शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पुण्यातील नाट्यगृहे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 07:00 IST

काहीवेळा नाटकांच्या प्रयोगाची तिकीट विक्री झालेली असते. शाळेचे किंंवा बुकिंग केलेल्या संस्थांचे कार्यक्रमाची निमंत्रणेदेखील गेलेली असतात, पण अशावेळी राजकीय पक्षाचे कार्यक्रम ठरतात...

- अंकुश काकडे-  अर्थात ही महापालिकेची नाट्यगृहे मुख्यत: नाटकांसाठी, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी बांधण्यात आलीत. सुरुवातीच्या काळात ती नाटकांसाठीच वापरली जात होती. परंतु, गेल्या १०-१५ वर्षांत नाटकांशिवाय महापालिकेचे कार्यक्रम, विविध पक्षांचे कार्यक्रम, मेळावे, अधिवेशन, शाळांची स्नेहसंमेलन यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागलाय, त्यामुळे अनेक वेळा वाद होऊ लागलेत. काही वेळा नाटकांच्या प्रयोगाची तिकीट विक्री झालेली असते. शाळेचे किंंवा बुकिंग केलेल्या संस्थांचे कार्यक्रमाची निमंत्रणेदेखील गेलेली असतात, पण अशावेळी राजकीय पक्षाचे कार्यक्रम ठरतात. त्यासाठी त्यांचे व्हीआयपी येणार म्हणून ज्यांनी नियमानुसार बुकिंग केलेले असते, पैसे जमा केलेले असतात, त्यांचे कार्यक्रम त्यांना रद्द करण्यास सांगितले जातात. याबाबत अनेक वेळा आंदोलने झाली, पण सत्ताधाऱ्यांना त्याची फिकीर नसते. विशेषत: बालगंधर्व रंगमंदिराच्याबाबतीत असे प्रसंग अनेक वेळा घडले आहेत.महापालिकेने स्वत:चा विचार करीत असताना समोरच्या नाट्यसंस्थेचा, इतर संस्थांचाही विचार करायला हवा. आज शहरात ही नाट्यगृहे असताना लाल देवळाजवळ असलेले नेहरू मेमोरियल हॉल हे कॅम्पमधील नाट्यगृह, शहरापासून थोडंसं दूर असलेलं तसेच जवळपास नागरी वस्ती नसल्यामुळे तेथे मराठी नाटकांचे कार्यक्रम फारसे होत नाहीत. पण हिंंदी, इंग्रजी, गुजराती नाटके बऱ्यापैकी होतात. खासगी असल्यामुळे तेथील स्वच्छतागृहे हीदेखील उत्तम असतात हे महत्त्वाचे. ही सर्व नाट्यगृहे पाहत असताना आपल्याला लक्ष्मी रोडवरील डुल्या मारुती मंदिराजवळ असलेलं आर्यभूषण तमाशा थिएटर विसरता येणं शक्यच नाही! १००-१२५ वर्षांपूर्वी सुरू झालेलं हे तमाशा थिएटर १९३३ पासून कै. अहमदशेठ तांबे आणि त्यानंतर त्यांची सर्व मुले आजपर्यंत या कठीण परिस्थितीतही चालवित आहेत. आजही या ठिकाणी १००-१२५ तमाशा कलावंत आहेत, तसेच या थिएटरला फार मोठा राजकीय, सांस्कृतिक वारसा आहे. या थिएटरमध्ये आपली कला सादर केलेल्या कलावंतांची नावे पाहिली तर सध्याच्या तरुण पिढीला निश्चितच आश्चर्य वाटेल. यमुनाबाई वायकर या ६-७ वर्षे तेथे राहण्यास होत्या, त्यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पदक देऊन गौरविले होते. आर्यभूषणमध्ये तुकाराम खेडकर, तमाशा सम्राट काळू-बाळू यांचे फड कायम असत. भाऊ बापू मांग नारायणगावकर यांचा तमाशा फड आणि त्यात सहभाग घेणाºया त्यांच्या ३ मुली विठाबाई, केशरबाई, मनोरमा यांनी या क्षेत्रात केलेली उत्तुंग प्रगती थक्क करणारी आहे. विठाबार्इंना तर संगीत अकादमी पुरस्कार २ वेळा प्राप्त झाले होते. तसेच राष्टÑपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते १९५७ मध्ये राष्टÑपती पदक देऊन गौरविले होते.१९५५-५६ च्या काळात मोरारजी देसाई यांनी तमाशाबंदीचा निर्णय आणला होता, त्याला विरोध करण्यासाठी या थिएटरमध्ये परिषदा होत त्याला वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, ह. रा. महाजनी, राजाभाऊ थिटे एवढेच काय पु. ल. देशपांडे हेदेखील तेथे हजर होते. विशेष म्हणजे त्यांनी त्यावेळी हार्मोनियमवर ‘झाला महार पंढरीनाथ’ हे गीत सादर केले होते, अशी आठवण श्री. नूरमहंमद तांबे सांगतात. दादू इंदुरीकर, तुकाराम खेडेकर, जगताप पाटील, निळू फुले, राम नगरकर येथे नियमित येत असत. उषा चव्हाण यांनी लहानपण येथे घालवले, अनंत माने यांच्या ‘सांगत्ये ऐका’ या गाजलेल्या चित्रपटातील सर्व महिला सहकलाकार याच थिएटरमधील होत्या, अशीही माहिती मिळते. पूर्वी चवली-पावली असे चलन होते, त्यावेळी येथील कार्यक्रमांना पावली म्हणजे सध्याचे २५ पैसे तिकीट होते. आता हेच तिकीट २५ रुपये झाले असल्याचे नूरमहंमद तांबे यांनी सांगितले. आजही हे थिएटर फारशी सुधारणा न होता, आहे त्या स्थितीत अजूनही सुरू आहे, हे विशेष म्हणावे लागेल. (उत्तरार्ध) (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकartकला