शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

आयुष्य किती छान असतं नै

By admin | Updated: May 23, 2015 16:56 IST

ग्रॅण्ड थिएटर ल्युमिए या प्रासादतुल्य मुख्य चित्रगृहाबाहेर रोज रेड कार्पेटवरचा खेळ रंगतो आणि त्यासाठी चहूबाजूने अफाट गर्दी लोटते. समोरचा रस्ता सामान्यांच्या वाहनांना बंद होतो.

- अशोक राणे

- कान डायरी - ३

इकडे फ्रेंच रिव्हिएराच्या काठावर कान महोत्सवात देशोदेशीच्या रुपेरी पडद्यावरच्या ललना नाना डिझाइन्सच्या, नाना रंगांच्या चमचमत्या, चकाकत्या पोषाखात रेड कार्पेटवर डौलदार पावले टाकीत आपल्या दिमाखदार आणि केवळ स्वर्गीय म्हणाव्या अशा व्यक्तिमत्त्वात अवतरताना मला  ‘अॅन’  या जपानी चित्रपटातील एका सुरकतलेल्या आजीबाईचे  शब्द सतत आठवत राहिले.

ऐंशीच्या पल्याड पोचलेली आजीबाई एका छोटेखानी उपाहारगृहात जॅम बनवून देण्याचं काम करते आहे. तिच्या हाताला न्यारी चव आहे. आजीबाईंच्या आधी हे काम स्वत:च करणारा मालकही तिच्या या पाककृतीच्या प्रेमात आहे. गि:हाईकांचीही मोठी रीघ रोज लागते आहे. त्यातलीच एक षोडषवर्षीय मुलगी जेव्हा पहिल्यांदा आजीबाईंच्या समोर येते तेव्हा आपल्या अधू नजरेने तिच्याकडे पाहणारी आजीबाई म्हणते,
‘‘तारुण्य किती चांगलं असतं नै..’’
 आजीबाई तिच्याचकडे पाहात राहिली आहे, असं वाटतं खरं, परंतु ती त्या मुलीकडे पाहता पाहता खूप खूप दूरवरचं काही तरी पाहते आहे..स्वत:चं षोडषवर्षीय रूप.. 
कानच्या या महोत्सवात  विविध देशातल्या सौंदर्यवती रेड कार्पेटवर चालताना सभोवताली जमलेला जमाव अक्षरश: भान हरपून जातो.  परंतु ही गर्दी जेवढी या नवतारकांना बघायला वेडी असते तितकीच ती साठी-सत्तरी ओलांडलेले देशोदेशीचे अभिनेते, दिग्दर्शक यांनाही पाहायला उत्सुक असते. टाळ्यांचा गजर आणि विविध आवाजातले चित्कार त्यांच्यासाठीही असतात. 
हा झाला रोज संध्याकाळचा एक दिमाखदार सोहळा ! कानची जगभर खास ओळख असलेला एक इव्हेण्ट ! परंतु दिवसभर जी मेजवानी चाललेली असते ती त्यापेक्षाही थोर असते. अविस्मरणीय असते. कमालीची तृप्तता देणारी असते. ही मेजवानी अर्थातच चित्रपटांची ! किती पाहू आणि किती नाही अशी अवस्था करून टाकणारी ! 
गेली जवळपास चाळीस वर्षे मी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना उपस्थिती लावत आलोय. आपल्याकडच्या महोत्सवात मी अलीकडे दिवसाकाठी जेमतेम तीन चित्रपट पाहतो, परंतु कानला रोजचे पाच. एखादा चुकलाच तर अपराधी वाटतं. कारणं दोन. एक, कानला त्या त्या वर्षातले नवेकोरे, कुठेही न दाखविलेले चित्रपट मुख्य स्पर्धा विभागाबरोबरच अनसर्टन रिगार्ड,   हॉर्स कॉम्पिटिशन आणि डिरेक्टर्स फोर्ट नाइट या अन्य तीन महत्त्वाच्या विभागात दाखविले जातात आणि दुसरं कारण म्हणजे कानचं हवामान ! युरोपमधला उन्हाळा म्हणजे आपल्या बेंगळुरू, पुणो, नाशिककडला हिवाळा. छानसं उबदार ऊन खात या थिएटरकडून त्या थिएटरकडे जात-येत राहायचं. एवढं चालणं होतं, एवढय़ा पाय:या चढणं-उतरणं होतं, परंतु थकवा कसला तो जाणवत नाही..आणि यातच भेटणारी नेहमीची मित्रमंडळी, नव्याने मित्रपरिवारात सामील होणारे वारकरी आणि त्यांच्याशी होणा:या सखोल चर्चा आणि सैलसर गप्पा! कुठलाही महोत्सव म्हणजे केवळ अभिजात चित्रपटांची मांदियाळी अशा भ्रमात किंवा अपेक्षांच्या लोढण्यात न गुंतलेल्यांना तर हा अनुभव हरखून टाकणाराच असतो. उदाहरणार्थ परवाच पाहिलेला जॉर्ज मिलर या दिग्दर्शकाचा   मॅड मॅक्स   हा ऑस्ट्रेलियन चित्रपट ! वुडी अॅलन यांचा इरॅशनल मॅन   हा फिलॉसॉफिकल आणि नानी मोरेतींचा   माय मदर   या   ‘ फिल्म विदिन फिल्म’  प्रकारातल्या चित्रपटाने दोन नितांत सुंदर अविस्मरणीय अभिजात चित्रपट पाहिल्याचं समाधान दिलंच परंतु मॅड मॅक्ससुध्दा मी विसरू शकत नाही. 
पीटर ब्रुक यांनी दिग्दर्शित केलेलं आणि विविध देशांतील कलाकार असलेलं   महाभारत  हे फ्रेन्च नाटक लिहिणारे जगप्रसिध्द नाटककार, पटकथाकार ज्याँ क्लाँद कॅरिए यांना त्यांच्या ऐन विशीत लुईस ब्युनिएल या दिग्गजाने सांगितलं होतं,  ‘ फॉर रायटर्स इव्हन स्काय शूट नॉट बी लिमिट, ही शूड गो बियॉण्ड दॅट.’ मॅड मॅक्सचा लेखक आणि दिग्दर्शक जणू याच स्कूलमधून आलाय असंच वाटतं. मला   मॅड मॅगेङिानचीदेखील आठवण झाली. तोच सारा मॅडनेस   मॅड मॅक्समध्ये होता. अर्थातच मल्टीपल कॅमेरा सेटअप वापरून त्याचं शूिटंग करण्यात आलंय. सबंध चित्रपट जेट स्पीडचा आहे.  दिग्दर्शकाला दोन तास प्रेक्षकाला एका जागी खिळवून ठेवायचं आहे आणि अत्याधुनिक तंत्रचा आविष्कार दाखवायचा आहे. बस्स ! आपणही तो तसाच पाहावा तरच त्यातली मौज अनुभवता येईल. 
मॅकेडम स्टोरिज हा आणखी एक अफलातून चित्रपट परवा पाहिला. सॅम्युयल बेंशेत्री दिग्दर्शित या फ्रेंच चित्रपटात एक जुनी बिल्डिंग, तिची नादुरुस्त लिफ्ट, तीन घटना आणि सहा पात्रे यांची ही गोष्ट आहे.  मी पहिल्या मजल्यावर राहतो, मला लिफ्टची गरज नाही   असं सोसायटीच्या मीटिंगमध्ये सांगत लिफ्टच्या दुरुस्तीच्या खर्चात सहभागी न होणा:या मध्यमवयीन सडाफटिंग माणसाचा पाय मोडतो आणि त्याला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे त्याला लिफ्ट वापरावी लागते. कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून तो रात्रीच इमारतीबाहेर पडतो.   त्याआधी तो दिवसभरात लिफ्टचा वापर कितीवेळ पर्यंत होतो त्याचा अभ्यास करून ठेवतो. रात्री सारी दुकानं बंद असल्यामुळे त्याला दूरच्या एका हॉस्पिटलच्या व्हेंडिंग मशीनमधून वस्तू घ्यायला जावं लागतं. सिगरेट ओढण्यासाठी त्याच वेळेला बाहेर येणा:या मध्यमवयीन नर्सच्या तो प्रेमात पडतो. पण हे सारं मनोमनच असतं. आपण फोटोग्राफर आहोत हे तिला तो एका गाफील क्षणी बोलून जातो आणि मग हा बनाव उघड होऊन नये म्हणून तो ज्या काही एकेक करामती करतो, त्या केवळ थोरच म्हणायच्या! कुठल्या तरी ग्रहावर निघालेलं नासाचं यान याच इमारतीच्या गच्चीत उतरतं आणि बाहेर आलेला अंतराळवीर चक्रावून जातो की आपण नेमक्या कुठल्या ग्रहावर आलोय. मग त्याच्या प्रकार लक्षात येतो की तो पृथ्वीवरच परतलाय..पण कुठे ? एका वृध्देच्या घरात शिरतो. तिच्या फोनवरून नासाला फोन लावतो. आपण नेमके कुठे आहोत ते त्याला सांगता येत नाही. खिडकीतून बाहेर जे जे दिसतंय, ते सारं सांगतो. अखेर वृध्देला विचारतो. तिला इंग्रजी येत नाही. याला फ्रेंच कळत नाही. या आणि पुढच्या काही मोजक्या प्रसंगांतून आणि मोजक्याच संवादातून भाषेतून उडणारी जी गंमत दाखवलीय ती धम्मालच आहे. शेवटी एकदाचं तो नासाला सांगतो की, आपण फ्रान्समध्ये आहोत. ते त्याला गुप्तता पाळायला सांगतात. त्याला दोन दिवस तिथेच राहण्याचा आदेश दिला जातो. त्याला राहावंच लागतं. दोन दिवस राहायचंच आहे म्हणून मग तो त्याचा तो विशिष्ट पोषाख वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढतो. वाळत घालतो. किचनमधला गळका पाइप दुरुस्त करतो आणि तो गळतच राहतो.
याच इमारतीतला पौगंडावस्थेतला चार्ली त्याच्या घरासमोर राहणा:या एेंशी वर्षांच्या नटीला तिच्या आवडत्या नाटकात काम मिळवायला मदत करतो. तिला खरं तर फार पूर्वी केलेली त्यातली नायिका करायची असते. पण हा पोरगा तिला, तुझं वय आता त्या भूमिकेसाठी योग्य नसून दुस:या वयस्कर बाईसाठीच योग्य आहे हे पटवून देतो आणि ती तिच्या नैराश्यातून बाहेर येते. स्वत:चं वय आणि त्याबरोबर येणारं वास्तव स्वीकारते. खरं तर ही एकेकाळची सिनेमा -नाटकांतून गाजलेली अभिनेत्री. परंतु तिच्या या देदीप्यमान भूतकाळाचं ओझं या पोरावर नाही. त्याला ती आता जशी आहे तशीच दिसते. समजते आणि म्हणून तिच्या संग्रहातले तिचे जुने गाजलेले चित्रपट पाहूनदेखील तो तिचं वर्तमानच पाहतो आणि तिलाही त्याची जाणीव करून देतो. 
या तीन गोष्टी म्हणजे मॅकेडम स्टोरीज हा चित्रपट! आजची पिढी आणि तिचा मागल्या पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे यातून फारच छान दाखवलंय. दिग्दर्शकाची माध्यमावरची पकड किती समर्थ आहे, याची जाण ज्या पध्दतीने या तीन गोष्टी एकात एक रचल्यात त्यातून येते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सहाही पात्र सबंध चित्रपटभर एकमेकांच्या संपर्कात येत नाहीत. त्यासाठी तयार केलेली पटकथेची बैठक विलक्षण आहे. 
(सध्या कान महोत्सवासाठी उपस्थित असलेले लेखक ख्यातनाम चित्रपट समीक्षक आणि जगभरच्या चित्रपट-संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)