शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

घरोघरी सावित्री, जोतिबाचा शोध जारी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 12:20 IST

Jaydeep Pisal And Kalyani Pisal : आजही गाव आणि गावातली माणसं, हाच ध्यास आणि श्वास...

नवनाथ सकुंडे

लग्नादिवशी दारात लावलेली केळीची पानं सुकून गेलीत... लग्नाला आलेले मोजकेच पाहुणे घरात...सत्यनारायणाची पूजा संपते, पूजा सांगणारे काका निघून जातात...नवरी भरजरी साडीतून अवघडत उठून उभी राहते...अन् अन्... अचानक नवरा समोर येतो...'आजपासून साडीत अवघडायचं नाही, हे घे पंजाबी ड्रेस, आजपासून आतली रूम तुझी... आणि ऐक, ही पुस्तकं, अभ्यास कर... दोन वर्षांत पीएसआय बनायचं'हनीमून का काय असतं, त्याला न जाता बायकोचा अभ्यास घेत राहिला नवरा... प्रणयमूल्यांकित गोलगप्पा मारण्यापेक्षा जनरल नॉलेज शिकवत राहिला नवरा...ही खरीखुरी गोष्ट आहे साताऱ्याच्या जयदीप पिसाळ यांची... जयदीप दोनदा एमपीएससी पास झाले... पीएसआय आणि कुठलीशी पोस्ट मिळाली...वाठार स्टेशनला तीन मिनिटं रेल्वे थांबायची, तेवढ्या वेळेत दहा-बारा ग्लास उसाचा रस विकायचा... त्यातनं ग्लासमागे रुपयाचा ठोकळा मिळायचा...असलं झांगड करत जयदीपराव एमपीएससी दोनदा पास झाले...पण... पण...'व्यवसाय करू, गावाची सेवा करू' म्हणत पोस्ट नाकारल्या...दुचाकीच्या कंपनीची सेमी-फ्रन्चायझी घेतली, कोरेगावच्या पळशीचे सरपंच झाले... खाचखळग्यांच्या गावात सिमेंटचे रस्ते केले... गावाशेजारचा बंधारा बांधला... 'पानी फाऊंडेशन'चं काम केलं... पळशी गौरव पुरस्कार सोहळा परमोच्च केला... आणि काय काय... आजही गाव आणि गावातली माणसं, हाच ध्यास आणि श्वास...एमपीएससी पास होऊनही पोस्ट न घेणाऱ्या जयदीपरावांची भागात छी-थू झाली...एमपीएससीचं फॅड असलेले तरूण जयदीपरावांकडे 'माजोरडा' म्हणत तुच्छतेनं पाहू लागले..विजयाच्या आनंदाला लपवत, पराभवाची बोच पचवणारे जयदीपराव हलले नाहीत... लढत राहिले...पण वाळल्या-करपल्या जगण्याच्या धगीमध्ये एक ओल होती मनात... करपतानाही मनात एक ऊबदार जाळ होता पेटलेला...वर्गातल्याच कल्याणी नावाच्या मुलीवर  जीव जडला होता...'अय पोरा, काम ना धाम, यमपीयस्सी पास हुऊन बोंबलत फिरतूय, दुनयादारी करत गावपुढारी झालायस, तुला पोरगी देण्यापरीस हिरीत ढकलून दिन पोरगी'जयदीप लग्नासाठी मागणी घालायला गेले तेव्हा कल्याणीच्या बापाचे हे शब्द...'तुमच्या पोरीला दोन वर्षांत अधिकारी करतो, माझ्यावर विश्वास ठेवा' म्हणणाऱ्या जयदीप पिसाळांच्या डोळ्यांतला आत्मविश्वासाचा झरा कल्याणीच्या वडिलांना पाझर फोडून गेला... अखेर आयुष्याची सोबतीन म्हणून कल्याणी मिळाली...पूजेनंतर अवघ्या दोन वर्षांत कल्याणी पीएसआय झाली...सगळं माहीत पडत होतं...एकदा जयदीपरावांना विचारलं...'व्यवसाय जोरातय, गावात सरपंचय, भागांत दबदबाय, लोक नमस्कार करतात, आता काय स्वप्न राह्यलंय?''सर, सगळं मिळालं, पण तिचं ट्रेनिंग संपलं की युनिफॉर्मवरच्या बायकोला एकदा सॅल्यूट मारायचाय'आता इतक्यात जयदीपरावांशी बोललो... म्हटलं, 'तुमच्या घराजवळ आहे, भेटूयात का?''सर, कल्याणीला पोलीस स्टेशनला सोडून घरी आताच आलोय, ती दुपारीच घरी आली होती, पण अचानक नाईटला जावं लागलं... आता मुलाला सोडायला आलोय शाळेत... घरी जाऊन स्वयंपाक करायचाय... या घरीच...'जयदीपराव तुम्ही बायकोला स्यॅल्यूट मारलात...ही साधारण गोष्ट नाही, कारण खादीला खाकी सॅल्यूट मारताना नेहमी दिसतं, इथं खाकीला खादी सॅल्यूट मारताना बघून विलक्षण वाटतं...असो...कल्याणी सावित्रीबाई आहे... लढवय्यी आहे... मी तिला सॅल्यूट तर मारणारच...पण तुमच्या पायांवर डोकं ठेवतो...कारण, घरोघरी सावित्री आहेत... फक्त त्यांच्या पंखांना बळ देणारे तुमच्यासारखे जोतिबा घरोघरी व्हायला हवेत...

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रmarriageलग्न