शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘चांदोबा’ची जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 06:05 IST

के. सी. शिवशंकर यांचं सारं आयुष्य  ‘चांदोबा’मधली चित्रं काढण्यात गेलं.  एखाद्या मासिकाचं व एखाद्या चित्रकाराचं  असं अद्वैत घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. 

ठळक मुद्देचित्रकार के. सी. शिवशंकर  यांचं नुकतंच वयाच्या सत्त्यावण्णव्या वर्षी  निधन झालं. त्यांच्या ब्रशमधून उमटलेल्या  ‘विक्रम वेताळ’ची छबी अजरामर झालेली आहे.  त्यांच्या चित्रांविषयी व चित्रांसह ‘असण्या’विषयी प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याशी संवाद

- चंद्रमोहन कुलकर्णी

* के. सी. शिवशंकर आणि ‘चांदोबा’विषयी तुमच्या काय आठवणी आहेत?लहानपणापासून आपण जे बघतो, ते आपल्या बॅकग्राऊंडला सतत राहातं. त्याचे संस्कार होतात हा शब्द मी वापरणार नाही. आपल्यासारख्या मध्यमवर्गी लोकांकडे समज तयार होत जाणार्‍या वयात काय असतं वाचायला? - चित्रात छापलेलं खरं असतं असं वाटण्याच्या वयापासून मी व माझ्यासारखे असंख्य लोक ‘चांदोबा’शी जोडलेले आहेत. लहानपणी बघितलेली ती चित्रं मनात कोरली गेलीहेत. के. सी. शिवशंकर हा वयाच्या शंभरीपर्यंत पोहोचू लागलेला माणूस होता. त्यांचं सारं आयुष्य ‘चांदोबा’मधली चित्रं काढण्यात गेलं. एखाद्या मासिकाचं व एखाद्या चित्रकाराचं असं अद्वैत घडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. परदेशात असं होत असेल, पण आपल्याकडे एक चित्रकार व एक मासिक यांचं इतकं घट्ट नातं जुळलेलं असावं याचं मला कौतुक वाटतं. ते गेले नि ते नातं संपलं, मात्र त्यांच्या चित्रांनी केलेला दृश्य परिणाम हा वाचकांसोबत राहिला. लॅन्डस्केप, पोट्रेट करणारे चित्रकार आता तुम्हाला दर पावलाला आढळतील; पण इलस्ट्रेशन करणं ही साहित्यामधली एक विशेष गोष्ट आहे. ते एक प्रकारचं साहित्यच मानतो मी. शंकर यांच्या कामाबाबतीत तर नुसते कष्ट महत्त्वाचे नसतात, त्यातून कलाकार मूळ संहितेला प्रवाही करणारी जी मांडणी करतो ती महत्त्वाची ठरते. विशिष्ट आशयासोबत प्रदीर्घ काळ काम करणं या कृतीला नमस्कार करावा इतकं हे विशेष आहे!* त्यांच्या चित्रांचं महत्त्व काय?जवळपास तेरा भारतीय भाषांमध्ये ‘चांदोबा’ प्रकाशित होत होता, चित्रं पोहोचत होती. तो सगळा काळ पाहता शंकर यांच्या चित्रकलेचा ‘प्रभाव’ कुणावर पडलाय असं मला फारसं जाणवलेलं नाही, त्याचं कारण निराळं आहे. ते एका विशिष्ट कंटेन्टबरोबर काम करत होते. तसा आशय इतर मासिकांमध्ये नव्हता. त्यांची चित्रं ही संपूर्ण भारतीय शैलीतली होती. कुठल्याही स्तरातल्या सामान्य माणसाला त्यांची चित्रं पाहून वाटायचं, ‘हे माझ्यासाठी आहे’ किंवा ‘हे मीच काढलंय.’ कलाकार आणि वाचक एकमेकांना आपल्या एरियात घेतात, विश्वास देतात, भाषा आपलीशी करतात हे इथे घडलं आहे. वाचकाला चित्रातून त्याच्या भाषेतली गोष्ट शंकर यांनी सांगितली. परदेशातली चित्रकला किंवा शिल्पकला बघा, त्यांच्या अभ्यासाचा, तपशिलांचा सामान्य माणसाला इतका दरारा वाटतो की तो बिचकतो. कलाकारांपासून थोड्या अंतरावर राहून बघतो. शंकर यांचं यश त्यांची चित्रं ‘माझी’ वाटण्यात आहे. छोट्या गोष्टींसोबत आलेली ती भाबडी चित्रं आहेत. त्यांचे रंग भडक आहेत. दाक्षिणात्य माणसांचा तोंडवळा नि देहयष्टी निवडून त्यांनी विक्रम, वेताळ, संन्यासी, राजे, स्रिया, राजवाडे चितारले. माझ्या दृष्टीनं ते महत्त्वाचे कला निर्देशकही होते. इलस्ट्रेटरला अभिनय, दिग्दर्शन, वेशभूषा, केशभूषा, पात्ररचना सगळं बघावं लागतं. वाचकानं गृहीत धरून उपयोगी नाही, शरण जावं अशी संपूर्ण पात्रं सलगतेचा विचार करून रेखाटावी लागतात. आता शिंगं फुटलेल्या आपल्यासारख्यांना ती चित्रं बटबटित वाटतील; पण झाडाला लटकलेल्या कवट्या, विक्रमचा झगा, पांढरे केस गळ्यात आलेला वेताळ, खांद्यावरचं प्रेत, तलवारीच्या मुठीत गच्च झालेली बोटं, तलवारीचं पातं या सगळ्यांची कल्पना करून त्यांच्या निर्माणाची भूमिका जबाबदारीनं निभवावी लागते. तेव्हा कुठं वाचक चित्रकाराचं बोट धरून गोष्टीत शिरतात. थोडं आकर्षण, थोडी भीती व वाचकाची पकड सुटू नये याकरिता एन्ड पीस म्हणून एखादं छोटं चित्र ही गोष्ट अत्यंत कठीण आहे. त्यादृष्टीनं माझ्या मते शंकर यांच्यासारखा चित्रकार मानसशास्रज्ञही असतो.* अशा चित्रांची भूल आता नाही..तुम्ही कुठल्या माध्यमाद्वारे काम करता यानं सगळ्या गोष्टी बदलतात. विचार बदलतो. माध्यमानुसार तंत्र बदलतं नि कलेतून व्यक्त होण्याच्या पद्धती बदलतात. शंकर यांच्या काळात परकीय मासिकांचं चलन फारसं नव्हतं, त्यामुळं धकून निघालं. आज चित्रकारांना आशयानुसार आपलं कॅरॅक्टर डेव्हलप करण्याची संधी संपूर्ण जगामध्येच कमी आहे, भारतात तर जास्तच कमी आहे. आपल्याकडे दृश्य माध्यमांचा अलोट मारा याचं कारण आहे. शंकर क्रोकविलनं चित्रं काढायचे. लोखंड किंवा पितळेचं लांबसडक टोकाचं नीब नि इंडियन ब्लॅक इंक. त्यामुळं त्यांच्या रेषेचा दर्जा खूप वेगळा आहे. त्यातून आडव्या-तिरक्या वेगवान स्ट्रोक्सनी ते काम करायचे. जाणवतो, न जाणवतो अशा हलक्या स्वरांसारखी पातळ रेषा काढायचे. तर तुम्ही कुठल्या तंत्रासोबत काम करता हे महत्त्वाचं ठरतं, व ते काम कुठं दिसणार आहे हेही. चित्र भिंतीवर लागणार की छापलं जाणार यानुसारही पद्धत बदलते. चांदोबा पहिल्यांदा ऑफसेटमध्ये बर्‍यापैकी वितरण होणारा अंक असला तरी त्यावेळी हे तंत्र रूळलं नव्हतं. चित्रकाराला त्यात खूप सांभाळून, विचारपूर्वक काम करत गोष्टीचा स्वाद वाढवण्याची जबाबदारी होती. भारतातला हा मोठा काळ शंकर यांनी जवळजवळ जन्मभर गांभीर्यानं खांद्यावर पेलला. सकाळी साडेआठला कामाला येऊन बसणारा हा सर्मपित माणूस. विशिष्टच गोष्टीसोबत वाचकाला कंटाळा येऊ न देता तेच दृश्य सर्व तर्‍हेनं पाहता येण्याची, चित्रकलेची आयुष्यभर सेवा केलेला हा माणूस होता. असे दिग्गज जातात तेव्हा भीती वाटते.. की आपण आपली रेष हरवू नये, अभ्यास कमी पडू देऊ नये! कुठल्याही स्कूलचा नसणारा हा माणूस स्वत:च स्कूल झाला होता! आयुष्यभर शाईने चित्र काढणार्‍या या मनुष्याला नमस्कार करण्याचा योग ‘इन्कटोबर’सारख्या इन्स्टाग्राम हॅँडलमधून घेता येईल. कृतज्ञतेची ही संधी मुला-मुलींनी सोडायला नको.

मुलाखत  : सोनाली नवांगुळ