LMOTY 2020: मी महाराष्ट्राचा; महाराष्ट्र माझा!; सोनी सूदची मनापासून 'साद'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:03 PM2021-03-22T17:03:18+5:302021-03-22T17:03:55+5:30

Lokmat Maharashtrian of the year award 2020: मी मदत करण्यासाठी कोणाचीही वाट पाहत नाही. तुम्हीही पाहू नका. पुढे चालत राहा. लोक मदत मागतील. करत राहा. प्रत्येक वेळी मदत करणे शक्य होणार नाही. मात्र जेथे शक्य होईल तेथे जरूर मदत करा. - सोनू सूद

LMOTY 2020: I am of Maharashtra; Maharashtra is mine !; Sony Sood's heartfelt 'Saad' | LMOTY 2020: मी महाराष्ट्राचा; महाराष्ट्र माझा!; सोनी सूदची मनापासून 'साद'

LMOTY 2020: मी महाराष्ट्राचा; महाराष्ट्र माझा!; सोनी सूदची मनापासून 'साद'

Next

लॉकडाऊनच्या काळात तू मजुरांसाठी किती झटलास हे अवघ्या देशाने पाहिले. लोकांना मदत करण्याची प्रेरणा कोणाकडून मिळते ?
मी मूळचा पंजाबचा आहे. माझी आई प्राचार्य होती. बाबा लंगरमध्ये काम करत असत. त्यांनी दिलेल्या शिकवणुकीमुळे मी यशस्वी झालो. माझी शाळा म्हणजे माझे आईबाबा होते. मी मातीशी जोडलो गेलो आहे. मला लोकांनी प्रेम दिले. काम करण्याची जिद्द प्रत्येकाकडे आहे. फक्त आपण आपली ताकद ओळखणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी सरकारला दाेष देण्याऐवजी आपण पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्ट सरकारनेच केली पाहिजे, असे नाही. मी केलेल्या कामामुळे मला समाधान मिळते, एवढे माझ्यासाठी पुरेसे  आहे! आरोग्यासाठी काम करतानाच आता देशातील सर्वात मोठी ब्लड बँक सुरू करण्याचा विचार मी करतो आहे.


       या अनुभवानंतर आता जबाबदारी वाढली आहे, असे वाटते का ?
मी मदत करण्यासाठी कोणाचीही वाट पाहत नाही. तुम्हीही पाहू नका. पुढे चालत राहा. लोक मदत मागतील. करत राहा. प्रत्येक वेळी मदत करणे शक्य होणार नाही. मात्र जेथे शक्य होईल तेथे मदत करा. माझी जबाबदारी दिवसागणिक वाढत आहे. कारण लोक माझ्याकडे अनेक कारणांसाठी मदत मागत आहेत. कोणी लग्नासाठी मदत मागत आहे. कोणी गावात माकडे जास्त झाली आहेत त्यांना पकडण्यासाठी, तर काेणी गावात पाण्याचे पंप लावण्यासाठी मदत मागत आहे. हे एवढे सगळे का? - तर लोकांचा विश्वास आहे, की हा माणूस आपले ऐकेल. बरे याने झाले काय?-  तर मी स्वत:च स्वत:ला ओळखू लागलो आहे. आतापर्यंत २१०० शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत केली आहे. उशिरा का होईना, मला नेमके काय करायचे, ते समजले आहे. दिशा मिळाली आहे. मी रेल्वेने प्रवास केला आहे. मुंबई एक प्रकारची शाळा आहे. येथील रेल्वे आणि रस्त्यांनी मला आयुष्यभराचे धडे दिले आहेत. नागपूरने मला प्रेम दिले. माझ्या कामात नागपूरचे मोठे योगदान आहे. माझे महाराष्ट्राशी, मुंबईशी एक नाते आहे. मुंबईने मला ओळख दिली आहे. मी २५ वर्षांपासून येथे राहातो, महाराष्ट्र हीच माझी कर्मभूमी आहे! म्हणून तर ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’चा हा पुरस्कार माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. 


पण तुझे टीकाकारही आहेत, त्यांना काय उत्तर देशील?
लोकांनी टीका केली तर तुम्ही योग्य मार्गावर आहात; असे समजा आणि तुमचे काम सुरू ठेवा. मुंबई महापालिकेने माझ्या हॉटेलवर कारवाई केली असली तरी ते हॉटेल माझे नाही. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची संधी मिळाली तर त्यांचे आभारच मानेन, कारण ते खूप चांगले काम करत आहेत.


तुझ्या व्यक्तिगत आवडी-निवडीबाबत काय सांगशील ?
नागपूर माझे आवडते शहर आहे. मिसळपाव माझा आवडता खाद्यपदार्थ आहे. मराठीत सचिन पिळगांवकर माझा आवडता अभिनेता आहे. राजकारणात मला शरद पवार आवडतात.
 

Web Title: LMOTY 2020: I am of Maharashtra; Maharashtra is mine !; Sony Sood's heartfelt 'Saad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.