शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

आमचे पोट्टे असले गुंडे, त्यांचे तिन्ही लोकी झेंडे !

By अतुल कुलकर्णी | Updated: November 9, 2025 13:38 IST

आजचे नेते, "सगळ्या गोष्टी सरकारला कशा मागता? तुम्ही पण जरा हात-पाय हलवा ना..." असा प्रेमळ, पण दादागिरीचा सल्ला जनतेला देतात. त्याच नेत्याचा पोरगा अत्यंत धाडसीपणे १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत घेत असेल तर तोच बाप आपल्या पोराने "चुकीचे काही करू नये असे आपण आधीच सांगितले होते"

-अतुल कुलकर्णी(संपादक, मुंबई)मिस्टर अब्राहम लिंकन नमस्कार.कधीकाळी तुम्ही तुमच्या पोरासाठी गुरुजील पत्र लिहिले होते. "सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र, त्याला हेदेखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही..." असा अनुवाद आमच्या वसंत बापट यांनी मराठीत केला होता.  

मिस्टर लिंकन, आता काळ बदलला. तुमच्या पत्राचा आम्हाला काही उपयोग नाही. आता न्यायप्रिय, सत्यनिष्ठ, साधुचरित, पुरुषोत्तम, समर्पित आयुष्य... हे शब्द बिनकामाचे आहेत. आता आम्हाला फार वेगाने पुढे जायचे आहे. राज्याची इकॉनोमी तीन ट्रिलियन डॉलर करायची आहे. त्यासाठी आम्हाला दिसेल ती जमीन मोठ्या प्रमाणावर विकत घ्यावी लागणार आहे. कधी प्रेमाने, कधी बळाने, कधी गांधीजींचे फोटो देऊन... "जेवढ्या जमिनी जास्त तेवढा वेगवान विकास" हे आम्हाला कायम लक्षात ठेवावे लागेल. म्हणूनच आजचे नेते, "सगळ्या गोष्टी सरकारला कशा मागता? तुम्ही पण जरा हात-पाय हलवा ना..." असा प्रेमळ, पण दादागिरीचा सल्ला जनतेला देतात. त्याच नेत्याचा पोरगा अत्यंत धाडसीपणे १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत घेत असेल तर तोच बाप आपल्या पोराने "चुकीचे काही करू नये असे आपण आधीच सांगितले होते" असे म्हणत त्याच्या कर्तृत्वाला दाद देतो. मीडियावाले फार आगाऊ आहेत. निष्कारण साप म्हणून भुई थोपटण्याचे काम करतात. अशा विषयांची फार बोंबाबोंब झाली, तर जमीन खरेदीचा व्यवहारच रद्द केला आहे, असे सांगणारे नेते आमच्याकडे आहेत. म्हणूनच म्हणतो मिस्टर लिंकन, अशी फिरवाफिरवी आजच्या पिढीला शिकविण्याची गरज असताना तुम्ही कसले धडे शिकवण्याचा आग्रह धरला होता? 

मिस्टर लिंकन, तुमच्या पत्रात तुम्ही, "मला माहीत आहे, सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत... तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे," असे लिहिले होते, पण नेत्यांची पोरं एसी घरात राहतात. एसी गाड्यात फिरतात. मग त्यांना घाम कसा येणार? घाम आला नाही तर त्यांनी कमवायचेकसे..? त्यामुळे तुमचा हा मुद्दाही आता गैरलागू आहे. त्यापेक्षा नेत्यांची पोरं कोणते कायदे, कसे वाकवायचे याचा अचूक अभ्यास करून कोट्यवधी रुपयांचा कर वाचवतात...

त्यासाठी तुम्ही त्यांना शिकवणाऱ्या बापाचे कौतुक करायला हवे!

English
हिंदी सारांश
Web Title : Our spoiled brats are thugs; their flags fly everywhere!

Web Summary : The author laments the erosion of values, contrasting Lincoln's ideals with today's reality where leaders' children amass wealth through dubious means, bending rules, and evading taxes, aided by their influential fathers.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPoliticsराजकारण