शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
4
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
5
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
6
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
7
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
8
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
9
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
11
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
12
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
13
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
14
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
15
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
16
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
17
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
18
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
19
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
20
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
Daily Top 2Weekly Top 5

रोड ट्रिप

By admin | Updated: April 25, 2015 14:50 IST

रंग, रूप आणि स्वभावाने वेड लावत भारतीय रस्त्यांवरून धावणा:या उनाड वाटा

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आठवतो? मित्र-मित्रंनी एकत्र केलेली रोड ट्रिप हीच कथा होती.या सुंदर, रोमांचक प्रवासात किती काही घडतं! अलीकडच्या काळात बॉलीवूडने ही नवी चटकच भारतातल्या पर्यटकांना लावली आहे. गाडीत सामान भरून नाहीतर बाइकवर टांग मारून एक रस्ता धरायचा आणि सरळ सुटायचं!! युरोपातल्या चिमुकल्या देशांच्या सीमा ओलांडत केलेल्या रोड ट्रिप्स अविस्मरणीयच असतात! - पण भारतातही असे काही कमी रस्ते नाहीत! त्यातल्याच काही सुंदर, देखण्या आणि
रोमांचक रस्त्यांची ही सैर!
 
दिल्ली ते लेह
अप्रतिम सृष्टिसौंदर्य लाभलेल्या या प्रदेशाच्या सफरीवर जून ते सप्टेंबर दरम्यान जाता येऊ शकते. बाईक किंवा कार यापैकी काहीही चालेल. रोहतांग पास, जांस्कर रेंज, नुब्रा घाटी, हिमालयातील विलोभनीय शिखरे.. वाटेत कायकाय भेटेल!!
अंतर : 990 किमी म्हणजे साधारण 3 दिवस लागतीलच.
मनाली : लेह हायवे (एन.एच. 21) वरून एकदा तरी प्रवास करावाच. स्वर्ग म्हणतात तो असाच असावा, असं या मार्गावरून प्रवास करताना वाटतं.
लेह ते श्रीनगरचा (एनएच 1 डी) प्रवास असाच सुंदर आहे.
 
जयपूर ते जैसलमेर
जयपूर ते जैसलमेर मार्गावर असलेली छोटी छोटी शहरं, गावं तुमचं आदरातिथ्य करायला सज्जच असतात. तिथलं राहणीमान, त्यांचे पेहराव, संस्कृती, स्वादिष्ट जेवण सगळंच रंगांमध्ये भिजलेलं.
अंतर : 570 किमी, 9 तास.
टीप : कुंभलगढचा कुंभलगढ किल्ला आणि वाईल्डलाइफ सँक्च्युरीसठी वाटेत थांबायला विसरू नका.
 
मुंबई ते गोवा
पहाटे 5 च्या दरम्यान एनएच 17 मार्गे निघालात तर सूर्यास्तापर्यंत तुम्ही गोव्यात पोचू शकाल. 
अंतर : 615 किमी, 10 तास
टीप : हा मार्ग आणि तिथला निसर्ग नितांत सुंदर आहे. फक्त तुमचा कॅमेरा रेडी ठेवा.
 
बंगळुरूते कुर्ग
भारताचं स्कॉटलंड म्हणून ओळख असलेलं कुर्ग तुम्हाला तिथल्या निसर्गासोबत खाद्य पदार्थांसाठीही नक्कीच आवडेल. पश्चिम घाटातला हा प्रवास संस्मरणीय आहे.
अंतर :  260 किमी, 5 तास
टीप : म्हैसूर शहरात प्रवेश न करता श्रीरंगपटणच्या बायपासरोडने कुर्ग मार्गे जा. शहरातली वाहतूक कोंडी टाळता येईल. 
 
जयपूर ते रणथंबोर
जयपूर ते रणथंबोरचा प्रवासही तुम्हाला नक्की आवडेल. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असलं तरी इथला पानगळीचा जंगलाचा थरारक अनुभवही रोमांचित करणारा आहे. छोटय़ा-छोटय़ा गावांमधून जाणारा रस्ता तसंच रस्त्याशेजारील धाबे तुमच्या ग्रुपमधील खवय्यांसाठी पर्वणी ठरू शकतात. 
अंतर :  180 किमी 4 तास
टीप : रणथंबोरला जाण्यासाठी जमल्यास टोंक मार्ग निवडा. या मार्गावरील रस्ते सुस्थितीत आहेत. शिवाय या रस्त्यांशेजारच्या धाब्यांवर मिळणा:या दालबाटीची चव घ्या.
 
कोलकाता ते कुमाउॅँ
कोलकातापासून कुमाउँला जाणारा मार्ग इतका सोयीस्कर आहे की अगदी नवखा ड्रायव्हरदेखील ही सहल मस्त एंजॉय करू शकेल. वाराणसीच्या घाटातून जाणारा मार्ग शिवाय थोडय़ा-थोडय़ा अंतरावर असलेले पेट्रोल पंप आणि रेस्तराँमुळे तुमच्या प्रवासाची अर्धी अधिक काळजी मिटते. 
अंतर :  130 किमी, 4 दिवस
टीप : वाटेत बिनसर अभयारण्यालाही भेट द्यायची असेल तर  मेन रोडला लागून असलेल्या जर्मन बेकरीतही जाऊन या. इथल्या पिङझा आणि थुक्पाची चव जरूर घ्या.
 
अहमदाबाद ते दीव
स्वच्छ समुद्रकिनारे ही इथली खासियत. पर्यटकांकडून थोडा दुर्लक्षित राहिलेला हा स्पॉट  उन्हाळ्याच्या सुटीत भटकंतीसाठी मस्त!
अंतर : 380 किमी, 8 तास
टीप : धोलवीराला आठवणीने भेट द्या. 
 
मुंबई ते माउंट अबू
उन्हाळ्याच्या सुटीत अनेकजण आपलं गाव गाठतात किंवा जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेट देतात. यंदाच्या उन्हाळ्यात तुमच्यासाठी माउंट अबू चांगला ऑप्शन ठरू शकतो. इथला नक्की लेक रिलॅक्स होण्यासाठीचा उत्तम पर्याय. शिवाय अहमदाबादमध्ये थांबून हे शहर जाणूनही घेता येईल. 
अंतर : 745 किमी, 12 तास
टीप : एनएच 18 मार्ग सोयीस्कर. या मार्गावर भरपूर पेट्रोल पंप व धाबे आहेत.
 
गुवाहाटी ते तवांग
गुवाहाटी ते तवांग मार्गावर चेरापुंजी, इंफाल, काझीरंगासारखे निसर्ग सौंदर्याने नटलेले सुंदर पिकनिक स्पॉट आहेत. 
अंतर : 480 किमी, 9 तास
टीप : तवांगला जाताना बोम्दिलामार्गे जा. येताना तुम्ही भालुकपोंग येथे थांबू शकता. हादेखील एक चांगला पिकनिक स्पॉट आहे. तवांग मार्गावर अनेक चहा, मोमोजचे स्टॉल्स आढळतात. 
 
अहमदाबाद ते कच्छ
कच्छला जाण्यासाठी डिसेंबर ते मार्चदरम्यानचा काळ सर्वात उत्तम. चंद्राच्या शीतल प्रकाशात चमकणा:या कच्छच्या वाळवंटाचं सौंदर्य पाहण्याबरोबरच तिथली संस्कृती, हस्तशिल्प, पारंपरिक संगीत, जीवनशैली सारं काही अनुभवता येईल. शिवाय इथलं जंगली गाढवांचं अभयारण्यही पाहता येईल.
अंतर : 400 किमी, 7 तास
टीप : इथल्या हस्तशिल्पांसाठी होदका गावाला आवर्जून भेट द्या.
 
चेन्नई ते येलिगरी
येलिगरी हे डोंगर : टेकडय़ांनी वेढलेलं छोटंसं शहर. इथले रस्ते, डोंगर, घनदाट वनराई म्हणजे बाइकर्स, ट्रेकर्सकरता पर्वणीच. 
अंतर :228 किमी, 4 तास
टीप : पावसाळ्यात हा मार्ग सर्वात सुंदर असतो पण त्यादरम्यान येथे दरडी कोसळतात. त्यामुळे सावधानतेने प्रवास करा. 
 
मुंबई ते तारकर्ली
महाराष्ट्रातला स्वच्छ नितळ किनारा! हा परिसर फारसा गजबजलेला नाही.  तारकर्लीच्या निळ्याशार समुद्रात स्कुबा ड्राइवचा अनुभव नक्की घ्या.
अंतर :535 किमी, अंतर 9 तास
टीप : मुंबईपासून एनएच 17 ने कासल गाठायच. तेथून एसएच 1क्8 मार्गे तारकर्ली. या मार्गावरील नैसर्गिक सौंदर्य पाहूनच लाँग ड्राइवमुळे येणारा थकवा दूर पळेल.
 
बंगळुरू ते मुन्नार
मुन्नार हा पर्यटकांसाठीचा उन्हाळ्यातला विसावा. इथल्या चहाच्या बागा. चहा संग्रहालय, टी प्रोसेसिंग, अर्नाकुलम राष्ट्रीय उद्यान हे  मुख्य आकर्षण. 
अंतर : 476 किमी, 10 तास
टीप : इथे सेल फोन कवरेज मिळत नाही. त्यामुळे डिसकनेक्टेड राहण्याची तयारी ठेवा.
 
दिल्ली ते जयपूर
भारताच्या पर्यटनातील सुवर्ण त्रिकोण म्हणजे दिल्ली-आग्रा-जयपूर. आग्य्राला ताजमहलसाठी, रणथंबोरला व्याघ्रप्रकल्पासाठी आणि जयपूरला तिथल्या राजवाडय़ांसाठी भेट देता येईल. सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवामहल, अंबर महल, मुबारक महल, जलमहल हे त्यापैकीच एक. 
अंतर : 275 किमी, 5 तास
टीप : एनएच 11 मार्गे जयपूर गाठण्यापूर्वी राजस्थानी धाब्यांवर थांबणं विसरू नका.
 
एनएच 212
भारतातल्या सर्वात अॅडव्हेंचर्स रस्त्यांपैकी एक एनएच 212. हा मार्ग केरळातील कोजीकोडेला कर्नाटकमधील कोलगेलशी जोडतो. या मार्गावरील घनदाट वनराई थक्क करणारीच. शिवाय इथलं जंगल.. अत्यंता थ्रीलिंग अनुभव देणारं. या रस्त्यावरून जाताना तुमच्यासमोर एखादा जंगली हत्ती उभा येऊन ठाकला तरी नवल वाटायला नको.  
 
हैदराबाद ते कन्नूर
कन्नूरमधली आकर्षणं म्हणजे पयमबल्लम बीच, मुजुपिलंगड बीच, थलस्सरी किला, अरालम वाइल्डलाइफ सँक्च्युरी, स्नेक पार्क, मदायी मिस्जद, सेंट एंजलो फोर्ट इत्यादी. शहरी वातावरण कंटाळलेले हजारो पर्यटक येथे निसर्गाच्या सान्निध्यात विसावा घेण्यासाठी येतात. 
अंतर : 897 किमी, 14 तास
टीप : कन्नुरला कुर्गमार्गे जाणो सोयीस्कर. पोचायला थोडा उशीर होतो पण ओबडधोबड रस्त्यांमुळे होणारा त्रस चुकवता येतो. 
 
चेन्नई ते पॉँडिचेरी
फ्रेंच संस्कृती अनुभवायची असेल तर पाँडिचेरीला जायलाच हवं. शिवाय चेन्नईपासून 5क्-6क् किमी अंतरावर असलेली मिठागरं पाहता येतील. या मार्गावरील नागमोडी वळणं बाइक रायडर्ससाठी नक्कीच आव्हानात्मक ठरतील. पण जरा जपून!
अंतर : 60 किमी. 3 तास तरी लागतीलच.
 
दिल्ली ते डेहराडून
दिल्लीतून एनएच 58 पकडायचा आणि छोटी छोटी शहरं, 
गावं पार करत डेहराडून गाठायचं. ट्रेकिंग, हायकिंग, स्कीइंग करणा:यांना डेहराडून नक्कीच आवडेल. 
अंतर : 255 किमी, 5 तास
टीप : या मार्गावर नेहमी ट्रॅफिक जाम असतंच. डेहराडूनला पोहचण्यासाठी दुसरा मार्ग उपलब्ध नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही. 
 
दार्जिलिंग ते पेलिंग
दार्जिलिंगपासून पेलिंगपर्यंतचा रस्ता म्हणजे निसर्गाच्या भव्यतेचा नजराणा. या मार्गावर एका बाजूला खोल द:या तर दुस:या बाजूला उंचच उंच पर्वत.
अंतर : 110 किमी, 3 तास
टीप : या प्रवासाला निघण्यापूर्वी वेदर अपडेटवर नजर टाकायला विसरू नका. 
 
कोलकाता ते पुरी 
सिटी ऑफ जॉय, लॅण्ड ऑफ बीचेस अशी बिरूदावली मिरवणा:या कोलकातातून पुरी पर्यंतचा प्रवास म्हणजे मस्तच. टूरिस्ट मॅपवर अजूनही एंट्री न मिळालेली कुलियाना, बिसंगासारखी ठिकाणं या मार्गावर शोधू आणि पाहू/अनुभवू शकता. 
अंतर : 500 किमी, 11 तास
 
पामबन पूल
पामबनहून रामेश्वरम बेटांना जाणारा हा पूल म्हणजे एकमेव मार्ग. या पुलावरून प्रवास करताना आपल्याला निळ्याशार समुद्रावर तरंगत असल्यासारखंच वाटतं.  या मार्गावर बाइकचालवण्याची मजा काही औरच.