शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

तयार फराळ घेताय? शेव, चकल्या, अनारसे, लाडू.. असं काय काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 06:29 IST

दिवाळी म्हटलं की, फराळाची नुसती रेलचेल... शेव, चकल्या, अनारसे, लाडू.. असं काय काय?

- वसुंधरा देवधर

दिवाळी म्हटलं की,फराळाची नुसती रेलचेल...शेव, चकल्या, अनारसे, लाडू..असं काय काय?पण, हे सारेच पदार्थ आजकालआपण घरी बनवत नाही.‘तयार’ पदार्थ बाहेरून आणण्याशिवाय बºयाचदाकाही पर्यायही नसतो..अशावेळी काय काळजी घ्याल?सणवार म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ, असं समीकरणच आहे नाही का? अगदी जगभर अमुक सणाला तमुक खास पदार्थ बनवायचा आणि मस्त हादडायचा अशा परंपरा आहेत. अर्थात, त्या देश-काळ-परिस्थितीनुसार बदलत असतात. एक मात्र खरं की या परंपरा सुरू झाल्या त्यावेळी सर्वसामान्यपणे घरी पदार्थ बनवले जात. म्हणजे असं की, ते खास पदार्थ जसे जिलेबी, श्रीखंड किंवा मग लाडू, चकली, शेव, अनारसे असे कोणतेच पदार्थ आजच्या सारखे बारामास बाजारात मिळत नसत. घरी ते बनवण्यासाठी सर्व प्रकारचे कष्ट घ्यावे लागत आणि घेतलेही जात. हो.., नाहीतर ते मिळणार कसे आणि कुठे? त्यामुळे त्यांच्या दर्जाबाबत आणि पोटासाठी सुरक्षित असण्याबाबत शंकेला वाव नसे. मग आईचा हात दुखला असेल लाडवाचे बेसन भाजून, तर सोºयातून चकली/शेव पाडायला व्यायामशाळेतले कमावलेले दंड पुढे सरसावत. आजच्या विशीतल्या शहरी तरुण पिढीने सोºया हा शब्द ऐकलाय का आणि तो पाहिलाय का? इथपासून तयारी आहे...चकली, शेव ही आता एक्सट्रुडेड प्रॉडक्ट्स झाली आहेत. अहो, जिथे बाकरवडी चक्क मशीनमधून बनून बाहेर पडते आहे आणि त्याची स्टोरी आपण टीव्हीवर पाहतो, तिथे इतर खाऊची काय कथा?तर मुद्दा असा की, अन्नप्रक्रि या उद्योगातून, कारखान्यातून बनलेले खाद्यपदार्थ ते कोपºयावरच्या वाण्याकडे मिळणारी, पाचव्या गल्लीतल्या काकूंनी किंवा मग बचतगटांनी बनवलेली लसूण चटणी इथपर्यंत सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आज विकत घेतले जातात आणि चवीने खाल्ले जातात. अशा पदार्थांची खरेदी करताना त्यांची शुद्धता, दर्जा, त्यामध्ये नक्की काय घातलंय, तेल-तूप कुठलं वापरलंय, असे प्रश्न विचारी ग्राहकांच्या मनात येतात. शिवाय विविध माध्यमांमधून दूध भेसळ, अन्न भेसळ, फॅट फ्री, शुगर फ्री, सेलिब्रेशन, खास दसरा-दिवाळी निमित्त, हार्ट हेल्दी, प्रोटीन रिच आणि काय काय दावे करणाºया जाहिराती, पोस्ट्स, बातम्या, एक्स्क्लुसिव्ह रिपोर्ट असं सगळं आपल्यापर्यंत पोहोचत असत. त्यामुळे ‘काय घेऊ, काय खाऊ?’ अशा मन:स्थितीत बहुसंख्य खरेदीदार असतात.अशावेळी एक गोष्ट नक्की करायची -जर आपण पॅकेज्ड पदार्थ, अमुक एका ब्रॅण्डचा घेत असू तर त्यावरची माहिती नीट वाचायची.पॅकेज्ड पदार्थांच्या संदर्भातकाय काळजी घ्याल?१. घटक पदार्थांची यादी - सगळ्यात जास्त प्रमाणात असलेला घटक प्रथम आणि मग उतरत्या क्र माने२. किती खावे - याला पोर्शन साइज असे म्हणतात. तो पदार्थ एकावेळी किती खावा ते दिलेले असते.३. किती दिवसात वापरावा, संपवावा- जसे पाव- चार दिवसात.४. उघडल्यावर कसा सांभाळावा - हवाबंद डब्यात, फ्रीजमध्ये, फ्रीजरमध्ये इ.५. न्यूट्रिशन तक्ता - ज्यातून घटक पदार्थांपासून कोणते पोषण मिळेल ते कळते.झालंच तर किंमत, वजन इ. तर आपण आधी पाहतोच.प्रश्न येतो ज्यावेळी आपण पॅकेज्ड फूड्स घेत नाही त्यावेळी. कारण पॅकेज्ड अन्नासाठी वेगळे नियम आहेत आणि त्यांचे पॅक हे सहज उघडून परत (जणू काही झालंच नाही असे) बंद करता येत नसतात; पण आपण मिठाई घेतो, त्यातला एक पेढा हळूच तोंडात टाकून, त्या खोक्याला ती सेलो टेप परत साळसूदपणे चिकटवून टाकू शकतो. म्हणजे हे झाले डोळ्यासमोर पॅकबंद.दिवाळीला घरगुती शेव, चकली, बचतगटांनी बनवलेले दिवाळीचे अनेक पॅकबंद पदार्थ विकले जातात. सगळा अन्न व्यवहार ‘अन्न आणि औषध प्रशासनाच्या’ अंतर्गत येतो. प्रत्येक जिल्ह्याला अन्न औषध प्रशासनाचे कार्यालय असते. यामध्ये कोपºयावरच्या वडापावच्या टपरीपासून ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत आणि घरगुती पातळीवरील खाऊपासून मोठ्या अन्नप्रक्रि या उद्योगापर्यंत सर्व प्रकारचे अन्न, अन्न घटक, त्यांचे उत्पादनपूर्व दर्जा परीक्षण, उत्पादनाचे दर्जा परीक्षण, अनुचित प्रकार आढळल्यास त्यावर कारवाई, अशी अनेक कामे अंतर्भूत असतात. तरीपण आपण खरेदी करताना सावधपणा बाळगायलाच हवा.सर्व मुद्दे लक्षात घेऊन बाहेरचे खाद्यपदार्थ घेतले आणि योग्य प्रकारे, योग्य तेवढे आणि योग्यवेळी खाल्ले तर आरोग्य राखण्यास अडचण येऊ नये; मात्र तरीही एक नक्की की बाहेरचे तयार पदार्थ हा नैमित्तिक स्वरूपात स्वीकारण्याचा पर्याय आहे. ते नित्य सेवनात ठेवणे योग्य नव्हे.सद्यपरिस्थितीत नियमितपणे बाहेरचे अन्न, खानावळ, मेस इ. ठिकाणांचे खावे लागत असेल तर खात असताना खाण्याकडे, चवीकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या तयार अन्नात नक्की काय घातलेय याची कल्पना, अशा ठिकाणी जेवणाºया सामान्यपणे तरुण पिढीला येणे जरा कठीणच. जर एखादा पदार्थ त्याचा प्रमाणित चवीपेक्षा वेगळा लागला तर त्याबद्दल विचारणा करावी, तो परत करावा किंवा पैसे दिलेत तरी खाऊ नये.उदा : डोसा साखर घातल्या सारखा गोडीळ लागला तर नक्की काहीतरी चुकतंय. शक्यता अशी की, अति आंबलेल्या पिठात दुसरे थोडे ताजे पीठ मिसळून, बदललेली चव झाकायला त्यात साखर घातली. असा पदार्थ आरोग्याला हानिकारक ठरू शकतो.अशा सजग खरेदीदारांना आणि रसना परजून आस्वाद घेणाºया खवय्यांना सणासुदीचा आनंद मनमुराद लुटता येणार, हे नक्की.

तयार फराळ घेताना काय पहाल?१. पॅकेज्ड पदार्थ घेताना त्याचा पॅक जर भोक पडलेला, शिवणीशी टोक आलेला अगर उसवल्यासारखा, तारीख उलटून गेलेला असेल तर विकत घेऊ नये.२. तारीख उलटलेले पॅकेज्ड फूड विकणे हा गुन्हा असून, मध्यंतरी मुंबईतील काही नामवंत दुकानात असा माल विक्र ीच्या फळीवर आढळून आल्याने, त्यावर कारवाई करण्यात आली. ही बाब ग्राहकांनी उघडकीस आणून तक्र ार केली होती.३. गृहउद्योगातर्फे बनवण्यात येणारे सणासुदीचे पदार्थ खास करून शेव, चकली, कडबोळी इ. यासाठी चांगले तेल वापरले नसेल, पीठ जुने असेल तर विशिष्ट वास येतो, चवही कळते; मात्र आपली रसना तयार हवी.४. मिठाई घेताना भडक रंग (हिरवीगार बर्फी, अति केशरी जिलेबी, पिवळे धम्मक पेढे) टाळावेत.५. रासायनिक रंग अखाद्य नसतात; पण त्यांचा अतिवापर हानिकारक ठरू शकतो.

टॅग्स :diwaliदिवाळी