देशात मतपेटीतून अलीकडेच झालेल्या सत्तांतराने सारेच चकित झाले. नरेंद्र मोदी नावाच्या एका माणसाने हा सगळा झंझावात निर्माण केला. पूर्वग्रहदूषित दृष्टीने त्यांच्या विजयाकडे न पाहता राजकारणातील बदलते प्रवाह समजून घ्यायला हवेत. ...
लक्ष्मीचे वजन वापरून सरस्वतीची आराधना होणार तरी कशी? दुर्मिळ सद्गुण अंगी असणारे प्राचार्य हल्ली अनेक ठिकाणी दिसून येतात. अशाच एका प्राचार्याने त्याच्यातील गुणांचा सदुपयोग करत महाविद्यालयामध्ये कसा धुमाकूळ घातला होता, त्याची परिणती पुढे काय झाली, त्या ...
ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. सुशीलाराणी पटेल यांचं नुकतेच निधन झालं. खयाल, द्रुपद, ठुमरी या संगीतप्रकारांवर हुकमत असणार्या सुशीलाराणींनी शास्त्रीय संगीतावर त्यांचा ठसा उमटवला. त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीचा हा धावता आलेख. ...
चित्रकार आणि ‘इन्स्टॉलेशन आर्टिस्ट’ डॉ. सुबोध केरकर यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन र्जमनीतल्या विख्यात कुंट्स म्युझियममध्ये येत्या २0 ऑगस्टपासून भरणार आहे. त्यांचे चित्रवैभव आणि या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाविषयी.. ...
उजाडता उजाडता भल्या सकाळी कुणाचा फोन आला, की मी दचकतो. ‘तुम्हाला कळलं का,?’ हा प्रश्न विचारला की काळजाचा ठोका चुकतो. सुधीरनं पुण्याहून फोन करून बातमी सांगितली, ‘स्मिता गेली.’ तुझी प्रकृती ठीक नव्हती, हे माहीत होतं; पण म्हणून..! ...
‘दूरदर्शन’वरची वृत्तनिवेदिका ते एक यशस्वी चित्रपटनिर्माती. स्मिता तळवलकर या कर्तृत्ववान महिलेचा प्रवास दिपवणारा होता. त्याला अभिनयाची लखलखीत किनार होती. ‘कॅन्सर’सारख्या असाध्य आजाराशी लढत असतानाही, त्या कधी खचल्या नाहीत, दमल्या नाहीत. जीवनाच्या रंगमं ...
अभ्यासात अत्यंत हुशार, एकपाठी असा एक मुलगा; पण अतिसंवेदनशीलतेमुळे त्याचे मन एकदा दुखावले आणि मग सुरू झाली सगळ्याच पातळ्यांवर पीछेहाट.. अशा वेळी त्याला सावरणारं, मनापासून समजून घेणारं कुणी तरी हवं असतं. काय झालं त्याचं पुढे? ...
पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात माळीण येथे शैलस्खलन होऊन अंदाजे १३0 पेक्षा अधिक लोक मृत्यू पावले. महाराष्ट्रात भू व शैलस्खलन, पूर, भूकंप आदी दुर्घटना घडल्यावर बरीच चर्चा होते, चौकशी समिती स्थापिली जाते आणि नंतर काहीच होत नाही. ...
तहान लागली की विहीर खणायची, अशी एक म्हण आहे. आपण तर त्यापेक्षाही वाईट आहोत. अनेकदा विविध प्रकारच्या आपत्ती येऊनही त्यांचा सामना कसा करायचा, हे शिकायला आपण तयार नाही. तेवढय़ापुरती चर्चा होते व पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. या सगळ्या आपत्ती निसर्गनिर्मित ...
निराशेचा पगडा आपणच झटकून टाकायचा आणि लढायला उभे राहायचे. दैव नेहमीच प्रतिकूल असेल असे नाही. कुणी सांगावे, एखाद्या वेळी आपल्यालासुद्धा अनुकूल शक्ती मागे उभ्या राहिल्याचा अनुभव येईल. मात्र, आपण जबाबदारी झटकून टाकून नुसतेच चमत्काराची वाट पाहत राहिलो, तर ...