शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

रंगमंच - नाट्यशिबिर, कार्यशाळा, अभिनय वर्ग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 18:00 IST

आपला चिमुकला वा चिमुकली खूप स्मार्ट आहे आणि वय वर्षे आठ किंवा नऊ असूनही ‘नटसम्राट’मधील स्वगत कशी धाडधाड म्हणतो, असं मार्केटिंग करणारे पालक कार्यशाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रश्न करतात....

ठळक मुद्देस्वत:च्या मर्यादा याची जाणीव झाली तरी मला वाटतं प्रशिक्षण घेण्याचा उद्देश सफल

- योगेश सोमण - अभिनयाच्या कार्यशाळा ही अगदीच पहिली पायरी असते आणि त्याच्याकडे तेवढ्याच मर्यादेत बघावं. एकदिवसीय कार्यशाळा किंवा अभिनय प्रशिक्षणाची फ्री सेमिनार्स याच्यात काही अर्थ नसतो. दिवसभरात जेमतेम जो लेक्चर देतो, त्याच्याशी ओळख होते आणि आपल्या आजूबाजूला बसलेल्या होतकरू कलाकारांशी परिचय होतो इतकंच. मला स्वत:ला असं वाटतं कार्यशाळा किमान तीन महिन्यांची असावी आणि रोजचे तीन ते चार तास कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी काम करावं. अशा तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत घेतलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना म्हणजे होऊ घातलेल्या अभिनेता-अभिनेत्रींना आपल्याला अभिनय जमणार आहे की नाही किंवा अभिनय साध्य करायला खूप मेहनत घ्यावी लागते किंवा आपल्या स्वत:च्या मर्यादा याची जाणीव झाली तरी मला वाटतं प्रशिक्षण घेण्याचा उद्देश सफल होईल. कार्यशाळेत सहभागी होताना उमेदवार स्वत:विषयी खूप भ्रामक कल्पना घेऊन आलेले असतात. कुठेतरी मिळालेलं बक्षीस, घरच्यांनी आणि मित्रमंडळींनी आपण करत असलेल्या नकलांचं केलेलं वारेमाप कौतुक असल्या हळकुंडांनी पिवळे झालेले उमेदवार कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी प्रश्न टाकतात, आॅडिशन कशी द्यायची? किंवा आपला चिमुकला वा चिमुकली खूप स्मार्ट आहे आणि वय वर्षे आठ किंवा नऊ असूनही ‘नटसम्राट’मधील स्वगत कशी धाडधाड म्हणतो, असं मार्केटिंग करणारे पालक कार्यशाळा सुरू होण्याच्या दिवशीच प्रश्न करतात, तुमच्याकडून काय संधी मिळणार? किंवा साधारण पंचावन्नव्या वर्षी रिटायर्डमेंट घेऊन जुने शौक पूर्ण करायला आलेले हौशी नट, त्यांना कार्यशाळेतील एक्सरसाईजपेक्षा शिकवायला येणाऱ्या सेलिब्रेटीशी गप्पा मारण्यात आणि नंतर सेल्फी घेण्यातच जास्त इंटरेस्ट असतो. अशा अनेक अपेक्षा घेऊन फिरणारे नवोदित, त्यांचे पालक मग अनेक फसव्या जाहिरातींना फसतात, उदा. ‘आमच्या आगामी चित्रपटात संधी’, ‘फोटोसेशन करून दिले जाईल तसेच विविध आॅडिशनमध्ये संधी’, शिवाय कार्यशाळेच्या जाहिरातीवर अनेक मालिका, चित्रपटातील सेलिब्रिटींचे फोटो असतात आणि अशा कार्यशाळेची फीदेखील भरघोस असते. मंडळी भुलतात, कार्यशाळेत सहभागी होतात. चार-दोन आॅडिशनला जाऊन नापास होऊनदेखील येतात आणि त्यांचा भ्रमनिरास होतो. मला असं वाटतं, अभिनय कार्यशाळांमधून रंगकर्मींना स्वत:लाच ऐकायला आणि बघायला शिकवलं पाहिजे. आरशात भांग पाडायला आणि लिपस्टिक लावायला रोज बघत असतील तसं नव्हे, तर आरशाशिवाय स्वत:च चालणं, उभं राहणं, बसणं हे बघायला शिकवलं गेलं पाहिजे. यासाठी पाय दुखेस्तोवर काही बेसिक हालचाली कार्यशाळेत सतत करून घेतल्या गेल्या पाहिजेत. आवाजाची पट्टी आणि आवाजाची फेक यात काय फरक आहे, हे समजावून पाच मिनिटांत सांगता येतं,....     (क्रमश:)(लेखक प्रसिद्ध रंगकर्मी आहेत.)

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र