शहरं
Join us  
Trending Stories
1
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
2
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
3
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
4
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
5
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
6
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
7
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
8
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
9
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
10
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
11
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
12
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
13
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
14
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
15
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
16
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
17
'या' कर्मचाऱ्यांना आई-वडील, सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालण्यासाठी मिळणार रजा!
18
हे आहेत भारताचे सर्वात उंच ५ क्रिकेटर, दोघांची उंची जाणून तर तुम्हीही थक्क व्हाल...!
19
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
20
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य

झोपडीतील सूर्यासाठी जिल्हाधिकारी बनले दिवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 11:34 IST

सूरज देवानंद डांगे हा यवतमाळ तालुक्यातील बोरगाव या छोट्याशा खेड्यातील मुलगा. वडील रोजमजुरी करणारे. घर म्हणजे झोपडीच. गरिबाघरी जन्मास आलेला सूरज तसा हुशार होता.

ऑनलाईन लोकमतअविनाश साबापुरेयवतमाळही कहाणी सुरू होते २००७ सालापासून. तेव्हा डॉ. हर्षदीप कांबळे यवतमाळात जिल्हाधिकारी होते. प्रशासनावर पकड ठेवण्यासोबतच सामाजिक समस्यांचे भान जपणारे अधिकारी ही त्यांची ओळख. त्यांच्या पुढाकारातून यवतमाळात ‘समतापर्व’ हा विचारांचा उत्सव दरवर्षी साजरा केला जात आहे. प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी संपृक्त झालेल्या या उत्सवात एकदा छोटासा ‘सूरज’ उगवला. पण गरिबीच्या अंधाराने त्याचे तेज झाकोळलेले होते. समतापर्वात या सूरजला संवेदनशील ‘हर्षदीपा’चा स्पर्श झाला अन् परिवर्तन घडले.सूरज देवानंद डांगे हा यवतमाळ तालुक्यातील बोरगाव या छोट्याशा खेड्यातील मुलगा. वडील रोजमजुरी करणारे. घर म्हणजे झोपडीच. गरिबाघरी जन्मास आलेला सूरज तसा हुशार होता. जिल्हा परिषदेच्या शाळेत कसेबसे शिक्षण सुरू झाले. शाळेतील शिक्षक अशोक राऊत यांनी सूरजची बुद्धिमत्ता हेरली, त्याला प्रोत्साहित केले. पण आयुष्याचे सोने होण्यासाठी एका संधीची गरज असते. ती संधी येतपर्यंत धीर धरावा लागतो. एक दिवस ती संधी आली. यवतमाळात ‘समतापर्वा’चे आयोजन झाले. वेगवेगळ्या कार्यक्रमांसोबतच वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली. विषय होता भारताचे संविधान. सूरजने त्यात भाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रमाण मानून सूरज बोलला. या एका भाषणाने डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सूरजमधला ‘सूर्य’ ओळखला. सूरजला स्पर्धेत पहिला क्रमांक आला. झोपडीतील या मुलाच्या पाठीवर थेट जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुकाची थाप दिली. पण कोरडे कौतुक करून थांबणारे डॉ. कांबळे नव्हते. त्यांनी पारितोषिक तर दिलेच, पण या लेकराला आपल्या बंगल्यावर रीतसर स्नेहभोजनाचे निमंत्रणही दिले. त्यावेळी छोटासा सूरज म्हणाला होता, ‘सर मला मोठे व्हायचे आहे.’ अन् डॉ. कांबळेंनीही त्याला ‘मी तुझ्यासोबत आहे’ अशा शब्दात आश्वस्त केले.तेथून सुरू झाला सूरजचा उर्ध्वगामी प्रवास. काही दिवसातच बेलोरा (ता. घाटंजी) येथील जवाहर नवोदय विद्यालयात सूरजची निवड झाली. दहावीची परीक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण केल्यावर सूरजला हैदराबादच्या नारायणा महाविद्यालयात आयआयटी जेईईसाठी पाठविण्यात आले. त्यासाठीही डॉ. कांबळे यांनी आर्थिक मदत केली. आयआयटी केल्यानंतर आता एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एमएस करण्यासाठी सूरजला अमेरिकेला जायचे होते. पुन्हा परिस्थिती आडवी आली. पण त्याने पुन्हा डॉ. हर्षदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सूरजला थेट मुंबईत बोलावून घेतले. अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठात शिकण्याचा जो काही खर्च असेल तो करण्याची हमी दिली. प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत सूरजला परदेशी जाण्याची परवानगी, पासपोर्ट व इतर गोष्टी करून दिल्या. आणि ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी सूरज उच्च शिक्षणासाठी अमेरिकेकडे झेपावला.

टॅग्स :Socialसामाजिक