धुळवड
By Admin | Updated: April 12, 2015 18:22 IST2015-04-12T18:22:15+5:302015-04-12T18:22:15+5:30
वाहनांचा वेग मंदावतो, जमिनीवर उतरू पाहणारी विमाने भरकटतात, माणसांना समोरचे काही दिसेनासे होते, रस्त्यावरून चालणोही अवघड होते. जमिनीवरच्या धुळीत हा राक्षसी जोर कसा भरला जातो?

धुळवड
हेमंत देसाई
एक साधी वावटळ बघता बघता एका महाप्रचंड, घोंघावत जाणा:या चक्रीवादळात रूपांतरित होते, आणि सर्वत्र धुळीचे लोटच्या लोट उठतात. हवेतील कणाकणात वाळू आणि माती उधळली जाते.
वाहनांचा वेग मंदावतो, जमिनीवर उतरू पाहणारी विमाने भरकटतात, माणसांना समोरचे काही दिसेनासे होते, रस्त्यावरून चालणोही अवघड होते. जमिनीवरच्या धुळीत हा राक्षसी जोर कसा भरला जातो?
--------
बरोबर 53 वर्षांपूर्वी म्हणजे 1962 साली ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ नावाचा चित्रपट आला होता. त्याच्या सुरुवातीलाच वादळाचे दृश्य पाहायला मिळते. या चित्रपटाचा दिग्दर्शक डेव्हिड लीन वाळवंटात भुताप्रमाणो येणा:या धूलिवादळांमुळे मंत्रमुग्ध होऊन गेला होता. ‘दे आर क्र ॉसिंग द सी अँड आर आउट इन धिस वल्र्ड इफेक्ट टू अ स्टॅगरिंग लँडस्केप’, असे उद्गार त्याने काढले होते. समुद्राकडून वाळवंटाच्या दिशेने वळणारे वादळ.. एक साधी वावटळ एका महाप्रचंड, घोंघावत जाणा:या चक्रीवादळात रूपांतरित होणो, हे लॉरेन्सच्या व्यक्तिरेखेच्या व चित्रपटाच्या व्यापक पटाच्या रचनेसंदर्भातही प्रतीकात्मक आहे, असे लीनला सार्थपणो वाटले.
नुकतेच आखाती देशांत अकस्मात धुळीच्या वादळाचे संकट उसळले आणि त्याचा तडाखा म्हणून गोवा असो की मुंबई; तेथे हवेतील कणाकणात वाळू उधळली गेली. दुबईतील वादळाने तेथील जनजीवन विस्कळीत केले. तिथल्या वातावरणात पसरलेले कण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणा:या वा:यांमुळे मुंबईसह कोकणपट्टीलगत व गुजरातच्या किनारपट्टीलगत वाहत आले आणि मग मुंबई, ठाणो, वाशी, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि पार पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वातावरणात वाळूच्या कणांचा दाट स्तर जमा झाला. दिवसाउजेडी अंधुक-अंधुक वाटू लागले. पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्ग किंवा मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावर धावणा:या वाहनांचा वेग मंदावला.
वादळी पाऊस व गारपिटीनंतर विदर्भाला धुळीच्या वादळास तोंड द्यावे लागले. आसाम व छत्तीसगडमध्ये द्रोणीय स्थिती निर्माण झाली नि ती विदर्भाच्या दिशेने सरकू लागली. धुळीच्या वादळात जमिनीवरील धूळ आणि वाळू वातावरणात वर उसळून ताशी शंभर कि.मी. पेक्षा जास्त वेगाने वाहू लागते. नुकतीच सौदी अरेबियात वावटळ आली, तेव्हा तिथले एक मोठे शहर भोवंडून गेले. अगणित कार्स, ट्रक्स, टेम्पो, बसेस इ. त्यात सापडले. घराघरांतील वस्तूंवर वाळू आणि मातीचा थर बसला. मुंबई, पुणो, नाशिक, नगर व इतरत्र आभाळ धुळीत हरवले. हवेतल्या धूलिकणांमुळे दाट धुके पसरल्यासारखे वाटत होते. विमानांचे व बस-कारचे चालक अशा दोघांनाही त्याचा त्रस झाला. आखाती देशांतील वादळी वारे अरबी समुद्र ओलांडून आले. पण पूर्वीही, अगदी दोन वर्षांपूर्वीदेखील असे घडल्याचे स्मरते. अर्थात हवामानतज्ज्ञांच्या मते, या धुळवडीचा स्थानिक हवामानावर काहीएक परिणाम होणार नाही.
उष्ण कटीबंधीय प्रदेशांत ही वादळे दुपारी वा संध्याकाळी होतात. समशीतोष्ण कटिबंधात ती शीत सीमापृष्ठाजवळ (म्हणजे शुष्क हवा विभक्त करणा:या पृष्ठाजवळ) होतात. कधीकधी वादळात पावसाऐवजी गारा पडतात. धुळीचे वादळ गडगडाटी वादळासारखेच असते. यात हवा बरीच कोरडी असल्यामुळे पाऊस किंवा गारा पडत नाहीत. पण धूळ मात्र बरीच उंच उधळली जाते आणि दृश्यमानता फारच कमी होते.
घूर्णघाती वादळ हे वावटळीसारखे असून, त्यात हवेची गती चक्राकार असते. ढगातून एक सोंडेसारखा भाग खाली आलेला असतो. कधीकधी सोंड भूपृष्ठापर्यंत पोहोचते. ती तीव्र गतीने फिरणा:या भोव:यासारखी असते. वादळाच्या केंद्राजवळ हवेचा दाब बराच कमी असतो व हवेची उदग्र गती अतितीव्र असते. त्यामुळे अशा वादळाच्या सपाटय़ात सापडलेली घरांची छपरे, माणसे, गुरेढोरे वर फेकली जातात. या वादळाची रु ंदी 2क्क् ते 4क्क् व उंची सरासरी 4क्क् मीटर असते. वादळाची गती 3क्क् ते 5क्क् कि.मी./तास असू शकते. अमेरिकेच्या मध्य भागात उन्हाळ्यात अशी वादळे होतात.
उष्ण कटिबंधीय चक्र ीवादळही असते. कमी दाबाची तीव्रता एका विशिष्ट मर्यादेपलीकडे पोहोचते. तीव्र चक्रीवादळात वा:याची गती 48 नॉट वा 88 कि.मी./तास वा जास्त असू शकते.
जलशुंडा म्हणजे सागरावर होणारा आविष्कार. हा घूर्णवाती वादळासारखा असून, त्यात तुषारांचा स्तंभ 6 ते 1क् मीटर ते 5क्-6क् मीटर व्यासापर्यंत असतो. जलशुंडेचा कालावधी 1क् ते 3क् मिनिटे असतो.
यावेळी 2 एप्रिलच्या सुमारास आखाती पट्टय़ात धुळीचे वादळ आले, तेव्हा समोरचे काही दिसत नव्हते. त्यामुळे शे-दीडशे अपघात झाले. दुबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्येच 16क्क् कॉल्स आले. विमाने खोळंबली. रियाध, दम्मम, कासित, हाफ्र-अल-बातिन, दोहा अशी सर्वत्र हवाई दिरंगाई दिसली. दुबईतल्या काही परिचितांनी सांगितले की, वादळामुळे दिवसभर धूळ हवेतच तरंगत होती. रस्त्यावर पार्क केलेल्या गाडय़ांवर धुळीचे आवरण पसरले होते. बांधकामावरच्या मजुरांनी सजिर्कल मास्क घातले, काहींनी तोंडावर स्कार्फ गुंडाळले. कॅफेजची बाहेरची टेबल्स आत गेली.
अमिरातीचा सदरलेखक आणि प्रेरक व्याख्याता खलीद अल-अमिरी याने ट्विट केले आहे ते असे : ‘अमेरिकेत भारी हिमवर्षावाचे दिवस असतात. त्यावेळी कंपन्या व शाळा बंद ठेवल्या जातात. माझा प्रश्न असा आहे की, आपण इथे धुळीच्या वादळाच्या दिवशी असेच काही करणार आहोत का?’ - आणि कतारमधील शाळा बंद ठेवण्यात आल्यादेखील!
इराक आणि प्रशियाच्या आखाती प्रदेशात (कुवेत व सौदी अरेबियासह) दिवसा जोरदार वायव्य वारा वाहतो व रात्री त्याचा वेग घटतो. बहुधा उन्हाळ्यात असे घडते व कधीकधी हिवाळ्यातही. या वा:यामुळे प्रचंड धूलिवादळे निर्माण होतात व त्याची झळ इराकसारख्या देशांना बसते. ही धूळ जॉर्डन व सीरियामधून वाहत येते. या वादळास तेथे ‘शमल’ असे संबोधतात. तुर्कस्तान व इराकच्या पर्वतांमध्ये ईशान्येस आणि सौदी अरेबियाच्या सपाट भूमीवरून नैऋत्य दिशेस इराणच्या आखातात जोरदार वादळ निर्माण होते. इराकमध्ये तर वर्षात 2क् ते 5क् दिवस ‘शमल’मय असतात..
लोककथा अशी आहे की, पहिले शमल आले हजारो वर्षांपूर्वी 25 मे रोजी. त्याला अल हफर किंवा ‘ड्रिलर’ असे संबोधतात. त्याचे वारे वाळवंटातल्या वाळूची प्रचंड घुसळण करतात. वारे खोलवर शिरून वाळू वर येते. जूनच्या आरंभी येणा:या वादळास ‘बारीह थोरय्या’ असे म्हणतात. दहा-बारा दिवसांपूर्वी आलेल्या धूलिवादळात अगदी जवळचे दिसू शकत नव्हते. खवळलेला समुद्र आणि भन्नाट वारे यामुळे आखातातले लोक चक्रावून गेले होते. या पाश्र्वभूमीवर कौन्सिल ऑफ अरब लीगने अमिरातीच्या नॅशनल सेंटर फॉर मेटिरिऑलॉजी अँड सेसिमॉलॉजीचे प्रभारी संचालक अब्दुल्ला अल मांडूस यांची हवामानविषयक समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. या समितीत 19 अरब लीग देशांच्या हवामान सेवांचे प्रमुख आहेत, तसेच वल्र्ड मेटिरिऑलॉजिकल ऑर्गनायङोशनचे प्रतिनिधीही. हवामानविषयक संस्था उभारणी, परस्पर सहकार्यात अरब लीग मोठी गुंतवणूक करत असते. भारत हे करत नाही.
वादळ/वावटळ/चक्रीवादळ ही नैसर्गिक संकटे आहेत. पण आपण त्यात भर टाकतो, ती मानवनिर्मित प्रदूषण संकटाची. या पाश्र्वभूमीवर देशातील दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनौ, वाराणसी, फरिदाबाद, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नई या दहा शहरांत नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्सचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आला आहे. नंतरच्या टप्प्यात दहा लाख लोकवस्तीच्या सर्व शहरांचा असा निर्देशांक काढण्यात येणार आहे. त्यानुसार हवेतील सहा प्रदूषकांची त्या-त्या वेळची, म्हणजे ताजी माहिती उपलब्ध होईल.
देशातील बहुतेक शहरांत एअर मॉनिटरिंग स्टेशन्स नाहीत. त्यामुळे प्रदूषणाच्या प्रमाणाचा पत्ताच लागत नाही. हवेतील पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) मध्ये प्रमाणाबाहेर वाढ झाल्यास त्याचा माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मुलांची फुफ्फुसे निकामी होऊ शकतात. तुमचे आयुष्यच कमी होते. जगात कुठेही होत नाहीत, इतके मृत्यू भारतात श्वसनसंस्थेच्या आजारामुळे होतात. समजा जास्त मॉनिटरिंग स्टेशन्स स्थापली गेली, तर अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे लोक त्या आधारे सत्ताधा:यांवर दडपण आणू शकतील.
आपल्याकडे कॉर्पोरेट लॉब्या सरकारला हव्या तशा वाकवतात. मात्र पादचारी, प्रवासी, नागरिक, ग्राहक यांच्या समर्थ संघटना नाहीत. त्यांची एक साखळी नाही.
‘हवाओं पे लिख दो
हवाओं के नाम..’
हे गाणो आपण म्हणतो. पण या हवेवर धुळीची व धुराची अक्षरे लिहिणारे नामानिराळेच राहतात!
नेमके घडते काय?
मुळात अतिउंच वाढलेल्या गर्ज-मेघांमुळे (क्युमुलोनिंबस ढगामुळे) गडगडाटी वादळ निर्माण होते. वातावरणात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे हवेस उभ्या दिशेत गती प्राप्त होते. मग हवा भूपृष्ठभागावरून वर जाते. त्यामुळे क्युमुलस किंवा राशिमेघ हे घनदाट ढग निर्माण होऊन, त्यांची उंची वाढत जाते व त्यांचे रूपांतर गर्ज-मेघांत होते. विजा चमकणो, गडगडाट, जोरदार वृष्टी, गारांचा पाऊस इत्यादी आविष्कार या वादळात निर्माण होतात. तसेच वर गेलेली आणि थंड झालेली हवा जोराने एकाएकी खाली येऊन चंडवात (अल्पावधीत एकाएकी जोरावून नंतरच्या कित्येक मिनिटांत मंद होत जाणारा वारा) निर्माण होतो. गडगडाटी वादळाचे क्षेत्र सुमारे पंधरा चौरस कि.मी. एवढे असते व कालावधी अध्र्या-एक तासाचा असतो. पण कधीकधी एका वादळापासून जवळपास दुसरी वादळे निर्माण होऊन गडगडाटी वादळ दोन-तीन तास चालू राहते.
(लेखक अर्थशास्त्रचे अभ्यासक
आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत )