शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

चेहरे...मन:पटलावर ठळकपणे उमटून राहिलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 9:15 AM

ललित : माणसं माणसं माणसं... जीवन एक जत्रा व त्यात भेटलेली असंख्य माणसं... आणि त्यांचे असंख्य चेहरे; पण या असंख्य चेहऱ्यांपैकी एखादाच चेहरा मन:पटलावर ठळकपणे उमटून राहतो.  तो आपण कितीही विसरला तरी विसरू शकत नाही किंवा नंतर कुठे अचानक दिसल्यास आपण चटकन म्हणतो ही आपणास कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते.

- सुषमा सांगळे - वनवे

तो चेहरा सुंदरच असतो असेही नाही. कित्येकदा कुरूप असतो, सामान्य अगदी दहा जणांसारखाही असतो, तर कधी क्रूर अथवा भयानकदेखील असतो. तो विशिष्टच चेहरा मनात जाऊन का बसतो, याचे काही कारण सांगता येईल, असे मला तरी वाटत नाही; पण असे कित्येकांच्या बाबतीत घडते.काही चेहऱ्यांवर सहज भाव उमटून जातात. असे चेहरे अगदी स्वच्छ आरशासारखे वाटतात. काही इतके बोलके असतात की, त्यांना आपण कधी बोलून गेलो हे आपल्याही लक्षात येत नाही. काही स्थितप्रज्ञ दगडासारखेही असतात. काहींच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या मनाचा तळ प्रतिकूल, अनुकूल असे भाव सहज दिसतात. काही पारदर्शी मनात काही लपून न राहणारे असे असतात, तर काहींचे चेहरे एवढे भीतिदायक असतात की, बऱ्याच वेळा लहान मुले तर त्यांच्याकडे पाहून रडूही लागतात.

चेहऱ्यातील कपाळ, गाल, नाक, ओठ हे सारे अवयव आपापल्या परीने चेहऱ्याचे वैशिष्ट्ये व्यक्त करतात; पण चेहऱ्याची सारगर्भिता कशात असेल, तर ती साठवलेली असते माणसांच्या डोळ्यात. डोळ्यात सारे ब्रह्मांड असते. ज्या गोष्टी ओठांनी सांगता येत नाहीत ते डोळे न बोलता सहज सांगून जातात. मानवी मनाच्या खिडक्या कोणत्या असतील तर त्या म्हणजे डोळे. माणसाचे शील, त्याचा स्वभाव, त्याची तल्लख बुद्धिमत्ता त्याच्या डोळ्यातच चमकताना दिसते. मनातील उदासी, भीती, प्रेम, असूया, क्रोध, तिरस्कार, आनंद माणसाच्या मन:पृष्ठावर उठणाऱ्या विविध भावतरंगाचे प्रतिबिंब जर कुठे दिसून येत असेल तर ते डोळ्यात..! प्रतिभावंत डोळे, भावातुर आर्जवी डोळे, अर्भकाचे निष्पाप डोळे एकंदर मानवी जीवनाच्या सप्तरंगाचा इंद्रधनू डोळ्यात साठवलेला असतो.

चेहऱ्यामधील डोळे झाकून ठेवले तर तो चेहरा रंगहीन, भेसूर दिसू लागतो. फक्त एका नजरेचा कटाक्ष उत्कट प्रेमभावनेचा प्रारंभ होण्यास पुरेसा असतो. हाच चेहरा माणसांच्या वयाची साक्ष देत राहतो. कपाळावर पडणाऱ्या आठ्या, सुरकुत्या, सैल पडत जाणारी त्वचा हे सारे वार्धक्याची सूचना देत राहतात आणि माणूस नेमक्या याच गोष्टीला घाबरत असतो. आपला चेहरा कसा का असेना बरा, वाईट, सुरूप, कुरूप ज्याचा त्याला तो आवडतो; पण वार्धक्याचे शिलालेख चेहऱ्यावर उमटू लागले की, तो हादरतो आणि वय लपविण्यासाठी त्याची केविलवाणी धडपड सुरू होते.

हे जरी खरे असले, तरी माणसाच्या जीवनाचा अख्खा चित्रपट दर्शविणारे चेहरे म्हणजे वृद्धांचे चेहरे. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुती त्यांचा जीवनपट उलगडत असते. जीवनपटातील प्रत्येक घटनेची, आनंदाची, वेदनेची सुख-दु:खाची ती साक्षीदार असते. तारुण्यातील गोड, टवटवीत देखण्या; पण व्यक्तित्वशून्य चेहऱ्यापेक्षा असे वैशिष्ट्यपूर्ण चेहरे अधिक देखणे दिसतात. कवी, शिल्पकार, थोरविचारवंत, देशभक्त, यांचे वृद्ध चेहरे खरंच त्यांच्या व्यक्तित्वाचे समग्र दर्शन घडवून देतात. त्यामुळे ते अधिक देखणे दिसतात.

इंदिरा गांधी, सिंधूताई सकपाळ, आइन्स्टाईन, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर असे कितीतरी देखणे चेहरे डोळ्यासमोर सहज आठवतात. अर्थात सर्व वृद्धांचे चेहरे असे सुंदर नसतात. काही निर्बुद्ध, अर्थहीन, कोरे करकरीत, जसेच्या तसे राहतात; पण काही अधिक बोलके, जीवनग्रंथांचे खोल दर्शन घडविणारे असतात. खरंच वार्धक्य हे माणसांच्या चेहऱ्याला सुंदर अशी देणगी देत असते. माणसाचे व्यक्तिवैशिष्ट्य त्यात सामावलेले असते. मात्र, ते बघण्याची, जाणण्याची नेमकी नजर मात्र आपल्याकडे असावी लागते.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक