तंत्रज्ञानाची आधुनिक संजीवनी
By Admin | Updated: August 30, 2014 14:38 IST2014-08-30T14:38:21+5:302014-08-30T14:38:21+5:30
एकेकाळी केवळ योग्य उपचार मिळाले नाहीत म्हणून जीव गमावणार्यांची संख्या मोठी होती. परंतु, कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयासारखी अत्याधुनिक रुग्णालये बालरुग्णांसह सर्वांसाठी जीवनदायीनी ठरत आहेत, त्याविषयी...

तंत्रज्ञानाची आधुनिक संजीवनी
- पूजा दामले
जगभरात वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणार्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लहान मुलांवर तत्काळ उपचार व्हावेत, या एकाच ध्यासातून अंधेरी येथे उभे राहिलेले कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय दरवर्षी शेकडो बालरूग्णांचे जीवन सुसह्य करीत आहे. केवळ बालरूग्णच नव्हे तर अन्य रूग्णांचेही जीवन येथे प्रगत उपचारांनी सावरले जात आहे. मुंबई शहरात सर्व प्रकारच्या जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य क्षेत्रातही उत्तम सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानही मुंबईत उपलब्ध व्हावे या उद्देशाने कोकिलाबेन रुग्णालयाची स्थापना करण्यात आली.
मुंबईसह राज्यातील लहान मुलांना हृदयविकाराचा त्रास असल्यास त्यांना उपचारासाठी केईएम आणि जे. जे. रुग्णालयाचा आधार आहे, मात्र तिथे प्रतिक्षायादी लांबलचक असल्याने त्यांना चेन्नई, दिल्ली गाठावी लागत असे. मात्र खासगी आरोग्य क्षेत्रात लहान मुलांच्या हृदयावर शस्त्रक्रिया रुग्णालय नव्हते. म्हणूनच सहा वर्षांपूर्वी कोकिलाबेन रुग्णालयात मुंबईकर, महाराष्ट्रासाठी चिल्ड्रेन्स हार्ट विभाग सुरू करण्यात आला.
भारतात दरवर्षी अडीच लाख रुग्णांचे मृत्यू केवळ यकृताच्या आजारामुळे होतात. यातील २५ हजार रूग्णांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. म्हणूनच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणासाठी एक खास विभाग सुरू करण्यात आला आहे. पूर्णवेळ स्पेशालिस्ट उपलब्ध असलेले कोकिलाबेन रुग्णालय हे मुंबईतील एकमेव खासगी रुग्णालय आहे. युरोलॉजी आणि युरो ऑनकोलॉजी, गायनोकोलॉजी आणि गायनॅक ऑनकोलॉजी, डोक आणि मान कर्करोग, ऑबस्ट्रेक्टिव्ह स्लीप अँपनिआ, फुफ्फुसातील ट्युमर, कार्डिएॅक आणि मोरबिड ओबेसिटीच्या शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.
पश्चिम भारतात अत्याधुनिक यकृत प्रत्यारोपण केंद्र, रोबोटिक सर्जरी, खासगी क्षेत्रामध्ये पिडिएॅट्रिक्स कार्डिएक सायन्स प्रोगॅ्रम राबवणारे कोकिलाबेन हे एकमेव रुग्णालय आहे. याचबरोबर रुग्णांचे पुनर्वसन आणि स्पोर्ट्स मेडिसीन विभाग असणारे हे पहिले रुग्णालय आहे. आजमितीस या रुग्णालयात १५ विशेष विभाग, २६ स्पेशालिस्ट डिपार्टमेंट, २0 स्पेशालिटी क्लिनीक कार्यरत असल्याचे कोकिलाबेन रुग्णालयाच्या अध्यक्षा टीना अंबानी यांनी सांगितले.
संशोधन केंद्र
कोकिलाबेन रुग्णालयात संशोधन केंद्र असले तरी केवळ एक प्रयोगशाळा इतके ते र्मयादित स्वरुपाचे नाही. कार्डिओलॉजी, कार्डिएक सर्जरी, अँनेस्थेसिओलॉजी, रेडिओलॉजी, पॅथोलॉजी, हिस्टो - पॅथोलॉजी, नेफ्रोलॉजी, न्युरोलॉजी, युरोलॉजी, ऑर्थाेपेडिक्स, पिडिएट्रिक्स कार्डिएक सर्जरी, फिजिकल मेडिसीन आणि पुनर्वसन इत्यादी विभागांमध्ये संशोधन केले जाते. रुग्णांच्या एकत्रित केलेल्या माहितीचा अभ्यास करून संशोधन केले जाते. येथे इन्स्टिट्युशनल सायंटिफिक अँण्ड एथिक्स बोर्ड तयार करण्यात आला आहे. यात १६१ क्लिनिकल रिसर्च करण्यात आले आहेत त्यापैकी १0७ प्रोजेक्ट हे स्वत: रुग्णालयाने पुढाकार घेऊन सुरू केले आहेत.
संसर्ग टाळण्यासाठी प्रोटोकॉल
रुग्णालयात अनेक रुग्ण असल्याने रुग्णालयात संसर्गाची लागण होण्याचे प्रमाण वाढते. म्हणूनच रुग्णालयामध्ये संसर्गाचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी एक प्रोटोकॉल आखला आहे. अतिदक्षता विभागामध्ये संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. ते टाळण्यासाठी एक विशिष्ट प्रोटोकॉल आखण्यात आला आहे. यात अतिदक्षता विभागात खाटांमध्ये जास्त अंतर ठेवण्यात आले आहे. संसर्ग टाळण्यासाठी दोन विशेष विभाग करण्यात आले आहेत. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्यांना बाहेरची हवा आत येणार नाही, अशा विभागात ठेवण्यात येते. मात्र टीबीसारख्या संसर्गजन्य रोग झालेल्या रुग्णांना एका वेगळ्य़ा विभागात ठेवण्यात येते.
चिल्ड्रन हार्ट सेंटर
या सेंटरमध्ये वर्षभरात ८00 हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात येतात तर ४00 हून अधिक स्पाईन कॅथ लॅब प्रोसिजर करण्यात येतात.
यकृत प्रत्यारोपण
आतापर्यंत रुग्णालयात ५५ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. जिवंत अवयवदाते - ४९, कॅडेव्हर - ६
रोबोटिक सर्जरी
सगळ्य़ा स्पेशालिस्ट विभागांमध्ये मिळून दरवर्षी ५00 हून अधिक शस्त्रक्रिया पार पडतात.
५ सपोर्ट ग्रुप
रुग्णालयातील औषधोपचाराने शारिरीकरित्या पूर्णत: बरा होत असला तरी अनेकदा रुग्णाची मानसिक स्थिती कमकुवत होते. अशावेळी त्याचे समुपदेशन केले अथवा तशा आजारातून बर्या झालेल्या लोकांशी त्याची भेट घालून दिली तर त्याला मानसिक आधार मिळतो. असे ५ सपोर्ट ग्रुप केवळ मानसिक आधारच देत नाहीत, तर रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आजाराविषयी माहितीही देतात.
कोकिलाबेन रुग्णालय हे १0 लाख चौरस फूट जागेत २0 मजली इमारतीचे आहे. रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात १८0 खाटा आहेत. २२ ऑपरेशन थिएटर तसेच २४ तास खुला असणारा अपघात विभाग आहे. मोठे डायलेसिस सेंटर आहे. या रुग्णालयात ४२ युनिट्स असून १ हजार ३५0 पूर्णवेळ स्पेशालिस्ट डॉक्टर, १,३00 पॅरामेडिक्स आणि ११ हजार १00 परिचारिका कार्यरत आहेत. निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिट आणि पिडॅट्रिक्स इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये मिळून ३0 खाटा आहेत.
अत्याधुनिक तंत्रज्ञान : भविष्यातही रुग्णांना उत्तम प्रतीचे उपचार मिळावेत यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले जाणार आहे. येथे दा विन्सी सर्जिकल सिस्टीमचा (रोबोट) वापर करून शस्त्रक्रिया केल्या जातात. न्युरोसर्जरी, नोवालिसटीएक्स, इन्फोमेशन गाईडेड सर्जरी, रेडिओ सर्जरी आणि ट्रायलॉजी, रेडिएशन थेरपी हे सर्व उपचार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येतात. ११ हजार १00 परिचारिका कार्यरत आहेत. निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिट आणि पिडॅट्रिक्स इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये मिळून ३0 खाटा आहेत.