शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी पान... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 07:00 IST

- अमोल मचाले एक देश म्हणून भारताची जी काही जागतिक स्तरावरील वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये लोकसंख्येचा विचार करता ‘सर्वांत मोठी ...

- अमोल मचालेएक देश म्हणून भारताची जी काही जागतिक स्तरावरील वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये लोकसंख्येचा विचार करता ‘सर्वांत मोठी लोकशाही’ आणि ‘क्रिकेटवेड्यांचा देश’ यांचा समावेश होतो. देशावर ब्रिटिशांचा अंमल असताना त्यांनी आपल्या विरंगुळ्यासाठी क्रिकेट नावाचे जे रोपटं इथं लावलं, रुजवलं... त्याचा आता महावृक्ष झालाय. या महावृक्षाचा पसारा इतका विस्तारलाय, की या खेळाच्या जन्मदात्यासह संपूर्ण क्रिकेटविश्व त्याच्या कवेत आलं आहे. या खेळाची रुजवात भारतात होत असताना येथील मातीचा गुणही त्याला लागला. क्रिकेट जगतात ठसा उमटविणारी अनेक रत्नं आपल्या देशानं दिली. अशा ११ रत्नांच्या आयुष्याचा ‘लोकशाहीमय’ पट वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या शैलीनं मांडण्याचा यशस्वी प्रयत्न ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि एका क्रिकेटपटूच्या पोटी जन्मलेले राजदीप सरदेसाई यांनी या पुस्तकातून केला आहे. सर्वकालीन महान भारतीय संघाविषयी हे पुस्तक नाही. भारतीय क्रिकेटला आकार देणाºया, यशाचा बॅटन पुढील पिढीच्या हाती देणाऱ्या, जगण्याच्या लढाया लढण्याचं बळ देणाऱ्या, भारतीयांना स्वप्न पाहण्याची; ती पूर्ण करण्याची हिंमत देणाऱ्या ११ खेळाडूंविषयी हे पुस्तक असल्याचं लेखक नमूद करतात. अर्थात ‘डेमोक्रसीज इलेव्हन -'Democracy's XI - The great Indian Cricket Story'...  भारतीय क्रिकेटची महान गाथा’ या पुस्तकामध्ये राजदीप यांनी वडील दिलीप सरदेसाई यांच्यासह मन्सूर अली खान पतौडी, बिशनसिंग बेदी, सुनील गावसकर, कपिलदेव, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या आजी-माजी दिग्गजांची जडणघडण, खेळाडू आणि व्यक्ती म्हणून वाटचाल, यश-अपयश, आव्हाने, विक्रम, निवृत्तीनंतरचं जीवन, त्यांचं भावविश्व, मजेशीर किस्से यांसह भोवतालची सामाजिक परिस्थिती अशा खुबीनं शब्दबद्ध केली आहे, की वाचणाºयाला जणू हे आपल्या नजरेसमोर घडत असल्याचा भास होतो. ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत कार्यरत पत्रकार मेघना ढोके यांनी तितक्याच ताकदीचा अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. हे पुस्तक उपरोक्त ११ खेळाडूंबद्दलच माहिती देत नाही, तर १९६०च्या दशकाच्या प्रारंभी कारकिर्दीचा श्रीगणेशा करणारे दिलीप सरदेसाई ते वर्तमान भारतीय संघाचा कर्णधार कोहलीच्या काळापर्यंत भारतीय क्रिकेटचा इतिहासदेखील सांगते. गोव्यातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ते भारतीय संघातील भरवशाचा फलंदाज म्हणून नाव कमावलेले सरदेसाई... राजघराण्यात जन्माला आलेले, अपघातात उजवा डोळा निकामी झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी भारतीय संघात स्थान मिळविणारे, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे ‘टायगर’ हे नाव सार्थ ठरविणारे मन्सूर अली खान पतौडी... भारतीय संघाची नकारात्मक मानसिकता बदलून ताठ मानेने खेळण्याची प्रेरणा देणारे, विंडीजसकट जगभरातील वेगवान गोलंदाजांचा समर्थपणे सामना करून सर्वांत प्रथम १० हजार कसोटी धावांचा टप्पा गाठणारे विक्रमादित्य सुनील गावसकर... फिरकीपटूंचा देश ही ओळख मिटवून सर्वाधिक कसोटी बळींचा विक्रम आपल्या नावे करणारे वेगवान गोलंदाज तसेच जागतिक दर्जाचे अष्टपैलू कपिलदेव... हैदराबादच्या गल्लीत वाढलेला मुस्लिम तरुण ते नजाकती मनगटी फटक्यांचे नैसर्गिक कोंदण लाभलेला आणि ऐतिहासिक पदार्पणाद्वारे जगभरातील समीक्षकांची वाहवा मिळविणारा अझर, मुंबईत प्राध्यापकाच्या घरी जन्माला येऊन आपल्या अफाट कर्तृत्वाद्वारे फलंदाजीला नवे जागतिक आयाम देणारा सचिन... संपन्न घरात जन्मलेला बंगाली मुलगा ते इतर संघांना ‘अरे’ला ‘कारे’ म्हणून उत्तर देण्याची सवय भारतीय संघाला लावणारा आक्रमक कर्णधार सौरव गांगुली... रांचीतला पेट्रोल पंप आॅपरेटरचा मुलगा ते भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून देणारा कर्णधार, अशा आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविणारी वाटचाल करणारा धोनी...  बालपणापासून बेधडक आणि काहीसा मुजोर स्वभाव असलेला, १८ व्या वर्षी रणजी सामना खेळत असताना वडिलांचे निधन झाल्याचे दु:ख बाजूला ठेवून त्याच दिवशी संघाला संकटातून बाहेर काढणारी खेळी करणारा विराट ते कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा सर्वच प्रकारांत स्वत: चांगली कामगिरी करून सहकाºयांना प्रेरणादायी नेतृत्व देणारा कर्णधार... असा खिळवून ठेवणारा या खेळाडूंचा प्रवास राजदीप यांनी चितारला आहे. इतर खेळांप्रमाणे क्रिकेटमध्येही घराणेशाहीला थारा नाही. इथं मैदानावर कामगिरी करा; नाही तर बाहेर व्हा, हाच नियम असतो. हे समजावून सांगताना राजदीप यांनी प्रस्तावनेत  सुंदर उदाहरण दिलं आहे... ‘‘राजकीय नेत्याच्या मुलाला राजकारणात सहज जागा मिळू शकते. वाडवडिलांच्या पुण्याईवर विधानसभा-लोकसभेची निवडणूकही जिंकू शकतो. आमदार, खासदार, मंत्री होऊ शकतो. घराणेशाहीचा लाभ घेत बड्या उद्योगपतींची मुलं मोठ्या पदांवर जाऊन बसतात. अभिनेता-अभिनेत्रींच्या मुलांना सिनेमात सहज संधी मिळते. क्रिकेटमध्ये हे शक्य नाही. अफाट गुणवत्ता आणि सर्वोत्तम कामगिरी याशिवाय भारतीय संघात स्थान मिळविणे शक्य नाही.’’ ‘कुणाचा तरी मुलगा’ या पात्रतेच्या आधारे भारतीय संघात स्थान मिळत नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी रोहन गावसकर आणि स्वत:चा दाखला दिला आहे. राजदीप यांनी पुस्तक लिहिताना लेखक म्हणून प्रामाणिकपणा आणि तटस्थपणा जपल्याचे सिद्ध करण्यास हे उदाहरण पुरेसं ठरावं. प्रजासत्ताक भारताचा पाया रचताना घटनेने सर्व नागरिकांना समान संधींचं आकाश उपलब्ध करून दिलं. क्षमतेच्या बळावर गगनभरारी घेता येते, हे भारतीय क्रिकेटने सिद्ध करून दाखविलं आहे. संधीची समानता या लोकशाही मूल्यावर विश्वास ठेवून स्वप्ने पूर्ण करता येतात, या वाचकांच्या विश्वासाला बळकटी देण्याचं काम पुस्तकात उल्लेख असलेल्या ११ खेळाडूंची वाटचाल खचितच करते. हेच या पुस्तकाचं यश आहे.  (लेखक लोकमत पुणे आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत)

टॅग्स :Puneपुणे