शहरं
Join us  
Trending Stories
1
"कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
5
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
6
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
7
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
8
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
9
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
10
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
11
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
12
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
13
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
14
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
15
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
16
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
17
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
18
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
19
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
20
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   

मग दगड मारणारे हात कुणाचे?

By admin | Updated: September 9, 2016 16:43 IST

धुम्मस श्रीनगरमध्ये फिरताना दिसलेलं ‘बंद डोळ्यां’आडचं जग हा लेख ‘मंथन’मध्ये(दि. ४ सप्टेंबर) प्रसिध्द झाला. त्यावरच्या या काही निवडक प्रतिक्रिया

- मकरंद जोशीपेलेटमुळे दृष्टी गमावलेले श्रीनगरमधले तरुण स्वत: निरपराध आहेत म्हणतात, मग लष्करावर दगडफेक करणारे,  पेट्रोल बॉम्ब टाकणारे कोण होते?  लष्कराने जाणूनबुजून निरपराध्यांवर केलेला पेलेट हल्ला समर्थनीय नाही; पण मग सुरक्षा दलाच्या जवानांना  कोंडीत पकडून त्यांच्यावर दगड-विटांपासून जे मिळेल त्या हत्यारांचा वर्षाव करणारे कोण होते?दृष्टी नेमकी कुणी गमावली आहे?‘धुम्मस - श्रीनगरमध्ये फिरताना दिसलेलं ‘बंद डोळ्यां’आडचं जग हा (मंथन दि. ४ सप्टेंबर ०१६) लेख वाचला. श्रीनगरमधल्या फक्त एकाच हॉस्पिटलमध्ये सहाशेवर ‘पेलेटग्रस्त’ तरुण उपचारार्थ दाखल झाले आहेत आणि त्यातील बहुतेकांच्या बाबतीत कायमची दृष्टी गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे हे वाचल्यावर कोणाही संवेदनशील व्यक्तीला वाईट वाटणं स्वाभाविकच आहे. मात्र पर्यटनक्षेत्रात गेली बावीस वर्षे कार्यरत असल्याने आणि २००३ पासून नेमाने दरवर्षी किंवा वर्षाआड तरी काश्मीरला जात असल्याने हा वृत्तांत म्हणजे एक बाजू आहे याची जाणीवही झाली. हा वृत्तांत वाचल्यानंतर सर्वात आधी एक प्रश्न मनात उभा राहिला की, श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या पेलेटग्रस्तांकडे ‘क्रिकेट खेल रहा था.. पासून ते टॉयलेट जा रहा था’पर्यंत अनेक निरपराध कारणे आहेत, मग पोलिसांवर, लष्करावर दगडफेक करणारे आणि पेट्रोल बॉम्ब टाकणारे कोण होते? बरं हे दंगेखोर पळून गेल्यावर लष्कराने पेलेट्स चालवल्या का? का या दंगेखोरांचा दंगा बघायला जमलेल्या या सगळ्या ‘निरपराध जनतेवर’ लष्कराने पेलेटमार केला? लष्कराने जाणूनबुजून निरपराध्यांवर केलेला असा हल्ला कधीच समर्थनीय ठरणार नाही; पण मग गल्लीबोळात सुरक्षा दलाच्या जवानांना कोंडीत पकडून त्यांच्यावर दगड-विटांपासून जे मिळेल त्या हत्यारांचा वर्षाव करणे कोणत्या धर्मयुद्धात बसतं? काश्मीर खोऱ्यात लष्कराने केलेला अधिकाराचा गैरवापर आणि लष्कराने केलेले अत्याचार जसे निंदनीय आहेत त्याचप्रमाणे देशाच्या घटनेला आव्हान देऊन ऊठसूट हिंसक निदर्शनं करणंदेखील निंदनीयच आहे ना? गेली काही वर्षे काश्मीरमध्ये पर्यटकांना घेऊन फिरताना नेहमीच एक अदृश्य तणाव जाणवला आहे, काश्मिरातील लोकांनी त्यांच्याभोवती एक अदृश्य रिंगण आखून घेतलेलं आहे आणि ते स्वत: हे रिंगण ओलांडू इच्छित नाहीत ना बाहेरच्यांना या रिंगणात प्रवेश करू देतात. कधी हे रिंगण धर्माचं असतं तर कधी स्वतंत्र होण्याचं. नव्वदच्या आरंभापासून काश्मिरातील धुमसत्या बर्फाने पेट घेतला आणि चांगलाच भडका उडाला. या भडक्यामध्ये सगळ्यात जास्त होरपळून निघाली ती काश्मीरमधील अवाम. ज्या पर्यटनावर इथली अर्थव्यवस्था आधारलेली होती, तो कणाच मोडला. काश्मीरची दशा लुळ्यापांगळ्यासारखी झाली. पोट रिकामं असलं की माथी भडकायला (आणि भडकवायलाही) वेळ लागत नाही. या भडकलेल्या माथ्यांनी काश्मीरमध्ये पंडित विरुद्ध मुसलमान अशी उभी फूट पाडली आणि हजारो काश्मिरी पंडितांना आपलं वतन सोडून बेघर व्हावं लागलं. सीमेपलीकडून मिळणाऱ्या उसन्या मदतीवर काश्मिरातील तथाकथित अलगवाद्यांचा उन्माद टिकून राहिला; पण सर्वसामान्य जनता मात्र चटके बसल्याने जरा भानावर आली. नव्या सहस्रकाची सुरुवात झाल्यानंतर भ्रमनिरास झालेल्या काश्मिरी जनतेच्या लक्षात आलं की, जगण्यासाठी आपल्याकडे पर्यटन हाच ठोस आधार आहे. पुन्हा एकदा काश्मीरच्या धुमसत्या वाद्या शांत झाल्या, भारतीय आणि काही प्रमाणात परदेशी पर्यटकांची पावले काश्मीरकडे वळली. पण सुंभ जळला तरी पीळ गेला नव्हता. त्यात काश्मिरातल्या पेटत्या निखाऱ्यांवर आपापली रोटी शेकायला राजकीय पक्ष तयार होतेच. त्यामुळे काश्मीरची कथा मूळपदावर कधी येईल ते सांगता येत नव्हतं. साहजिकच निदर्शने, मोर्चे, बंद, लाठीमार, गोळीबार, बॉम्बस्फोट यासगळ्यांसह काश्मीरचा प्रवास सुरू राहिला.साधारणत: दर वर्षी किंवा वर्षा आड तरी व्यवसायाच्या निमित्ताने काश्मीरला गेल्यावर काही गोष्टी हमखास अनुभवायला मिळायच्या, एक तर काश्मीरमध्ये टोकाची आर्थिक विषमता आहे, शिक्षणाचा अभाव आणि सुविधांची वानवा,धार्मिक पुढाऱ्यांचा वरचष्मा आणि अनेक कारणांनी सर्वसामान्यांच्या मनात खदखदत असलेलं वैफल्य. त्यातच ‘काश्मिरियत’चा उभा केलेला बागुलबुवा - ज्या गोष्टीचा उपयोग पर्यटकांसाठी दरवाजे उघडण्यासाठी करायचा, ज्या परंपरेचा अभिमान दागिन्यासारखा मिरवायचा त्यागोष्टीची तटबंदी उभारून स्वत:ची विकासची वाट रोखण्याच्या मनोवृत्तीला काय म्हणायचं? या सगळ्यामुळे भारताच्या मुख्य प्रवाहाशी काश्मीरमधील सर्वसामान्य जनता जोडली गेली नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सिमेपलिकडून मिळणाऱ्या मदतीमधील कावा काश्मीरातल्या सर्वसामान्यांच्या लक्षात येऊ लागला आहे अशी धुसर चिन्हे दिसू लागली आहेत. याचा एक ताजा अनुभव आॅगस्ट २०१६ मध्ये आला. लडाखसाठी दरवर्षीप्रमाणे श्रीनगर- सोनमर्ग- कारगिल असा कार्यक्र म आधीच ठरवलेला होता. पण जुलैमध्ये सुरू झालेल्या गडबडीमुळे श्रीनगरमध्ये जायला तरी मिळेल का हा प्रश्न निर्माण झाला. त्यावर तोडगा तिथल्याच ट्रान्स्पोर्टरने सुचवला ‘साब आप को श्रीनगरमें रूकना पडेगा. आज कल रात को बारा बजेके बाद ही रोड ट्रान्स्पोर्ट चल रहा है’. १२ आॅगस्टला श्रीनगर एअरपोर्टवर उतरणाऱ्या मोजक्यÞा (फक्त१५-२०) मंडळींमध्ये आम्ही होतो. तिथून दल लेकवरच्या हॉटेलकडे जाताना एखाद्या बेशुध्द पेशंटसारखं स्मशान शांततेत गुरफटलेलं श्रीनगर पाहिलं. भर दुपारी शहरभर पसरलेली ती शांतता दचकवणारी होती. संध्याकाळी सहा नंतर दल लेकच्या बुलेवार्ड रोडवर जरा चहल पहल दिसू लागली. शिकारेवाले आमच्या सारख्या तुरळक दिसणाऱ्या पर्यटकांना अजिजिने विनवत होते, एरव्ही ज्या शिकारा राइडचे अडीचशे- तीनशे रु पये घेतात ती फक्त शंभर रूपयात द्यायला तयार होते. आमचा बस ड्रायव्हर गप्पा मारत होता, गेल्या महिन्याभरात पर्यटन थंडावल्यानं इथल्या शिकारेवाल्यांच्या आणि विक्र ेत्यांच्या घरातल्या चुली कशा थंड झाल्या आहेत हे त्यानं सांगितलं. त्याच्याबरोबरीनं आर्मीनं वापरलेल्या पेलेट गन्सबाबत त्याने तीव्र प्रतिक्रि या दिली. या पेलेट गनमुळे शेकडो मासूमांची दृष्टी हिरावल्याबद्दल संताप त्याने व्यक्त केला. ज्यांच्यावर सेनेनं पेलेट चालवली ते आंदोलक नव्हते का ? त्यांनी आधी पोलिसांवर, सैन्यावर दगड मारले नाहीत का ?’ या प्रश्नावर त्याच्याकडे इतकंच उत्तर होतं की ‘लेकीन ऐसी जादती मिलिट्रीवाले हमेशा करते आये है’. बरं या सगळ्यामुळे तुमचंच नुकसान सर्वात जास्त होतं हे आजपर्यंत नेहमी दिसून आलंय मग स्वत:च्या पायावर स्वत:च्या हाताने तुम्ही धोंडा का मारून घेता? या प्रश्नावर त्याने दिलेलं उत्तर वेगळं होतं ‘साब हम लोग मुस्लिम है पर हमे पाकिस्तानसे कुछ लेना देना नही, ना ही हम पाकिस्तानमें जाना चाहते है. हमको हिंदुस्थानमेही रहना है’. गेल्या दहा वर्षांमध्ये मी प्रथमच एका काश्मीरी माणसाकडून अशा प्रकारचं वक्तव्य ऐकत होतो. मग त्याला विचारलं ‘आपको पाकिस्तानसे लेना देना नही तो फिर पाकिस्तानी झंडे क्यो लहराते हो? हिंदुस्थानके खिलाफ क्यों नारेबाजी करते हो’त्यावर त्याचा प्रतिवाद होता ,‘साब घरमें भी झगडा हो जाता है, तो गुस्सें मे आदमी अनाप शनाप बकता है, अपने वालिदसे झगडा करता है मगर इसका मतलब वह तुरन्त घर छोडके जायेगा ऐसा तो नही होता.’ मग माझा पुढचा प्रश्न होता ‘आखीर आप लोग चाहते क्या हो ?’ तो म्हणाला ‘हम लोग इंडियामें ही रहना चाहते है. बस हम यह चाहते है की हमारे जो पुराने कानून है वो कायम रहे. सदियोंसे हमारे कानून चलते आयें है, हमपर बाकी के इंडियाके कानून मत थोपो.’ हे ऐकल्यावर काश्मीरातील परिस्थिती एका नव्या वळणावर उभी आहे याची जाणीव झाली.पेलेट गनचा वापर नैतिक आहे का? मानवतावादी दृष्टीकोन फक्त सुरक्षा दलांनी बाळगायचा आणि दहशतवाद्यांना मन:पूत हिंसाचार करायला मोकळं सोडायचं का ? - या प्रश्नांवरील चर्चा तशी न संपणारी आहे. आज गरज आहे ती मागचे संदर्भ बाजूला ठेवून काश्मीर प्रश्नाकडे बघण्याची. कोणी दोन पावलं पुढे यायचं आणि कोणी मागे जायचं, हा जर प्रतिष्ठेचा मुद्दा होणार असेल तर काश्मीर हे स्टेलमेट बनेल.ती वेळ येण्याआधीच भारत सरकारने आणि काश्मीरातील राज्य सरकारने मिळून कृती करायला हवी. काश्मीरची भूमी हवी आहे, जनता नाही‘लोकमत’च्या प्रतिनिधींचं प्रत्यक्ष श्रीनगरला जाणं व तेथील वास्तवाचं (आँखों देखा हाल) वर्णन मनाला चटका लावून जातं. आम्ही अनेक वर्षे हेच मांडतो आहोत, तर आम्हाला देशद्रोहीच ठरवलं जातं. कै. मुफ्ती मोहम्मद सैद माझे खूप जवळचे मित्र होते. दोनदा ते काश्मीरचे मुख्यमंत्री होते व प्रत्येक वेळी त्यांच्या निमंत्रणांवरून मी या भूमीवरीलच स्वर्गात गेलो होतो. ते म्हणत की, पाटीलसाहब, हमारा प्रमुख प्रश्न है हमारी मिलिटरी!’- पण असं म्हटल्यांबरोबर तथाकथित देशभक्त व काही प्रामाणिक मिलिटरीवाले आमचे जणू शत्रूच होतात. नरसिंहराव प्रधानमंत्री असताना ते अत्यंत खाजगीत म्हणाले होते,‘न्यायमूर्ती, काश्मीरचा ही दोन्ही देशांतील राज्यकर्त्यांची लाईफलाईन आहे. दोघांनाही हे भांडण कायम जिवंत ठेवण्यातच रस आहे. दोघांनाही काश्मीरची भूमी हवी आहे, जनता नाही.’ आज या वास्तववादी लेखाने, मला नरसिंहरावांची व मुफ्ती मोहम्मद सैद या दोन्ही मित्रांची आठवण झाली.ते म्हणत होते, ते कसं खरं आहे याची प्रचिती या लेखातून येते. या वास्तवदर्शी लेखाबद्दल मनापासून अभिनंदन! - न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील (निवृत्त)मंथनमधला लेख वाचला. ‘माणूस’ म्हणून अस्वस्थ झालो. आणि त्यासोबत काही प्रश्न पडले.कुणी सांगतो की,१ श्रीनगरच्या रस्त्यावर, गल्लीबोळातून जवानांवर दगड भिरकावणारे हात कोणाचे? ही दगडं कोण आणून देतंय त्यांच्या हातात? २ बाहेर संचारबंदी वा जमावबंदी लागू आहे, हे माहीत असताना माय-बाप या ‘निष्पाप’ लेकरांना घराबाहेर पाठवतात कसे?३ ज्या हाताला रोजगार नाही, ते हात दगडं का घेत आहेत? दगडं भिरकावल्याने पोट भरते का? हेही रोजगाराचे माध्यम आहे का?४ आर्मीवर दगडफेक करण्यासाठी, खोऱ्यात असंतोष कायम राखण्यासाठी सीमेपलीकडून तरु णाना ठरावीक ‘रक्कम दिली जाते’ या चर्चेत तथ्य किती आहे?५ गेली दोन महिने खोऱ्यातील असंतोषामुळे सारे काही ठप्प आहे. मग तेथील लोकांचे पोट कसे भरते? कोण खायला देते त्यांना? मोदी सरकार की मेहबूबा सरकार अन्नधान्य पुरवठा करते?६ ‘हमें चाहिये आजादी, लेके रहेंगे आजादी...’ या घोषणांचा व या ‘निष्पाप’ जख्मी तरु णांचा काही संबंध आहे की कसे? याचा लेखात तपशील आला नाही. (लेखाच्या पुढील भागात तो सविस्तराने येईल का?)७ आणि महत्त्वाचे म्हणजे, जे कोणी जवानांवर हल्ले करीत असतील, ते कोण आहेत? त्यांच्यापैकी किमान एक तरी माथेफिरू सापडला का? त्याने काय सांगितले असेल? का करतोय हे सगळे? कोणासाठी व कोणाच्या सांगण्यावरून जवानांवर हल्ले केले जात आहेत? ८ माथेफिरुं च्या हल्ल्यात किती जवान जख्मी झाले, शहीद झाले? याची चर्चा कोण करणार?- विजयकुमार स्वामी, लातूरअजून कठोर पाऊल उचला..काश्मीरमधील तरु ण आपली दृष्टी गमवताहेत हे वाचून वाईट वाटलं; पण लेखातलं हे चित्र एकतर्फी आहे असं मला वाटतं. तरुण मुलं खेळताहेत आणि त्या निरपराध्यांवर सैन्य पेलेट गन चालवत असेल हे कोण्त्याही विचार करणाऱ्या माणसाला समजण्यापलीकडचं आहे. काश्मिरी तरुण एवढे शांती प्रिय आहेत, तर दगडफेक, जाळपोळ काय देशातील इतर भागातील तरुण काश्मीरमध्ये जाऊन करताहेत का? जी तरुण मुलं बुरहाणवाणी सारख्यांना आपले हिरो बनवत रस्त्यावर येत आहेत त्यांना रोखण्यासाठी भारतीय सैन्याने काय करायला हवं? मी सैन्याचं समर्थन करतो आणि यापेक्षापण कठोर पावलं त्यांनी उचलली पाहिजेत, असं मला वाटतं. - गोपाळ पवार(लेखक पर्यटन क्षेत्रात सहल संयोजक आहेत.)

makarandvj@gmail.com