शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

क्यू किंग

By admin | Updated: November 1, 2014 18:34 IST

बिलियर्ड्स हा भारतात तसा काहीसा दुर्लक्षित क्रीडाप्रकार; त्यामुळेच की काय, त्यातील विविध स्पर्धांत तब्बल ११ वेळा विश्‍वविजेतेपद मिळविणारा पंकज अडवाणी हा फारसा कोणाच्या लक्षात आलेला नाही. चिकाटी, परिश्रम व जिद्द दाखवून पंकजने या खेळातील बादशाहपद मिळविले आहे. इतके मोठे यश मिळवूनही त्याचे पाय मात्र अद्याप जमिनीवरच आहेत, हीदेखील एक मोठीच गोष्ट आहे.

चंद्रशेखर संत     
 
'किंग ऑफ इंडियन क्यू स्पोर्ट’ असे ज्याचे अगदी सार्थ वर्णन करता येऊ शकेल, असा बिलियर्ड्स- स्नूकर खेळाडू कोण, या प्रश्नाचे सर्वतोमुखी एकच उत्तर येऊ शकेल आणि ते म्हणजे पंकज अडवाणी. पुण्यनगरीत जन्मलेला आणि नंतर कुवेतमध्ये रमलेला व मग बंगळुरूमध्ये स्थायिक झालेला हा  २९ वर्षांचा बिलियर्ड्स- स्नूकर बादशहा एकापाठोपाठ अजिंक्यपदे पटकावण्याचा धूमधडाका उडवून देताना दिसत आहे. बिलियर्ड्सचा विषय निघाला रे निघाला, की पूर्वी भारतवर्षात विल्सन जोन्स, मायकल फरेरा, गीत सेठी, सुभाष आणि त्याचा भाऊ ओम अगरवाल यांचीच नावे डोळ्यांसमोर प्रकर्षाने येऊन जात असत.
मात्र, गेल्या काही वर्षांत बिलियर्ड्स- स्नूकर या क्रीडाप्रकारात स्वयंप्रकाशाने चमचमणारा, डोळे दिपवून टाकत असलेला खेळाडू म्हणजे पंकज अडवाणी, असेच म्हणावे लागेल, याबाबत दुमत असूच शकत नाही. नुकतेच त्याने लीड्स येथे १५0 अप पॉईंट्स फॉरमेट्स प्रकारात पीटर गिलख्रिस्टसारख्या मुरब्बी, नाणावलेल्या खेळाडूवर मात करून तब्बल ११वे विश्‍वविजेतेपद संपादन करण्याचा अभूतपूर्व विक्रम- पराक्रम साजरा करून तमाम भारतीय क्यू स्पोर्ट रसिकांना आनंदाचा आणि आश्‍चर्याचा अतिशय सुखद धक्का दिलेला आहे. तसे बघायला गेले, तर आपल्या भारतात क्रिकेट हा खेळ वगळता इतर खेळांकडे तसे पार दुर्लक्ष होत असते.
बिलियर्ड्स काय किंवा स्नूकर काय, हे क्रीडाप्रकार भारतात काही फारसे लोकप्रिय अजिबात नाहीत; परंतु अशा क्रीडाप्रकारात आणि त्यातही त्यांच्यातील विविध प्रकारच्या स्पर्धांत पंकज अडवाणीने अल्पावधीतच आपला असा एक आगळावेगळा ठसा उमटवून दाखविल्यामुळे तमाम भारतीय क्रीडारसिकांची मान अभिमानाने, आनंदाने उंचावलेली आहे. एरवी फारसा लोकप्रिय नसलेला हा खेळ आज संपूर्ण भारतवर्षात गेल्या काही वर्षांत  अगदी चवीचवीने, सातत्याने मोठय़ा प्रमाणावर चर्चिला जाऊ लागलेला बघायला मिळत आहे तो पंकज अडवाणीच्या यशोगाथेमुळेच, यात शंका नाही. त्याच्या या भीमपराक्रमाची दखल मग अर्थातच भारत सरकारला घ्यावीच लागली.
भारत सरकारने त्याचा ‘अर्जुन, राजीव गांधी खेलरत्न, पद्मश्री’ असे किताब बहाल करून उचित मानसन्मान केलेला आहे. एकाग्रता, खेळावर लक्ष केंद्रित करण्याची हातोटी, कौशल्य असा अगदी क्वचितच दिसून येणारा त्रिवेणी संगम पंकजमध्ये प्रकर्षाने दिसून येतो आणि हीच तर त्याची बलस्थाने आहेत. सचिन तेंडुलकरला घडविण्यात जसा फार मोठा, सिंहाचा वाटा त्याचा थोरला भाऊ अजित तेंडुलकर आणि द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचा आहे, तद्वत पंकजच्या जडणघडणीत खूप मोलाचा- महत्त्वाचा वाटा त्याचा थोरला भाऊ डॉक्टर श्री अडवाणी आणि अरविंद सवूर यांचा आहे, हे दस्तुरखुद्द पंकज नेहमी उघड-उघड बोलून दाखवीत असतो. केवळ १२व्या वर्षीच पहिलेवहिले विजेतेपद- अजिंक्यपद मिळविल्यानंतर त्याने मुळी मागे असे वळून बघितलेच नाही. आपण व्यावसायिक खेळाडू व्हायचे की नाही, असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा ठाकलेला होता. मात्र, एकदा का एखादा निर्णय घेतला, की तो झपाटल्यागत यश मिळविण्याच्या जिद्दीने- ईर्षेने पेटून उठतो. अजिबात न गडबडून जाता तो यशप्राप्तीची शिखरे पादाक्रांत करताना दिसतो. 
राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक यश मिळविल्यानंतर २00२पासून, म्हणजेच वयाच्या अवघ्या १७व्या वर्षापासून त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही आपले वर्चस्व गाजविण्यास प्रारंभ केला. दिल्लीतील आशियाई बिलियर्ड्स स्पर्धेचे त्याने प्रथम अजिंक्यपद आपल्याकडे अक्षरश: खेचून आणले आणि त्यानंतर पंकज अडवाणी हे नाव तमाम बिलियर्ड्स- स्नूकर जगतात आदराचा- आदर्शाचा विषय बनून गेले. भारताचा तिरंगा मोठय़ा अभिमानाने- डौलाने उंचच उंच फडकावत ठेवण्याची गौरवास्पद कामगिरी पंकजने गेल्या १२ वर्षांत सर्मथपणे करून दाखवलेली आहे. लाँग आणि शॉर्ट फॉर्म प्रकारातील (१५ रेड आणि ६ रेड) व्यावसायिक जागतिक अजिंक्यपदे तसेच टाइम आणि पॉईंट्स (वेळ व गुणसंख्या) प्रकारातील इंग्लिश बिलियर्ड्स स्पर्धांतील अजिंक्यपदे पटकावण्याचा अभूतपूर्व पराक्रमही त्याने करून दाखविलेला आहे. प्रचंड चिकाटी आणि कमालीचा संयम ही तर त्याची अगदी ठळक गुणवैशिष्ट्ये. 
नुकतेच त्याने अशोक शांडिल्य, देवेंद्र जोशी आणि  रूपेश शहा यांच्या साथीने पहिलेवहिले सांघिक विजेतेपददेखील मिळवून दाखविले आणि सर्वांकडून कौतुकाची- शाबासकीची पावतीदेखील मिळवलेली आहे. बोलायला-वागायला अतिशय साधा असलेला हा जगज्जेता आहे. स्थानिक स्पर्धांच्या वेळी तो आमच्या एमआयजी क्लबमध्ये वास्तव्याला असतो, त्या वेळी त्याच्याशी बातचीत करण्याची संधी मिळते आणि सर्वांत आधी जाणवून जातो त्याचा बालसुलभ- निरागस स्वभाव. आपण एखाद्या विश्‍वविजेत्या खेळाडूबरोबर गप्पा मारत आहोत, असे अजिबात वाटत नाही. तो खेळाडू म्हणून अतिशय मोठा आहेच; परंतु माणूस म्हणूनही खूप-खूप मोठा आहे आणि मला वाटते, हाच त्याचा सगळ्यांत महत्त्वाचा गुणविशेष आहे. सध्या तो खेळ की नातीगोती, बिलियर्ड्स की स्नूकर या प्रश्नांच्या कात्रीत सापडला आहे. त्याने आपले व्यावसायिक कार्डही परत करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. पंकज हा यक्षप्रश्न सारासार विचार करून योग्य त्या प्रकाराने सोडवेल, असा विश्‍वास वाटतो. या महान खेळाडूला लाख-लाख शुभेच्छा आणि देदीप्यमान यशाबद्दल त्याचे मन:पूर्वक अभिनंदन.
(लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आहेत.)