शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Politics: काॅंग्रेसचे ईडीविराेधातील आंदाेलन चूक की बराेबर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 11:40 IST

Politics: काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईडी चाैकशीवरून काॅंग्रेसचे आंदाेलन सुरू आहे. भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचा काॅंग्रेसचा आराेप आहे.

काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईडी चाैकशीवरून काॅंग्रेसचे आंदाेलन सुरू आहे. भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचा काॅंग्रेसचा आराेप आहे. 

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस काॅंग्रेस नेते राहुलजी गांधी यांची ईडीने केलेली चौकशी ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून करण्यात आली आहे. गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे. काँग्रेस पक्ष अशा दडपशाहीला घाबरत नाही. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून भाजपने दिल्लीत काँग्रेसचे नेते, खासदार, पदाधिकारी यांच्यावर अत्याचार चालवला आहे; पण ब्रिटिश सत्तेला नामोहरम करून पळवून लावणारा काँग्रेस पक्ष इंग्रजांच्या हस्तकांच्या या दडपशाहीला भीक घालणार नाही. राहुलजी गांधी यांच्यावरील कारवाई म्हणजे भाजपची ‘उलटी गिनती’ सुरू झाल्याचे द्योतक आहे. केंद्रातील भाजप सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुलजी गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही.  राजकीय द्वेषातून भाजप सरकार करत असलेल्या कारवाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरलेली असताना पोलीस बळाचा वापर करून मंत्री, खासदार आमदार, महिला कार्यकर्ते यांना मारहाण केली जात आहे. देशात आज अराजकता निर्माण केली आहे. या विरोधातील असंतोष व्यक्त केला जात आहे. 

चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपराहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली म्हणून काँग्रेस नेते देशभर आंदोलन करत आहेत. हा तर भररस्त्यावर भ्रष्टाचाराचा उत्सव होत आहे. त्याचा मी निषेध करतो. प्रकरण न्यायालयात आहे. ईडी या स्वायत्त संस्थेकडून चौकशी होत आहे. न्यायालयावर विश्वास हवा. राहुल गांधी यांनी चौकशीत बाजू मांडावी. न्यायालयातही बाजू मांडण्याचा अधिकार आहे. ईडी अन्यायाने कारवाई करते असे वाटत असेल तर न्यायालयात दाद मागावी. पण घटनेच्या चौकटीत कायदेशीर काम करण्याच्या ऐवजी काँग्रेस देशभर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला आहे. काँग्रेसचे आंदोलन म्हणजे संविधानाचा अपमान आहे. न्यायालयावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थांबद्दल संशय निर्माण करून देशात अराजक निर्माण करण्याची धडपड आहे. तक्रारदाराचे म्हणणे आहे की, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी त्यांच्या यंग इंडियन या कंपनीच्या माध्यमातून असोसिएटेड जर्नल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची हजारो कोटींची मालमत्ता लबाडीने बळकावली. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना या प्रकरणी न्यायालयात हजर राहून जामिनावर सुटका करून घ्यावी लागली. यात मनी लाॅण्ड्रिंगचे प्रकरण उघडकीस आले म्हणून ईडी चौकशी करत आहे.  विषय गंभीर आहे. चौकशी होऊन न्यायालयात सोक्षमोक्ष लागायला हवा. या प्रकरणाच्या निमित्ताने काँग्रेसचा बुरखा फाटला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNana Patoleनाना पटोलेchandrakant patilचंद्रकांत पाटील