पहा वाचा ऐका
By Admin | Updated: January 17, 2015 16:58 IST2015-01-17T16:58:44+5:302015-01-17T16:58:44+5:30
एरवी कधी पाहायला न मिळणारी एखादी सुंदर फिल्म, बाजारात कुठेही विकत न मिळणारं जगाच्या काना-कोपर्यातलं संगीत, क

पहा वाचा ऐका
>
एरवी कधी पाहायला न मिळणारी एखादी सुंदर फिल्म, बाजारात कुठेही विकत न मिळणारं जगाच्या
काना-कोपर्यातलं संगीत, कसलाही गाजावाजा न करता सातत्याने उत्तम लिहिणारा कुणी अनाम ब्लॉगलेखक यांच्या भेटीगाठींसाठी
हा एक खास कोपरा
‘लिटल टेररिस्ट’
‘शार्ली हेब्दो’ प्रकरणाची दहशत जाणवतेय अजून, आणि आठवतातच पेपरात पाहिलेले हसरे चेहरे, पेशावरची शाळा नव्यानं सुरू झाली म्हणून पुन्हा दप्तरं पाठीला टांगून जाणारे.
कितीही नाकारला तरी ‘दहशतवाद’ होतोच असा आपल्या जगण्याचा भाग.
त्या संशयाची, दहशतीची आणि जमिनीवर रेषा मारुन तयार झालेल्या देशांची एक गोष्ट आणि या गोष्टीतली सिधीसाधी हाडामासाची माणसं. ती पहायची असतील तर ‘लिटल टेररिस्ट’ हा लघुपट जरूर पहा. फक्त १५ मिनिटांचा. भारत-पाक बॉर्डरवरचं राजस्थानातलं एक इटुकलं गाव. फौजांनी वेढलेलं. क्रिकेट खेळता खेळता चेंडू भारतीय हद्दीत पडला म्हणून ‘तिकडचा’ जमील ‘इकडे’ येतो कुंपणाची तार वर करुन. फौजी शोधतात त्याला आणि त्याचा जीव वाचावा म्हणून ‘इकडचे’ बापलेक त्याला पुन्हा घरी पाठवण्याचा प्रयत्न करतात, इतकी ही छोटी गोष्ट.अश्विन कुमार लिखित दिग्दर्शित हा लघुपट
http://www.filmsshort.com/
या वेबसाईटवर जाऊन शॉर्टफिल्म विभागात गेलं तर पाहता येईल. - मृण्मयी सावंत
कलाक्षेत्रातले अस्सल ‘चिन्ह’!
इंद्रधनुष्याचे रंग, चांदणभरली रात्न, मधुबालाच्या कृष्णधवल प्रतिमा, गुरु दत्तचे सिनेमे, पिकासोच्या गेर्निकेचं कारुण्य, व्हिन्सीच्या मोनालिसाचं हास्य, अरुण कोलटकरांच्या जेजुरीतली इमेजरी, गायतोंडेंची चित्रं यापैकी कशातही रस असणारांसाठी, दृश्यकलेला वाहिलेला एक ब्लॉग- ‘चिन्ह’-
http://chinhatheartblog.blogspot.in/
चित्न वाचायला अलगद शकवणारा. चित्नकलेविषयी चर्चा घडवणारा. असे ब्लॉग हे मायमराठीचे भाग्य. ‘चिन्ह’ हे चित्नकलेला वाहिलेले नियतकालिक. त्याच्या अंकांविषयी येथे रसरशीत नोंदी होतात. ‘नग्नता, चित्नातली आणि मनातली’ या विशेषांकावर आलेला प्रतिसाद मुळातून वाचवा असा. ‘मुक्त शब्द’च्या दिवाळी अंकाने आरांचे न्यूड मुखपृष्ठावर छापून नंतर झाकले. या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रि या एखादा विषय किती आशयघनतेने हाताळता येतो हे दाखवतात. चित्नकलेवर कुठे काही लिहिले, बोलले गेले की त्याची सजग नोंद येथे होते. मांडणी कलापूर्ण आणि भाषा नेमकी. कोणत्याही कलाक्षेत्नात अस्सल काही केले तर दाद मिळते, अशी आश्वासकता पेरणारे हे लेखन नव्या पिढीला मागच्यांशी जोडून उमेद देणारे आहे.
- प्रा. अनंत येवलेकर
वाद्यांशिवाय ऑर्केस्ट्रा
स्टॅनफोर्ड विद्यापीठातले प्राध्यापक गे वँग आणि त्यांचा ‘कॉम्प्युटर म्युझीक ऑर्केस्ट्रा’! प्रिय मित्र ‘गूगल’वर या महाशयांच्या नावाने (Ge Wang) शोधाशोध केली तर पहिल्याच ३-४ लिंक्स्मध्ये त्यांच्या या ऑर्केस्ट्राची लिंक दिसते. वाचकांच्या सोयीसाठी ही लिंक सोपी करूनही देत आहे (http://tinyurl.com/lbrwj2m). या वँग महाशयांनी सादर केलेल्या ‘चक’ सॉफ्टवेअरचा वापर करून कुठल्याही कॉम्प्युटरवर अनेक वाद्यांचा अंतर्भाव असलेला वाद्यवृंद निर्माण करता येतो.
याशिवाय आवश्यकता भासेल ती ध्वनिवर्धनासाठी फक्त एका साऊंड मिक्सरची! सोबतीला काही स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेली उपकरणं वापरली तर मग काही विचारायला नको - विविध प्रकारचे साऊंड इफेक्टस् आणि सध्याच्या सांगीतिक वाद्यांवर अशक्य असलेले असंख्य नाददेखील सहज शक्य होतात. वर दिलेल्या लिंकमध्ये या सगळ्या प्रकारांचं प्राध्यापक महोदयांनी केलेलं एक उत्तम सादरीकरण बघायला मिळतं - अवश्य बघा, कदाचित तुम्हालाही यातून काही नवीन घडवण्याची प्रेरणा मिळेल!
- राजा पुंडलिक