खिळवून ठेवणारे ‘ओटीटी’चे विश्व

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 12:52 PM2022-04-17T12:52:07+5:302022-04-17T12:53:23+5:30

अलीकडे ग्राहकांच्या पाहण्याच्या सवयी खूप विकसित झाल्या आहेत. ओटीटीचा आज बोलबाला आहे. त्याबद्दल...

The world of OTT that keeps you hooked | खिळवून ठेवणारे ‘ओटीटी’चे विश्व

खिळवून ठेवणारे ‘ओटीटी’चे विश्व

Next

अमित भंडारी, माध्यम तज्ज्ञ, मुंबई -

रतीय ओव्हर द टॉप (ओटीटी) एंटरटेन्मेंट इंडस्ट्री अब्जावधी-डॉलर्सची उड्डाणे घेत आहे. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत नवीन चमचमीत आणि आकर्षक कॉन्टेंट तितक्याच तत्परतेने सादर करण्याच्या अहमहमिकेत पारंपरिक टेलिव्हिजन, रेडिओ आणि सिनेमा ऑडिटोरियमच्या प्रस्थापित बालेकिल्ल्यात एव्हाना सुरूंग पेरले आहेत.

पुढील काळात स्ट्रीमिंग उद्योगासाठी सर्वात मोठा उदयोन्मुख ट्रेंड म्हणजे भौगोलिक सीमा आणि भाषेतील अडथळे दूर होत असल्याने इंटरनेट कनेक्टिव्हिटीने दूरस्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. बहुतांश प्रेक्षक आता सुजाण झाला आहे. म्हणूनच ग्लोबल कॉन्टेण्टसाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षक हा स्थानिक असो वा जागतिक दोन्ही, हुशार, अधिक संवेदनाक्षम आणि अधिक गंभीर बनला आहे. यामुळेच कॉण्टेण्ट निर्माते आणि वितरक यांची जबाबदारी वाढली आहे. उत्तम नेटवर्क, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोन्सच्या प्रवेशासह, भारतातील ओटीटी प्लॅटफॉर्मने समवर्ती आधारावर वाढत्या प्रमाणात ग्राहकांना आकर्षित केले आहे.  डिस्ने-हॉटस्टार, ॲमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्स या टॉप फेव्हरेट्स व्यतिरिक्त, स्पेस अनेक स्थानिक आणि प्रादेशिक प्लेयर्स आहेत. वानगीदाखल सांगायचे झाले तर सोनी लिव्ह, वूट, एमएक्स प्लेअर, झी५, एरोस नाऊ, एएलटी बालाजी आदी. लायन्सगेट प्ले आणि डिस्कवरी प्लस हे प्लॅटफॉर्मसुध्दा हळूहळू आपले जाळे भारतात विस्तारित आहेत. यासोबतच मराठीतील येऊ घातलेले वन ओटीटी आणि अस्तित्वात आलेले प्लॅनेट मराठी हे मराठी मधील सध्याचे प्लेअर्स आहेत. 

कोविडने प्रेक्षकांच्या मनोरंजन सवयीत बदल झाला आहे, हे मान्य करावे लागेल. मीडिया वापरण्याच्या त्यांच्या पद्धतीत आमूलाग्र बदलल घडला आहे. या काळात ओटीटी स्वीकारून एक निर्विवाद ट्रेंड समोर आला. तसं पाहायला गेलं तर हा काळ असाधारणच मानायला हवा. जेथे अनेक पारंपरिक क्षेत्रांवर साथीच्या रोगाचा नकारात्मक परिणाम झाला आहे. उलट कोविडने ग्राहकांच्या अभिरूचीत, प्राधान्यक्रमात आणि निवड स्वातंत्र्यात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.

२०२२ मध्ये डिजिटल ऑडिओव्हिज्युअल उद्योगाचा स्फोट होईल. बेन आणि कंपनीच्या मते, भारतातील ऑनलाइन व्हिडिओ वापरकर्त्यांची संख्या ३५० दशलक्षांपेक्षा जास्त झाली आहे, जी गेल्या तीन वर्षांत २४% वाढली आहे.  इंफ्लुएंसर मार्केटिंग वेगाने सूक्ष्म-प्रभावकांचा समावेश करेल आणि केवळ सेलिब्रिटी प्रभावांवर अवलंबून राहणार नाही.  चीनमध्ये  आंतरराष्ट्रीय ओटीटीमधील गुंतवणूकदारांसाठी कडक निर्बंधात्मक असलेले वातावरण पाहता आंतरराष्ट्रीय ओटीटी खेळाडूंच्या ग्राहकसंख्येला चालना देण्यासाठी भारत हा अमेरिकेनंतरचा पुढचा बालेकिल्ला आहे. त्यात भरीस भर म्हणून कॉमकास्टच्या मालकीचे ‘पीकॉक’ आणि एचबीओसारखे अनेक आंतरराष्ट्रीय प्रवेशकर्ते कुंपणावर बसून भारतात आपला ठसा उमटवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या बदलत्या ट्रेंडला आत्मसात करून घरोघरी ओटीटी अन् त्यामध्ये झपाट्याने होणारी वाढ पाहता, हा उद्योग येत्या काही वर्षांत अधिक सक्षम होईल हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. 

दर तीन वर्षांला साधारणपणे तंत्रज्ञान हे विकसित होतं आणि त्या नंतर उद्भवणाऱ्या संक्रमणावस्थेतून माध्यमांना जावं लागतं. आजही प्रादेशिक भाषांमधील ओटीटी प्लॅटफॉर्म्सना तोटा सहन करावा लागत असला तरी परकीय गुंतवणूक आणि विविध  माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक पाठबळामुळे पुढील पाच वर्षांपर्यंतचे बिझनेस  व्यावसायिक नियोजन निश्चितच केलेले आढळते. नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवत असताना त्या तंत्रज्ञानाच्या वापरातील  सुलभता हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे नवं तंत्रज्ञान विकसित होईपर्यंत आता प्रेक्षकांच्या प्राधान्यक्रमावर कॉन्टेंट आर्थिक घडी बसवणे, हा यक्षप्रश्न कायम उभा असेल.

- उद्योग चालविणारे प्रमुख घटक
- जगात ऑनलाइन व्हिडीओचा दरडोई वापर भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- जगातील सर्वात स्वस्त मोबाइल डेटा १८.५रुपये/जीबी (२०१५ - ३१३रुपये/जीबी)
- ग्रामीण इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये लक्षणीय वाढ
- भारतात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या खगोलीय दराने वाढत आहे.
५०% पेक्षा जास्त वाढ -
दोन वर्षांमध्ये ओटीटी वापरकर्त्यांमध्ये अंदाजे ३०-३५% आणि सशुल्क सदस्यतांमध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 
 

Web Title: The world of OTT that keeps you hooked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.