शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

थिजलेली  भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 6:02 AM

दुखावलेला इराण आत्मघातकी हल्ले, सायबर हल्ले,  अपहरण आणि खून या वाटांनी  अमेरिकेला सतावून सोडेल, अशी शक्यता आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत  पुढले 11 महिने डोनाल्ड ट्रम्प हे अविचारी, आततायी गृहस्थ  काय करतील ते सांगता येत नाही.  त्यामुळे ट्रम्प पुरस्कृत ‘बालाकोटगिरी’ची शक्यता राहीलच! एक मात्र नक्की. युद्ध कोणालाही नको आहे. इराणला तर ते अजिबातच नको आहे.  तेलाची तहान न भागलेल्या युरोपीय देशांनाही युद्ध नको आहे. 

ठळक मुद्दे.. आता अकरा महिने वाट पहाणं एवढंच जगाच्या हाती आहे..

- निळू दामले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सणक आल्यावरून इराणचे लष्कर प्रमुख मेजर जनरल कासीम सुलेमानी यांची हत्या केली; त्यानंतर स्वाभाविकच मध्य-पूर्वेत एक मोठं युद्ध सुरू होईल अशी भीती जगभर पसरली. सुलेमानी यांच्यावर अंत्यसंस्कार होताच प्रत्युत्तर म्हणून इराणनं बगदादमधील अमेरिकन तळावर बॉम्ब हल्ला केल्यावर ती भीती आणखी गडद झाली. या घटनेनंतर काही वेळातच ‘आमच्या देशाला युद्ध करण्याची खुमखुमी नाही’, असा खुलासा इराणच्या परदेश मंत्र्यांनी केला आणि धास्तावलेल्या जगाचा जीव आत्तातरी भांड्यात पडला.यावर गप्प बसतील ते ट्रम्प कसले? त्यांनीही ‘युद्धाची शक्यता तूर्तास नाही’, असं सांगत सांगत पुन्हा कधीही अमेरिका तो आचरटपणा करू शकेल, असं सूचित केलं. भीती थिजली.सरत्या आठवड्यात युद्ध ही भीतिदायक गोष्ट जगाच्या रंगमंचावर एखाद्या कॉमेडीसारखी उलगडत गेली.कॉमेडी सुरू झाली ती ‘सुलेमानी यांना ठार करा’ या ट्रम्प यांच्या हुकूमापासून. सुलेमानी या इराणच्या सर्वोच्च लष्करी जनरलला अमेरिकेच्या दलांनी आकाशातून मारा करून टिपणं म्हणजे जवळ जवळ युद्ध सुरू करण्यासारखंच होतं. इतका गंभीर निर्णय घेण्यासारखी परिस्थिती मुळीच नव्हती, तशा निर्णयाची आवश्यकता भासावी अशा घटना घडल्या नव्हत्या. सारं काही ठीकठाक होतं. खुद्द ट्रम्प फ्लोरिडात आपल्या रिसॉर्टमध्ये गोल्फ खेळत मजा मारत होते.युद्धसदृश घटनेची माहिती 48 तासांत संसदेला देणं अमेरिकेत कायद्यानं बंधनकारक होतं, त्यानुसार दोन दिवसांनी एक संदिग्ध पत्र देऊन तशी सूचना ट्रम्प यांनी काँग्रेसला दिली. परंतु ‘कोणत्या गंभीर शक्यता गृहीत धरून ही कारवाई केली’ याची माहिती त्या पत्रात नव्हती. अध्यक्ष ही एक स्वतंत्र संस्था असली तरी अध्यक्षानं युद्धासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना लष्कर, परदेश खातं, संसदेच्या संबंधित समित्या यांच्याशी आधी विचारविनिमय करणं अमेरिकेतील व्यवस्था आणि शिरस्त्यानुसार आवश्यक असतं. त्यातलं काहीही ट्रम्प यांनी केलं नाही. कोणाशीही न बोलता तोंडावर आलेल्या निवडणुकीची गणितं घालून हे महाशय इराणच्या लष्करप्रमुखाला ठार मारण्याचा आदेश देऊन मोकळे झाले.सध्या हे ट्रम्प महाशय स्वत:च इंपीचमेंटमध्ये अडकले आहेत. प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना हरवण्यासाठी त्यांनी रशियाची मदत घेतली. ‘आपल्या विरोधकांबाबत माहिती पुरवा नाही तर तुमची मदत अडवून ठेवू’, अशी धमकी ट्रम्प यांनी युक्रेनच्या अध्यक्षांना दिली. या दोन्ही गोष्टी गंभीर गुन्हे आहेत, असा मुद्दा घेऊन ट्रम्प यांची चौकशी चालली आहे. ते सिद्ध होऊन त्यांना अध्यक्षपद सोडावं लागेल की नाही ते आत्तातरी सांगता येत नाही; पण एकूणच अमेरिकन अध्यक्षांचं वर्तन उघडं पडत असून, त्याचा प्रभाव मतदानावर पडण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेऊन ट्रम्प यांनी इराणकडे लोकांचं लक्ष वळवून एकदम देशप्रेमालाच हात घातला, आणि एक नवीन रणभूमी तयार केली. ‘सुलेमानी हे गृहस्थ अनेक अमेरिकनांचा बळी घेणार होते याची माहिती होती, त्यामुळे त्यांचा खातमा करून आपण देशाचं कल्याणच केलं आहे’, असं हे ट्रम्प आता सांगत सुटले आहेत.ट्रम्प स्वत: कायदे पाळत नाहीत. ते कोणाचाही सल्ला न घेता मनास वाट्टेल तसं वागतात. ते देशहित आणि मानव हित यांना धाब्यावर बसवणारे निर्णय घेतात. त्यांचे स्रीविषयक विचार, त्यांचा वर्णद्वेष, त्यांचा परकीय द्वेष या गोष्टी अनैतिक आणि अमानवी आहेत. सरकार, न्याय व्यवस्था, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या गोष्टी ते मानत नाहीत. अमेरिकेसारख्या देशात असा हा माणूस निवडून येतो आणि खुश्शाल राज्य करतो ही गोष्ट चिंताजनक आहे. लोकशाही व्यवस्थेचाच वापर करून ही लोकविरोधी माणसं सत्तारूढ होतात. अशा माणसांच्या हातात देश जाणं किती धोकादायक आहे ते सुलेमानी यांच्या हत्येवरून पुन्हा एकवार स्पष्ट झालं आहे.अमेरिकेने सुलेमानींची अशी थेट हत्या केल्याने इराणमध्ये संतापाचा भडका उडणं स्वाभाविकच होतं. त्या देशातून अमेरिकेचा सूड उगवण्याच्या घोषणा सुरू झाल्या. प्रतिहल्ल्याचे इशारे दिले गेले. त्यातूनच इराकमधल्या अमेरिकी तळावर इराणनं हल्ला केला. हा हल्ला तसा फुसका होता, नाममात्र होता, त्यात अमेरिकेचं फारसं नुकसान झालं नाही. इराणनं आपला राग फक्त व्यक्त केला, एवढंच काय ते!इराण यापेक्षा अधिक करू तरी काय शकणार?इराणची शस्र ताकद अमेरिकेच्या तुलनेत अगदीच नाममात्र आहे. इराण अमेरिकेवर हल्ला करू शकत नाही. इराक, सीरिया, इस्रायल, दुबई इत्यादी ठिकाणच्या अमेरिकेन तळांवर हल्ला करणं एवढंच इराणला शक्य आहे. पण तेही कठीण आहे कारण इराणी सैनिक, विमानं, रॉकेटं तिथं पोहोचू शकत नाहीत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं की अमेरिकेनं जबर प्रतिहल्ला केला तर  इराणचं कधीही न भरून येणारं नुकसान होईल. इराणला ते परवडणारं नाही.इराणला अण्वस्रं तयार करण्याची महत्त्वाकांक्षा होती म्हणून अमेरिकेनं इराणवर आर्थिक निबर्ंध लादले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात हे निर्बंध सैल केले. पण ओबामा द्वेषाची कावीळ असलेल्या ट्रम्प यांनी सत्तेवर येताच पुन्हा ते निर्बंध लादून इराणची पुन्हा कोंडी केली. या अमेरिकन निर्बंधांमुळे तेल निर्यात हे उत्पन्नाचं मुख्य साधनच वांध्यात आल्यावर इराणची अर्थव्यवस्था सध्या पूर्णत: कोसळली आहे. इराणी जनतेला तेलावर दिली जाणारी सबसिडी सरकारला काढून घ्यावी लागली आहे, कारण रोजच्या खर्चासाठीसुद्धा सरकारकडे पैसे नाहीत. पेट्रोलचे दर महागल्यावर इराणी जनता खवळली, रस्त्यावर आली आहे. देशात सर्वत्र अस्वस्थता आहे. अशा स्थितीत इराणला युद्धाची चैन परवडणारी नाही, हे उघडच आहे. त्यामुळे अमेरिकेने आगळीक केल्यावर रस्त्यावरच्या मारामारीसारखी शाब्दिक मारामारी करून इराण गप्प राहील, हीच शक्यता मोठी!या संघर्षात दोन तट आहेत. एक तट इराणचा. दुखावलेला इराण  आत्मघातकी हल्ले, ट्रक बॉम्बचे स्फोट, अपहरण आणि खून या वाटांनी   अमेरिकेला सतावून सोडेल, अशी शक्यता आहे. त्याहूनही जास्त शक्यता आहे ती सायबर हल्ल्यांची ! अमेरिकेतल्या कित्येक शहरांमधली पाणी-वीज-सांडपाणी इत्यादी व्यवस्था कॉम्प्युटर नियंत्रित करतात. इराणी कॉम्प्युटर निष्णात त्या व्यवस्थांमध्ये घुसून उत्पात घडवू शकतील. अमेरिकेची संरक्षण व्यवस्था सायबर हल्ल्यांबाबत पुरेशी सक्षम नसल्याचं याही आधी सिद्ध झालेलं आहे.दुसरा तट आहे अमेरिकेचा. या देशात अध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत पुढले 11 महिने तरी डोनाल्ड ट्रम्प हे अविचारी आणि आततायी गृहस्थ काय करतील ते सांगता येत नाही. देशहितासारखा मुद्दा पुढे करून अमेरिकन जनतेला वेठीला धरण्याचा प्रय} हा ट्रम्प यांच्यासाठी एक सोपा मार्ग आहे. सुलेमानी यांची हत्या घडवून आणून त्यांनी या मार्गावर चालण्यास आपण किती उत्सुक आहोत, याची चुणूक दाखवलीच आहे. त्यामुळे यापुढेही ट्रम्प ‘बालाकोटगिरी’ करतील, ही शक्यता नाकारता येत नाही. एक मात्र नक्की.युद्ध कोणालाही नको आहे. इराणला तर ते अजिबातच नको आहे. सामान्यपणे अमेरिकेबरोबर असणार्‍या युरोपीय देशांनाही युद्ध नको आहे. फ्रान्स, ब्रिटन, र्जमनी इत्यादी देशांना इराणबरोबरचे संबंध सुधारायला हवे आहेत. कारण इराणचं तेल युरोपला हवंय. तेलाबाबत स्वयंपूर्ण झाल्यानं अमेरिकेला आता इराण किंवा आखाती देशांशी चांगले संबंध ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही. परंतु तेलाबाबत अजूनही पूर्ण परावलंबी असलेल्या युरोपला मात्र इराणशी भांडण परवडणारं नाही.या सगळ्यांसाठीच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प ही एक मोठी अडचण होऊन बसली आहे. युरोपीय देशांवर टीका करण्याची एकही संधी ट्रम्प वाया घालवत नाहीत. या महाशयांना समजावायचे प्रय} मॅक्रॉन आणि मर्केल यांनी करून पाहिले. पण ट्रम्प दाद देत नाहीत. पुढल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव व्हावा, ही एकमेव आशा आता हतबल युरोपच्या मनात असणार!इराणचीही तीच स्थिती आहे. निवडणुकीत पराभूत होऊन ट्रम्प गेलेच तर पुन्हा एकदा अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारतील अशी आशा इराण बाळगून आहे. म्हणूनच केवळ गुरगुरण्यावरच थांबण्याचा पवित्रा इराणने आत्तातरी घेतला आहे.ट्रम्प हा माणूस चक्रम आहे. त्यांच्याजवळ कोणतंच दीर्घकालीन धोरण वगैरे नाही. काहीही करून प्रकाशात रहाणं एवढा एकच कार्यक्रम घेऊन ते सत्तेत गेले आहेत. त्यातल्या त्यात एक कार्यक्रम मात्र ते पक्केपणानं हृदयाशी बाळगून आहेत, तो म्हणजे ओबामा द्वेष. ओबामा मुक्त अमेरिका असं त्यांचं धोरण आहे. ओबामा यांनी घडवून आणलेल्या गोष्टी एकामागून एक रद्द करणं हा ट्रम्प यांचा एकमेव कार्यक्रम आहे. त्यामुळंच 2015 साली ओबामानी इराणबरोबर केलेला करार रद्द करून इराणला छळणं हा कार्यक्रम ट्रम्प हाती घेतला आहे... आता अकरा महिने वाट पहाणं एवढंच जगाच्या हाती आहे.

-------------------(आंतरराष्ट्रीय संबंधांचा विशेष अभ्यास असलेले लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

damlenilkanth@gmail.com