शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
4
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
5
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
6
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
7
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

‘इफ्फी’मध्ये मानवी जगण्याचे रंग झाले व्याकूळ!

By संदीप आडनाईक | Published: January 31, 2021 3:22 AM

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातले या वर्षीचे सगळेच चित्रपट त्यांच्या अत्युच्य निर्मितीमूल्यांमुळे ओळखले जातील. अतिशय आटोपशीरपणे निवडलेल्या यंदाच्या इफ्फीने वेगळी ओळख निर्माण केली.

- संदीप आडनाईकभारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातले या वर्षीचे सगळेच चित्रपट त्यांच्या अत्युच्य निर्मितीमूल्यांमुळे ओळखले जातील. अतिशय आटोपशीरपणे निवडलेल्या यंदाच्या इफ्फीने वेगळी ओळख निर्माण केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या महोत्सवात खऱ्या अर्थाने दर्दी सिनेरसिकांनी गर्दी केली होती. ‘विंडो बाय वुड ऑल्सो लाइक टू हॅव सबमरीन’ हा चित्रपट एक तरुण खलाशी  समुद्रपर्यटन करताना माँटेव्हिडीओ येथील अद्भुतरम्य घराकडे जाणारा दरवाजा कसा शोधून काढतो, या विषयी आहे. त्या मुलाला आशियातील शेतकऱ्यांच्या समूहाला सामोरे जात खोऱ्यातील वाळीत टाकलेले घर सापडते, ज्यातून त्याला पारलौकिक सामर्थ्य प्राप्त होते. या चित्रपटात वरवर पाहता एकमेकांशी संबंध नसलेल्या विलक्षण जागा आणि प्रसंगांतून विस्मयकारक गोष्टींचे सौंदर्यपूर्ण आणि गूढरम्य चित्रण केले आहे. एखाद्या व्यक्तीला दुसरीकडे राहताना अचानक गाठ पडणाऱ्या, चमत्कृतीपूर्ण गोष्टींबाबत हा चित्रपट आहे. तुम्हाला एखादा दरवाजा दिसला, तुम्ही तो उघडून बाहेर आलात  की तुम्हाला कळते की, पलीकडे काहीच नाही. म्हणजेच जे आपल्या सभोवताली आहे, ते आपल्याशिवाय दुसरे कुणीच नसते, हे समजल्यानंतर येणाऱ्या निराशाजनक, पण मुक्त करणाऱ्या भावनेबद्दलचा हा चित्रपट!या वर्षीचा विशेष ज्युरी पुरस्कार मिळालेल्या फेब्रुवारी या बल्गेरियन दिग्दर्शक कामिन कालेव यांच्या चित्रपटात आठ, अठरा आणि ब्याऐंशी या तीन वेगवेगळ्या वयोगटांतील व्यक्तींची  जीवनकथा सांगण्यात आली आहे. आयुष्य म्हणजे विविध अवतारांतील सातत्य असून, माणसे  म्हणजे केवळ विस्तीर्ण आकाशाच्या खाली असलेल्या मोकळ्या धरतीवरील ठिपके आहेत, हा जीवनाचा दृष्टिकोन काव्यमय रूपकातून हा चित्रपट मांडतो. तैवानच्या दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या  चेन-नियन को यांना  मँड्रिन भाषेतील चित्रपट ‘द साइलेंट फॉरेस्ट’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्राप्त झाला. गतिमंद मुलांच्या शाळेत घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे वास्तववादी आणि हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात आहे.  पीडितांना  सावज बनवून  त्यांचा कसा बळी जातो, याविषयीची ही वेदनादायक कहाणी तैवानमधील एका शाळेतील सत्यघटनेवर आधारित आहे.  ज्या महिलेने आयुष्यात  कोणाशीही प्रेमसंबंध जोडण्याचा प्रयत्नही केला नाही आणि ७०व्या वर्षीच कुमारी म्हणून मरण पावली, अशा महिलेच्या गूढ आयुष्याचा शोध घेण्याचा अफलातून प्रयत्न पोर्तुगीज दिग्दर्शक क्रिस्टियान ऑलिव्हिरा यांनी ‘द फर्स्ट डेथ ऑफ जोना’ या चित्रपटातून केला आहे. इफ्फीत या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला. हा चित्रपट एका स्त्री कलाकाराच्या खऱ्या कथेवर आधारित आहे. या महिलेने स्वत:च्या अटीवर आपले जीवन व्यतित केले आणि कोणाबरोबरही प्रेमसंबंध न ठेवता तिचा  मृत्यू झाला. तिचे आयुष्य कायम गूढ राहिले. संदीप कुमारच्या ‘मेहरुनिसा’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर या महोत्सवादरम्यान झाला. या चित्रपटात उमराव जान फेम फरुख जाफर यांनी ८0 वर्षांच्या अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.  केवळ भारतीय चित्रपट उद्योगातच अभिनेत्रींच्या वयाला महत्त्व असते.  वयस्कर पुरुष चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारू शकतात, मग महिला का नाहीत, असा प्रश्न लखनौमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट विचारतो. इफ्फीमध्ये युद्धपट आणि लघुपटांचीही मेजवानी होतीच. आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या एका तरुण नायिकेची कथा महोत्सवातील भारतीय ‘पॅनोरामा’ विभागात दाखविण्यात आलेल्या ‘स्टील अलाइव्ह’ हा मनोनाट्य लघुपट सांगतो. व्यावसायिक प्रवासी छायाचित्रकार असणाऱ्या ओंकार दिवाडकर यांचा हा लघुपट आहे. या लघुपटातील मुख्य पात्र औदासिन्य आणि भावनिक गोंधळामुळे आत्महत्येचा प्रयत्न करते, परंतु ती अयशस्वी होते आणि पुन्हा आपले आयुष्य जगू लागते. ३० मिनिटांच्या या मराठी लघुपटात २७ मिनिटांचा अनकट शॉट आहे. आत्महत्या करण्याच्या वृत्तीने झपाटलेल्या त्या व्यक्तीचा प्रवास यातून दाखविलेला आहे. प्रेक्षकांना कथा सांगण्याऐवजी त्याचा प्रभावी अनुभव देणे हा या लघुपटाचा उद्देश!  - अशा किती कहाण्या सांगाव्यात? काय पाहू, त्यातले काय मनात साठवून ठेवू, असे प्रश्न प्रत्येकच फिल्म फेस्टिव्हलमध्ये चाहत्यांना पडतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रंगलेल्या इफ्फीमध्ये मानवी जगण्याचे हे रंग  अधिकच व्याकुळ करून गेले हे मात्र खरे!

टॅग्स :IFFIइफ्फी