शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
3
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
4
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
5
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
6
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
7
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
8
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
9
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
10
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
11
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
12
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
13
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
14
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
15
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
16
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
17
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
18
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
19
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
20
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘क्लेव्हर लिटल बॅग’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 06:00 IST

एखादी वस्तू आपण का विकत घेतो? गरज ही गोष्ट तर आहेच, पण अनेकदा गरज नसतानाही खरेदी होते. ती का? - त्याचे उत्तर आहे पॅकेजिंग! वस्तूच्या खरेदीत बर्‍याचदा त्या वस्तूपेक्षाही त्याच्या पॅकेजिंगचा वाटा मोठा असतो.  स्पोर्ट्स शूज बनवणार्‍या पूमा या प्रसिद्ध कंपनीने आपल्या उत्पादनाच्या पॅकेजिंगसाठी  एक खास बॅग तयार केली.  त्या बॅगेचे नुसते कौतुकच झाले नाही, त्याच्या डिझाइनला आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले!

ठळक मुद्देपॅकेजिंग : उत्पादक आणि ग्राहकांमधला महत्त्वाचा दुवा

- स्नेहल जोशीकधी विचार केलाय की आपण एखादी वस्तू विकत घेण्याचा निर्णय कसा घेतो? आठवून पहा - पेपरमध्ये किंवा टीव्हीवर एखाद्या नवीन क्र ीम, श्ॉम्पू, साबण, तेल, बिस्कीट, उदबत्तीची जाहिरात येते. जाहिरात पटली, विचारात राहिली तर ती वस्तू प्रत्यक्षात पाहण्यासाठी आपण उत्सुक होतो. मग दुकानात जाऊन आपण ती हातात घेऊन पाहतो आणि मग विकत घ्यायची की नाही हे निश्चित करतो. पण खरोखर आपण प्रत्यक्ष वस्तू पाहतो का? उपलब्ध असलेल्या 4-5 पर्यायांमध्ये नेमका कोणता  योग्य? एखाद्या श्ॉम्पूची परिणामकारकता, बिस्किटाची चव, साबणाचा त्वचेला होणारा स्पर्श, उदबत्तीचा सुगंध, तेलाचे गुण हे सगळं विकत घेण्यापूर्वी आपण कसे ठरवतो? उत्तर सोप्पं आहे - वस्तूचं पॅकेजिंग पाहून. पॅकेजिंग म्हणजे उत्पादक आणि ग्राहकांच्या मधला दुवा. त्याशिवाय एकही वस्तू आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. पॅकेजिंगचे दोन मुख्य उपयोग आहेत. एक तुमच्या आत्ता लक्षात आलेच असेल. उत्पादनाविषयी महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पॅकेजिंग करतं. आणि दुसरा उपयोग वस्तूची सुरक्षा. कारखान्यातून घाऊक उत्पादन बाजारात पोहोचतं आणि बाजारातून लोकांच्या घरांत हा प्रवास होत असताना वस्तू सुरक्षित राहाव्यात, त्या सांडून वाया जाऊ नयेत, वस्तू नाशवंत असतील तर खराब होऊ नयेत; नाजूक असतील त्या मोडू नयेत, त्यांचा आकार बिघडू नये यासाठी पॅकेजिंग खूप महत्त्वाचं आहे. अर्थात या मुख्य उपयोगांच्या पलीकडे जाऊन डिझाइनद्वारे अजून खूप काही साध्य केलं जातं. मागच्या लेखात आपण कोक-बॉटलचं उदाहरण पाहिलं. पेय सुरक्षित ठेवायला काचेची बाटली उत्तम होतीच; पण त्यापलीकडे जाऊन कोका-कोला कंपनीची ओळख या बाटलीने निर्माण केली. अशीच काही उदाहरणं आजही मी तुमच्या समोर मांडणार आहे.पुदुचेरीला चिन्नी कृष्णन यांचं छोटेखानी औषधी उत्पादन आणि विक्र ी केंद्र होतं. महागाईचे साबण, पावडर, मीठ आदी वस्तू सुट्या करून पुड्यांतून त्यांची विक्र ी करत. त्यामागे विचार असा होता की कोणालाही कुठलंही उत्पादन विकत घेता यायला हवं, त्यावर र्शीमंती मक्तेदारी नसावी. या विचारला खरं रूप मात्न दिलं त्यांच्या मुलानी - सी. के. रंगनाथान यांनी. 1983 साली वडिलांच्या पश्चात त्यांनी स्वत: श्ॉम्पू बनवण्याचा कारखाना सुरू केला.  आजवर श्ॉम्पू हे शहरी र्शीमंत लोकांचं उत्पादन म्हणून ओळखलं जात होतं. म्हणजे लहान गावात राहणारी 70 टक्के भारतीय लोकसंख्या यातून बादच. मग आपण त्यांच्या खिशाला परवडेल असा श्ॉम्पू तयार केला पाहिजे; पण त्याचा दर्जा उत्तमच हवा. रंगनाथान यांनी असा श्ॉम्पू बनवला आणि त्यासाठी कल्पक पॅकेजिंग डिझाइन केलं -श्ॉम्पू सॅशे. एका आंघोळीला पुरेल इतकाच श्ॉम्पू एका सॅशेमध्ये असतो. किंमत मात्न 1 रुपया. यामुळे आपल्या गरजेनुसार श्ॉम्पू विकत घेण्याचं स्वातंत्र्य लोकांना मिळालं. लोकांना आकर्षक वाटावे म्हणून 3 रंगांचे सॅशे तयार करण्यात आले. याची विक्र ीदेखील किराणाच्या दुकानातून केली गेली. चिक श्ॉम्पूच्या 1 रुपयाच्या सॅशेनी पर्सनल केअरच्या दुनियेत खरोखर क्र ांती घडवून आणली. पॅकेजिंगबद्दल बोलत असताना एक गोष्ट वारंवार विचारण्यात येते. या पॅकेजिंगचा उपयोग वस्तू संपेपर्यंत, काही वेळेला तर फक्त दुकानातून वस्तू घरी आणेपर्यंत; त्यासाठी सामग्रीचा किती अतिरिक्त वापर, केवढा खर्च, आणि त्यातून होणारी पर्यावरण हानी. या गोष्टी खर्‍याच आहेत. उपभोगतावाद शिगेला पोहोचलेला असल्याने साधन-सामग्रीचा विपर्यास व्हायला लागला आणि मोठय़ा प्रमाणावर पर्यावरण हानी झालेली लक्षात आली. पण गेल्या 4 ते 5 वर्षात पॅकेजिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मकपणे बदलतो आहे. खासकरून प्लॅस्टिकचा वापर टाळण्याकडे कटाक्ष आहे. त्याचंच एक उदाहरण बघूया.पुमा ही 72 वर्ष जुनी, स्पोर्ट-शूज बनवणारी, जगभर वितरण असलेली र्जमन कंपनी आहे. यावरून पुमाचं उत्पादन किती मोठं असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. बुटांचं संरक्षण करायला, त्यांचा आकार जपायला खोकं अनिवार्य होतं. हे खोकं बूट विकत घेतल्यावर आपल्या घरी येतं. ते धरायला फार सोयीचे नसल्याने त्यावर प्लॅस्टिकची पिशवी चढवली जाते. आणि घरी आणल्यावर त्यातून बूट बाहेर काढताच दोन्ही गोष्टी निकामी. जितकी कंपनी मोठी, पर्यावरण हानीही तेवढीच मोठी. यावर तोडगा काढण्याची गरज होती. 2010 साली पुमाने बुटाचे पॅकेजिंग डिझाइन करायला अमेरिकन डिझाइनर यीवज् बेहर यांना नेमले. फ्युज-प्रोजेक्ट हा त्यांचा डिझाइन स्टुडिओ. बेहरनी सर्वप्रथम खोक्याची कल्पना मोडून काढली. कमीत कमी साहित्याचा वापर करून पॅकेजिंग कसे करता येईल यासाठी प्रयोग सुरू झाले. जवळपास 2000 कल्पना रेखाटून, नमुने तयार करून पाहिले आणि त्यातून अतिशय साधी, सरळ; पण चुणचुणीत कल्पना पुढे आली. चित्नात दाखवल्याप्रमाणे खोक्याची बांधणी एकाच सपाट पुठ्ठय़ाला घड्या घालून केली जाते. खोक्याचा आकार परिचित असूनही अनोखा आहे. त्याला झाकण नाही. कारण पिशवीशिवाय खोकं  कधीच दिलं जात नाही त्यामुळे पिशवीच खोक्याला पूर्ण करते. आणि त्यामुळे तिचाही आकार अगदी बेताचा आहे. तिला एकच बंद आहे. प्रवासाला जाताना ही पिशवी अतिरिक्त चपला बूट ठेवण्यासाठी अगदी नेटकी आहे, तेव्हा तिचाही पुरेपूर वापर होण्याची खात्नी आहे. खोकं आणि पिशवी दोनही गोष्टी या नैसर्गिक पद्धतीनी नाश पावणार्‍या आहेत, त्यात रासायनिक पदार्थ नाहीत. आधीच्या खोक्याच्या तुलनेत नवीन खोक्याच्या रचनेतून 65 टक्के साहित्याची बचत होते. शिवाय, हे पॅकेजिंग इतकं अनोखं आहे, आपसूक ते जपून ठेवावंसं वाटतं. या पॅकेजिंगचं नाव ‘क्लेव्हर लिटल बॅग’ अगदीच सार्थ ठरतं. या डिझाइनचं संपूर्ण जगात खूप कौतुक झालं. त्यासाठी यीवज् बेहर आणि पुमा यांना ‘आयएफ’ आणि ‘गुड डिझाइन’ यासारखे नामांकित पुरस्कारही मिळाले आहेत.या उदाहरणांप्रमाणे अजून किती तरी कल्पक पॅकेजिंगचे नमुने बाजारात पाहायला मिळतील. तेव्हा खरेदी करताना वस्तूच्या पॅकेजिंगचा नक्की विचार करा.

snehal@designnonstop.in(लेखिका वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)