शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

दारू व तंबाखू- बंदीकडून मुक्तीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 06:05 IST

मृत्यू व रोगनिर्मितीच्या सर्वोच्च दहा कारणांपैकी दोन कारणे दारू व तंबाखू आहेत. २१व्या शतकातले ते जणू प्लेग व कॉलऱ्याचे जंतू आहेत. रोगजंतूंचे उच्चाटन करायचे असते, उत्पादन व उत्पन्न नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

ठळक मुद्देदारू व तंबाखूबंदी अयशस्वी होते हा गैरसमज आहे. ती अनेक देशात यशस्वीरीत्या लागू आहे.

- डॉ. अभय बंगचंद्रपूर जिल्ह्यात २०१५ पासून दारूबंदी आहे. या जिल्ह्यात २०१०-२०१५ या काळात स्रियांनी व ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणात दारूबंदीची मागणी केली. आंदोलन केले. जिल्ह्याच्या विविध पक्षांच्या सुजाण राजकीय नेतृत्वाने व देवतळे समितीनेही दारूबंदीची शिफारस केली. शेवटी मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या ठाम राजकीय भूमिकेमुळे जिल्ह्यात २०१५ पासून दारूबंदी लागू झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात आम्ही १९८८ ते १९९३ पाच वर्षे दारूमुक्ती आंदोलन केले. १९९३मध्ये शासनाने दारूबंदी लागू केली. त्यापूर्वी वर्धा जिल्ह्यात विनोबांच्या सूचनेवरून १९७५पासून दारूबंदी आहे. अशा तऱ्हेने हा तीन जिल्ह्याचा सलग दारूबंदी प्रदेश आहे.दारूबंदीबाबत या तीनही जिल्ह्यात दोन प्रश्न उभे झालेले आहेत.1. दारूबंदी यशस्वी झाली की अयशस्वी?2. दारूबंदीनंतर काय?महाराष्ट्रासमोर अजून तिसरा प्रश्न आहे - यवतमाळ, बुलढाणा, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यातही दारूबंदीसाठी आंदोलने होत आहेत. तिथे काय करावे?चौथा प्रश्न आहे- तंबाखूसाठी काय करायचे? राज्य सरकारने दूरदर्शीपणे २०१२ साली सर्व प्रकारच्या सुगंधित तंबाखूवर बंदी आणल्यावरही तंबाखूजन्य पदार्थ-खर्रा, मावा, नस, गुटखा राजरोसपणे व्यापक प्रमाणात रस्त्या-रस्त्यावर विकले जात आहेत. त्यांना कसे बंद करावे?दारू व तंबाखू हे नवे कॉलरा-प्लेगभारतामध्ये असंक्र मक रोगांचा महापूर आला आहे. वाढते आयुर्मान व बदलती जीवनशैली यामुळे हे रोग आणखी वाढणार आहेत. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लकवा व कॅन्सर हे सर्व रोग यात येतात. ‘ग्लोबल बर्डन आॅफ डिसीज’ या सार्वजनिक आरोग्याच्या आजवरच्या सर्वात विराट अभ्यासानुसार मृत्यू व रोगनिर्मितीच्या सर्वोच्च दहा कारणांपैकी दोन कारणे दारू व तंबाखू आहेत. आधुनिक वैद्यकशास्रानुसार ते जणू २१व्या शतकातले प्लेग व कॉलऱ्याचे जंतू आहेत. रोगजंतूंचे उच्चाटन करायचे असते, उत्पादन व उत्पन्न नाही.शासनासमोर वास्तववादी द्विधा आहे असं सांगितलं जातं. अनेकांना असे वाटते की दारू हा पदार्थ घातक आहे त्यावर बंदी यावी. पण शासनासमोर दोन प्रश्न उभे राहतात. एक, दारूपासून मिळणाºया प्रचंड उत्पन्नाला गमवून शासकीय बजेट जुळवायचे कसे? दुसरा प्रश्न, बंदी यशस्वी कशी करावी? बंदीनंतर त्या जागी बेकायदेशीर विक्र ी येणार असेल तर उपयोग काय?गुजरात हे आर्थिक भरभराट असलेले राज्य मानले जाते. तिथे गेली सत्तर वर्षे दारूबंदी आहे. दारूच्या उत्पन्नाशिवाय राज्य चालविता येते, विकास करता येतो याचे प्रत्यक्ष उदाहरण गुजरात राज्य आहे.पण दुसरा प्रश्न अनुत्तरित आहे- दारू व तंबाखूबंदी यशस्वीरीत्या अंमलात कशी आणायची? ती अयशस्वी होते हा वस्तुत: गैरसमज आहे. ती अनेक देशात यशस्वीरीत्या लागू आहे. शून्य दारू हे कधीच शक्य नसते. तसे होण्याचे स्वप्न जरूर असावे; पण व्यावहारिक ध्येय व लक्ष्यांक हे उत्तरोत्तर दारू कमी करणे असे असावे. जिल्ह्यात थोडीही दारू असली म्हणजे दारूबंदी अयशस्वी झाली असं वाटणं हा विचारदोष आहे. दारू किती उरली यापेक्षा दारूबंदीमुळे ती किती कमी झाली या तºहेने मोजायची असते. यासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा अनुभव बोलका आहे.चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा परिणामदारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात बेकायदेशीर दारू भरमसाठ वाढली, दारू पूर्वीपेक्षा जास्त झाली, असे न मोजताच म्हणण्यात येते. दारूबंदी लागू होण्याच्या एक महिना अगोदर व दारूबंदी झाल्यानंतर एक वर्षाने आमच्या ‘सर्च’ संस्थेने गोंडवन विद्यापीठाच्या सहकार्याने जिल्ह्याची दोन रॅन्डम सॅम्पल सर्वेक्षणे केलीत. त्याद्वारे दारूबंदीमुळे एका वर्षात किती फरक पडला हे आम्ही मोजलं. काय आढळलं?* पुरुषांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून २७ टक्क्यांवर आले. म्हणजे ८०.००० पुरुषांनी दारू पिणे थांबवले.* दारू मिळण्याचे अंतर ३ किमीवरून ८.५ किमी झाले.* दारू विकत घेण्यावर जिल्ह्याचा खर्च ८६ कोटी रुपयांनी कमी झाला. दारू महाग झाल्यानंतरदेखील एकूण खर्च कमी झाला.* निष्कर्ष असा निघतो की, चंद्रपूर जिल्ह्यातली दारूबंदी अयशस्वी नाही, आंशिक यशस्वी झाली. ८६ कोटी रुपये सरळ लोकांच्या खिशात वाचले. दारूबंदी म्हणजे डायरेक्ट कॅश ट्रान्सफर योजना आहे. शिवाय दारू कमी झाल्याने इतर फायदे झाले ते वेगळेच.गडचिरोली जिल्ह्यात ‘मुक्तिपथ’ प्रयोगगडचिरोली जिल्ह्यात २०१६पासून ‘मुक्तिपथ’ नावाचा एक प्रयोग सुरू आहे. या प्रयोगातून अनेक प्रश्नांची संभाव्य उत्तरे मिळू शकतात.समस्या : गडचिरोली जिल्ह्यात १९९३पासून दारूबंदी व महाराष्ट्रात तंबाखूबंदी असूनही २०१५ व २०१६मध्ये जिल्ह्यातली उर्वरित समस्या मोठी होती. ४१ टक्के पुरुष दारू पीत होते, ४४ टक्के लोक तंबाखू सेवन करत होते. जिल्ह्यात ८००० जागी खर्रा विक्र ी होत होती. लोक दारू खरेदीवर ८० कोटी व तंबाखू खरेदीवर २९८ कोटी असे एकूण ३७८ कोटी रु. वार्षिक खर्च करत होते. बंदी नसती तर तो याहूनही जास्त राहिला असता.पद्धत : सर्च संस्थेने आखलेला व मा. मुख्यमंत्र्यांनी स्वीकार केलेला नवा जिल्हाव्यापी प्रयोग ‘मुक्तिपथ’ २०१६ मध्ये महाराष्ट्र शासन, सर्च, टाटा ट्रस्ट आणि जिल्ह्यातली जनता यांच्या संयुक्त सहकार्याने सुरू झाला.जिल्हा पातळीपासून गाव पातळीपर्यंत १८०० समित्या व संघटना निर्माण करण्यात आल्या. या कार्यक्र माच्या अंमलबजावणीसाठी सर्चच्या अंतर्गत ‘मुक्तिपथ’ संघटना सुरू करण्यात आली, जिचे ४० पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत.जिल्हाभरात चार कलमी कार्यक्रम अमलात आणला1. व्यापक जनजागृती2. गावागावात सामूहिक निर्णय व अहिंसक कृतीद्वारे गावाची दारू व तंबाखूमुक्ती3. शासकीय विभागांद्वारे बंदीची अधिक सक्रिय अंमलबजावणी4. व्यसनींसाठी व्यसनमुक्ती उपचारपरिणाम :वार्षिक सर्वेक्षणांद्वारे याचे फलित आम्ही काटेकोरपणे मोजले. दोन वर्षे कार्यक्र मानंतर आढळलेले परिणाम असे -* जिल्ह्यातील १५०० गावांपैकी ५८३ (३९ टक्के) गावांनी गावातली दारू पूर्णपणे बंद केली. २८७ गावांनी तंबाखू विक्री बंद केली.* दारू पिणाऱ्या पुरुषांचे प्रमाणे २९ टक्क्यांनी कमी झाले. म्हणजे ४८००० पुरुषांनी दारू पिणे थांबवले.* दारूचे दुष्परिणाम ४५ टक्केनी कमी झाले.* तंबाखू सेवन करणारे २१ टक्केनी म्हणजे ९७०००नी कमी झाले.* तंबाखूचा वापर कमी होण्याची वार्षिक गती पाच पटींनी वाढली.* दारूवरील लोकांचा वार्षिक खर्च ३६ कोटींनी, तंबाखूवरील ५५ कोटींनी कमी झाला. म्हणजे मुक्तिपथमुळे एकूण वार्षिक ९१ कोटींची बचत झाली.* प्रकल्पाचा वार्षिक खर्च दोन कोटी रुपये होता. दोन कोटी खर्च व ९१ कोटी बचत देणारी ही विलक्षण उपाययोजना आहे.हे सर्व फलित २०१५-१८ या काळातले, म्हणजे अनेक वर्षांपूर्वी दारूबंदी व तंबाखूबंदी लागून आधीच झालेल्या फायद्याव्यतिरिक्त, मुक्तिपथच्या चार कलमी कार्यक्र माचे अतिरिक्त परिणाम आहेत. चंद्रपूरमध्ये आढळलेला दारूबंदीचा तत्काळ फायदा गडचिरोलीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात (५८ कोटी रु.) यात जोडला की दारूबंदी + मुक्तिपथ यांचे एकूण फलित कळते.म्हणजे दारूबंदीमुळे ५८ कोटी व मुक्तिपथमुळे ९१ कोटी मिळून १४९ कोटींची वार्षिक बचत झाली.शासकीय दारूबंदी व तंबाखूबंदी, व्यक्तीची व्यसनमुक्ती, गावाची दारू मुक्ती व तंबाखूमुक्ती आणि जिल्ह्यात मुक्तिपथ मार्गाने क्र मश: प्रगती असा एकूण चार पदरी मार्ग आता आपल्याला उपलब्ध आहे.(चंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्य व्यसनमुक्ती साहित्य संमेलनातील डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित सारांश.)