मोजा तुमच्या परसातले पक्षी
By Admin | Updated: February 15, 2015 03:20 IST2015-02-15T03:20:50+5:302015-02-15T03:20:50+5:30
जनसहभागातून निसर्ग संवर्धन करण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून उद्या दि. 16 फेब्रुवारी रोजी जगभरात पक्षिगणना होणार आहे.

मोजा तुमच्या परसातले पक्षी
>‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट’ (जीबीबीसी) असे या उपक्रमाचे नाव असून,
भारतातील पक्षिगणनेत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा
सक्रिय सहभाग आहे.
त्यानिमित्त पक्ष्यांच्या या अद्भुतरम्य जगाची ही हवाई सफर.
काय आहे
‘ग्रेट बॅकयार्ड
बर्ड काऊंट?
‘कॉर्नेल लॅब ऑफ ऑर्निथोलॉजी’ (उ1ल्ली’’ छुं ा ड1ल्ल्र3ँ’ॅ8) आणि ‘नॅशनल ऑडूबोन सोसायटी (ठं3्रल्लं’ अ44िुल्ल र्रूी38) या अमेरिकेतील जगप्रसिद्ध संस्थांतर्फे दरवर्षी जगभरात पक्षिगणनेचा ‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट’ हा उपक्रम राबवला जातो. या वर्षी हा उपक्रम 13 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, 16 फेब्रुवारीर्पयत तो चालणार आहे. या उपक्रमाचं वैशिष्टय़ म्हणजे कोणत्याही वयाच्या अगदी नवशिक्यापासून ते तज्ज्ञांर्पयत, शिवाय जगभरात कोणत्याही ठिकाणी ते असोत, थेट तिथून सा:यांनाच यात सहभागी होता येणार आहे. प्रत्येकानं आपापली निरीक्षणं नोंदवायची, माहिती घ्यायची आणि ती ऑनलाइन सबमिट करायची! या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना कुठली फी, ना कसला खटाटोप. पर्यावरण, पक्ष्यांप्रती जगातील प्रत्येकाचा हा सजग सहभाग तर आहेच, शिवाय त्यात आनंद आहे, मौज आहे, निसर्गाशी आत्मिक संवाद आहे. या चार दिवसांत प्रत्येकानं मनापासून रोज किंवा एखाद्या दिवशी किमान 15 मिनिटे पक्ष्यांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला जे दिसलं ते नोंदवायचं आणि ्रु1ूि4ल्ल3.1ॅ या पत्त्यावर डकवायचं! बस्स! त्यातून मिळेल जगभरातील पक्षिगणनेचा एक ‘रिअल टाइम स्नॅपशॉट!
माहिती असावं
असं काही
पक्ष्यांचे अधिवास-
उघडय़ा माळरानावरील पक्षी (ग्रासलॅण्ड अॅण्ड डेझर्ट)
पाणथळीच्या प्रदेशातील पक्षी
(वेट लॅण्ड)
दाट झाडीच्या प्रदेशातील पक्षी
(वूड लॅण्ड)
शेती, नागरी वसाहती इत्यादी मानवनिर्मित अधिवासातील पक्षी
पक्ष्यांच्या उड्डाणाचे प्रकार-
पंख वर-खाली फडफडवत उडणं (फ्लॅपिंग)
तरंगत वर जाणं (सोअरिंग)
संथ तरंगत खाली येणं (ग्लायडिंग)
एकाच जागी स्थिर राहून उडणं
पक्षिगणना कशासाठी?
आपल्याकडे दर दहा वर्षानी जनगणना केली जाते. त्यावरून लोकसंख्यावाढ, या वाढीचा दर, त्यातून निर्माण होणारे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय प्रश्नांचं स्वरूप कळतं. त्यासाठीच्या उपाययोजनांसाठीही जनगणना अत्यंत महत्त्वाची असते. माणसांप्रमाणोच पक्ष्यांचीही दरवर्षी गणना केली जाते. पक्ष्यांचं जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पक्ष्यांची संख्या समजणं अत्यंत गरजेचं असतं. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही पक्षिगणनेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. एखाद्या प्रजातीच्या पक्ष्याची स्थिती नेमकी कशी आहे, म्हणजे तो अति संकटग्रस्त आहे, संकटग्रस्त आहे, भावी संकटग्रस्त आहे की, थेट नामशेषच झाला आहे, याची माहिती पक्षिगणनेवरून कळते आणि त्यावरून उपायही योजले जातात.
पक्ष्यांचा माग कसा काढतात?
जगभरातील अनेक पक्षी विणीसाठी, सुयोग्य वातावरणासाठी स्थलांतर करीत असतात. हे स्थलांतर कित्येकदा आंतरखंडीय आणि हजारो किलोमीटर्सचं असतं. या पक्ष्यांचा मागोवा घेण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जातात.
1 : पायात वळी किंवा रिंग अडकवणो- पक्ष्यांच्या पायात वळी अडकवल्यामुळे त्यांच्या स्थलांतराचा मार्ग आणि व्याप्ती कळते. या वळ्या वजनानं अतिशय हलक्या आणि वेगवेगळ्या व्यासाच्या असतात. पक्ष्यांना पकडण्यासाठी अत्यंत बारीक अशा ‘मिस्ट नेस्ट’ या जाळ्याचा वापर केला जातो.
2 : रेडिओ ट्रॅकिंग- ज्या पक्ष्याची अधिक माहिती मिळवायची आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे अशा पक्ष्याला पकडल्यानंतर त्याच्या पिसांमध्ये किंवा पायावर एक छोटा ट्रान्समीटर बसवून त्याला पुन्हा सोडून दिलं जातं. या ट्रान्समीटरमधून रेडिओ लहरी (सिग्नल्स) सोडले जातात. रिसिव्हरमधील अॅन्टेनाच्या मदतीनं या रेडिओ लहरी पकडल्या जातात आणि त्यांचं ध्वनिलहरींत रूपांतर केलं जातं. पक्षी जर कक्षेत असेल तर त्याचा आवाज ऐकू येतो. उपग्रहांच्या मदतीनं या पक्ष्यांचा माग घेतला जातो आणि त्यांची माहिती नोंदवली जाते.
पूरक माहिती-
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस),
मुंबई, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना, चिपळूण,
डॉ. उमेश करंबेळकर, सातारा
जिभेला हाड असतं!
प्रत्येक सस्तन प्राण्याचा डोळा पापण्यांनी झाकला जातो, तसंच पक्ष्यांचंही, पण फक्त पक्ष्यांमध्येच मृत्यूसमयी त्यांचे डोळे पापणीनं झाकले जातात.
‘जिभेला हाड नसतं’ असं आपण म्हणतो, पण पक्ष्यांच्या जिभेला हाड असतं.
पक्ष्यांच्या पापण्यांच्या आत एक पारदर्शक पडदा असतो. त्याला तिसरी पापणी असं म्हटलं जातं.
खबरदार, एकही पाऊल पुढे टाकलं तर!
विणीच्या हंगामात नर पक्षी एखाद्या विशिष्ट भागावर ताबा मिळवतो आणि तिथे आपली ‘सत्ता’ स्थापन करतो. हे त्याचं ‘राज्य’ असतं. या भागात स्वत:च्या प्रजातीच्या दुस:या नर पक्ष्याला तो प्रवेश करू देत नाही. आपल्या भूभागावर कोणी ‘आक्रमण’, ‘घुसखारी’ केलीच तर तो ‘युद्ध’ पुकारतो आणि सर्वशक्तिनिशी त्या नराला तिथून पिटाळून लावण्याचा प्रयत्न करतो. नराला आपल्या ‘राज्यात’ मज्जाव, पण माद्यांना मात्र मुक्त प्रवेश! अर्थात हे फक्त या काळातच!
प्रत्येकाचं स्वतंत्र राज्य!
शिकारी पक्ष्यांच्या ताब्यातला प्रदेश तुलनेनं ब:यापैकी मोठा असतो आणि विणीच्या हंगामात तिथे त्यांची सत्ता चालते. घरटं बांधणं, नर-मादीचा प्रणय आणि मिलन या सा:या गोष्टींसाठी नरानं आपलं राज्य संरक्षित केलेलं असतं. छोटय़ा पक्ष्यांचं राज्य अर्थातच छोटं असतं आणि विणीच्या हंगामात मिलनासाठीच त्याचा उपयोग केला जातो.
माझं तुङयावर प्रेम आहे!
चिमणी, मैना. यासारख्या पक्ष्यांना अगदी हमरी-तुमरीवर येऊन भांडताना आपण पाहिलं असेल, एकमेकांना पायांनी पकडून आणि चोची मारतानाचं दृष्यही आपल्याला दिसलं असेल, पण खरंच हे भांडण, मारामारी असते?
- छे! हे तर प्रणयाराधन. ‘माझं तुङयावर प्रेम आहे’ हे सांगण्याची एक ‘प्रमेळ’ पद्धत!
दुर्बीण का?
नुसत्या डोळ्यांनी पक्षी दिसत नाहीत असं नाही, पण त्यांचं नीट निरीक्षण करता येत नाही. आपल्याला पक्ष्यांच्या फार जवळही जाता येत नाही. तसा प्रयत्न केला तर लगेच ते उडून तरी जातात, नाहीतर हल्ला तरी करतात. त्यामुळे पक्षिनिरीक्षणासाठी दुर्बीण उत्तम. दुर्बिर्णीवर आकडे असतात. 6 बाय 3क्, 7 बाय 35, 8 बाय 4क् असे. त्यातला पहिला आकडा म्हणजे या दुर्बिणीतून वस्तू किती पट मोठी दिसते त्याचा तर दुसरा आकडा म्हणजे दुर्बिणीच्या भिंगाचा व्यास किती मिलीमीटर आहे ते दर्शवतो.
पक्षिनिरीक्षण कसं करायचं?
स्थळ आणि तारखेची नोंद
अधिवास कोणता?
- जंगल, दलदल, कुरण, बाग इत्यादी.
पक्षी विश्रंती घेतोय की हालचाल करतोय?
तुलना- चिमणी, कावळा, घार, मैना या सर्वसामान्यपणो दिसणा:या आणि परिचित पक्ष्यांशी आपण पाहिलेल्या पक्ष्यांची तुलना करा.
त्या पक्ष्यांचा आवाज किंवा गुणगुणणो ऐकणं.
पक्ष्यांच्या सवयींची नोंद.
पक्ष्यांची वैशिष्टय़े- त्यांच्या अंगावरील रेघा, ठिपके, पट्टे यांची नोंद
पक्ष्यांची रचना, लांबी, चोच, शेपूट यांचे निरीक्षण.
काय काळजी घ्याल?
भडक कपडे नको.
परिसराशी एकरूप होणारे कपडे, शक्यतो खाकी कपडे उत्तम.
पायात चांगल्या प्रतीचे बूट असावेत.
पक्षिनिरीक्षणासाठी सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी चार ते सात या वेळा उत्तम.
महत्त्वाचे मुद्दे-
पक्षिगणनेसाठी जे स्थळ निवडलं आहे तिथे सकाळी आणि पुन्हा संध्याकाळी त्याच ठिकाणी गणना करावी.
संध्याकाळी निशाचर पक्ष्यांवर भर द्यावा.
एकाच ठिकाणची गणना दोन वेळा, वेगवेगळ्या गटांनी करू नये.
ज्यांची खात्री पटली आहे असेच पक्षी नोंदवावेत.
सर्व प्रकारच्या पक्ष्यांची, म्हणजे जमीन, पाणी, झाडीझुडपे आणि उडणा:या पक्ष्यांची नोंद करावी.
पक्ष्यांच्या समूहाची गणना करताना ‘कुकी कटिंग’ या तंत्रचा वापर करावा. म्हणजे पक्ष्यांचा थवा असलेल्या ठिकाणावर एक लहान वतरुळाकार क्षेत्रची कल्पना करायची आणि त्या वतरुळातील पक्ष्यांची मोजणी करायची. पक्ष्यांचा संपूर्ण समूह व्यापण्यासाठी अशी किती वतरुळे लागतील याचा अंदाज घेऊन पक्ष्यांची संख्या काढावी.
पक्ष्यांची रातथा:यांची जागा हेरून तेथे वस्तीसाठी येणा:या पक्ष्यांची नोंद करावी. दिवस मावळण्यापूर्वी किमान एक तास आधी तेथे हजर रहावे.
पक्षी घरटी करीत असतील, अंडी उबवित असतील, पिलांना भरवत असतील तर त्याची स्वतंत्रपणो नोंद करावी.
पक्षिगणना करताना छापील नमुना सोबत ठेवावा.
परिसर नेमका कोणता आहे, पाणथळ जागा, गाव, शहर, नागरी वसाहत, गवती कुरण, माळरान, जंगल इत्यादींची नोंद करावी.
पक्ष्याची निश्चित ओळख पटल्यावर त्याचे इंग्रजी नाव, शास्त्रीय, प्रचलित नाव, पक्ष्यांची एकूण संख्या, त्यांची वीण/घरटे इत्यादी बाबींची नोंद करावी.
मासा स्वत:च गट्टम करणार
की, पिलाला खाऊ घालणार?
विणीच्या हंगामात समजा आपल्याला खंडय़ा पक्षी दिसला. मादीनं पिलांना जन्म दिलेला आहे. खंडय़ाच्या तोंडात मासा आहे. आता हा मासा तो स्वत: मटकावणार की, आपल्या बाळांना खाऊ घालणार?
हे समजण्याचा सोपा नियम असा, चोचीतल्या माशाचं तोंड जर खंडय़ाच्या घशाकडे असेल, तर हा मासा तो स्वत:च गट्टम करणार आणि माशाचं तोंड जर विरुद्ध दिशेला असेल तर हा मासा पिलासाठी!
असं का? - कारण मासा जर शेपटीकडून गिळला तर त्याचे काटे घशात अडकतात. त्यामुळेच माशाचं तोंड जर बाहेरच्या बाजूला असेल, तर समजावं हा मासा पिलासाठी! तसं जर केलं नाही आणि पिलाला जर शेपटीकडून मासा भरवला तर त्याची पिढीच संपुष्टात येईल!
(लेखक ‘लोकमत’मध्ये
उपवृत्त संपादक आहेत.)