स्वयंसिद्ध शेती तंत्र एक यशोगाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 05:41 PM2019-06-21T17:41:01+5:302019-06-21T17:43:41+5:30

शेतकºयांना कृषी विज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी २० वर्षांपूर्वी वयाच्या ४४ व्या वर्षी मी राजीनामा देऊन मोकळा झालो आणि लवकरच ‘पोहनकर फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची (चॅरिटेबल ट्रस्ट) रीतसर नोंदणी करण्यात आली.

Selfmade Farming Mechanism A Success Story | स्वयंसिद्ध शेती तंत्र एक यशोगाथा

स्वयंसिद्ध शेती तंत्र एक यशोगाथा

googlenewsNext

आजपासून ३४ वर्षांपूर्वी १९८५ सालचा आॅगस्ट महिना. एका जर्मन कंपनीच्या कृषी विभागातील कृषी अधिकारी या नात्याने मी विदर्भातील शेतकºयांना भेटत होतो. कोणत्याही कृषी सेवा केंद्रात गेलो की शेतकरी त्या दुकानदाराशी काय बोलतात, याचे बारकाईने निरीक्षण करण्याची मला सवय होती. यवतमाळ जिल्ह्यातील एका दुकानात कोपºयात बसून कीटकनाशकांची खरेदी करायला आलेल्या शेतकºयांचे बोलणे मी ऐकत असतानाच तिथे एक शेतकरी आला आणि त्याने दुकानदाराकडे एका कीटकनाशकाची मागणी केली. दुकानदाराने कोणतीही चौकशी न करता त्याला एक लीटरची बाटली दिली. तो शेतकरी ते कीटकनाशक नक्की कशासाठी फवारणार आहे, हे जाणून घेण्यासाठी मी दुकानाबाहेर पडलो आणि आपल्या गावाकडे निघालेल्या त्या शेतकºयाला भेटलो. तो म्हणाला, माझ्या पिकावर कीड नाही. हे कीटकनाशक मी कपाशीचे पीक हिरवेगार करण्यासाठी फवारणार आहे. त्याचा त्या कीटकनाशकावर इतका प्रचंड विश्वास होता की, त्याचा गैरसमज दूर करण्याच्या फंदात मी पडलो नाही. त्या काळी खिशात मी नेहमी काही पुड्या बाळगत असे. मी त्या शेतकºयाला एक पुडी दिली, तिच्यातील पावडर १५ लीटर पाण्यात मिसळून फवारण्याचा सल्ला दिला आणि एक आठवड्यानंतर पुन्हा त्याच दुकानात भेटण्याचे आश्वासन देऊन त्याचा निरोप घेतला. एक आठवड्यानंतर त्या कृषी सेवा केंद्रात तो शेतकरी माझी वाटच बघत बसला होता. मी दिलेली भुकटी फवारून त्याची कपाशी चारच दिवसांत हिरवीकच झाली होती आणि कीटकनाशकाची बाटली त्याने दुकानदाराला परत केली होती. तो मला दुकानाबाहेर घेऊन गेला आणि हळूच मला म्हणाला, साहेब, तुमच्याकडे आणखी पुड्या आहेत का, मी पैसे द्यायला तयार आहे. किती आहे एका पुडीची किंमत, मी त्याला म्हणालो, भाऊ, एका पुडीचे पैसे देण्याइतकी तुमची ऐपत नाही. तो संतापला आणि म्हणाला, साहेब, ऐपत कोणाची काढता, किंमत तर सांगा आणि त्याने खिशातून काही नोटा काढल्या. मी शांतपणे त्याला सांगितले, भाऊ, या पुडीची किंमत आहे पाच पैसे आणि ते नाणे आता चलनातून बाद झाले आहे!’ एखाद्या शेतकºयाने गैरसमजामुळे खर्च केलेले शंभर रुपये मी केवळ पाच पैशात वाचवू शकतो तर पिकांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात का कमी करू शकणार नाही? 
या प्रश्नाने मला अस्वस्थ केले आणि त्याच क्षणी माझ्या मनात जन्म झाला शेतीचे व शेतकºयांचे आयुष्य बदलून टाकणाºया एका जगावेगळ्या तंत्राचा ज्याचे काही वर्षांनंतर ‘स्वयंसिद्ध शेती तंत्र’, असे नामकरण करण्यात आले. विदर्भातील शेतकºयांबरोबरच कोकणातील शेतकºयांनाही कंपनीच्या उत्पादनांची माहिती देण्याची जबाबदारी कंपनीने माझ्यावर सोपविली असल्यामुळे दिवाळीनंतर तीन महिने मी माझ्या अत्यंत आवडत्या कोकणात मनसोक्त भटकंती करीत असे. गावा-गावांत जाऊन आंबा व काजू बागायतदारांना भेटून पीक संरक्षणाबद्दल मार्गदर्शन करणे हे माझे मुख्य काम होते. आंबा पिकावरील ‘तुडतुडे’ या किडीमुळे प्रचंड वैतागलेल्या व तिच्या नियंत्रणासाठी लाखो रुपये खर्च करणाºया आंबा बागायतदारांच्या बागांना भेटी देताना माझ्या मनात वेगळेच विचार घोळू लागले. ५७ वर्षांपूर्वी मी सात वर्षांचा असताना मध्य प्रदेशातील पोहनकर कुटुंबीयांच्या शेतीत पांढरे खडे मीठ शेतात टाकताना मी बघितले होते. काही वर्षांनंतर त्याची शास्त्रीय कारणे जाणून घेतल्यामुळे मिठाचा महिमा मला कळून चुकला होता. एक दिवस मी छोट्या हातपंपात कोकणातील वेंगुर्ल्याच्या समुद्रातील पाणी भरले आणि आंब्याच्या काही कलमांवर अत्यंत गोपनीयरीत्या त्या पाण्याची फवारणी केली. त्या फवारणीने चमत्कार घडला आणि अवघ्या ४८ तासांत एकही तुडतुडा शिल्लक राहिला नाही. समुद्राच्या पाण्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर माझा आत्मविश्वास बराच वाढला आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अत्यंत महागड्या उत्पादनांवर अवलंबून न राहता ‘मीठ’ नावाचा एक अत्यंत स्वस्त पण जबरदस्त ‘जादूई चिराग’ शेतीत व शेतकºयांच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो, याबद्दल माझी खात्री पटली. मी जरी कीटकनाशकांचा व्यवसाय करणाºया एका मोठ्या कंपनीचा अधिकारी असलो तरी पिकांवर विविध प्रयोग करण्यापासून मला कोणी थांबवू शकणार नव्हते; पण ३५ वर्षांपूर्वी केलेल्या या अत्यंत यशस्वी प्रयोगाची जर मी वाच्यता केली असती तर कोकणातील कृषी सेवा केंद्रांचा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय एका रात्रीत ठप्प झाला असता आणि माझी नोकरीही गेली असती. अखेर मी सुज्ञपणे गप्प बसण्याचा निर्णय घेतला! 
कृषी सेवा केंद्रांना व शेतकºयांना भेटी देत असताना शेतकºयांना योग्य सल्ला देणाºया व्यक्तींचा प्रचंड तुटवडा मला जाणवला. शेतकºयांच्या भल्यापेक्षा व्यवसाय व नफा वरचढ ठरू लागल्यामुळे खरा सल्ला देणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालली होती. बाजारात कंपन्या व त्यांच्या विविध उत्पादनांमध्ये स्पर्धा वाढू लागली होती, ज्यामुळे विक्रीची उद्दिष्टे (टार्गेट्स) वेळेत पूर्ण करण्याच्या जीवघेण्या धावपळीत शेतकºयांची दिशाभूल करणाºया व त्यांना विनाकारण खर्चात पाडणाºया अयोग्य सल्ल्यांना ऊत आला होता. चुकीच्या सल्ल्यामुळे अळ्या मारण्यासाठी मायक्रोन्युट्रीयंट्स (टॉनिक) फवारणारे अनेक महाभाग मला त्या काळात भेटले आहेत! हे प्रकार जर थांबले नाहीत तर कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करू लागतील, अशी भीती मला वाटू लागली आणि शेतकºयांना कृषी विज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी २० वर्षांपूर्वी वयाच्या ४४ व्या वर्षी मी राजीनामा देऊन मोकळा झालो आणि लवकरच ‘पोहनकर फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची (चॅरिटेबल ट्रस्ट) रीतसर नोंदणी करण्यात आली. कोणाकडूनही देणगी स्वीकारायची नाही व कोणालाही देणगी द्यायची नाही आणि शेतकरी व त्यांच्या मुलांसाठी आयोजित केल्या जाणाºया कोणत्याही कार्यक्रमासाठी एकही रुपया मानधन स्वीकारायचे नाही, या दोन महत्त्वाच्या तत्त्वांवर ‘पोहनकर फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात होणारे शोषण थांबविण्यासाठी त्यांना कृषी क्षेत्रातील मूलभूत गोष्टींबद्दल माहिती देऊन त्यांचे गैरसमज, अंधश्रद्धा दूर करणे आवश्यक होते. माती, पाणी, बियाणे, खते, मशागत, पीक संरक्षण, पिकांचे मूल्यवर्धन अशा अनेक विषयांवर शेतकºयांशी चर्चांना सुरुवात झाली. अनेक पिढ्यांपासून शेती करणाºया शेतकºयांसाठी उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करणाºया यातील कितीतरी गोष्टी आश्चर्यचकित करणाºया होत्या. लवकरच कार्यशाळेला शेतकºयांची गर्दी होऊ लागली. ज्या काळात सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, मिठावरील शेती, झीरो बजेट शेती अशा विविध शेती तंत्रांची नावेही कोणाच्या कानावर पडली नव्हती. त्या काळात शेतकºयांना शेतीविषयी मूलभूत माहिती देऊन त्यांना निसर्गाजवळ नेण्यास कार्यशाळेने सुरुवात केली. हरितक्रांती ऐन जोमात होती. रासायनिक खते, संकरित बियाणे, जहाल कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा शेतकºयांवर पाऊस पाडण्यासाठी सरकारी व खासगी कंपन्या स्पर्धेत उतरल्या होत्या आणि कसेही करून आपली उत्पादने शेतकºयांच्या माथी मारण्यासाठी त्यांनी विक्रेत्यांवर विविध आमिषांची खैरात करायला सुरुवात केली होती.
 कंपन्यांच्या कृपेने विक्रेते विदेशवाºया करू लागले आणि गरीब शेतकरी आणखी गरीब होऊ लागले. शेतकºयांनी स्वत:च्या शेतीत जगावेगळे प्रयोग करून त्यांचा परिणाम बघितल्याशिवाय एकाही शेतकºयाचा त्या प्रयोगांवर विश्वास बसणार नाही, हे लक्षात आल्यामुळे कार्यशाळा थेट शिवारात नेण्यास सुरुवात झाली. रासायनिक खतांचे जमिनीवर व कीटकनाशकांचे शेतकºयांवर होणारे भयानक परिणाम अनेक वर्षे मी अत्यंत जवळून बघितले होते. एका अत्यंत जहाल कीटकनाशकाची फवारणी करताना काळजी न घेतल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील अनेक शेतकºयांच्या अंत्ययात्रांना मी जातीने हजर होतो. कीटकांचा नायनाट करण्यासाठी अगदी सहज उपलब्ध असलेल्या व कोणत्याही शेतकºयाला परवडेल, अशा पदार्थाचा प्रयोग करायचा की तो करण्यासाठी कोणतीही काळजी घेण्याची गरजच भासणार नाही, असा पदार्थ मला अनेक वर्षांपासून माहीत असल्यामुळे पोहनकर फाउंडेशनने समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेल्या खडे मिठाच्या प्रयोगांची सुरुवात करून पहिला हल्ला चढवला, तो रासायनिक खते व कीटकनाशकांवर! कंपन्यांनी तयार केलेल्या डबे, बाटल्या व पोत्यांमधील वस्तू शेतीत वापरण्याची शेतकºयांना इतकी सवय झाली होती की मिठासारखी सहज उपलब्ध होणारी, अत्यंत स्वस्त व उपयुक्त वस्तू वापरण्याची त्यांची अजिबात तयारी नव्हती. शेतीत मीठ वापरणे हा गुन्हा आहे आणि मीठ वापरले तर जमीन क्षारपड होते, असा शेतकºयांचा गैरसमज असल्यामुळे व त्या गैरसमजाला कृषी अधिकारी व कंपन्या हेतुपुरस्सर खतपाणी घालत असल्यामुळे मीठ वापरण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे ही सोपी गोष्ट नव्हती. शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षाही कमी मिळणारे भाव; खते, बियाणे, कीटकनाशके व तणनाशकांसारख्या कृषी निविष्ठांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या किमती, दुष्काळाचा तडाखा, पाण्याची टंचाई, कर्जबाजारीपणा यासारख्या अस्मानी व सुलतानी आपत्तींनी गांजलेल्या शेतकºयांच्या आत्महत्या अतिशय चिंताजनकरीत्या वाढू लागल्या आणि शेतकºयांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सक्षम व खात्रीचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली. या परिस्थितीतूनच एक नवा पर्याय जन्माला आला ज्याचे नाव आहे ‘स्वयंसिद्ध शेती तंत्र’. शेतीतील मिठाच्या प्रयोगांचा माझा अनेक वर्षांचा अनुभव व शेतकºयांच्या प्रत्यक्ष अनुभवांचा अंतर्भाव पोहनकर फाउंडेशनतर्फे सादर केल्या जाणाºया ‘स्वयंसिद्ध शेती तंत्र’ या कार्यशाळेत करण्यात आला आणि चारही दिशांनी परिस्थितीचा असे मार झेलणाºया शेतकºयांची मिठाच्या प्रयोगांबद्दल उत्सुकता वाढू लागली. ही कार्यशाळा शेतीतील अगदी सोप्या व अत्यंत कमी खर्चाच्या अनेक प्रयोगांवर आधारित असल्यामुळे शेतकºयांनी प्रयोग करण्यास सुरुवात केली. प्रयोगांचे आश्चर्यचकित करणारे परिणाम बघून त्यांची माहिती हजारो शेतकºयांपर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही. प्रयोग करणाºया शेतकºयांची संख्या वाढू लागताच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्याही वाढू लागली. शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी करणारा मिठाचा प्रयोग व इतर अनेक प्रयोग नक्की कसे करतात, हे जाणून घेण्यासाठी कार्यशाळेत अनेक राज्यांमधून हजारोंच्या संख्येत शेतकरी सहभागी होऊ लागले आणि शेतीत मिठाचा प्रयोग करण्याची शेतकºयांना इच्छा व्हावी, अशी वातावरण निर्मिती होण्यास हळूहळू सुरुवात होऊ लागली. ‘स्वयंसिद्ध शेती तंत्र’ म्हणजे केवळ खडे मीठ व गार्बेज एन्झाईमचे प्रयोग, असा अनेक शेतकºयांचा गैरसमज आहे; पण या तंत्रात सायकल व मोटारसायकलच्या मदतीने सिंचन, बाजारात आठ लाखांत मिळणारे ट्रॅक्टर केवळ पंचवीस हजारात तयार करणे, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, पाखरांना पळविण्याचे उपाय, शेवग्याच्या बियांपासून जगातील सर्वात शुद्ध पाण्याची निर्मिती यासारखे असंख्य प्रयोग आहेत. 
हे अत्यंत सोपे व कमी खर्चाचे प्रयोग शेतकºयांना करता यावेत, यासाठी ‘स्वयंसिद्ध शेतकरी’ व ‘मिठातून समृद्धीकडे’ या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे आणि ही पुस्तके शेतकºयांनी पोस्टाने घरपोच मिळविण्यास सुरुवात केली आहे. सर्वत्र गुलाबी बोंडअळीने थैमान घातले असताना अनेक शेतकºयांच्या कपाशीच्या पिकात एकही अळी सापडली नाही. कारण त्यांनी या पुस्तकांचे बारकाईने वाचन केले व जमीन तयार करण्यापासून कापसाची वेचणी करण्यापर्यंत या तंत्राचा वापर करून केवळ उत्पादनच वाढवले नाही, तर तब्बल ९० टक्के खर्चही कमी केला. शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी पोहनकर फाउंडेशनची ९८२२६९८१०० ही नि:शुल्क हेल्पलाइन सकाळी ६ ते रात्री ८ या वेळात उपलब्ध असते. आज ‘स्वयंसिद्ध शेती तंत्राचे’ प्रयोग हिमाचल प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत अनेक राज्यांतील लाखो शेतकरी विविध पिकांमध्ये करून उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करीत आहेत. कर्जबाजारीपणा व आत्महत्यांची संख्या झपाट्याने कमी होऊन शेतीला व शेतकºयांच्या आयुष्याला आश्चर्यकारक कलाटणी देणाºया या प्रयोगांमुळे प्रत्येक शेतकºयाच्या शेतात व घरात सुखसमृद्धीचा वर्षाव व्हावा, यासाठी सर्व शेतकरी बंधू-भगिनींना मन:पूर्वक शुभेच्छा! 

- श्रीकांत पोहनकर
 

Web Title: Selfmade Farming Mechanism A Success Story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.