शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

आकाशाच छत पांघरणारी माय- लेकरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 09:20 IST

हरवलेली माणसं  : नंदूभाऊ आणि आरतीताईच्या मायेच्या घरट्याला पाय लागताच आम्हाला समाधान वाटलं. आम्हाला पालवे कुटुंबियांच्या समर्पक सेवावृत्तीची अनुभूती असल्याने नाझिमा आणि सोहेल यांच्या भविष्याची काळजी मिटल्याचा विश्वास येत होता. सोहेलच्या वयाची तीन मुलं तिथं शिक्षण घेत होती. नाझिमावर सहा महिन्यांच्या आत बरी होईल, असा विश्वास नंदूभाऊंनी देताच आम्हाला मोहीम यशस्वी झाल्याचा विश्वास आला. आता जवळपास तीन महिने होऊन गेलेत. सोहेल शिकू लागलाय. त्याची आई उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहे. दोघेही सेवासंकल्पाच्या परिवारात रमली आहेत. 

- दादासाहेब थेटे

तुमची दोन्ही पाखरं शांत झोपी गेलीयेत! आरतीताईच्या या मेसेजमुळे कित्येक दिवसांनंतर काल रात्री मलाही शांत झोप लागली. एक मनोरुग्ण आई आणि तिचा अल्लड, अवखळ मुलगा देशी रोडच्या कोपऱ्यावर अंधाराच्या आडोशाला थंडी पावसात उघड्यावरच झोपायचे. दिवसभर पायाला भिंगरी लावून शहरातील उष्ट्या पात्यावर आणि लोकांनी दिलेल्या अन्नावर पोटाची गुजराण करायचे. मुलगा तर एवढा चुणचुणीत होता की, शहरातल्या अनेक पोरांशी त्याची ओळख झालेली. यात्रेत जाणाऱ्या पोराच्या हातातले खेळणे पाहून यालाही त्या खेळण्याचा मोह व्हायचा. पतंग उडवायला त्याला भलत आवडत होतं. जुनेदभाईच्या दुकानासमोर त्याला पतंग उडवताना पाहून तर मन भरुन आलं होतं. 

रस्त्यावर खेळणाऱ्या पोरांनी आपल्याला खेळात घ्यावं, आपल्याशी खेळावं एवढीच त्याची माफक अपेक्षा असायची. उगाच कुणाच्या वस्तूला हात लावला म्हणून त्याला कित्येकदा मार खायची वेळ यायची. दिवसभर माणसाचं, माणसांच्या पोरांचं, पोरांच्या खेळण्याचं निरीक्षण करून हे लेकरू रस्त्यावरच आपल्या आईच्या कुशीत झोपायचं. कधी कधी बेवडे लोक या माय-लेकरांना झोपेतून उठवून त्रास द्यायचे. कधी देशी रोडवर होणाऱ्या गोंधळाने त्यांची झोप उडायची. महिन्यापूर्वीच पोलीस प्रशासनाच्या सर्व संमत्या मिळवून दोघांचीही व्यवस्था लावण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ही दोघेही १५ ते २० दिवस शहर सोडून निघून गेले. आम्ही त्यांचा खूप शोध घेतला; पण ते आम्हाला सापडले नाही. आठवड्यापूर्वी ते परत अंबडमध्ये दिसून आले. दोन्ही माय-लेकरांसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत हे सोशल मीडियावरून अनेकांना समजलं होतं. त्यातील काही लोकांनी आम्हाला फोन करून माय-लेकराबद्दल माहिती कळवली.

२० दिवसांनंतर आम्ही या दोघांना भेटायला गेलो. सोहेलनं मला पाहताच ओळखलं होतं. त्याला पैसे, कपडे, खेळणी काहीच नको होतं. त्याच्याशी मैत्री करून त्याचा विश्वास मिळवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले; पण तरीही तो अबोलच होता. शाहरुखभाईंशी मात्र त्याची जेमतेम दोस्ती जुळली होती. त्यांच्या मोबाईलवर खेळायला तो समशेर मशीदकडे जायचा. याच मशिदीसमोर एका रात्री ११ वाजता ही माय-लेकरं झोपलेली असताना, डुकराने सोहेलचा पाय तोंडात पकडल्याचे पाहून शाहरुखभाई व मज्जूभाई यांनी त्याला त्या डुकरापासून वाचवले होते. ही घटना कोणत्याही माणसाची झोप उडवणारी होती. एवढं निष्ठुर जगणं कुणाच्याच वाट्याला यायला नको होतं, ते सोहेल आणि त्याच्या आईच्या नशिबी आलं होतं. त्या दिवसापासून सोहेल प्रत्येक क्षण माझ्या डोळ्यासमोर उभा राहत होता; पण कायद्यावर चालणाऱ्या आपल्या व्यवस्थेत अनेक कायदेशीर बाबी पूर्ण करूनच या दोघांच पुनर्वसन शक्य होणार होतं. नंदू भाऊंनी पुनर्वसनासाठी हिरवा कंदिल दाखवला होता; पण महिला व बालकल्याण समितीची परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. इकडं सोहेलच्या आईच्या डोक्यात आळ्या झाल्याचं समजल्यानंतर मन अधिकच सुन्न झालं होत. पाष्टे सर, गणेश तात्या, जिगे सर, मोईन भाई या मंडळींना घेऊन पोलीस स्टेशनपासून ते या माय-लेकरांच्या पाठीमागे आमचा राबता सुरू झाला होता.

शेवटी संपत खांडेकर व संतोष दाभाडे यांच्या मदतीने महिला व बालकल्याण समितीची परवानगी मिळाली. दिवस ठरला. जुनेदभाईच्या दुकानासमोर ही माय-लेकरं जुनेदभाईंनी सकाळपासून रमवून ठेवली होती; पण ऐनवेळी महिला सरकारी कर्मचारी, गाडी व पोलीस प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशनवरून परत येईपर्यंत ते दोघेही देशी रोडकडे निघून गेले होते. त्यांचा पाठलाग करून त्यांना आम्ही देशी रोडवरच गाठलं. त्यांना गाडीत चढवताना अख्खा गच्च भरलेला रस्ता बघे होऊन आमच्याकडे बघत होता. बघ्यांनी गर्दी केली होती. जिगे सर व अशोक दादा, तात्या, जुनेदभाई, शाहरुखभाई, मुज्जूभाई या सर्वांच्या सहकार्याने आमची टीम सेवासंकल्पच्या रस्त्यानं गाडी निघाली होती. नाझिमाला ‘आम्ही तुमचे भाऊ आहोत. तुमच्या उपचारासाठी तुम्हाला घेऊन जातोय,’ असा विश्वास बसल्यानंतर ती काहीशी निवांत झाली होती. तरीही मनातून ती घाबरलेलीच होती. 

टॅग्स :Socialसामाजिकsocial workerसमाजसेवकFamilyपरिवार