शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

साताऱ्याच्या औद्योगिकरणास ग्रहणच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:28 IST

खंडाळा तालुक्यात दशकापूर्वी औद्योगिक वसाहतीने पाय रोवले. खंडाळा, शिरवळ, केसुर्डी, धनगरवाडी, अहिरे, लोणंद या परिसरात औद्योगिक वसाहती निर्माण होऊ लागल्या. यासाठी

ठळक मुद्देस्थानिकांना गाईड म्हणून प्रशिक्षित केल्यास रोजगार निर्मितीबरोबरच पर्यटकांची सोय होईल

- दीपक शिंदे

खंडाळा तालुक्यात दशकापूर्वी औद्योगिक वसाहतीने पाय रोवले. खंडाळा, शिरवळ, केसुर्डी, धनगरवाडी, अहिरे, लोणंद या परिसरात औद्योगिक वसाहती निर्माण होऊ लागल्या. यासाठी तालुक्यातील सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्र औद्योगिक वसाहतीसाठी संपादित करण्यात आले; परंतु सहा टप्प्यांचे नियोजन असलेली एमआयडीसी तिसºया टप्प्यातच अडखळली आहे. भूसंपादनाच्या जाचक अटींमुळे औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणाला ग्रहण लागले आहे.तालुक्यात एमआयडीसीची उभारणी करण्यात आली; त्यामुळे कधीकाळच्या कवडीमोल दराच्या जमिनींना लाखोंचा भाव मिळाला. सध्या तालुक्यात तीन टप्प्यांत कारखानदारी विस्तारली आहे. अजूनही तीन टप्पे होणे बाकी आहेत. पहिल्या तीन टप्प्यांतच छोट्या-मोठ्या सुमारे १२० कंपन्यांनी आपले बस्तान बसविले आहे. यात केसुर्डीच्या विशेष आर्थिक क्षेत्राचाही (सेझ) समावेश आहे. वास्तविक सुमारे ६०० कंपन्यांच्या उभारणीचे नियोजन आहे. त्यामुळे सर्वत्र कारखान्यांचे जाळे निर्माण झाले असले, तरी उर्वरित कंपन्या कधी पाय रोवणार? हेसुद्धा महत्त्वाचे आहे.तालुक्यात कारखानदारी वाढू लागली तशी त्यासाठी जमिनींची मागणीसुद्धा वाढली. साहजिकच त्यामुळे जागेच्या उपलब्धतेसाठी संघर्ष उभा राहू लागला आहे. खंडाळा एमआयडीसीला पूरक म्हणून पुरंदर तालुक्यात नियोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचाही मुहूर्त ठरत नसल्याने तालुक्यातील इतर कंपन्यांची उभारणी ठप्प आहे. त्यामुळे औद्योगिक विस्तारासाठी यावर मार्ग निघणे आवश्यक आहे.महामार्गावरील बोगदा तांत्रिक अडचणीतआशियाई महामार्ग ४७ वरील महत्त्वपूर्ण असलेल्या खंबाटकी घाटामध्ये जुन्या बोगद्याव्यतिरिक्त परदेशाच्या धर्तीवर आणखी सर्वसुविधांयुक्त अत्याधुनिक दोन नवीन बोगदे निर्माण करण्यात येणार आहेत. या बोगद्यांसाठी लागणाºया जमिनीची संपादन प्रक्रिया सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्ण केली आहे. या दोन बोगद्यांसाठी संपादन प्रक्रियेसहित अंदाजे ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून टेंडर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, तांत्रिक अडचणीत बोगदा सापडल्यामुळे याचे भूमिपूजन होऊनही बोगदाच्या कामाला सुरुवात झालेली नाही, तसेच साताºयाकडून कºहाडकडे जाणारा सहापदरी मार्गही शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास नकार दिल्याने रखडला आहे.तीन अभयारण्यांचे वाजले तीन तेरा...न्याहरी-निवास योजना (एमटीडीसी)-कोयना अभयारण्यालगतच्या गावात व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर (झालर) क्षेत्रात ही योजना राबविणे उपयुक्त ठरणार आहे. काही ठिकाणे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करता येण्यासारखी आहेत. मायणी पक्षी अभयारण्य ओस पडले आहे. त्याऐवजी पक्षी आता येराळवाडी तलावाकडे जातात. त्याठिकाणी पक्षी निरीक्षणाची साधने उपलब्ध करावीत. स्थानिकांना गाईड म्हणून प्रशिक्षित केल्यास रोजगार निर्मितीबरोबरच पर्यटकांची सोय होईल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMIDCएमआयडीसी