शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अध्यात्मिक; देशाच्या प्रतिष्ठेसाठी सुसज्ज रहायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 8:00 AM

दोन प्रवृत्तीत युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने शिष्टाईची सर्वतोपरी शिकस्त केली. परंतु यश आले नाही. शेवटी युद्ध हाच एक पर्याय ठरला. याचा अर्थ हाच की, सख्खा भाऊ जरी अन्याय करीत असेल तरी त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसंकलन: बाबा मोहोडमित्रहो! वास्तविक तुम्ही गुरुजनांच्या अत्यंत जवळ आहात. परंतु असे असूनही बरेच वर्षानंतर आपल्या भेटीचा योग आला. आपल्या भेटीने मला आनंद झाला. सध्याचे दिवसच असे आहेत की यावेळी भारतीय माणसाचे मन स्थिर नाही. तो उत्सवात असला तरीही त्याच्या मनात फार मोठी चिंता व्यापून राहिली आहे. सध्या आपल्यावर पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाला तोंड कसे द्यावे, याच विचाराने प्रत्येक भारतीय माणूस काळजीत पडला आहे.आपला देश एक स्वतंत्र देश आहे. कोणत्याही स्वतंत्र देशाला एक वेगळी प्रतिष्ठा असते. आपल्याही देशाला ती आहे. तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. प्रसंगी पडेल ती किंमत देऊनही देशाची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी आपण सुसज्ज राहिले पाहिजे.आपली परंपरा : आपला देश एक जगावेगळा देश आहे. जगात पुष्कळ देश आहेत. पण ते सारे एकेका धर्माचे आहेत. पण ज्यांत अनेक धर्म, वंश आणि पक्ष आहेत असा भारत हा एकच देश आहे. एखाद्या प्रसन्न बगिचासारखे त्याचे स्वरूप आहे. नीती, न्याय हा आमचा आधार आहे. आम्ही कोणाचाही अन्याय सहन करणार नाही आणि कोणावर आक्रमणही करणार नाही. जर कोणी आमच्याशी प्रेमाने राहत असेल तर तो आमचा मित्र आहे. आम्ही कोणाचाही द्वेष करीत नाही. कोणत्याही धर्माच्या, पक्षाच्या माणसाशी आमचे नाते जुळते. त्याच्यासाठी आम्ही आमचे सर्व काही अर्पण करू शकतो.मित्रहो, ज्या-ज्या वेळी भारत युद्धासाठी उभा राहिला त्या-त्या वेळी भारतामागे धर्माची, पक्षाची व जातीची भावना नव्हती. शिवाजी महाराज हा येथला एक वीरपुरुष. त्याने देशभर युद्ध केले. परंतु ते कोणाही धर्माविरुद्ध, जातीविरुद्ध नव्हते. अन्यायाविरुद्ध ते युद्ध होते. शिवाजीच्या सैन्यात अनेक मुसलमान होते. शिवाजीने अनेक देशद्रोही हिंदूंना नेस्तनाबूद केले होते. आता आता महात्मा गांधींनीही असेच केले. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी जन्मभर इंग्रजांशी लढा दिला परंतु अनेक इंग्रज त्यांचे मित्र राहिले. माझी लढाई इंग्रजांशी नसून इंग्रजी सत्तेशी आहे असे ते म्हणत. याचा अर्थ एवढाच की, भारत कोणालाही गुलाम करू इच्छित नाही आणि तो कोणाचाही गुलाम राहू इच्छित नाही.भारतीय विचार :- भगवान श्रीकृष्णांनी महाभारत निर्माण केले. ते एका कुटुंबातच निर्माण झाले आहे. त्या सर्वांची जात, धर्म आणि वंश एकच आहे. पण त्यांच्यातही घनघोर युद्ध झाले. कारण एकच, एका बाजूला न्याय आणि एका बाजूला अन्याय अशी तिथे स्थिती होती. एकीकडे पांडव पाच गावावर समाधान मानण्यास तयार होते. तर दुसरीकडे कौरव सुईच्या टोकावर राहील एवढी जमीनही देण्यास तयार नव्हते. अशा दोन प्रवृत्तीत युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने शिष्टाईची सर्वतोपरी शिकस्त केली. परंतु यश आले नाही. शेवटी युद्ध हाच एक पर्याय ठरला. याचा अर्थ हाच की, सख्खा भाऊ जरी अन्याय करीत असेल तरी त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक