जपानची ‘तीर्थयात्रा’
By Admin | Updated: July 25, 2015 18:07 IST2015-07-25T18:07:15+5:302015-07-25T18:07:15+5:30
कमालीच्या स्वच्छ आणि शिस्तप्रिय देशातल्या देवळांमध्ये भारताच्या ओळखीच्या खूप खुणा सापडतात, हे एक नवलच!

जपानची ‘तीर्थयात्रा’
>कल्याणी गाडगीळ
अलीकडेच जपानच्या दहा दिवसांच्या भेटीत हिरोशिमा आणि माझदा फॅक्टरी सोडल्यास जपानी मंदिरे पाहण्याचाच योग आला आणि नकळत जपानची तीर्थयात्र घडली.
जपानमधे शिंटो धर्माची श्रइन्स म्हणजे एखादा देव, पूर्वज, संत वगैरे विभूतींशी नाते असलेल्या पवित्र जागा, बुद्धाची व ङोन प्राचीन मंदिरे आहेत. बुद्ध मंदिरात बुद्धाच्या, तर शिंटो मंदिरात त्यांच्या धार्मिक मूर्ती दिसतात. मंदिरप्रवेशासाठी अनेक ठिकाणी तिकीट पडते. जपानी देवळातील वातावरण आनंदाचे किंवा दु:खी नसून बरेचसे निर्विकार वाटते. मंदिरात प्रामुख्याने शांतता असते. लोक बुद्धाच्या किंवा देवतांच्या पुढे उदबत्त्या, मेणबत्त्या लावतात, घंटा वाजवतात, हाताने टाळ्या वाजवतात, आपल्यासारखेच हात जोडून नमस्कार करतात. काही मंदिरांत प्रचंड मोठय़ा ब्रॉँझच्या घंटा व त्यासाठी बांधलेली खास घंटाघरेही लक्ष वेधून घेतात.
क्योतोमधे 2ंल्लA42ंल्लॅील्ल िं’’ नावाचे भारतीय संस्कृतीशी घनिष्ठ नाते सांगणारे बुद्धधर्मीय मंदिर पाहिले. येथील मुख्य देवता आहे ‘सहस्त्रभुजा-आर्या-अवलोकितेश्वरा’. जिला 1क्क्क् 1क्क्क् आम्र्ड कनन म्हटले जाते. या देवतेचे 1क्क्क् पुतळे हॉलमधे एकत्र पाहायला मिळतात. त्यांच्यासाठीच्या 28 संरक्षक देवतांच्या मूर्तीही तिथे आहेत. त्यांचे नाते आपल्या वरुण, विष्णू, लक्ष्मी, ब्रrा, शिव, गरुड, वायू, नारायण, इंद्र वगैरे देवतांशी जोडलेले आहे. जपानी बुद्ध मंदिरात आपल्या देवतांची संस्कृतमधील नावे आणि आपल्या परिचित देवतांची जपानी रूपेही अद्भुत वाटली. ही नावे चीनमधून जपानमधे आली असे म्हणतात.
क्योतोपासून जवळ असलेल्या नारा येथील तोडाइ-जी (ळं्रि-A्र) हे आठव्या शतकातले शोमू या सम्राटाच्या काळातले मंदिर. प्रवेशद्वारीच माणसांना बिल्कुल न घाबरणारी, उलट त्यांच्या हातून काही खायला मिळते का याची वाट पाहणारी शेकडो हरणो बागडताना दिसतात. शिंटो धर्मानुसार हरीण म्हणजे देवाचा दूत. मंदिराचा भव्य परिसर, प्रसन्न झाडी व शेकडो हरणो पाहून आपण शाकुंतलातील कण्व मुनींच्या आश्रमातच आलो की काय असे वाटले. येथील दाइबुत्सुडेन (ऊं्रु4324-ीिल्ल) ही बुद्धाची 25क् टनी ब्रॉँझची 14.98 मीटर उंच व 5.41 मीटर रुंद कमळात बसलेली प्रचंड मूर्ती आहे. या महाकाय मूर्तीच्या बाजूलाही बुद्धाच्या लहान लहान आकाराच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या लाकडी खांबाला जमिनीजवळ मोठी भोके असून त्यातून लोक आरपार जाण्याचा पयत्न करतात. प्रयत्न यशस्वी झालेल्या व्यक्तीला पुढील जन्मी ईश्वराचा साक्षात्कार होईल अशी त्यामागची श्रद्धा आहे. या मंदिराच्या परिसरात अशोक स्तंभ असून, त्यावर चार सिंहमुखांचे भारताच्या ङोंडय़ावर दिसणारे शिल्पही पाहिले आणि साश्चर्य आनंद झाला.
टोकियोजवळील कामाकुरा भागातील एंगाकुजी
(एल्लॅं‘4-A्र) ङोन बुद्ध मंदिर म्हणून प्रसिद्ध असून, चिनी शैलीत बांधलेले आहे. येथील 2.5 मीटर उंचीची भव्य घंटा हे मोठे आकर्षण असून, गौतम बुद्धाचा दात येथे जतन केलेला असल्यामुळे या जागेला धार्मिकदृष्टय़ा फार महत्त्व आहे. येथील नाश्त्यासाठीच्या छोटय़ाशा खाद्यगृहात बसायला ढाब्यासारखी लाल बाकडी, वर निळ्या उशा. जमीन सारवून स्वच्छ केल्यासारखी - सज्जनगडाचीच आठवण आली.
क्योतोमधील कियोमिझा डेरा मंदिर पाहायला जातानाचा रस्ता अगदी लहान गल्लीबोळातून जात होता. दोन्ही बाजूंनी कपडे, दागिने, खाद्यपदार्थ, जपानी पंखे, टंल्ली‘्र-ल्ली‘ हे हात हलविणारे मांजर (हे शुभ समजले जाते) विकणा:या दुकानांनी ते बोळ दुतर्फा खचाखच भरलेले. शाळांच्या सहली आल्यामुळे गर्दीही खूप. भारतीय जत्रेचीच आठवण आली. गर्दीतून वाट काढताना रस्त्याच्या कडेला एक छोटेसे देवघर उंचवटय़ावर ठेवलेले दिसले. वाकून पाहिले तर आत देवाच्या मूर्ती व उदबत्ती आणि मेणबत्तीही लावलेली. शिवाय एका कुंडीत लावलेला मोगरा गच्च फुलून सुगंध देत होता. येथे अनेक बुद्ध मंदिरे असून, पूर्वेकडील ड36ं2ंल्ल ्र्रे94ीि1ं हे 798 साली बांधलेले मंदिर सर्वात प्रसिद्द. जवळच असलेल्या अ1ेी ्रि84 94 नावाच्या धबधब्यावरून देवळाचे नाव पडले आहे. चेरी ब्लॉसमच्या काळात हे मंदिर चेरीच्या झाडांनी बहरते. ते पाहण्यासाठी लोक तिकडे धाव घेतात.
जपानमध्ये भारताला जवळचे असे
आणखीही खूप काही दिसते. त्याबद्दल पुढच्या रविवारी!
टोकिओतली तुळशीबाग
टोकिओजवळील अ2ं‘42ं बुद्धमंदिर हे रील्ल2 म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिराच्या प्रमुख प्रवेशद्वारी लाल-काळ्या रंगाचा प्रचंड मोठा कागदी दिवा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. दिव्याच्या तळाशी ड्रेगनचे लाकडी कोरीव काम अप्रतिम आहे. आत शिरले की दिसणारा पाच मजली पेगोडा आणि प्रमुख मंदिर केशरी रंगाचे असून, विशेषत: रात्री दिव्याच्या प्रकाशात अप्रतिम दिसते. रंल्लAं टं324ल्ल या जपानी सणासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे. त्यावेळी आपल्याकडे नवरात्रत महालक्ष्मीच्या मंदिरात होते तशी गर्दी येथे उडते. आसपासचे रस्ते वाहनांना बंद करतात. अनेक जपानी लोक दरवर्षी या सणासाठी या मंदिरात दर्शनासाठी येतात. आम्ही गेलो तेव्हाही मंदिरातली आणि आसपासची गर्दी पाहून भारतीय मंदिरांची आठवण झाली. या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी दोन्ही बाजूंना असलेली हजारो दुकाने पाहून पुण्यातली तुळशीबागच जणू इथे उचलून आणली आहे असे वाटत होते.
केशरी कमानींची जादू
क्योतोजवळील फुशिमी इनारी ताइशा (ऋ42ँ्र्रे-्रल्लं1्र-3ं्र2ँं) श्रइन ही जपानची खरीखुरी प्रतिमा आहे असे मानले जाते. टोरी (ळ1्र) या नावानेही हे शिंटो धर्माचे पवित्र स्थान ओळखले जाते. टोरी म्हणजे जपानी पद्धतीची कमान. शिंटो धर्माच्या इनारी या भात, साके (मद्य), संपन्नता यांच्या देवतेची पूजा येथे बांधली आहे; ती दहा हजार शेंदरी रंगाच्या टोरी म्हणजे कमानींमधून. मंदिराच्या प्रवेशद्वारी इनारी देवता ्र32ंल्ली म्हणजे कोल्ह्याच्या रूपात चबुत:यावर उभी असून, मंदिराची किल्ली त्याच्या तोंडात आहे. काळ्या डोंगराच्या पाश्र्वभूमीवर एकात एक असणा:या केशरी कमानी कमालीच्या सुंदर दिसतात. या कमानींतून डोंगरावरून चढत उतरत सुमारे तीन तासांची पदयात्र केली की जागोजागी शेकडो पवित्र स्थाने व तोंडात भाताच्या ओंब्या घेतलेल्या कोल्ह्याच्या अक्षरश: हजारोंवर दगडी आणि ब्रॉँझच्या मूर्ती दिसतात.
(लेखिका न्यूझीलंडमधील ऑकलंडच्या
रहिवासी आहेत)
kalyani1804@gmail.com