टेंभली.
By Admin | Updated: October 24, 2015 19:03 IST2015-10-24T19:03:09+5:302015-10-24T19:03:09+5:30
आधार कार्डची योजना देशात सर्वप्रथम राबवली गेली, ते नंदुरबार जिल्ह्यातलं आदिवासी गाव टेंभली आणि देशात पहिल्यांदा ‘आधार’ मिळालेली महिला रंजनाबाई. काय स्थिती आहे आज त्यांची?

टेंभली.
>- रमाकांत पाटील
टेंभली..
शहादा तालुक्यातील लोणखेडा-पुरुषोत्तमनगर साखर कारखाना या हमरस्त्यावरच लोणखेडा गावापासून अर्धा किलोमीटर आत संपूर्ण आदिवासी लोकवस्तीचे हे गाव. गावाची लोकसंख्या 1575. पाच वर्षापूर्वी म्हणजे 29 सप्टेंबर 2क्1क् चा दिवस या गावासाठी अक्षरश: ‘सोनियाचा दिन’ होता. आजर्पयत कोणाच्या कानी नसलेले हे गाव अचानक जिल्ह्यात, राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत आले. त्याला निमित्तही तसेच होते. तेव्हाच्या यूपीए सरकारने ‘आधार’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आणि त्याची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असलेल्या टेंभली या गावापासून केली.
विशेष म्हणजे, त्याच्या शुभारंभासाठी स्वत: तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी आल्या होत्या. त्यावेळी हे गाव देशात झळाळून उठले होते, पण आज पुन्हा ते काळोखाचा अनुभव घेत आहे.
‘आधार’ योजनेबाबत स्थानिक आदिवासींना तेव्हाही पुरेशी माहिती नव्हती आणि योजना सुरू झाल्यानंतर आजही पुरेशी माहिती नाही. आधारचे कार्ड आपल्याला दिले म्हणजे सरकार आपल्याला सर्व योजनाच देणार हीच भावना तेव्हाही होती व आताही आहे.
‘आधार’चे देशातले पहिले कार्ड ज्या महिलेला दिले गेले त्या रंजनाबाई सदाशिव सोनवणो यांनी आजही आधारचे कार्ड एखाद्या धनादेशाप्रमाणो जपून ठेवले आहे. घरात त्या, त्यांचे पती आणि तीन मुले असा पाच जणांचा परिवार. गावाच्या मध्यभागी रस्त्यावरच पत्र्याचे छप्पर आणि मातीच्या भिंती असलेले त्यांचे घर. शेती अथवा उत्पन्नाचे कुठलेही साधन नसल्याने हातमजुरीवरच त्यांची गुजराण होते. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा त्यांच्याशी काही बोलण्याआधी त्यांनी स्वत:हूनच प्रश्न केला, ‘आधार’ची चौकशी करायला आलात का?.. गेल्या पाच वर्षापासून अनेक जण मला भेटून गेले.. सर्वाना उत्तरे देत मी थकले.. पण कुणी काही दिले नाही. घराला वीज दिली होती, मीटर बसविले होते पण तेही काढून नेले. आता काय करू त्या आधार कार्डचे तुम्हीच सांगा..’
रंजनाबाई म्हणाल्या, ‘जेव्हा खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते सर्वप्रथम आधार कार्ड मला दिले गेले तेव्हा मला अगदी स्वप्नवत वाटत होते. माङया जीवनाचे सार्थक झाले असे वाटले होते. आलेला प्रत्येक अधिकारी सांगायचा, या कार्डमुळे तुम्हाला अमुक मिळेल, ढमुक मिळेल, तुमचं आयुष्यच बदलून जाईल. पण आजतागायत काही म्हणता काही मिळालं नाही. बाकी गोष्टींचं सोडा, धड रेशनसुद्धा व्यवस्थित मिळत नाही. घराला त्यावेळी मीटर बसवून वीज दिली होती, परंतु आता तेही काढून घेऊन गेले. आधार कार्डमुळे आमचे बँकेचे खाते उघडले पण त्या खात्यावर कुठल्याही योजनेचे अनुदान मिळालेले नाही. त्यावर केवळ मुलांची शिष्यवृत्ती जमा होते. यापलीकडे काही नाही.
रंजनाबाई सोनवणो यांच्याप्रमाणोच गावातील इतर महिलांचीही अवस्था आहे. जसोदाबाई चेंडूळ, शोभाबाई इंजोळी, केनाबाई पवार यांच्या प्रतिक्रियादेखील थोडय़ाफार फरकाने सारख्याच. सर्वाचे रडगाणो एकच. आधार कार्ड दिले तेव्हा आम्हाला खूप आश्वासने दिली होती. आमच्या हाती मात्र काहीच आले नाही..
टेंभली हे गाव आज पूर्णपणो ओस झाल्यासारखे आहे. जवळपास 75 टक्के लोक रोजगारासाठी गुजरातमध्ये स्थलांतरित झाले आहेत. येथील लोक दरवर्षी सप्टेंबर ते मार्च महिन्यार्पयत स्थलांतरित होतात. यावर्षीही गावातून जवळपास 12 ट्रक भरून लोक गुजरातमधील सोमनाथ येथे कामाला गेले आहेत. तेथे कारखान्यात आणि शेतीची कामे करतात. लोक स्थलांतरित झाल्याने त्यांच्यासोबत शाळेत शिकणारी मुलेही गेली आहेत. त्यामुळे शाळेतही विद्याथ्र्याची संख्या रोडावली आहे. मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार 17क् पैकी 83 मुले स्थलांतरित झाली आहेत. जे लोक गावात आहेत ते मात्र अजूनही आधार कार्डवर ‘आधार’ शोधत आहेत. सरकारने दिलेले हे कार्ड अनमोल असल्याची त्यांची भावना पक्की असल्याने त्याला जपून ठेवले आहे. आज ना उद्या कुणी तरी अधिकारी येईल आणि या आधार कार्डवर ‘आधार’ देऊन आयुष्य बदलेल, अशी आशा त्यांना लागून आहे.
कार्डाचा ‘आधार’ 1क्क् टक्के!
4टेंभली गाव नंदुरबार जिल्ह्यातील 1क्क् टक्के आधार गाव ठरले आहे. जवळपास 99 टक्के लोकांना कार्ड प्राप्त झाले आहे. नंदुरबार जिल्हादेखील ‘आधार’ नोंदणीबाबत आघाडीवर आहे. राज्यात विकासाच्या बाबतीत भलेही जिल्ह्याचे नाव शेवटी घेतले जात असले, तरी ‘आधार’च्या बाबतीत मात्र पहिल्या पाच जिल्ह्यांत स्थान मिळवले आहे. जिल्ह्यात एकूण 15 लाख 24 हजार 338 जणांची आधार नोंदणी (92.56 टक्के) झाली आहे. त्यापैकी 14 लाख 45 हजार 815 जणांना (87.क्8 टक्के) कार्ड मिळाले आहे.
4आधारमुळे बहुतांश कुटुंबांचे बँकेत खाते उघडले गेल्याने विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती, गॅस कनेक्शन, स्वस्त धान्य दुकान, निराधार योजना, विशेष घटक योजनेतील वैयक्तिक लाभाच्या योजना यासाठी या कार्डचे महत्त्व वाढले आहे. जिल्ह्यात 57 ते 63 टक्के कुटुंबांना योजनांच्या लाभासाठी या कार्डचा वापर झाल्याचा यंत्रणोचा दावा आहे.
(लेखक ‘लोकमत’च्या जळगाव आवृत्तीत
उपमुख्य उपसंपादक आहेत.)
patilramakant24@yahoo.com