बँडएडचा शोध कसा लागला?
By Admin | Updated: May 24, 2014 13:26 IST2014-05-24T13:26:02+5:302014-05-24T13:26:02+5:30
सेहवागची बँडएडची जाहिरात आता आपल्याला चांगलीच परिचित आहे. पण, बँडएडच्या शोधाचं श्रेय कुणा एका व्यक्तीकडे जात नाही. वैद्यकीय व्यवसायातील अनेक जणांचा बँडएड निर्मितीस हातभार लागलेला आहे.

बँडएडचा शोध कसा लागला?
सेहवागची बँडएडची जाहिरात आता आपल्याला चांगलीच परिचित आहे. पण, बँडएडच्या शोधाचं श्रेय कुणा एका व्यक्तीकडे जात नाही. वैद्यकीय व्यवसायातील अनेक जणांचा बँडएड निर्मितीस हातभार लागलेला आहे. फिलोडेल्फिया मेडिकल र्जनलमध्ये सॅम्युअल डी. ग्रॉसन १८३0मध्ये वैद्यकीय चिकटपट्टय़ांचा मोडलेली हाडं सांधण्यासाठी उपयोग होतो, हे दाखवून दिले. ८४५मध्ये डॉ. होरेस डे आणि विल्यम विल्यम शूट या डॉक्टरद्वयीनं रबराच्या द्रावणाचं रोगण देऊन तयार केलेल्या चिकटपट्टीचे एकाधिकार मिळवले.
जर्सीसिटी न्यूजर्सीततल्या या डॉक्टरांनी त्यांच्या या चिकटपट्टीचे स्वामित्व हक्क डॉ. थॉमस ऑलकॉक यांना विकले. डॉ. ऑलकॉकने ऑलकॉक पोरस प्लॅस्टर घाऊक प्रमाणात बाजारात आणले. इ. स. १८४८मध्ये डेडहॅम ह्या मॅसॅच्युसेटसमधल्या गावातले डॉ. जॉन पार्कर मे नार्ड यांना एक वेगळीच कल्पना सुचली. त्यांनी सल्फ्युरिक इथरच्या द्रवात गनकॉटन विरघळू दिला. हे चिकट द्रावण त्वचेवर फासायचं आणि त्यावर कापड चिकटवायचं, अशा तर्हेची एक चिकटपट्टी त्यांनी तयार केली होती.
इस्ट ऑरेंज, न्यू जर्सी इथल्या रॉबर्ट डब्ल्यू जॉन्सन आणि जॉर्ज जेबीबरी यांनी रबरी मातृकेवर आधारित एक नवी चिकटपट्टी इ. स. १८७४मध्ये तयार केली होती. बारा वर्षांनंतर जॉन्सननं स्वत:चीच जॉन्स अँड जॉन्सन नावाची एक कंपनी सुरू केली. वैद्यकीय साधनं आणि मलम तयार करणार्या या कंपनीमध्ये अर्लडिप्सन हा कंपनीसाठी कापूस खरेदी करायचं काम करायचा. त्याच्या पत्नीला सतत बारीकसारीक दुखापती व्हायच्या. बोटं कापणे, हात भाजणे असं या स्वयंपाकघरातील जमखांचे स्वरूप असे.
दरवेळी नवरा तिच्या जखमांवर मलम लावायचा. त्यावर कापूस बसवून वर चिकटपट्टी लावायचा. या उद्योगाला खरं तर तो कंटाळला होता. त्यामुळं त्यानं वैतागून एक दिवस चिकटपट्टीचे बारीक बारीक लांबट तुकडे तयार केले. त्यांची चिकट बाजू वरती करून ते टेबलावर ठेवले. त्यावर बँडेजच्या जाळीदार कापडाचे अगदी छोटे तुकडे मधोमध चिकटवले. त्यावर एक पुतिरोधक द्रवाचा थेंब टाकला. हे सगळं जलाभेद्य कागदात गुंडाळलं (बटर पेपर) अशा बर्याच पट्टय़ा त्यानं पत्नीला दिल्या आणि काही कंपनीमध्ये नेल्या.
- निरंजन घाटे
(लेखक ज्येष्ठ विज्ञान अभ्यासक आहेत.)