शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

पिशवीतले गप्पी मासे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 06:05 IST

आपण रोज जी कॉस्मेटिक्स वापरतो, त्यामुळे समुद्रातले जीव मरतात, असं सहावीतल्या मितालीनं तिच्या पुस्तकात वाचलं होतं. आपली मोठी बहीण आणि तिच्या मैत्रिणींना हे कसं समजवायचं आणि त्यांना त्यापासून कसं परावृत्त करायचं यासाठी मितालीनं मग घरातच एक प्रयोग सुरू केला...

ठळक मुद्देअधले-मधले : धड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

‘‘आईईईई, ही मिताली बघ काय करतीये!’’ - सानिका जोरात ओरडली.‘‘आता काय नवीन??? कितीही मोठ्या झाल्या तरी इतक्या कशा भांडतात या पोरी???’’ आई वैतागून हातातलं पुस्तक टाकून मुलींच्या खोलीत आली.‘‘काय झालं?’’ असं तिने म्हणायच्या आत बारावीतल्या सानिकाने सहावीतल्या मितालीची तक्रार करायला सुरुवात केली.‘‘आई, तू हिला सांगून ठेव बरं. माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही म्हणून. तिला एक तर काही वापरायची अक्कल नाही आणि सगळ्या गोष्टी वाया घालवत असते.’’‘‘कुठल्या वस्तू वाया घालवते ती?’’ आईने जरा आश्चर्याने विचारलं. कारण मिताली तशी सगळ्या वस्तू जपून वापरणारी होती. अगदी लहान बाळ असतानासुद्धा तिने कधीच पुस्तकं फाडली नव्हती किंवा खेळणी मोडली नव्हती. पण सानिका उगीच तक्रार करणार नाही हेही आईला माहिती होतं.‘‘अगं ती माझी कॉस्मेटिक्स वाया घालवते किंवा चक्क हरवून टाकते. तुला माहितीये ना ती किती महाग असतात ते!’’- सानिका चांगलीच वैतागली होती.आता आईला समजलं की सानिकाला इतका राग का आला असेल. कारण सानिका तिच्या पॉकेटमनीमधून तिची कॉस्मेटिक्स आणायची. त्यासाठी आईबाबा तिला वेगळे पैसे द्यायचे नाहीत. त्यामुळे एखादं महागाचं क्रीम आणण्यासाठी तिला इतर काही खर्चात कपात करायला लागायची, आवडलेल्या दुसऱ्या गोष्टीत तडजोड करायला लागायची. त्यात मितालीने एखाद्या वेळी एखादी वस्तू वापरली तर सानिका तक्र ार करायची नाही; पण मिताली तिच्या वस्तू हरवत असेल किंवा वाया घालवत असेल तर सानिकाने चिडणं स्वाभाविक होतं हे आईला पटलं.आईने शेवटी मितालीला हाक मारली,‘‘मिताली, इतकं काय महत्त्वाचं करते आहेस तू?’’ थोड्या उत्सुकतेनं आई बघायला गेली, तर त्या टेबलवर काय वाट्टेल ते सामान पसरलेलं होतं.एक मध्यम आकाराची बादली भरून पाणी, हॉटेलातून भाज्या पार्सल करून देतात तसले तीन छोटे प्लॅस्टिकचे पांढरे डबे, सानिकाचा एक्सफॉलिएटिंग फेस वॉश, सानिकाचं सनस्क्रीन लोशन, मॉइश्चरायझर, नेलपॉलिश आणि सगळ्यात कहर म्हणजे एका मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशवीचं तोंड रबरबॅण्ड लावून पक्क बंद केलेलं होतं आणि त्यात पोहत होते आठ गप्पी मासे!मिताली शांतपणे त्या प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये काहीतरी कालवत होती. मितालीने आईच्या समोरच थोडंसं सनस्क्र ीन लोशन बोटावर घेतलं आणि ते पाण्यात कालवलं. ते बघून परत सानिकाचा संताप झाला.‘‘मिताली अगं काय चाललंय तरी काय तुझं???’’ आईनेही आता जरा चिडून विचारलं.‘‘अगं प्रयोग करते आहे आई मी.’’ असं म्हणत मितालीने सानिकाच्या एक्सफॉलिएटिंग फेस वॉश, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर या तिन्हींची झाकणं लावली आणि तिला त्या ट्यूब्ज परत देत म्हणाली, ‘‘घे तुझ्या वस्तू परत. एवढ्या काही वाया गेल्या नाही आहेत.’’‘‘अगं पण तुझं चाललंय काय ते मला कळू दे आधी.’’ - आई म्हणाली, ‘‘मासे कुठून आणलेत? आणि कोणी?’’‘‘अगं मीच आणले सायकलवर जाऊन. सरकारी नर्सरीत मिळाले मला.’’‘‘आणि पैसे कुठून दिलेस?’’‘‘अगं हे गप्पी मासे आहेत. ते फ्री असतात. हे डासांची अंडी खातात ना, म्हणून सरकार आपल्याला ते मासे फ्री देतं आणि साचलेल्या पाण्यात टाकायला सांगतं.’’आता आईला कळेना की असं परस्पर जाऊन मासे आणल्याबद्दल आधी रागवावं का कॉस्मेटिक्स अक्षरश: पाण्यात घालून वाया घालवल्याबद्दल आधी रागवावं? पण आपली सहावीतली लेक हे सगळं एकत्र करून काय करते आहे याची उत्सुकताही आईला वाटत होतीच, त्यामुळे तिने रागवायचा प्लॅन थोडा पुढे ढकलला आणि ती म्हणाली, ‘‘बरं, पण आता या सगळ्याचं तू पुढे काय करणार आहेस ते तर कळू दे.’’‘‘प्रयोग.’’‘‘कसला???’’‘‘अगं आई, मी शाळेतला पर्यावरणाबद्दलचा प्रकल्प करत होते ना, तेव्हा मी असं वाचलं की आपण वापरतो ती कॉस्मेटिक्स सगळी शेवटी समुद्रात जातात.’’‘‘इथून समुद्रात कशी जातील गं?’’ - सानिकाने खवचटपणे विचारलं.‘‘आपण तोंड धुतो तेव्हा ती पाण्यात जातात, त्यातून ड्रेनेजमध्ये, त्यातून नदीत आणि शेवटी समुद्रात.’’‘‘बरं मग?’’‘‘आणि त्यातल्या रसायनांमुळे मासे मरतात. आणि समुद्रातले इतर जीवपण मरतात. सनस्क्रीनमधल्या रसायनांमुळे पाणी विषारी होतं. आणि असा फेसवॉश असतो ना त्यात प्लॅस्टिकचे अगदी लहान, सूक्ष्म आकाराचे मणी घातलेले असतात. ते सगळे समुद्रात गोळा होतात आणि छोटे मासे ते खातात किंवा ते पाण्याबरोबर त्यांच्या पोटात जातात. त्याच्यामुळे ते मरतात. मग आपण अशा वस्तू कशाला वापरायच्या?’’‘‘अच्छा!’’ आईला ही सगळीच माहिती नवीन होती. ‘‘पण हे सगळं इथे गोळा करून तू काय करणार आहेस?’’‘‘मी हे सिद्ध करणार आहे की या वस्तू पाण्यात मिसळल्या तर मासे मरतात. म्हणजे मग सानिकाला पटेल आणि ती तिच्या मैत्रिणींना पण सांगेल आणि त्या हे सगळं वापरायचं बंद करतील.’’‘‘ओह!’’ आत्ता आईच्या लक्षात आलं. ती म्हणाली, ‘‘आता मला समजलं की तू काय करते आहेस. आणि तुझं हे म्हणणं बरोबर आहे, की आपल्यामुळे जर इतर कुठलाही जीव मरणार असेल तर ती गोष्ट आपण नक्की करायला नको. सानिकाच्या ते लक्षात येईल. ती आणि तिच्या मैत्रिणी अशी प्रोडक्ट्स शोधतील जी पर्यावरणाचं नुकसान करणार नाहीत. त्याबद्दलची माहिती त्यांनाही इंटरनेटवर मिळेल. शोधशील ना सानिका?’’‘‘हो’’ सानिका आॅलरेडी हातातल्या ट्यूबवरचे घटक वाचत होती. आई मग मितालीला म्हणाली,‘‘पण या सगळ्यात तुझंही काहीतरी चुकत होतं असं तुला वाटत नाही का?’’‘‘माझं? मी सानिकाच्या वस्तू घेतल्या ते म्हणते आहेस का तू? पण मागितल्या असत्या तर तिने दिल्या नसत्या आणि त्या न वापरता प्रयोग कसा करणार?’’‘‘तिच्या वस्तूंबद्दल मी काही म्हणत नाहीये. मी या माशांबद्दल म्हणते आहे.’’आईने पिशवीत पोहणाºया माशांकडे हात केला. ‘‘तुझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी तूसुद्धा हे आठ मासे मारून टाकणार होतीस. त्यांची काही चूक नसताना ! हे तुझ्या लक्षात येतंय का?’’मिताली आ वासून आईकडे बघत राहिली. तिच्या हे अजिबात लक्षात आलेलं नव्हतं. तिने हळूच नकारार्थी मान हलवली.आई म्हणाली, ‘‘तुझा हेतू चांगला आहे आणि तुझा मुद्दा योग्य आहे; पण तो सिद्ध करताना आपल्या हातून इतर कोणाचं काही नुकसान होत नाही ना हे बघणंपण तुझी जबाबदारी आहे.’’‘‘हो.’’ अपराधी भावनेने पिशवीतल्या माशांकडे बघत मिताली म्हणाली.‘‘मग आता हे मासे परत देऊन येतेस का?’’‘‘नको त्यापेक्षा आपण ते बागेतल्या हौदात सोडूया. डास तरी कमी होतील.’’ मिताली माशांची पिशवी उचलत म्हणाली. पुढच्या वेळी प्रयोग करण्यापूर्वी आईशी चर्चा करायला हरकत नाही, हे तिच्या लक्षात आलं होतं. कारण आई प्रत्येक गोष्टीला नाही म्हणत नाही आणि शिवाय आपण घातलेले घोळ निस्तरू शकते. असा भिडू आपल्या बाजूने घ्यायलाच लागणार हे तिला माहितीये..**ही आहे थोड्या ‘सटक’ वयातल्यामुला-मुलींसाठी एक मोकळीढाकळी ‘स्पेस’- या जागेत आम्ही तर लिहूच; पण मुलांनीही लिहावं असा प्लॅन आहे. मुलांनी काय लिहायचं? - याचं उत्तरही मुलांना आणि त्यांच्या आईबाबांना या ‘स्पेस’मध्येच मिळेल.थोडी धडपडी, डोकं जरा ‘तिरकं’ चालणारी, सतत काहीतरी कीडे करायला उत्सुक असलेली मुलंमुली... कुचकट न बोलता अशा मुलांना ‘सपोर्ट’ करणारे प्रयोगशील शिक्षक आणि अशा वेड्या मुलांच्या पाठीत धपाटे न घालता त्यांच्या गळ्यात मैत्रीचा हात टाकणाºया आई-बाबांची मिळून एक ‘कम्युनिटी’ बनवता येईल का, असा एक बेत आम्ही शिजत घातलाय. त्याविषयी सांगूच !तर भेटूया, येत्या रविवारी !अधल्या-मधल्या मुलामुलींसाठी काय काय शिजतंय हे पाहायचं असेल, तर एका गरमागरम, ताज्या ताज्या भांड्यात जरा पटकन डोकावून पाहायला सुरुवात करा :

www.littleplanetfoundation.org

(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)lpf.internal@gmail.com