शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

प्रयोगशील ‘अभि’रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 10:30 IST

गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या अंबाबाईच्या देवळाच्या पायऱ्यावर तीन मुली आणि चार मुलांना घेऊन गोविंद पांडुरंग पातकर गुरुजींनी सुरू केलेल्या या, ’अभि’ शाळेने आता भव्य स्वरूप तर प्राप्त केले आहेच, पण तिने इतक्या वर्षांत शाळा म्हणजे पुस्तकी शिक्षण देणारी चारभिंतींआडची संस्था नव्हे हे सिद्ध केले आहे.

मुंबईच्या गोरेगाव या उपनगरात १९४२ साली अ. भि. गोरेगावकर इंग्लिश शाळा सुरू झाली. २०२१ साली ती शाळा ७९व्या वर्षांत आहे. गोरेगाव पश्चिमेला असणाऱ्या अंबाबाईच्या देवळाच्या पायऱ्यावर तीन मुली आणि चार मुलांना घेऊन गोविंद पांडुरंग पातकर गुरुजींनी सुरू केलेल्या या, ’अभि’ शाळेने आता भव्य स्वरूप तर प्राप्त केले आहेच, पण तिने इतक्या वर्षांत शाळा म्हणजे पुस्तकी शिक्षण देणारी चारभिंतींआडची संस्था नव्हे हे सिद्ध केले आहे. मी ५२ वर्षांपूर्वी पुण्याच्या प्रख्यात नूतन मराठी प्रशालेत शिकलो आणि असा अभिमान बाळगला की नूमवि ही एकमेव उत्तम शाळा आहे. त्यावेळचे शिक्षण निरीक्षक व प्रसिद्ध साहित्यिक वि. द. घाटे यांनी असे म्हटले होते की, आम्ही नूमवित नवीन काय झाले ते पाहायला आणि शिकायला येतो व तसे इतर शाळांनी करावे असे त्यांना सांगतो. पण आज अभिची प्रगती वाचताना असे जाणवले की तिने नूमविला नक्कीच मागे टाकले आहे. या शाळेची ७५ वर्षांपर्यंतची कामगिरी २५०-३०० पानांच्या दोन खंडात ही शाळा चालविणाऱ्या ‘दि शिक्षण मंडळ, गोरेगाव’ या संस्थेने ग्रथित केली आहे. यातल्या वेगवेगळ्या पैलूंची माहिती ते ते विभाग चालविणाऱ्या लोकांनी शब्दबद्ध केले आहेत.शाळेतली बालवर्गापासून दहावीपर्यंतची १२ वर्षे ही संपूर्ण जीवनाची पायाभरणी करणारी वर्षे असल्याने ती आयुष्याची बेगमी ठरण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शिकवणारी शाळा हवी, नव्हे तर ती तशी असायला हवी. मग त्यात वर्गात धडे शिकवले जायला हवेत, ती स्थानिक भाषेच्या माध्यमातून दहावीपर्यंत शिकवणारी शाळा असायला हवी, त्याचबरोबर त्यांचे इंग्रजीही बोलणे, लिहिणे याबाबतीत पूर्ण तयारी करून घेणारी असायला हवी, त्यामुळे पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जाण्याचा ओघ खुंटेल. खेळांचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळायला हवे.समाजात ज्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा होतात त्यांची तयारी करून घ्यायला हवी. सातवी- आठवीत मुले-मुली वयात येतात, तेव्हा त्याबद्दलचे शिक्षण, समुपदेशन, जशी हुशार मुलांची वेगळी तयारी करून घेतात, तशी ढ मुलांची वेगळी तयारी करून घेण्याची सोय, जर दिव्यांग मुले असतील, तर त्यांच्यासाठी वेगळी सोय हवी. सांघिक गीतगायन, समारंभाच्या वेळी ओळख करून द्यायला, आभार मानायला, ध्वनिवर्धक लावायला नववी-दहावीतल्या मुलांची मदत घेतली पाहिजे. शिक्षण खात्याच्या सूचनांची अंमलबजावणी वेळच्या वेळी करावी लागते, अंदाजपत्रक बनवणे, खर्चावर देखरेख ठेवणे, शाळा आधुनिक ठेवणे अशा एक ना अनेक गोष्टी करत राहाव्या लागतात आणि त्या सर्व गोष्टीत ‘अभि’ पुरी पडलेली दिसते. काही ठिकाणी असलेले त्यांचे अपयशही त्यांनी न लपवता या पुस्तकांतून वाचकांपुढे व्यवस्थितपणे मांडले आहे. कारण कुठल्याही संस्थेत कायम यश मिळत नसते. किंबहुना चुका झाल्या तरच शिकण्याची संधी असते आणि यासाठी शिक्षण संस्था चालवणाऱ्या मंडळाला निस्वार्थी भावनेने काम करणारी माणसे सतत मिळवत राहावी लागतात, त्यातही ही शाळा यशस्वी ठरलेली दिसते.- अ. पां. देशपांडे  पुस्तकाचे नावशिकणारी शाळा ‘अभि’रंगप्रकाशनग्रंथाली प्रकाशनपृष्ठे : ३०४मूल्य : रु. ३५०/-

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण