कोहा
By Admin | Updated: September 19, 2015 14:44 IST2015-09-19T14:44:44+5:302015-09-19T14:44:44+5:30
अकोट-हरिसाल या राज्यमार्गावर वसलेलं कोहा हे एक चिमुकलं गाव! मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट अरण्यातून जाणारा हा मार्ग खासच आहे.

कोहा
>
प्रकाश ठोसरे
अनुवाद : अरविंद आपटे
अकोट-हरिसाल या राज्यमार्गावर वसलेलं कोहा हे एक चिमुकलं गाव! मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट अरण्यातून जाणारा हा मार्ग खासच आहे. या मार्गाने दिवसाचा प्रवास तोही पावसाळ्यात म्हणजे एक स्वर्गीय अनुभव आहे. जंगल गस्तीकरता फिरणारी वनखात्याची एखादी तुरळक जीप वगळता या मार्गावर रात्रीची वाहतूक जवळपास नाहीच. अकोटहून (अकोला जिल्ह्यातील तालुक्याचं गाव) हरिसालकडे निघाल्यावर पोपटखेडा या वननाक्यावरून मेळघाटात आपला प्रवेश होतो आणि मग सुरू होतो एक दीर्घ प्रवास.
साधारण अध्र्या तासाने जीनबाबा नावाचं एक ठिकाण येतं. या ठिकाणच्या देवतेपुढे मस्तक ठेवण्यासाठी श्रद्धाळू आवर्जून थांबतात. ओठांत फट असणारी ही देवाची दगडी मूर्ती जरा वेगळीच वाटते. त्याचं कारणही तसंच आहे, ते म्हणजे देवाला नैवेद्य (?) अर्पण करण्याची प्रथा ! इथे भाविकांकडून देवाच्या ओठात विडी ठेवली जाते. लोकांची श्रद्धा आहे की जीनबाबा रात्रभरात ही विडी ओढतो आणि सकाळी फक्त थोटूक उरतं. मी जेव्हा जेव्हा त्या मार्गाने गेलो तेव्हा तेव्हा मला जीनबाबाच्या ओठात थोटकं दिसली आहेत (पुराव्यादाखल फोटोही आहेत बरं का.) मेळघाटातल्या कोणत्याही देवतेच्या ठाणाहून पुढे जाताना न थांबता देवाला नमन करण्याची माङया ड्रायव्हरची पद्धत आगळीच होती. तो गाडीचा वेग कमी करून हॉर्न (घंटा!) वाजवून पुढे जायचा. अर्थात जीनबाबा त्याला अपवाद नव्हता. माझी गाडी सरकारी असल्याने नियमानुसार स्टिअरिंगवर ड्रायव्हरच असायचा. क्वचित प्रसंगी तो नसल्यास वनरक्षक, वनमजूर असं कोणी ना कोणी तरी असायचे. एके रात्री पोपटखेडा नाक्यावर कमर्चारीवर्ग आहे की नाही हे तपासण्यासाठी अकस्मात भेट द्यावी असं माङया मनात आलं. रात्रीचं जेवण उरकून मी एकटाच निघालो. माङया सोबत ड्रायव्हर किंवा दुसरं कोणीच नव्हतं. मी जीनबाबापाशी पोचलो तोपर्यंत जवळपास मध्यरात्र झाली होती. या वळणावळणाच्या रस्त्याने दाट धुक्यातून काळजीपूर्वक वाट काढत असताना माङो डोळे जीनबाबाचा वेध घेत होते. हॉर्न वाजवून पुढे जायचं ही माङया ड्रायव्हरची प्रथा मला मोडायची नव्हती. अखेर जीनबाबाचं अंधुकसं अस्तित्व जाणवलं. मी हॉर्न वाजवणार इतक्यात माङया जीपच्या मागच्या सीटवरून हलकीशी कुजबूज ऐकू आली. मी जागीच उडालो. मागे बघतो तर कोणी नाही ! माङया मेंदूत वेगवेगळ्या तारा झंकारल्या. माङया काळजाचा ठोका चुकला आणि सर्रकन अंगावर काटा उठला (पहिल्यांदा आणि शेवटचा.) त्या भारावलेल्या अवस्थेत मी आणखी एक किलोमीटर उताराच्या दिशेने पुढे गेलो. तोपर्यंत धुकंही निवळलं होतं. मी गाडी थांबवून पाण्याचे दोन घोट घेतले, गाडीतले दिवे लावून शोध घेऊ लागलो. त्या कुजबुजीचा जनक होता माझा नाठाळ टेपरेकॉर्डर. जीनबाबाजवळच्या खड्डय़ाच्या हाद:यामुळे त्यात अचानक जान आली होती. मी हुश्श करून पोपटखेडय़ाच्या दिशेने निघालो. नंतरही मी जेव्हा जेव्हा जीनबाबाच्या जवळून जात असे तेव्हा तो प्रसंग आठवून मिशीतल्या मिशीत हसू फुटल्याशिवाय राहत नसे.
कोहा/हरिसालकडे जाताना जीनबाबाहून पुढे गेल्यावर ‘हायेस्ट पॉइंट’ नावाची एक जागा येते. इथून अकोट शहराचं विहंगम दृश्य दिसतं. येणारा-जाणारा बहुतेक वेळा इथं थांबतो. या ठिकाणी एका बाजूला उंच कडा आहे, तर दुस:या बाजूला खोल दरी. अशाच एका संध्याकाळी मी माङया ड्रायव्हर हसनसोबत इथून सृष्टीसौंदर्य न्याहाळत होतो. अचानक आमच्या मागच्या बाजूच्या टेकडीकडून आलेल्या सांबराच्या ‘अलार्म कॉल’ने माझं लक्ष वेधलं. या धोक्याच्या इशा:यापाठोपाठ आमच्या मागच्या बाजूने साधारण पंचवीसएक फुटावरून नर सांबार धडपडत पडल्याचा आवाज ऐकू आला. क्षणार्धात त्या नराने स्वत:ला सावरलं आणि तो तसाच लंगडत रस्ता पार करून खालच्या दरीत नाहीसा झाला. हे पाहून आमच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. आम्ही गोंधळून गेलो होतो. आम्ही जेव्हा वर पाहिलं तेव्हा त्यामागचं कारण कळलं. सांबर ज्या कपारीवरून खाली पडला होता त्या ठिकाणी भुकेलेल्या रानकुत्र्यांचा कळप अचानक ब्रेक लागल्यासारखा थबकला होता. मला वाटतं, आमच्या उपस्थितीने त्यांच्या तोंडचा घास हिसकावला गेला होता. या उंच ठिकाणाहून कोह्याच्या दिशेने निघाल्यावर डोंगराची दुसरी बाजू आल्याने पाणलोट बदलतो. बेलकुंडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रमगृह पार करून कोहा येईपर्यंत हा रस्ता खाली खाली उतरत जातो. या बेलकुंड रेस्ट हाऊसमध्ये भुतं रेस्ट करतात असा प्रवाद असल्याने कोणी अधिकारी भुतांच्या विश्रंतीत व्यत्यय आणण्याचा विचारही करत नसत. मी एकदा तिथं मुक्काम केला होता, पण मला काही अनुभव आला नाही. कदाचित त्या दिवशी फॉर अ चेंज भुतं दुस:या ठिकाणी गेले असावेत! खालच्या उतारावर रस्त्याला गडगा नदीची साथ मिळते. कधी समांतर वाहत, तर कधी रस्ता ओलांडून. बेलकुंड विश्रमगृहाच्या खालच्या बाजूला नदीवर पूल आहे आणि त्यावर 1864 साली बांधकाम झालं असा फलक लावलेला आहे. एकंदरीत सर्वोच्च बिंदूपासून रस्ता पंचवीसएक किलोमीटर वळणावळणाने खाली खाली उतरत जातो. या दोन ठिकाणच्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीत 2क्क्क् फुटाचा फरक आहे. मी असं ऐकलं होतं की असा तीव्र उतार अचानक येणा:या पुरांना आमंत्रण देणारा असतो.
तारुबंदामधील माङया रेंज चार्जच्या दिवसांत मी कोहाला ब:याच वेळा भेट दिली होती. मेळघाटातील वन्यजिवांच्या अधिवासात मानव आणि त्याच्या पाळीव प्राण्यांचा कमीत कमी हस्तक्षेप व्हावा या दृष्टिकोनातून आता हे गाव तिथून उठवून दुस:या ठिकाणी पुनर्वसित करण्यात आलं आहे. त्या दिवसांत (1979) कोहा हे वनापालाचं (वन क्षेत्रपालाच्या खालचं पद) मुख्यालय होतं आणि तिथं ब:यापैकी कर्मचारी वर्ग होता. मला आठवतं सव्वालाखे नावाचे माङो विश्वासू वनपाल तिथे कार्यरत होते. परिपक्व झाडांची छापणी, रोपवाटिका, रोपवन लागवड, विरळणी अशा खात्याच्या एक ना अनेक कामांमुळे माङया परिक्षेत्रतलं कोहा हे गाव सदैव गजबजलेलं असायचं. साहजिकच तिथल्या कोरकू मजुरांना मजुरी देण्यासाठी मोठी रक्कम घेऊन मला वरच्यावर (जवळपास आठवडय़ातून एकदा तरी) तिथं जावं लागत असे. कोहा गाव गडगा नदी व रस्त्यामुळे दोन भागात विभागलं गेलं होतं. आमच्या वनपालांचं सरकारी निवासस्थान थोडय़ाशा उंच जागी होतं. तिथे आणखी एक पक्की शाळेची इमारत होती. या शाळेच्या भिंतीवर राष्ट्रगीत रंगवलेलं होतं. मी या शाळेतही अधूनमधून जात असे.
बहुतेक सर्व कोरकू आदिवासी बुधवारच्या आठवडी बाजारासाठी हरिसालला जात असत (काही जण अकोटला जात). त्यामुळे मी एक ठरवलं होतं की, त्यांची मजुरी शक्यतोवर मंगळवारी द्यायची, जेणोकरून बाजारासाठी त्यांच्या हातात थोडाफार पैसा खुळखुळेल. मी फक्त एकदाच बुधवारी सकाळी कोहाला गेलो होतो आणि त्या दिवशी काही तरी खास घडणार होतं. गावचा जवळपास सगळा भाग सव्वालाख्यांचं कार्यालयही गडगा नदीच्या एका बाजूस होतं. त्या दिवशी मी घोटाभर पाण्यातून मार्ग काढत कार्यालयात पोचलो. तिथे बरेच कोरकू मजूर हजर होते. मजुरी वाटपासाठी साधारणत: तास- दोन तास लागतील असा हिशेब करून मी मजुरी वाटपाला सुरुवात केली. पंधराएक मिनिटांनी सव्वालाख्यांनी हायेस्ट पॉइंटच्या दिशेने बघत माझं लक्ष काळ्याकुट्ट ढगांकडे व लखलखणा:या विजांकडे वेधलं. मी वाटपाचं काम थांबवून नदी ओलांडून पलीकडे रस्त्याला लागावं असं त्यांनी सुचविलं. मी हसून त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण कोह्यात पावसाचा टिपूस नव्हता. दहा मिनिटांनी त्यांनी माझं लक्ष कमी आवाजातल्या घोंघावाकडे वेधलं आणि म्हणाले, ‘साहेब ऐकताय ना, पूर येतोय’. खरंच त्यांचं म्हणणं बरोबर होतं. आम्ही पाच मिनिटांत आमचं काम आटोपतं घेऊन चंबुगबाळं घेऊन नदी ओलांडण्यासाठी धाव घेतली. आमच्या सोबत अख्खं गाव, त्यांना पुढील काही तास ज्या भागात थांबायचं आहे त्या भागात पोचण्याची लगबग करू लागले. आम्ही अध्र्या नदीपात्रत असतानाच पावसाची भुरभुर सुरू झाली आणि पुराच्या पाण्याचा भीतिदायक आवाज जवळून येऊ लागला. आम्ही नदीपल्याड पोचतो न पोचतो तोच कानठळ्या बसवणारा आवाज करत विजेच्या वेगाने येणा:या पाण्याचा लोंढा आला. क्षणार्धात गडगा नदीचं 300 फूट रुंदीचं पात्र दुथडी भरून वाहू लागलं. आम्ही जलसमाधी मिळण्यापासून थोडक्यात बचावलो.
काही मिनिटांत पावसाची रिमङिाम थांबली. मी रस्त्यापलीकडे माझं मजुरी वाटपाचं काम संपवलं. मजूरही खुशीखुशीत हरिसालच्या बाजाराला गेले. पण गडगा नदीचं पाणी पुढील चार तास काही ओसरलं नाही. गंमत म्हणजे अख्ख्या मेळघाटात कुठेही पावसाचा थेंबही पडला नाही. हा सगळा ढगफुटीचा प्रताप होता. अचानक येणा:या पूर आणि त्याच्या भयानकतेचा हा पहिलाच प्रत्यक्षदर्शी अनुभव होता. आमचे उच्चीचे ग्रह आणि सव्वालाख्यांची समयसूचकता यामुळे हम बालबाल बच गए. त्यावेळी माङया वनाधिकारी वडिलांचे बोल आठवले- बेटा जंगलातील आग आणि पाण्याच्या शक्तीला कधीही कमी लेखू नकोस. खरं आहे ते. त्याची प्रचिर्ती येण्यासाठी आजचा झटका पुरेसा होता.
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त
प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com