शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
4
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
5
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
6
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
7
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

ड्रग्ज... बॉलिवूडवाल्यांचं ‘ड्रग कनेक्शन’ इतकं तगडं कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 6:06 AM

ड्रग आणि सेलिब्रिटी हे नातं नवं नाही. वाट्टेल ती किंमत चुकवत ड्रग खरेदी करणारे सेलिब्रिटी आणि इतरांच्याही हातात  विविध देशांच्या सीमा ओलांडत येणारे ड्रग  पडतात तरी कसे, हा चक्रावून टाकणारा प्रश्न आहे.  हे ड्रग त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी  सक्रिय असलेली आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांची यंत्रणा  मोडून काढणं ही आजची आंतरराष्ट्रीय समस्या आहे.  

ठळक मुद्देड्रगसेवन कुणाकडूनही होणं अनिष्टच, पण सेलिब्रिटींकडून होणार्‍या सेवनामुळे समाजात या व्यसनाला प्रतिष्ठा मिळत असल्याने त्याबाबत अधिक चर्चा होताना दिसते. 

 

ड्रग्ज... बॉलिवूडवाल्यांचं ‘ड्रग कनेक्शन’ इतकं तगडं कसं?

- रवींद्र राऊळ

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासातून उघडकीस आलेलं ड्रग कनेक्शन आणि पाठोपाठ कन्नड अभिनेत्री राधिका द्विवेदी हिला बंगळुरू येथे ड्रग रॅकेटप्रकरणी झालेल्या अटकेच्या घटनांनी सेलिब्रिटींचा ड्रगशी कसा रिश्ता आहे यावर झगझगीत प्रकाश टाकला आहे. वाट्टेल ती किंमत चुकवत ड्रग खरेदी करणारे सेलिब्रिटी आणि इतरांच्याही हातात वेगवेगळ्य़ा देशांच्या सीमा ओलांडत येणारे ड्रग पडतात तरी कसे, हा चक्रावून टाकणारा प्रo्न आहे. ड्रगच्या देशाटनाचा हा प्रकार नियोजनपुर्वक चालणार्‍या संघटित गुन्हेगारीचं एक सर्वात मोठं उदाहरण आहे. कमालीची असुरक्षितता, असह्य ताणामुळे बेगडी दुनियेत वावरणारे बॉलिवुडमधील सेलिब्रिटी ड्रगसेवनाच्या आहारी जातात. हे ड्रग त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी सक्रीय असलेली आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांची अभेद्य यंत्रणा मोडून काढणं ही आजची आंतरराष्ट्रीय समस्या झाली आहे. 1980 च्या दशकात ड्रगसेवनाची समस्या सर्वच देशांना सतावू लागल्यानंतर डिसेंबर 1987 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची एक परिषद भरवण्यात आली. अमलीपदार्थांच्या व्यापार आणि सेवनाला आळा बसावा म्हणून 26 जून हा जागतिक अमलीपदार्थ वापर आणि तस्करीविरोधी दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. पण इतकी वर्षे उलटूनही ही समस्या अक्राळविक्राळ स्वरूप घेतच चालली आहे. ड्रग आणि सेलिब्रिटी हे नातं नवं नाही. अभिनेता फरदिन खान याला ड्रग विकत घेतानाच अटक झाली होती तर अभिनेत्री ममता कुलकर्णी हीसुद्धा अशा प्रकरणात आरोपी आहे. ड्रगसेवन कुणाकडूनही होणं अनिष्टच, पण सेलिब्रिटींकडून होणार्‍या सेवनामुळे समाजात या व्यसनाला प्रतिष्ठा मिळत असल्याने त्याबाबत अधिक चर्चा होताना दिसते. मेंदू सुन्न करणार्‍या, सारासार विचार करण्याची क्षमता हिरावून घेणार्‍या आणि वागण्याबोलण्यावर परिणाम करणार्‍या या अमली पदार्थांची चटक एकदा लागली की हे व्यसन कायमचं जडतं. काही केल्या ही झिंग उतरत नाही. मग कुठलंही निमित्त काढून पब, हॉटेल, रिसॉर्टवर पाटर्य़ांचं आयोजन होतं. कानठळ्य़ा बसवणारं म्युझिक, लाईट अँरेंजमेंट असा मदहोश करणार्‍या माहौलमध्ये ड्रगचा हंगामा सुरू होतो. देशांच्या सीमा बंदिस्त असताना, विमानतळ आणि बंदरांमध्ये कसून तपासणी होत असतानाही हे ड्रग देशात येतं कसं आणि ज्याला हवं त्या व्यक्तीच्या हातात ते पडतं कसं याचं नेटवर्क अवाक करणारं आहे.  अफगाणिस्तान, पाकिस्तानापासून थेट ब्रुसेल्ज, बेल्जियम, अमेरिका, कॅनडा यासारख्या अनेक देशांच्या सीमा ओलांडून विविध स्वरूपातील ड्रग भारतात येत असतं. यात मेरीजुना, मँड्रेक्स, कोकेन, ब्राऊन शुगर, हेरॉईन, हशीश, चरसपासून एक्स्टॅसी, मेथाफेटाईन, अँम्फेटॅमाईन, मेफेड्रोन अशा पार्टी ड्रगपर्यंतच्या विविध ड्रगचा समावेश असतो. केमिकल स्ट्ररनुसार नावं वेगवेगळी असली तरी ते सारे अमलीपदार्थच. ड्रग तस्करांकडून हे ड्रग भारतात आणण्याचे शेकडो मार्ग हुडकून काढले जातात. गेल्याच महिन्यात जेएनपीटी बंदरात कार्गो कंटेनरमधून आलेल्या बांबूच्या तुकड्यांबद्दल महसुल गुप्तवार्ता संचालनालय आणि सीमा शुल्क अधिकार्‍यांना संशय आला. त्यांनी बारकाईने निरखून पाहिलं असता ते बांबूचे तुकडेसदृश्य प्लॅस्टीकची नळकांडी असल्याचं आढळलं. त्याच्या पोकळीत पावडर भरलेली होती. त्यांनी संबंधितांना विचारणा केली असता ती आयुर्वेदिक पावडर असून ती सौंदर्यप्रसाधनासाठी वापरला जात असल्याचा दावा करण्यात आला. पण अधिकार्‍यांनी ती पावडर तपासली आणि एक हजार कोटींच्या हेरॉईनचं प्रकरण उघडकीस आलं.कधी चिनीमातीच्या फुलदाणीतून, कधी कॅमेर्‍यात दडवून तर कधी शस्त्रक्रियेद्वारे पोटात हे ड्रग भरून संबंधित अधिकार्‍यांच्या डोळ्य़ात धूळफेक करण्याचा प्रयत्न होतो. कधी तस्करांचे प्रयत्न यशस्वी होतात तर कधी पकडले जातात. विमानतळ आणि बंदरांवर अशा घटना घडतच असतात. याशिवाय जम्मू काश्मिर, राजस्थान, गुजरात, पंजाब आणि नेपाळमार्गे भारताच्या सीमा ओलांडून पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ड्रगच्या कन्साईनमेंट भारतात पाठवत असतात. याशिवाय भारतातही काही फॅक्टरींमधून मेफेड्रोन ड्रग तयार केलं जातं. गेल्या काही वर्षांत भिवंडी, पुणे, सोलापूर येथील फॅक्टरींवर छापे घालून मेफेड्रोन तयार करणारे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले. बड नावाने ओळखलं जाणारं ड्रग एक ग्रॅमला पाच हजार रूपये या भावाने विकलं जातं. कोकेनचीही साधारण तितकीच किंमत. यावरून देशभर होणार्‍या ड्रगच्या उलाढालीची कल्पना यावी. या भरमसाठ किमतीमागचं कारणही तसंच आहे. भारतातील बडे तस्कर विदेशातील ड्रगविक्रेत्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून ड्रग खरेदी करतात. हवालाद्वारे त्याची किंमत चुकवली जाते. खरेदी केलेलं ड्रग भारतात पोहोचवण्याची कामगिरी एखाद्या टोळीवर सोपवली जाते. वेगवेगळ्य़ा वाहतूकमार्गाने मजल दरमजल करत ती टोळी ते ड्रग भारतात पोहचवते आणि तस्करांच्या हवाली करते. माफिया टोळ्याच अशा जबाबदार्‍या घेत असतात. एकदा का ते ड्रग हाती आलं की खरेदीदारांचा शोध घेऊन ते त्यांच्यापर्यंत पोहवण्यासाठी एक मोठी साखळीच जय्यत तयार असते. प्रत्येक शहरात बडे ड्रगविक्रेते मौजूद असतात. ते या तस्करांकडून रोखीने ड्रग विकत घेतात आणि भागाभागातील पेडलरपर्यंत पोहचवतात. हे पेडलर थेट ग्राहकांच्या संपर्कात असतात. पार्टी, पब, रिसॉर्ट येथील तरूण ग्राहकांवर यांनी नजर. यातही दोन - चार स्तर असतात. बेकायदेशीरपणे भारतात वास्तव्य करून असलेले नायजेरीन नागरिकही ड्रग पेडलिंगमध्ये आघाडीवर आहेत. अगदी महिलाही यात मागे नाहीत. ड्रगक्वीन म्हणून ओळखल्या जाणार्‍या शशिकला उर्फ बेबी पाटकर हिच्यावर चरस बाळगल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अगदी उच्चभ्रु वर्गातले शिक्षित तरूणही या रॅकेटमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतले असून त्यांच्याकडून मोबाईल, नेट, वेगवेगळे अँप आणि चॅटग्रुप अशा आधुनिक संपर्कयंत्रणा आणि साधनांचा वापर करीत हा धंदा शहरांपासून अगदी गावपातळीपर्यंत पोहचवला जातो. त्यासाठी रितसर रेव्ह पाटर्य़ांंचंही आयोजन करून नवा ग्राहकवर्गही तयार केला जातो.ऑक्टोपससारखा हा ड्रगचा विळखा तरूणवर्गाभोवती पडत असताना तपासयंत्रणा मात्र कमालीच्या हतबल झाल्याचं चित्र आहे. 

ravirawool@gmail.com(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपवृत्त संपादक आहेत.)