शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

फ्लाइंग कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 06:00 IST

आकाशात उडण्याची माणसाची इच्छा विमानाच्या माध्यमातून कधीचीच प्रत्यक्षात आली. आता मात्र माणसाला कारच हवेत उडवायचीय!

ठळक मुद्देजपान सरकारनं फ्लाइंग कार्सच्या विकसनात खूप मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली असून, त्यातून त्यांना 2023 पर्यंत या भविष्यवेधी वाहतूकप्रणालीचे संपूर्ण व्यावहारिकपण बाजारात सिद्ध करायचंय.

- शैलेश माळोदे

पक्ष्यांप्रमाणे आकाशात विहार करण्याची माणसाची सुप्त इच्छा फलद्रूप होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. त्यासाठी खूप काळ लोटावा लागला. विमानं आकाशात उडायला लागली; परंतु आता कार्सही आगामी काळात हवेत उडायला लागतील अशी स्थिती आहे. शहरातल्या ट्रॅफिक जामला हे चोख उत्तर असेल अशी स्थिती आहे.जपानी कंपनी स्काय ड्राइव्हनं ‘फ्लाइंग कार’ची (टॅक्सी कार) नुकतीच यशस्वी चाचणी घेतली आहे.   एसडी 3 मॉडेलच्या एका वाहनाला वीज वापरून वर उचलणं आणि पुन्हा खाली आणण्यात कंपनीला आलेलं यश; खरं म्हणजे अवघ्या चार मिनिटांचा कालावधी होता. या मॉडेलला ई-व्हीटीओएल व्हेईकल म्हणतात. तीन मीटर उंचीपर्यंत (दहा फूट) हे वाहन एका पायलटद्वारे हवेत नेण्यात आलं. अर्थात ही केवळ सुरुवात आहे. येत्या काळाची चुणूक त्यानं दाखवली आहे.

प्रयत्न आणि स्पर्धाअशा प्रकारच्या एरिअल टॅक्सी वास्तवात अवतरतील, हा विचार अनेक वर्षांपासून मूळ धरून आहे. त्यासाठी किमान वीस कंपन्या जवळपास अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या वापरासह प्रय} करताना दिसतात. त्यामध्ये बोइंग आणि एअरबससारख्या विमान निर्माण करणार्‍या कंपन्या आणि टोयोटा तसेच पोर्शेसारख्या कंपन्यादेखील आहेत. ह्युंदाई आणि उबर यांनीदेखील संपूर्णपणे विजेवर धावणार्‍या एअर टॅक्सीची निर्मिती करण्यासाठी संयुक्त प्रय} सुरू केले आहेत. मॉर्गन स्टॅँलेच्या विेषकांच्या मते, सन 2040 पर्यंत अशा नागरी एअर टॅक्सीज सगळीकडे सर्रास दिसतील आणि ही बाजारपेठ 1.4 ते 2.9 ट्रिलियन डॉलर्सची असेल. लॅरी पेज या गुगल कंपनीच्या सहसंस्थापकाने गुगलच्या स्वयंचलित कारची निर्मिती करणार्‍या अभियंत्यांच्या ‘किटिहॉक’ या कंपनीला आर्थिक पाठबळ पुरवलंय. ‘लिलियम’ नावाची एक र्जमन स्टार्टअप कंपनी अत्यंत गुप्ततेत यावर खूपच गंभीरपणे काम करत आहे. त्यांनी गुंतवणूकदारांकडून 100 मिलियन डॉलर्स उभे केलेत. उड्डाण मार्गातील अडथळे  फ्लाइंग कारसंदर्भात सुरक्षा प्रमुख अडथळा आहे. त्यामुळेच हे तंत्रज्ञान सर्वत्र वापरण्यात अडचणी आहेत. अजून ई-व्हीटीओएल एअर क्राफ्ट्सकरिता सुरक्षित स्वयंचलित तंत्रज्ञान विकसित होतेय. या वाहनांना आजूबाजूची स्थिती लक्षात घेऊन विेषणाअंती कृती करावी लागणार आहे. पायलट वा ऑपरेटरवर कमांडसाठी अवलंबून राहण्याची गरज भासू नये इतपत हे तंत्रज्ञान विकसित करण्याचेच प्रय} सुरू आहेत. दुसरं मुख्य आव्हान डिझाइन अर्थात रचनेचे आहे. अशा वाहनांना आवश्यक वजन वाहून नेण्याबरोबरच अनिश्चित असलेल्या कमी उंचीवरून उड्डाण करता यायला हवं. अर्थात अशी वाहनं हेलिकॉप्टर्सपेक्षा अधिक कार्यक्षमतेने ऊर्जा वापरतील. हेलिकॉप्टर्सना खूप इंधन लागतं, कारण त्यांना स्वत:ला उचलावं लागतं. अर्थात खर्चाचा विचार करता किराणा माल आणण्यासाठी ही फ्लाइंग टॅक्सी परवडणारी नाही. प्रा. एला अटकिन्स या तज्ज्ञांच्या मते, शहराजवळ पसरलेल्या उपनगरांतील लोकांना किंवा जवळजवळच्या देशांतील नागरिकांना ही कार सोईची असेल. मुंबईसारख्या ठिकाणी कर्जत-बदलापूरवाल्यांना पुणे, मुंबई गाठण्यासाठी ही कार सोईची ठरेल ! अर्थात सध्यातरी ही कार र्शीमंतांनाच परवडणारी असेल. याशिवाय खर्च कमी करून उत्पादन घेणं, संशोधन, विकास, उपलब्धता ही आव्हानंही आहेतच. बॅटरी तंत्रज्ञानाची र्मयादाही लक्षात घ्यावी लागेल. कारण प्रोटोटाइप तयार करणं वेगळं आणि मास प्रॉडक्शन करणं वेगळं. ते ग्राहकांना परवडायला हवं. शेवटचा मुद्दा नियमनाचा आहे. सध्या विविध ठिकाणी वाढलेल्या हवाई वाहतुकीचं नियमन करण्यासाठी पुरेसे हवाई वाहतूक नियंत्रक नाहीत. एकुणातच स्पर्धा सुरू झालीय. त्यात टिकणं महत्त्वाचं. खर्चही वाढता असेल. अनेक प्रय} फसतीलही; पण जे टिकतील ते नागरी परिवहनाला एक नवं परिमाण देतील.भविष्याचं चित्रलिलियम कंपनीनंदेखील अत्यंत उत्कृष्टपणे निर्माण केलेल्या व्हिडिओद्वारे त्यांच्या जेटने यशस्वीरीत्या उड्डाण केल्याचं दाखवलंय. उबरने तर 2023 मध्ये लॅास एंजल्स, डल्लास आणि मेलबर्नमध्ये एअर टॅक्सी सुरू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. म्हणजे पुढच्या तीन-चार वर्षांत फ्लाइंग कार क्षेत्रात अनेक पर्यायही उभे असल्याचं दिसेल. जपान सरकारनं फ्लाइंग कार्सच्या विकसनात खूप मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली असून, त्यातून त्यांना 2023 पर्यंत या भविष्यवेधी वाहतूकप्रणालीचे संपूर्ण व्यावहारिकपण बाजारात सिद्ध करायचंय.शांत, सुरक्षित आणि परवडण्याजोगी एअर टॅक्सी कमी कार्यान्वयन आणि देखभाल खर्चात उपलब्ध व्हावी आणि तीही कमी उंचीवरून उडावी अशी अपेक्षा आहे. या सर्व प्रय}ात भारत सध्या तरी कुठेच नाही; परंतु सर्वात जास्त युवक संख्या आणि बेरोजगारी असलेल्या या देशाला हे आव्हान स्वीकारून ‘आत्मनिर्भर’ होता येईल का, हाच खरा प्रश्न आहे. 2028 पर्यंत येणार?तोमोहिरो फुकुझावा हे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या स्काय ड्राइव्ह या कंपनीनं गेल्या पाच वर्षांत स्थिर पंखांच्या अनेक प्रोटोटाइप्सची निर्मिती करून प्रयोग केले होते. मात्र इतर सर्व डिझाइन्सपेक्षा यशस्वी ठरलेल्या फ्लाइंग कारचा आकार आटोपशीर आणि वजनानं हलका होता.2014 पासून अशा फ्लाइंग कार तयार करण्याचे कंपनीचे प्रय} सुरू आहेत. 2028 पर्यंत अशी 100 वाहनं विकण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.

shailesh.malode@gmail.com                                                 (लेखक विज्ञान पत्रकार आहेत.)