शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

लिब्रा नावाचं डिजिटल नाणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 6:00 AM

क्रिप्टोच्या बाजारात आता थेट मार्क झुकेरबर्गची फेसबुक ही कंपनी उतरत आहे. आपले स्वतःचे चलन ही कंपनी सुरू करत आहे. या चलनाचं नाव आहे लिब्रा.

ठळक मुद्देही करन्सी नियमात बसवण्यासाठी लिब्रा असोशिएशन कार्यरत असणार आहे. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाही सहभागी होता येईल

 

तुमच्याकडे भरमसाठ लक्ष्मी आहे पण हा पैसा कधीच प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणार नाही... असे चलन म्हणजे क्रिप्टो.. बिटकॉइनमुळे क्रिप्टोकरन्सी आता जवळपास साऱ्यांनाच माहिती झाली आहे. जगात अनेक प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी आहेत. पण त्यावर वॉच ठेवणारी अशी कोणतीही यंत्रणा नाही. या करन्सीमध्ये गुंतवणूक करणारे काही जण मालामालही झाले आहेत तर काही धनकुबेर मोठ्या प्रमाणात पैसा गमावूनही बसले आहेत. कारण, यातली सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे सुरक्षा. आपल्या हातात, बँकेत पैसे ठेवलेले असतात. त्यामुळे ते प्रत्यक्ष कधीही काढता येतात. पण क्रिप्टोकरन्सी केवळ डिजिटली उपलब्ध असते. जसे व्यवहार आपण डिजिटल पद्धतीने सध्याही करतो तसेच व्यवहार या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातूनही आता काही ठिकाणी होत आहेत. पण, अद्याप त्याचा पूर्णपणे वापर होताना दिसत नाही. या क्रिप्टोच्या बाजारात आता थेट मार्क झुकेरबर्गची फेसबुक ही कंपनी उतरत आहे. आपले स्वतःचे चलन ही कंपनी सुरू करत आहे. या चलनाचं नाव आहे लिब्रा. गेल्या वर्षी यासंदर्भात काही घोषणा झाल्या होत्या. पण हे चलन आता जानेवारीत सुरू होईल अशी चर्चा आहे. लिब्रा या क्रिप्टोकरन्सीला जगात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. कारण ही करन्सी नियमात बसवण्यासाठी लिब्रा असोशिएशन कार्यरत असणार आहे. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाही सहभागी होता येईल असे बोलले जाते.

गायब होणारं  गूढ स्मारकगेल्या काही दिवसांपासून गायब होणाऱ्या स्मारकांची चर्चा जोरात सुरू आहे. ही स्मारकं येतात कुठून, कोण त्यांना उभं करतं आणि ती मध्येच गायब कशी होतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.पहिलं स्मारक नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतल्या उताह  राज्यात आढळलं होतं. जवळपास १० फूट उंच आणि दीड फूट रुंद त्रिकोणी आकाराचं स्टीलचं हे स्मारक लक्ष वेधून घेणारे होते. उताहमधल्या खडकांमध्ये - निर्मनुष्य ठिकाणी हे स्मारक कोणीतरी उभं केलं होतं. ते लोकांच्या नजरेत पडताच आणि त्याबद्दल उत्सुकता ताणली जात असतानाच अचानक ते गायब झालं. त्यानंतर तसेच स्मारक रोमानियामध्येही  आढळलं होतं. तेही काही दिवसांतच गायब  झालं. आता गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियामध्येही आणखी एक स्मारक दिसून आलं आहे. विशेष म्हणजे ही तिन्हे स्मारके साऱखी आहेत.या स्मारकांमुळे पुन्हा एकदा एलियन्सबाबत तर्क लावले जात आहेत. सोशल मीडियावर गेल्या आठवड्यात यावर बरीच चर्चा घडली आहे. काहींनी म्हटले की हे २०२० या महाकठीण वर्षाचा शेवट करणारे हे बटन आहे. ते प्रेस करा, म्हणजे कोरोनाच्या संकटातून सूटका होईल.एलियन्स आहेत आणि त्यांनी पृथ्वीवर येऊन स्मारकांसारखी हे पिलर्स उभे केले असा मानणाराही एक गट आहे. पण त्यावर कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. जोवर हे पिलर आणते कोण, लावते कोण आणि तयार करतंय कोण, याची ठोस माहिती मिळत नाही, तोवर या चर्चा अशाच रंगत राहणार आहेत

- पवन देशपांडे

(सहायक संपादकलोकमतमुंबई)