शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

कितीही संकटे आली, तरी मोदींचा मार्ग उज्ज्वलच!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 06:05 IST

काहीजण अंत्यसंस्काराच्या अग्नीवर आपल्या दिवास्वप्नांची भाकरी भाजण्यात मग्न असले, तरी मोदींसाठी प्रत्येक संकट म्हणजे गरिबांच्या सेवेच्या संकल्पाचा पुनर्निर्धार असतो.

ठळक मुद्देकेंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकूण कार्यकाळ सात वर्षांचा टप्पा पूर्ण करीत असताना मोदी सरकारच्या कामगिरीबाबत भूमिका मांडणारा लेख..

डॉविजयचौथाईवाले

(प्रभारी, विदेश विभाग, भारतीय जनता पक्ष)

आजच्या कोरोनाच्या संकटात अनेक राजकीय विश्लेषकांनी सरकारवर विशेषतः मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. अर्थातच आव्हाने ही काही मोदींसाठी नवीन बाब नाही. २०१४ मध्ये मोदीजींनी केव्हा शपथ घेतली तेव्हा देशापुढे अनेक आव्हाने होती. विस्कटलेली अर्थव्यवस्था, भ्रष्टाचाराचे साम्राज्य, नेतृत्वाचा अभाव, दहशतवाद यासारख्या अनेक समस्यांना देश सामना करत होता. परंतु मोदींच्या नेतृत्वाखाली या सर्व प्रश्नांना देश समर्थपणे सामोरा गेला. भाजपा सरकारने जाहीर केलेल्या लोकाभिमुख योजनांच्या बाबतीत त्यांनी असाध्य वाटणारे लक्ष्य जाहीर केले, त्याची पूर्णतः साध्यता केली एवढेच नव्हे तर अनेक योजनांमध्ये हे लक्ष्य वेळेच्या आधीच साध्य झाले. जनधन योजनेमध्ये दहा कोटी लोकांना १००० दिवसांत बँकेची खाती उघडण्याचे लक्ष्य केवळ एका वर्षात साध्य करण्याची किमया मोदी सरकारने करून दाखविली. प्रत्येक गावात वीज, नळाचे स्वच्छ पाणी अशा अनेक योजना यासंदर्भात सांगता येतील.

या सर्व योजनामागे मोदींची कल्पकता व दूरदृष्टी तर दिसून येतेच, परंतु यापेक्षाही ठळक वैशिष्ट्य म्हणजे अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट नियोजन, व्यवस्थापन, सतत मूल्यमापन व पाठपुरावा ! आधारभूत संरचनेच्या क्षेत्रात (उदाहरणार्थ रेल्वे, रस्ते, पूल) सुद्धा भारताने गेल्या सात वर्षांत फार मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे.

प्रशासकीय यंत्रणेत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मोदींचा सतत आग्रह असतो. मोदी

सरकारच्या दूरदृष्टीमुळे तंत्रज्ञानाचा वापर इंग्रजी भाषा समजणाऱ्या निवडक वर्गापुरता मर्यादित नाही. आज आधार, मोबाइल आणि एक-वेळचा डिजिटल संकेत क्रमांक (ओटीपी) यांच्या साहाय्याने जो कोणी शून्य ते नऊ क्रमांक वाचू शकतो तो या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सक्षम झाला आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमुळे मधल्या दलालांना वगळून आज १०० टक्के रक्कम लाभार्थीच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे.

मोदींनी फक्त भव्यदिव्य योजना आखून त्यांचीच अंमलबजावणी केली असे नव्हे,

अनेक मूलभूत गरजांकडे देशाचे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले होते. याआधी कोणत्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरील आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून स्वच्छतागृह बांधण्याचे आवाहन केले?

मोदीजींनी या व अशा अनेक क्षुल्लक वाटणाऱ्या परंतु अत्यंत मूलभूत गरजेच्या गोष्टींवरही आपल्या योजनांमध्ये भर दिला. मोदींची जनसंपर्काची पद्धतही अगदी निराळी आहे त्यामुळे पारंपरिक प्रसारमाध्यमांना ती नकोशी वाटते. सोशल मीडियाचा उपयोग करून पंतप्रधान जगाशी सरळ संवाद साधत असतात. मोदीजींनी सोशल मीडियाचे महत्त्व फार आधी ओळखले. दुसऱ्या टोकाला “मन की बात” द्वारे रेडिओसारखे जवळपास निष्क्रिय झालेले माध्यम त्यांनी पुन्हा जिवंत केले आणि देशाच्या कानाकोपर्‍यात स्वतःचे विचार पोहोचविले. परंतु त्यांनी मन की बातचे माध्यम संपूर्णतः अराजकीय ठेवून समाजातील अनेक अपरिचित पण तळागाळात आमूलाग्र परिवर्तन करणाऱ्या अनेक व्यक्तींचा भारताला परिचय करून दिला.

गेल्या सात वर्षांत मोदींनी जागतिक मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातही फार मोठी मजल मारली. २०१४ मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा भारताच्या परराष्ट्र धोरणात अनेक त्रुटी होत्या. उदाहरणार्थ सुमारे १७ वर्षे भारताचे कुणीही पंतप्रधान नेपाळ भेटीसाठी गेले नव्हते. श्रीलंकेसाठी हे अंतर २८ वर्षे आणि यूएईसाठी ३४ वर्षे होते. पंतप्रधान मोदींनी व्हाइट हाउस मधील तीन वेगवेगळ्या रहिवाशांशी व्यवहार करूनही भारत-अमेरिका संबंध सुदृढ केले. त्यांनी इस्राईलला भेट दिली, पण त्याचबरोबर मध्यपूर्व देशांसोबत असलेले भारताचे पारंपरिक

संबंध दृढ केले. आफ्रिकन देशांशी सहयोग व भागीदारीचे नवे मार्ग त्यांनी उघडले. नवीनतम संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात केवळ एका देशावर अवलंबून न राहता अमेरिका, फ्रान्स, इस्त्राईल आणि रशिया यांसारख्या विविध देशांमधून त्याची खरेदी केली. त्याचवेळी संरक्षणात थेट परकीय गुंतवणुकीला महत्त्व दिले. QUAD बळकटी देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. सीमापार दहशतवादाला कठोर प्रतिसाद आणि भारताच्या उत्तरी शेजारच्या गैरवर्तणुकीला भारताने ठोस उत्तर दिले त्याचे जगभर कौतुकच झाले.

आजच्या कोविड च्या संकटात भारताला मदत करणारा प्रत्येक देश प्रथम भारताने त्या देशाला जी मदत केली त्याबद्दल भारताला धन्यवाद देत आहे. भारताच्या “व्हॅक्सिन मैत्री” कार्यक्रमावर टीका करणाऱ्या विरोधकांना हे समजत नाही की जर भारताने अनेक देशांना कोविडच्या लसीचा पुरवठा केला नसता तर त्या देशांनी आज आपल्याला कदाचित मदत केली नसती. सध्याच्या महामारीमुळे अनेकांना आपल्या राजकीय पुनर्वसनाचे दिवा स्वप्न पडू लागले आहे. प्रथमतःच निवडून आलेल्या एका लोकसभेच्या खासदाराने तर “मला मोदींच्या पराभवाची मास्टर की सापडली आह”, असेही जाहीर विधान एका वृत्तपत्रात केले आहे. काहीजण अंत्यसंस्काराच्या अग्नीवर टीआरपीची भाकरी भाजण्यात मग्न आहेत. परंतु मोदींसाठी प्रत्येक संकट म्हणजे गरिबांची सेवा करण्याच्या त्यांच्या संकल्पा चा पुनर्निर्धार असतो. मानवी संवेदनांसह कार्यक्षम सरकार आणि सुधारणांच्या माध्यमातून समाजातील दलित व असुरक्षित घटकांचे संरक्षण आणि सबलीकरण या मार्गांवर मोदी सरकारचा प्रवास चालू आहे. अब्जाहून अधिक भारतीयांच्या सद्भावना आणि पाठबळामुळे मोदीजी भारतीयांच्या संपन्नतेचा मार्ग प्रशस्त करतील हे नक्की.

(लेखातील मते संपूर्णतः वैयक्तिक )