एका दगडात किती पक्षी?
By Admin | Updated: August 22, 2015 18:58 IST2015-08-22T18:58:17+5:302015-08-22T18:58:17+5:30
आपल्या मायदेशाबद्दल,तिथल्या पंतप्रधानांबद्दल आपल्या आंतरराष्ट्रीय मित्रमैत्रिणींना वाटणारी उत्सुकता परभूमीवर अनुभवायला मिळते, तेव्हा जीव किती सुखावतो, ते कसे सांगणार? - त्यासाठी ‘अनिवासी’ असण्याच्या सुख-दु:खातून जावे लागते, हेच खरे!

एका दगडात किती पक्षी?
>- शिल्पा कुलकर्णी-मोहिते
दहा वर्षापूर्वी अबुधाबीमध्ये जेव्हा पहिले पाऊल टाकले तेव्हा ‘यात काय छान आहे, हे फक्त स्वच्छ चर्चगेट आहे’ अशा चेष्टेने नव:याच्या उत्साहावर पाणी टाकल्याचे आजही आठवते. पण हळूहळू मुंबईतल्या माझ्या अनुभवांशी खूप समानता असलेले तरी खूप वेगळे असे हे शहर उमजत गेले. अबुधाबीहून काही वर्षापूर्वी दुबईला वास्तव्यास आल्यानंतर तर हा फरक अजून तीव्रतेने जाणवू लागला. 45 वर्षांपूर्वीच्या रखरखत्या वाळवंटाचे आज इतके सुंदर शहर कसे होऊ शकते याचे आजही मला आश्चर्य वाटते. स्वच्छता, सुरक्षितता, वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतींची ओळख अशा कित्येक गोष्टी या शहराने मला दिल्या आहेत.
- पण आवडो किंवा न आवडो हे शहर कधी ना कधी आम्हाला सोडावेच लागेल. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा इतर देशांप्रमाणो संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) नागरिकत्व मिळत नाही. त्यामुळे इथल्या अनिवासी भारतीयांचे भारताच्या घडामोडींवर खास ध्यान असते. म्हणूनच भारताच्या पंतप्रधानांचे आपल्या घरी येणे हे यूएईमधल्या भारतीय नागरिकांसाठी विशेष महत्त्वाचे आणि औत्सुक्याचेही होते. राजनीती आणि अर्थनीती यासोबत आणखी एक महत्त्वाचा संदर्भ मोदींच्या भेटीला होता : आपल्या मायदेशाच्या प्रमुखाकडून इथल्या कर्तृत्ववान अनिवासी भारतीयांना हवी असलेली पाठीवर कौतुकाची एक थाप !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा यशस्वी होण्यासाठी यूएई सरकार जितक्या बारकाईने तयारी करत होते, तितकीच लगबग इथल्या भारतीयांच्या घरीही होती. दुबई क्रिकेट स्टेडियममध्ये होणा:या कार्यक्रमासाठी तर इथल्या आमच्या मित्रंनी अगदी जय्यत तयारी केली होती. किती वाजता निघायचे, कुणी कुणी सोबत जायचे इथपासून ते तुम्ही काय कपडे घालणार आहात, इथवर चर्चा मित्रंमध्ये रंगल्या होत्या.
खरंतर, एका देशाच्या प्रमुखांनी दुस:या देशाचा दौरा करून राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक संबंधांची वीण घट्ट केली या आशयाने अशा दौ:यांचे वृत्तांकन होत असते आणि ते उचितही आहे. पण, मोदींच्या यूएई दौ:यात राजकारण आणि अर्थनीतीला किनार होती ती समान हितांच्या मुद्दय़ांची आणि सांस्कृतिक समरसतेची.
मोदी यांच्या भेटीबाबत यूएईतील भारतीयांबरोबरच इथले राज्यकर्ते, धोरणकर्ते आणि उद्योगपतींनाही तितकीच उत्सुकता होती. त्यामुळेच मोदी यांच्या भेटीच्या 15 दिवस अगोदरपासूनच इथल्या माध्यमांमध्ये अनेक विश्लेषणो ऐकायला आणि वाचायला मिळत होती. दुबईबद्दल बोलायचे तर हे एक आंतरराष्ट्रीय शहर असून, 8क् पेक्षा जास्त देशांच्या नागरिकांचे इथे वास्तव्य आहे. त्यात वरचष्मा अन् दबदबा आहे तो भारतीयांचाच. अर्थात हा दबदबा केवळ भारतीयांच्या संख्येमुळे नसून त्यांच्या येथील अर्थव्यवस्थेतील योगदानामुळे आहे. त्यामुळे भारत, भारतातील घडामोडी यांना इथल्या मीडियात मानाचे पान असते. याचा फायदा म्हणजे भारतीयांना तर आपल्या देशाची खबरबात मिळतेच; पण यानिमित्ताने भारताचे महत्त्व इथे राहणा:या अन्य देशांच्या लोकांनाही आता चांगलेच ठाऊक आहे. सध्या इथे सुटय़ांचा मौसम असल्याने केवळ वीकेण्डच नव्हे, तर आठवडय़ाच्या मधल्या दिवसांतही पाटर्य़ाचे फड रंगत आहेत. गेल्या आठवडाभरातल्या पाटर्य़ाचा मुख्य विषय हा अर्थातच मोदी यांची भेट हा होता. यूएईला भेट देऊन मोदी यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याच्या मुद्दय़ावर इथल्या चर्चामध्ये जवळपास एकमत दिसते.
पश्चिम आशियामध्ये अनेक मोठे आणि सधन देश आहेत. मात्र यूएईसारखा सधन, मुस्लीम राज्यकत्र्याचाच देश निवडणो याद्वारे त्यांनी केवळ व्यापारउदीम किंवा गुंतवणुकीची गणितेच सोडविली नाहीत, तर तेलसमृद्ध अशा देशाला दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सोबत घेण्याची मुत्सद्देगिरीदेखील अत्यंत चतुराईने साधली आहे.
यूएई हे सात अमिरातींचे राष्ट्र. या भागाशी भारताची ‘मैत्री’ आहे असे चित्र नव्हते. नाही. समान संदर्भामुळे अमिरातीची पाकिस्तानशी जवळीक अधिक. पण, भारत आणि यूएई यांच्यातला स्वाभाविक समान हिताचा कार्यक्रम आणि समस्यांतील साम्य हे अरबांच्या गळी उतरविण्यात मोदींना यश आले. दुबईतले अर्थतज्ज्ञ डॉ. धर्मा मूर्ती म्हणतात, ‘इस्लामिक स्टेट’ नावाचा जो काही शब्द मधल्या काळात तयार झाला त्याला छेद देण्याचे काम हे मोदी यांच्या भेटीने साधले गेले. या भेटीत यूएई आणि भारत यांच्यात झालेला दहशतवादविरोधी सहकार्य करार पाकिस्तानला चपराकच असल्याचे मानले जाते.
अर्थकारणापेक्षाही दहशतवादाच्या मुद्दय़ावर यूएईसारख्या देशाला आपल्या बाजूने वळविणो हे मोठे यश असल्याचे डॉ. मूर्ती सांगतात.
मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि कार्यशैलीमुळे त्यांची लोकप्रियता मोठी असली तरी त्यांच्याबद्दल असलेले आक्षेपदेखील चर्चेत आले हे विशेष. मोदी हे निष्णात इव्हेण्ट मॅनेजर आहेत. त्यांच्या कोणत्याही कृतीतून कायम स्वत:कडेच फोकस केंद्रित राहील याची ते काळजी घेतात. किंबहुना त्या दृष्टीनेच त्यांच्या भेटीचे नेपथ्य झालेले असते. अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा अगदी दुबईतील त्यांच्या भाषणातील काही मुद्दे, या मुद्दय़ांचा तेथील अनिवासी भारतीयांशी फारसा संबंध नव्हता. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून किंवा परदेशातून मोदी यांनी जणू भारतातील लोकांसाठी भाषण केले असे भासत होते.
अमेरिकेच्या दौ:यादरम्यान मोदी यांनी तेथील अनिवासी भारतीय अथवा भारतीय मूळ असलेल्या लोकांच्या ओसीआय कार्डाचा प्रश्न निकाली काढला. किंवा ऑस्ट्रेलिया, जपान येथे अनिवासी भारतीयांचे मेळावे घेतले तेव्हा त्यांच्यात प्रत्यक्ष मिसळून त्यांनी तिथल्या अनिवासी भारतीयांसोबत दुतर्फा असा संवाद साधला. परंतु, यूएईच्या दौ:यात मात्र त्यांनी प्रत्यक्ष लोकांत मिसळणो किंवा त्यांच्या समस्या ‘ऐकणो’ टाळले, असा एक टीकेचा सूर उमटतो आहे.
या भेटीने लोकांमध्ये एक चैतन्य आले हे खरे; पण या भेटीत अनिवासी भारतीयांचे कुठलेही प्रश्न मांडले गेले नाहीत, त्यावर फारशी गंभीर चर्चा झाली नाही. साडेचार लाख करोड थेट गुंतवणूक अबूधाबी फंड करणार, हे ऐकायला छान वाटते. पण कधी, कशी, कुठे ते माहीत नाही. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कदाचित फायदा होईल. यात अनिवासी भारतीयांची काहीच भूमिका नाही.
मोदींचे भाषण मीडियासाठी जास्त, अनिवासी भारतीयांसाठी कमी होते. इथल्या कर्मचारीवर्गात 65 टक्के भारतीय आहेत. त्यांचे वेतनाचे आणि अन्य काही आर्थिक प्रश्न आहेत. वेगवेगळ्या व्हिसाच्या स्वरूपातील सुसूत्रीकरण आणि त्यातील प्रक्रियेची सुलभता यावर मोदी काही बोलले असते तर त्याचा निश्चित अन् थेट फायदा इथल्या 25 लाख अनिवासी भारतीयांना झाला असता. पण ते घडले नाही.
यूएईचे सरकार आणि इथले स्थानिक अरब नागरिक यांनादेखील या दौ:याबद्दल एक विलक्षण कुतूहल होते. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे, या देशाच्या आणि विशेषत: दुबईसारख्या शहराच्या विकासात भारतीयांचे उल्लेखनीय योगदान. इथल्या 1क्क् श्रीमंतांच्या यादीतदेखील अनेक भारतीयांची नावे आहेत. त्यामुळे इथल्या अर्थकारणावर असलेला त्यांचा प्रभाव त्यांचे इथल्या व्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित करतो. तसेच, भारत आणि यूएई यांच्यातील व्यापार- उदीमाचे दुतर्फा संबंध अनेक दशकांचे आहेत. सुमारे 6क् अब्ज अमेरिकन डॉलर इतक्या मोठय़ा प्रमाणावर होणारा असा हा ट्रेड आहे. यासंदर्भात येथील एक अर्थतज्ज्ञ डॉ. राम मिसाळ यांच्या मते, आगामी दोन ते तीन वर्षात जगातील पहिल्या पाचातील अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचा दबदबा जगात असेल. अशावेळी भारतासारखा भक्कम देश पाठीशी असावा, असा सुज्ञ राजकीय विचार इथल्या राज्यकत्र्यानी केल्याचे दिसते.
अबुधाबी आणि दुबई ही खरेतर ग्लोबल शहरे. जगाच्या प्रत्येक देशातील नागरिक इथे नोकरी-धंद्याच्या निमित्ताने आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी वास्तव्यास आहेत. त्यामुळे साधारणपणो प्रमुख देशांतील राजकारण, अर्थकारण या विषयावर चर्चा होत असते. फक्त भारतीयच नव्हे, तर माङया अमेरिकन, युरोपियन, रशियन, फ्रेन्च, लेबनिज अशा सर्वच मित्रमैत्रिणींनी गेल्या 15 दिवसांत कधी ना कधी कसली ना कसली माहिती माङयाकडून उत्सुकतेने घेतली.
आपल्या मायदेशाबद्दल, तिथल्या पंतप्रधानांबद्दल आपल्या आंतरराष्ट्रीय मित्रमैत्रिणींना वाटणारे कुतूहल, उत्सुकता परभूमीवर अनुभवायला मिळते, तेव्हा जीव किती सुखावतो, हे कसे सांगणार?
- त्यासाठी ‘अनिवासी’ असण्याच्या सुख-दु:खातून जावे लागते, हेच खरे!
(लेखिका मुक्त पत्रकार असून, दुबई येथे
वास्तव्याला आहेत)
shiloo75@yahoo.com