कारगिल प्रवास राष्ट्रीय पर्यटनस्थळाचा
By Admin | Updated: August 23, 2014 14:14 IST2014-08-23T14:14:44+5:302014-08-23T14:14:44+5:30
कारगिल हा अत्यंत दुर्गम प्रदेश आहे. त्यामुळे तिथे विकासाला र्मयादा होत्या. मात्र, पाकिस्तानबरोबरच्या युद्धातील विजयामुळे कारगिलला भावनिक महत्त्व आले आहे. त्यातूनच हे एक राष्ट्रीय पर्यटनस्थळ व्हावे, व त्यानिमित्ताने या भागाचा विकास व्हावा असे प्रयत्न प्रशासन, तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सरहद संस्थेने सुरू केले. त्या प्रवासाची गोष्ट..

कारगिल प्रवास राष्ट्रीय पर्यटनस्थळाचा
संजय नहार
सरहद संस्थेने १९९८ मध्ये आळंदी ते श्रीनगर, जम्मू-काश्मीर अशी संत-सूफी संदेश यात्रा काढली होती आणि त्याला काश्मीर खोर्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता. तेथील जनतेशी थेट संवादाचा हा प्रयत्न अपेक्षेपेक्षा खूप जास्त यशस्वी झाला आणि याची दखल जगभरातील महत्त्वाच्या प्रसिद्धी माध्यमांनी घेतली तेव्हा लक्षात आले, की या प्रश्नाला मोठे आंतरराष्ट्रीय परिमाण आहेत. मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणार्या संत सूफी संदेश यात्रेत पुण्यातील रुपी बँकेतीलही कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. अण्णा हजारे, जे. एफ. रिबेरो, शरद पवार, विजयकुमार चोप्रा आणि जम्मू-काश्मीरचे गृहमंत्री मुश्ताक अहमद लोन यांच्या सहभागामुळे ही यात्रा यशस्वी झाली. या यात्रेने सरहदच्या काश्मीरचे नाते महाराष्ट्राशी जोडण्याच्या प्रक्रियेला मोठी मान्यता मिळाली.
ही यात्रा पूर्ण करून पुण्यात आलो, त्यानंतर अटलजींची पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी आयोजित केलेली लाहोर बस यात्राही झाली. या बस यात्रेचा परिणाम सुरू होण्यापूर्वीच भारतीय लष्कराला आणि जनतेला धक्का देणारे कारगिलही पाठोपाठच घडले. पंतप्रधान अटलजी पाकिस्तानशी बोलणी करायला ज्या सन्मानाने गेले त्यांच्या या प्रयत्नांवर कारगिलमधील पाकिस्तान प्रायोजित घुसखोरीने पूर्ण पाणी फेरले. आपण भारतीय त्या धक्क्यातून अजूनही सावरलेलो नाही.
त्या काळात म्हणजे मे १९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरूझाले आणि देश पेटून उठला. शहीद सैनिकांच्या येणार्या शवपेट्यांनी हा राग अधिकच तीव्र झाला आणि विश्वासघाताने भारतीय जनमानस क्षुब्ध झाले. शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करायला देश पुढे आला. या शहिदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आम्ही सरहदच्या कार्यकर्त्यांनी जरा वेगळा विचार केला. पाकिस्तानच्या हल्ल्यात कारगिल, द्रास बटालिकमधील भागांतील नागरिकांनाही मोठी क्षती पोचली होती. त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय लष्करालाच होणार होता. मग रुपी बँकेच्या कर्मचार्यांनी आणि पुणेकर नागरिकांनी रेल्वेची एक बोगी भरून जीवनावश्यक गरजेच्या वस्तू जनतेसाठी दिल्या. सरहदचे कार्यकर्ते जम्मू काश्मीर सरकारच्या तसेच लष्कराच्या मदतीने कारगिल भागातील गावा-गावांत गेले. स्थलांतरित आणि सैनिक विचारू लागले, अरे अशी माणसे पुण्यात आहेत, जी या युद्धकाळात कारगिल, द्रास, बटालिकमधीलसारख्या भागांत प्रत्यक्ष फिरून मदत देताहेत. याची दखल तत्कालीन लष्करप्रमुख आणि तेथील जनतेने खूप आत्मीयतेने घेतली. आमचा विचार छत्रपती शिवरायांचा होता. किल्ला जिंकायचा असेल तर आजूबाजूची गावे जिंकावी लागतात म्हणजे रसद तुटत नाही, ही भावना या छोट्याशा मदतीमागे होती.
२0 हजारांपेक्षा अधिक लोक प्रत्यक्ष सीमेवरून सोनर्मग आणि लेहमधील स्थलांतरित कॅम्पमध्ये स्थलांतरित झाले होते. ५00 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे मोठे किट जेव्हा देण्यात आले, तेव्हा तेथील स्थानिकांच्या प्रतिक्रिया पाहतानाच आम्ही निर्णय घेतला, या कारगिल भागातील जनतेसाठी कालबद्ध कार्यक्रम आखायचा. केवळ सैनिकांच्याच नाही तर सैनिकांना मदत करणार्या जनतेच्याही पाठीशी देश आहे हा संदेश देण्यासाठी कृतिशील कार्यक्रम आखण्यात आला. त्यातूनच पुण्याचेच असणार्या जन. रवी दास्ताने यांनी पुढाकार घेऊन २00३ मध्ये १७ मुलांना कारगिलमधून सरहदमध्ये पुण्यात पाठवले. त्यातील सर्वांत छोटा अडीच वर्षांचा तर सर्वांत मोठा बारा वर्षांचा होता. सध्या लष्कराने सरहदमध्ये पाठवलेले कारगिल युद्धातील सहभागी असणार्यांची ३३ मुले-मुली शिकताहेत. मग त्यातूनच जेव्हा हे विद्यार्थी सुटीसाठी पुन्हा कारगिल, झंस्कारसारख्या भागांत जाऊ लागले, तोपर्यंत ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कारगिलच्या अद्भूत सौंदर्याची, पर्वतरांगांची महती या विद्यार्थ्यांना कळू लागली आणि मग काश्मीर आणि कारगिलमधील विद्यार्थी आणि सरहद संस्थेने कारगिल हे एक राष्ट्रीय पर्यटनस्थळ बनविण्याच्या कल्पनेवर काम सुरूकेले. तोपर्यंत श्रीनगरहून लेहला जाताना किंवा लेहहून श्रीनगरला जाताना एका रात्रीचा मुक्काम एवढेच कारगिलचे महत्त्व होते. हा प्रवास अत्यंत अवर्णनीय आणि आनंददायी असतो; मात्र इथे पर्यटक वेगळे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी र्मयादा होत्या. कारगिल युद्धानंतर तेथे शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वॉर मेमोरियल बांधण्यात आले. रस्ते नीट करण्यात आले. वाहनांची सोय उपलब्ध होऊ लागली आणि जुलै २00३ मध्ये कारगिलमध्ये डोंगरी विकास परिषदेचीही स्थापना करण्यात आली.
कारगिलमध्ये बौद्धधर्मीय आणि शीयापंथीय मुस्लिम लोक मुख्यत: राहतात. श्रीनगर अथवा जम्मूप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, हरताळ, बंद, याचे प्रमाण या भागात खूप नसते. येथील लोक पाहुणचारामध्ये आनंद मानणारे साधे शांतताप्रिय लोक आहेत. कारगिलला सध्या नागरी विमानतळ नसले तरी हळूहळू याकडे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. लष्कराचे आणि शासनाचे पर्यटनासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरूअसले तरी स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराशिवाय आणि सहभागाशिवाय हा विकास होणे अवघड आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळेल अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सरहदने पुढाकार घेतला आहे.
सध्या या भागाचे प्रशासकीयदृष्ट्या कारगिल, शाकर चिकटान, सोरू, सांकु, झंस्कार, द्रास, शोरगुले असे विभाग करण्यात आले आहेत आणि कारगिल हे या सर्वांचे मुख्य केंद्र आहे. येथे एक महत्त्वाची बाजारपेठ असून, येथील लहान आकाराचे गोल्डन अँपल, अक्रोड, र्जदाळू, खुबानी जगप्रसिद्ध आहे. सन १९९९ नंतर कारगिलचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशात आले. भारतीयांसाठी ते जास्त भावनिक बनले. यातूनच सरहद संस्थेने केंद्रीय गृह मंत्रालय, जम्मू काश्मीर सरकार, पर्यटन विभाग आणि लष्कराच्या नॉर्दन कमांडशी पत्रव्यवहार केला. पंतप्रधानांनीही ही कल्पना उचलून धरली. त्यांनी संबंधित खात्यांना तसे निर्देश दिले, मग आम्ही जम्मू-काश्मीर पर्यटनाला आकार देणार्या जम्मू-काश्मीरचे माजी पर्यटन संचालक सलीम बेग, माजी पोलीस महानिरीक्षक जावेद मकदुमी आणि विद्यमान पर्यटन मंत्रालयाची यासाठी मदत घेतली. महाराष्ट्रातून कारगिलला जाणार्या पर्यटकांना विद्यार्थ्यांच्या हेल्पलाईनद्वारे मदत करायला सुरुवात केली. आता दोन दिवस कारगिल आणि परिसरात राहण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी छोटे छोटे हॉटेल आणि लॉजिंग सुरूझाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात मुख्यत: पर्यटक मोठय़ा संख्येने येऊ लागले आहेत.
त्याच वेळी कारगिलच्या आजूबाजूला हिंदू-कुशच्या बगलेत असणार्या पामीटस, काराकोरम आणि हिमालयाच्या पर्वतरांगांपासून तेथील अनेक स्थळांचा ज्यात बाल्टी बाजार, ट्रेकिंग स्थळे, सुरु व्हॅली यांसारख्या स्थळांचा अभ्यास करून तेथील समस्यांचा अभ्यास करून स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले. सरहदच्या दोन दशकांतील कामामुळे विश्वासार्हता तयार झालेलीच होती. मग अडचणींवर मार्ग काढतानाच या विद्यार्थ्यांंना पर्यटन, भाषा आणि हॉस्पिटॅलीटीचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सरहद संस्थेत सुरूकेला. सध्या हे विद्यार्थी याचे शिक्षण घेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील नाही तर देशभरातील पर्यटन कंपन्यांनीही यात पुढाकार घेतला. अमरनाथ आणि लेहला जाणार्या पर्यटकांना कारगिलकडे वळविण्यात मोठे यश मिळाले.
आता सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून तेथे जाणार्या पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. टायगरहिल, मश्कोव्हॅली ही ठिकाणे पाहताना आपले सैनिक किती प्रतिकूल परिस्थितीत लढले याची जाणीव होते. त्यांना नमन करतानाच किल्ला जिंकायचा असेल तर आजूबाजूची गावे जिंकली पाहिजेत म्हणजे रसद तुटत नाही, या छत्रपतींच्या युद्धशास्त्रविषयक विचाराचीच पुन्हा पुन्हा आठवण होते. या कामी महाराष्ट्रानेच पुढाकार घेतला आहे. हा पुढाकार कोणा एका व्यक्तीचा, संस्थेचा अथवा शासनाचा नाही, तर आपल्या सर्वांंचा आहे, ही भावना कारगिलला पर्यटनस्थळ बनण्यामध्ये सर्वात महत्त्वाची ठरणार आहे.
(लेखक सामाजिक कार्यकर्ते व सरहद्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)संजय नहार
कारगिल हा अत्यंत दुर्गम प्रदेश आहे. त्यामुळे तिथे विकासाला र्मयादा होत्या. मात्र, पाकिस्तानबरोबरच्या युद्धातील विजयामुळे कारगिलला भावनिक महत्त्व आले आहे. त्यातूनच हे एक राष्ट्रीय पर्यटनस्थळ व्हावे, व त्यानिमित्ताने या भागाचा विकास व्हावा असे प्रयत्न प्रशासन, तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सरहद संस्थेने सुरू केले. त्या प्रवासाची गोष्ट..
रहद संस्थेने १९९८ मध्ये आळंदी ते श्रीनगर, जम्मू-काश्मीर अशी संत-सूफी संदेश यात्रा काढली होती आणि त्याला काश्मीर खोर्यात मोठा प्रतिसाद मिळाला होता. तेथील जनतेशी थेट संवादाचा हा प्रयत्न अपेक्षेपेक्षा खूप जास्त यशस्वी झाला आणि याची दखल जगभरातील महत्त्वाच्या प्रसिद्धी माध्यमांनी घेतली तेव्हा लक्षात आले, की या प्रश्नाला मोठे आंतरराष्ट्रीय परिमाण आहेत. मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणार्या संत सूफी संदेश यात्रेत पुण्यातील रुपी बँकेतीलही कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. अण्णा हजारे, जे. एफ. रिबेरो, शरद पवार, विजयकुमार चोप्रा आणि जम्मू-काश्मीरचे गृहमंत्री मुश्ताक अहमद लोन यांच्या सहभागामुळे ही यात्रा यशस्वी झाली. या यात्रेने सरहदच्या काश्मीरचे नाते महाराष्ट्राशी जोडण्याच्या प्रक्रियेला मोठी मान्यता मिळाली.
ही यात्रा पूर्ण करून पुण्यात आलो, त्यानंतर अटलजींची पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी आयोजित केलेली लाहोर बस यात्राही झाली. या बस यात्रेचा परिणाम सुरूहोण्यापूर्वीच भारतीय लष्कराला आणि जनतेला धक्का देणारे कारगिलही पाठोपाठच घडले. पंतप्रधान अटलजी पाकिस्तानशी बोलणी करायला ज्या सन्मानाने गेले त्यांच्या या प्रयत्नांवर कारगिलमधील पाकिस्तान प्रायोजित घुसखोरीने पूर्ण पाणी फेरले. आपण भारतीय त्या धक्क्यातून अजूनही सावरलेलो नाही.
त्या काळात म्हणजे मे १९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरूझाले आणि देश पेटून उठला. शहीद सैनिकांच्या येणार्या शवपेट्यांनी हा राग अधिकच तीव्र झाला आणि विश्वासघाताने भारतीय जनमानस क्षुब्ध झाले. शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करायला देश पुढे आला. या शहिदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आम्ही सरहदच्या कार्यकर्त्यांनी जरा वेगळा विचार केला. पाकिस्तानच्या हल्ल्यात कारगिल, द्रास बटालिकमधील भागांतील नागरिकांनाही मोठी क्षती पोचली होती. त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय लष्करालाच होणार होता. मग रुपी बँकेच्या कर्मचार्यांनी आणि पुणेकर नागरिकांनी रेल्वेची एक बोगी भरून जीवनावश्यक गरजेच्या वस्तू जनतेसाठी दिल्या. सरहदचे कार्यकर्ते जम्मू काश्मीर सरकारच्या तसेच लष्कराच्या मदतीने कारगिल भागातील गावा-गावांत गेले. स्थलांतरित आणि सैनिक विचारू लागले, अरे अशी माणसे पुण्यात आहेत, जी या युद्धकाळात कारगिल, द्रास, बटालिकमधीलसारख्या भागांत प्रत्यक्ष फिरून मदत देताहेत. याची दखल तत्कालीन लष्करप्रमुख आणि तेथील जनतेने खूप आत्मीयतेने घेतली. आमचा विचार छत्रपती शिवरायांचा होता. किल्ला जिंकायचा असेल तर आजूबाजूची गावे जिंकावी लागतात म्हणजे रसद तुटत नाही, ही भावना या छोट्याशा मदतीमागे होती.
२0 हजारांपेक्षा अधिक लोक प्रत्यक्ष सीमेवरून सोनर्मग आणि लेहमधील स्थलांतरित कॅम्पमध्ये स्थलांतरित झाले होते. ५00 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे मोठे किट जेव्हा देण्यात आले, तेव्हा तेथील स्थानिकांच्या प्रतिक्रिया पाहतानाच आम्ही निर्णय घेतला, या कारगिल भागातील जनतेसाठी कालबद्ध कार्यक्रम आखायचा. केवळ सैनिकांच्याच नाही तर सैनिकांना मदत करणार्या जनतेच्याही पाठीशी देश आहे हा संदेश देण्यासाठी कृतिशील कार्यक्रम आखण्यात आला. त्यातूनच पुण्याचेच असणार्या जन. रवी दास्ताने यांनी पुढाकार घेऊन २00३ मध्ये १७ मुलांना कारगिलमधून सरहदमध्ये पुण्यात पाठवले. त्यातील सर्वांत छोटा अडीच वर्षांचा तर सर्वांत मोठा बारा वर्षांचा होता. सध्या लष्कराने सरहदमध्ये पाठवलेले कारगिल युद्धातील सहभागी असणार्यांची ३३ मुले-मुली शिकताहेत. मग त्यातूनच जेव्हा हे विद्यार्थी सुटीसाठी पुन्हा कारगिल, झंस्कारसारख्या भागांत जाऊ लागले, तोपर्यंत ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कारगिलच्या अद्भूत सौंदर्याची, पर्वतरांगांची महती या विद्यार्थ्यांना कळू लागली आणि मग काश्मीर आणि कारगिलमधील विद्यार्थी आणि सरहद संस्थेने कारगिल हे एक राष्ट्रीय पर्यटनस्थळ बनविण्याच्या कल्पनेवर काम सुरूकेले. तोपर्यंत श्रीनगरहून लेहला जाताना किंवा लेहहून श्रीनगरला जाताना एका रात्रीचा मुक्काम एवढेच कारगिलचे महत्त्व होते. हा प्रवास अत्यंत अवर्णनीय आणि आनंददायी असतो; मात्र इथे पर्यटक वेगळे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी र्मयादा होत्या. कारगिल युद्धानंतर तेथे शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वॉर मेमोरियल बांधण्यात आले. रस्ते नीट करण्यात आले. वाहनांची सोय उपलब्ध होऊ लागली आणि जुलै २00३ मध्ये कारगिलमध्ये डोंगरी विकास परिषदेचीही स्थापना करण्यात आली.
कारगिलमध्ये बौद्धधर्मीय आणि शीयापंथीय मुस्लिम लोक मुख्यत: राहतात. श्रीनगर अथवा जम्मूप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, हरताळ, बंद, याचे प्रमाण या भागात खूप नसते. येथील लोक पाहुणचारामध्ये आनंद मानणारे साधे शांतताप्रिय लोक आहेत. कारगिलला सध्या नागरी विमानतळ नसले तरी हळूहळू याकडे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. लष्कराचे आणि शासनाचे पर्यटनासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरूअसले तरी स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराशिवाय आणि सहभागाशिवाय हा विकास होणे अवघड आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळेल अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सरहदने पुढाकार घेतला आहे.
सध्या या भागाचे प्रशासकीयदृष्ट्या कारगिल, शाकर चिकटान, सोरू, सांकु, झंस्कार, द्रास, शोरगुले असे विभाग करण्यात आले आहेत आणि कारगिल हे या सर्वांचे मुख्य केंद्र आहे. येथे एक महत्त्वाची बाजारपेठ असून, येथील लहान आकाराचे गोल्डन अँपल, अक्रोड, र्जदाळू, खुबानी जगप्रसिद्ध आहे. सन १९९९ नंतर कारगिलचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशात आले. भारतीयांसाठी ते जास्त भावनिक बनले. यातूनच सरहद संस्थेने केंद्रीय गृह मंत्रालय, जम्मू काश्मीर सरकार, पर्यटन विभाग आणि लष्कराच्या नॉर्दन कमांडशी पत्रव्यवहार केला. पंतप्रधानांनीही ही कल्पना उचलून धरली. त्यांनी संबंधित खात्यांना तसे निर्देश दिले, मग आम्ही जम्मू-काश्मीर पर्यटनाला आकार देणार्या जम्मू-काश्मीरचे माजी पर्यटन संचालक सलीम बेग, माजी पोलीस महानिरीक्षक जावेद मकदुमी आणि विद्यमान पर्यटन मंत्रालयाची यासाठी मदत घेतली. महाराष्ट्रातून कारगिलला जाणार्या पर्यटकांना विद्यार्थ्यांच्या हेल्पलाईनद्वारे मदत करायला सुरुवात केली. आता दोन दिवस कारगिल आणि परिसरात राहण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी छोटे छोटे हॉटेल आणि लॉजिंग सुरूझाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात मुख्यत: पर्यटक मोठय़ा संख्येने येऊ लागले आहेत.
त्याच वेळी कारगिलच्या आजूबाजूला हिंदू-कुशच्या बगलेत असणार्या पामीटस, काराकोरम आणि हिमालयाच्या पर्वतरांगांपासून तेथील अनेक स्थळांचा ज्यात बाल्टी बाजार, ट्रेकिंग स्थळे, सुरु व्हॅली यांसारख्या स्थळांचा अभ्यास करून तेथील समस्यांचा अभ्यास करून स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले. सरहदच्या दोन दशकांतील कामामुळे विश्वासार्हता तयार झालेलीच होती. मग अडचणींवर मार्ग काढतानाच या विद्यार्थ्यांंना पर्यटन, भाषा आणि हॉस्पिटॅलीटीचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सरहद संस्थेत सुरूकेला. सध्या हे विद्यार्थी याचे शिक्षण घेत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील नाही तर देशभरातील पर्यटन कंपन्यांनीही यात पुढाकार घेतला. अमरनाथ आणि लेहला जाणार्या पर्यटकांना कारगिलकडे वळविण्यात मोठे यश मिळाले.
आता सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून तेथे जाणार्या पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. टायगरहिल, मश्कोव्हॅली ही ठिकाणे पाहताना आपले सैनिक किती प्रतिकूल परिस्थितीत लढले याची जाणीव होते. त्यांना नमन करतानाच किल्ला जिंकायचा असेल तर आजूबाजूची गावे जिंकली पाहिजेत म्हणजे रसद तुटत नाही, या छत्रपतींच्या युद्धशास्त्रविषयक विचाराचीच पुन्हा पुन्हा आठवण होते. या कामी महाराष्ट्रानेच पुढाकार घेतला आहे. हा पुढाकार कोणा एका व्यक्तीचा, संस्थेचा अथवा शासनाचा नाही, तर आपल्या सर्वांंचा आहे, ही भावना कारगिलला पर्यटनस्थळ बनण्यामध्ये सर्वात महत्त्वाची ठरणार आहे.
(लेखक सामाजिक कार्यकर्ते व सरहद्द संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)