शहरं
Join us  
Trending Stories
1
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
2
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
3
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
4
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
5
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
6
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
7
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
8
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
9
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
10
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
11
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
12
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
13
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
14
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
15
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
16
गीता जयंती २०२५: सगळी भगवद्गीता नको, सुखी जीवनासाठी ५ उपदेश कायम लक्षात ठेवा; वाचा, गीतासार
17
आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकल्याला बिबट्या घेऊन गेला, गावात भीतीचे वातावरण...
18
जगाला धक्का! नामिबियात 'एडोल्फ हिटलर' सलग पाचव्यांदा विजयी; वाद वाढताच नेत्याने घेतला मोठा निर्णय...
19
'रनमशिन' कोहलीचा मोठा पराक्रम! क्रिकेटच्या देवाला मागे टाकत बनला वनडेतील शतकांचा 'बादशहा'
20
कॅनडाच्या किनाऱ्यावर 'UFO'? कार्गो जहाजाच्या कॅमेऱ्यात घटना कैद, पाहा VIDEO...
Daily Top 2Weekly Top 5

पिलं एकाची, घास भरवणारा दुसराच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 06:00 IST

निसर्गात अनेक चमत्कारिक गोष्टी आपल्याला आढळतात. त्यातील एक प्रकार म्हणजे ‘दत्तक पालक’. काही पक्षी स्वत: घरटी बांधत नाहीत, पण पिलांना जन्म देण्याची वेळ आली की आपली अंडी ते दुसऱ्याच्या घरट्यात घालतात. हे दत्तक पालकच मग या पिलांना ‘आयुष्यभर’ सांभाळतात..

ठळक मुद्देपावशा, काेकीळ, चातक, तसेच कुकु म्हणजे कोकीळ कुळातील काही पक्षी स्वत: घरटं बांधत नाहीत, त्यामुळे पिलांना जन्म देताना त्यांची मोठी अडचण होते. हे पक्षी मग एक युक्ती करतात. आपली अंडी ते दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात घालतात आणि निर्धास्त होतात.

(माहिती : डॉ. श्रीश क्षीरसागर)

ही छायाचित्रं पाहिल्यावर काय वाटतं? छोटा पक्षी मोठ्या पक्ष्याला भरवतोय की मोठा पक्षी छोट्या पक्ष्याला भरवतोय? की हे पक्षी नुसतीच गंमतजंमत करताहेत? या छायाचित्रांतील छोटा पक्षी आहे सनबर्ड. यालाच शिंजिर किंवा सूर्यपक्षी असंही म्हणतात. मोठा पक्षी आहे तो ‘ग्रे बेलिड कुकु’. म्हणजे कोकीळ कुळातला एक पक्षी.

यातला मोठा पक्षी खरंतर आहे एक पिल्लू आणि छोटा पक्षी आहे ‘दत्तक पालक’. निसर्गातलं हे एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे. पक्ष्यांच्या काही प्रजातींमध्ये आपल्या पिलांची वाढ, पालनपोषण त्यांचे जन्मदाते करीत नाहीत, तर ‘दत्तक पालक’ या पिलांची पूर्ण जबाबदारी घेतात. म्हणजे अगदी अंडी उबवण्यापासून ते त्यातून पिलू बाहेर येऊन ते मोठं, ‘स्वतंत्र’ होत नाही, तोपर्यंत..! हे पक्षीही आपल्या पिलांप्रमाणेच दुसऱ्यांच्या पिलांवरही आपलं समजून प्रेम करतात, त्यांना वाढवतात. इथेही तेच दिसतं.

कावळा आणि कोकिळेचं उदाहरण यासंदर्भात अगदी प्रसिद्ध आहे. कोकिळा कावळ्याच्या घरट्यात आपली अंडी घालते आणि नंतर कावळेच त्यांच्या पिलांचं पालनपोषण करतात.

पावशा, काेकीळ, चातक, तसेच कुकु म्हणजे कोकीळ कुळातील काही पक्षी स्वत: घरटं बांधत नाहीत, त्यामुळे पिलांना जन्म देताना त्यांची मोठी अडचण होते. हे पक्षी मग एक युक्ती करतात. आपली अंडी ते दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात घालतात आणि निर्धास्त होतात. त्यांच्या पिलांची सर्व काळजी मग हे ‘दत्तक पालक’ घेतात.

नुसतंच दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात आपली अंडी घालून उपयोग नाही. त्या पक्ष्याच्या मादीनेही नेमकी त्याच काळात अंडी घातलेली असावी लागतात. असं घरटं हे पक्षी आधी शोधतात. समजा कोकीळ पक्ष्यांच्या जोडीला कावळ्याचं असं घरटं सापडलं.. पण कावळ्याची जोडी घरट्यात असताना तिथे अंडी घालायची कशी? त्यामुळे कावळ्याच्या घरट्याजवळ जाऊन कोकीळ पक्षी खूप वेळ ओरडतो. काही वेळानं कावळ्यांनाही हा आवाज असह्य व्हायला लागतो. आपल्या पिलांना या पक्ष्यापासून धोका आहे, असं त्यांना वाटायला लागतं. त्यामुळे कोकीळला तिथून हुसकावण्यासाठी ते घरट्यातून बाहेर पडतात, कोकीळही त्यांना भुलवत दूर नेतो. तेवढ्यात कोकिळा संधी साधते आणि कावळ्याच्या घरट्यात आपली अंडी घालते! त्यांचं काम आता झालेलं असतं! कारण यापुढे पिलांची सारी जबाबदारी कावळ्यांची !

या पक्ष्यांच्या चतुराईच्या आणखीही काही गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात अंडी घालणारे हे पक्षी अगोदर घरट्यात असलेली काही अंडी खाली पाडून फोडून टाकतात. म्हणजे समजा अगोदर चार अंडी असतील, तर नंतरही चारच अंडी तिथे असतील. त्यामुळे घरटं असलेल्या पक्ष्याला अंड्यांतला झालेला बदल कळत नाही. कारण ही अंडीही साधारण सारख्याच आकाराची असतात.

अंड्यांतून पिलं बाहेर आल्यावर सुरुवातीला सारीच पिलं छोटी असतात, पण दोन-तीन आठवड्यांतच ही ‘दत्तक पिलं’ झपाट्यानं मोठी होतात. आपल्या पालकांपेक्षाही आकारानं ती धिप्पाड होतात. काही पिलं तर पालकांपेक्षा आकारानं चार-पाच पट मोठी होतात. त्यामुळे त्यांना खायलाही तसंच भरभक्कम लागतं. ही पिलं वाढवताना, त्यांच्यासाठी खाद्य गोळा करताना दत्तक पालकांचीही अक्षरश: दमछाक होते; पण तरीही ही पिलं ते वाढवतात. पिलं मोठी झाल्यानंतर काही पक्ष्यांना कळतंही ही पिलं आपली नाहीत; पण तोपर्यंत पिलाबरोबर त्यांचे बंधही जुळलेले असतात. त्यामुळे हे दत्तक पालक या पिलांना टाकून देत नाहीत.. मायेनं त्यांना वाढवतात.

वटवट्या, राखी, शिंपी, रेपाळ वटवट्या, सातभाई.. यांसारखे पक्षी इतर पक्ष्यांच्या पिलांचे पालक होतात. कारण, आपली अंडी त्यांनी या पक्ष्यांच्या घरट्यात घातलेली असतात.

पालक पक्ष्यांना ही पिलं मोठी करण्यात तसा काही फायदा नसतो, उलट त्यासाठी त्यांना मोठे कष्टच पडतात; पण एकमेकांच्या आधारानं जगताना अशी अनेक उदाहरणं निसर्गात दिसतात. उदाहरणार्थ माकड आणि हरीण. माकडं झाडावरची फळं काढून हरणांकडे फेकतात. हरीणही वाघ वगैरे आला की आवाज करून माकडांना सावध करतात.. निसर्गात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी दडलेल्या आहेत. त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहायला फक्त हवं..!

(छायाचित्रे : मुकेश कुकडे, नागपूर)