‘सिस्टर सिटी’ म्हणजे काय?
‘सिस्टर सिटी’ किंवा ‘ट्विन टाऊन्स’ ही संकल्पना मुळात सुरू झाली ती दुस:या महायुद्धानंतर. भिन्न देश, भिन्न संस्कृती, भिन्न भौगोलिक प्रांत आणि दोन भिन्न भाषिक प्रदेशांतील लोकांमध्ये साहचर्य वाढावं, विशेषत: पूर्वी ज्या देशांत शत्रुत्व, वैरभावना होती आणि युद्धासारख्या ठिकाणांनी दोन देशांत कटुता निर्माण झाली होती, ही कटुता कमी होऊन परस्परसंबंधांचं नातं प्रस्थापित व्हावं, त्यांच्यातलं ‘मैत्र’ वाढावं, शांतता नांदावी यासाठी दोन्ही देशांतील साम्यस्थळं शोधून आधी त्यांच्यात जवळीक निर्माण करावी आणि त्यानंतर याच नात्याचा उपयोग करून त्या दोन्ही देशांतील संबंध सुधारावेत या हेतूने ‘सिस्टर सिटी’ किंवा ‘ट्विन टाऊन्स’ संकल्पनेचा उगम झाला. विविध देशांत ‘पार्टनर टाऊन्स’, ‘पार्टनरशिप टाऊन्स’, ‘टाऊन ट्विनिंग’, ‘पार्टनर सिटी’, ‘सिटी बॉण्ड’, ‘फ्रेण्ड टाऊन्स’. अशा विविध नावांनी ही संकल्पना परिचित आहे.
आधुनिक संकल्पना
‘सिस्टर सिटी’ची संकल्पना आता अधिक व्यापक होत आहे. बदलत्या संदर्भात आता दोन देशांतील परस्पर साधम्र्य असलेल्या शहरांतील सांस्कृतिक, सामाजिक देवाणघेवाण वाढावी, परस्पर सामंजस्य वाढावं आणि याच जवळीकीचा उपयोग करून दोन्ही शहरांच्या विकासाला चालना मिळावी, व्यापार-उदीम वाढावा, पर्यटनाला चालना मिळावी, यासाठीचे प्रयत्न गेल्या काही वर्षापासून सुरू झाले आहेत. याच नव्या नात्याची नांदी पंतप्रधान मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या चीन दौ:यातही झाली. अर्थात यापूर्वीही भारतातली अनेक शहरं वेगवेगळ्या देशांतील शहरांशी ‘बंधुभावाच्या’ नात्यानं जोडली गेली आहेत.
‘सिटी डिप्लोमसी’
दोन विभिन्न शहरांतील बंधुत्वाचं नातं मुख्यत्वे आर्थिक कारणांशी निगडित असलं तरी अलीकडच्या काळात त्यात आणखी परिवर्तन आलं असून त्या दोन ‘सिस्टर सिटी’मधला ‘कौटुंबिक’ सलोखा राजकीय नात्यांतही परावर्तित झाला आहे. स्वतंत्र आर्थिक धोरणं, स्वतंत्र व्यापारनीती, पर्यटन आणि परकीय गुणवत्तेचा स्थानिक विकासासाठी उपयोग. अशा कारणांसाठी ही जुळ्या शहरांची संकल्पना सध्या राबवली जाते. त्याला ‘सिटी डिप्लोमसी’ असंही म्हटलं जातं.
राजकीय कूटनीतीचा भाग म्हणून अगदी अलीकडे म्हणजे मार्च 2क्14मध्ये ब्रिटिश संसदेतही या संकल्पनेला मान्यता देण्यात आली.
‘नातं’ नेमकं जुळतं कसं?
त्या त्या देशांतील किमान साम्यस्थळं असलेली शहरं निवडली जातात. सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक, पर्यटनविषयक. अशा नेमक्या कोणत्या गोष्टींवर भर द्यायचा आहे हे ठरवलं जातं आणि त्या दोन शहरांच्या दरम्यान चक्क कायदेशीर आणि सामाजिक करारच केला जातो. प्रशासकीय स्तरावरही दोन्ही देशांकडून त्याला मान्यता देण्यात येते आणि व्यापक अर्थानं या दोन शहरातील नातं समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो.
एकमेकांची सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक ओळख वृद्धिंगत करतानाच हातात हात घालून चाललेली ही एकात्मिक गुंफण दीर्घकाळ टिकवण्याचा मनापासून प्रय} केला जातो. किंबहुना हाच त्याचा मुख्य हेतू. व्यापार-उद्योगधंद्यापासून ते पर्यटनार्पयत, विज्ञान-तंत्रज्ञानापासून ते ऐतिहासिक वारशांर्पयत, साहित्य-संस्कृतीपासून ते कलेर्पयत, शिक्षणापासून ते शेतीर्पयत आणि अगदी एतद्देशीय खाद्यसंस्कृतीपासून ते हस्तकौशल्यार्पयत. कोणतेही विषय या नात्याला एकत्र आणू शकतात. उदहारणार्थ ‘सिस्टर सिटी’च्या माध्यमांतून पोर्टलॅण्डमधलं ओरेगॉन आणि इटलीतलं बोलोग्ना. या शहरांनी बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री, परस्पर खाद्यसंस्कृती, कला आणि शिक्षणासंदर्भात तर अमेरिकेतील शिकागो आणि पोलंडमधील वॉर्सा या शहरांनी पोलिश समुदायाच्या ऐतिहासिक वारशासंदर्भात आपल्या नात्यांत आणखी जवळीक निर्माण केली आहे.
ध्येय आणि हेतू
दोन विभिन्न देशांतील शहरांमध्ये ‘सिस्टर सिटी’चं नातं निर्माण करण्यामागे अनेक गोष्टींचा दीर्घकालीन विचार केला जातो.
एकाचवेळी व्यक्ती आणि समुदायातील साहचर्य वाढवताना एकमेकांविषयीचा आदर, सहकार्य, ज्ञान-कौशल्य, समज, ताळमेळ, अनुकूलता वाढीस लागावी, एक-दुस:याचा विकास व्हावा, परस्पर परिचयातून दोघांनीही एक नवं क्षितिज गाठावं.
दीर्घकालीन साहचर्याच्या माध्यमातून त्या त्या शहराचे प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांना विशेष अनुभव मिळावा, सांस्कृतिक अनुभवांची देवाणघेवाण होतानाच एकतानता यावी.
दोन्ही शहरांत आर्थिक आणि सामाजिक विकासासाठीचं सुदृढ वातावरण निर्माण व्हावं आणि ते टिकावं.
‘सिस्टर सिटी’तील व्यापार-उद्योग, प्रकल्प यांच्यातील आदानप्रदान वाढावं, उद्योगपती, व्यावसायिक, तज्ज्ञ. यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा व्हावा आणि त्यातून शैक्षणिक, रोजगारसंधी निर्माण व्हाव्यात, एकमेकांच्या अडचणी दूर व्हाव्यात.
दोन्ही शहरांत परस्पर सहकार्यानं युवा आणि शैक्षणिक प्रकल्प राबविले जावेत, आर्थिक आणि स्थायी विकास व्हावा, अटीतटीच्या क्षणी मानवतेच्या दृष्टिकोनातून एकमेकांना लाभ व्हावा आणि सांस्कृतिक सामंजस्य वाढावं.
पुण्याच्या इंटरनॅशनल
‘बहिणी’
‘ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट’ तसेच सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणो! जर्मनीतील ब्रेमेन, अमेरिकेतील सॅन होजे, फेअरबँक्स, बोगाटा, जपानमधील ओकायामा. जगभरातील पाच शहरांशी पुणो महापालिकेने ‘सिस्टर सिटी’ करार केलेला आहे. या सर्व करारांमध्ये त्या ठिकाणी स्थायिक असलेले पुणोकर आणि पुण्यात येऊन स्थानिक झालेल्या पुणोकरांचा मोठा वाटा आहे.
ब्रेमेन
ब्रेमेन शहराशी पुण्याचे औद्योगिक स्वरूपाचे संबंध 1976 पासून आहेत. या दोन शहरांमध्ये 1997-98 तसेच 2क्क्3 मध्ये विविध प्रकारच्या 21 मुद्यांवर स्वाक्ष:या करण्यात आल्या.
1997 मध्ये तत्कालीन महापौर वंदना चव्हाण यांच्या हस्ते ब्रेमेनमध्ये भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्ताने भारतीय ध्वज फडकविण्यात आला.
या सहकार्य कराराची आठवण म्हणून औंध येथील एका चौकास ब्रेमेन असे नाव देण्यात आले आहे. त्या ठिकाणी मैत्री शिल्पही उभारण्यात आले आहे.
सॅन होजे
अमेरिकेतील सॅन होजे शहराशी पुण्याने 2क्क्8 मध्ये सिस्टर सिटीचा करार केला. त्या अंतर्गत या दोन्ही शहरांमध्ये दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या दोन्ही शहरांमध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रसाठी विविध उपक्रम, शैक्षणिक शिष्यवृत्ती, पायाभूत प्रकल्पांसाठी महापालिकेस मोफत तंत्रज्ञान आणि सल्ला देणो अशा स्वरूपाची देवाणघेवाण सुरू आहे. त्यात प्रामुख्याने नदी सुधार योजना, दोन शहरांमध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रत संघटनात्मक बांधणी अशा 21 विविध स्वरूपाच्या मुद्यांवर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे.
करारा अंतर्गत पुणोकरांच्या वतीने सॅनहोजेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देण्यात आला आहे.
ओकायामा
दोन वर्षापूर्वी हा जपानच्या ओकायामा शहराशी झालेला करारही पुण्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरला आहे. या कराराच्या माध्यमातून शहराच्या शाश्वत विकासासाठी जपानच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची दारे महापालिकेस उघडी झाली आहेत.
या कराराची आठवण म्हणून महापालिकेच्या सिंहगड रस्त्यावरील पु.ल. देशपांडे उद्यानात जपानी शैलीचे ओकायामा उद्यान साकारण्यात आले आहे.
याशिवाय महापालिकेला नदीसुधारणा, पाणीपुरवठा योजना तसेच इतर बाबींमध्येही हा सिस्टर सिटी करार शहर विकासासाठी मोलाचा ठरत आहे.
बोगोटा
पुणो शहरात महापालिकेकडून उभारल्या जाणा:या अति जलद वाहतूक मार्ग (बीआरटी) साठी बोगोटा या शहराशी करार करण्यात आला होता. त्या अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यासाठी महापालिकेस वेळोवेळी सल्ला तसेच मार्गदर्शनही मिळाले आहे.
सुनील राऊत
गाणा:या पर्वताचं गाव
दूनहुआंग
महाराष्ट्रातलं औरंगाबाद आणि पश्चिम चीनमधलं दूनहुआंग. बौद्ध लेणी (गुहा मंदिरे) आणि प्राचीन रेशीम मार्गाने (सिल्क रुट) जोडली गेलेली शहरे हा त्यांच्यातला महत्त्वाचा दुवा.
अजिंठा लेण्यांनी औरंगाबादला, तर मोगोआच्या लेण्यांनी दूनहुआंग शहराला वेगळी ओळख दिली आहे. दोन्ही लेण्यांची कलाकुसर सारखीच. बुद्धाचा जीवनपट मांडण्याची शैलीही तीच.
गोबीच्या वाळवंटातला चीनचा हा तसा दुर्लक्षित भाग होता. दूनहुआंग पूर्वी जागतिक नकाशापासून दूरच होतं. चीनमधूनच रस्ते मार्गानं इथवर पोहोचायचं म्हटलं तरी अनेक दिवस लागायचे. आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे. पर्यटनाच्या हंगामात तर बीजिंग-दूनहुआंग अशी अखंडित विमानसेवा सुरू असते आणि केवळ तीन तासात तिथे पोहोचता येतं.
क्रिसेन्ट लेक आणि ‘गाणा:या’ पर्वताच्या पाश्र्वभूमीवरील मरुद्यानाची रमणीय पाश्र्वभूमी या परिसराला लाभली आहे. वाळवंटी प्रदेश असल्यानं वा:याच्या झोताबरोबर वाहणा:या वाळूमुळे मंत्रमुग्ध करणारा नादमय आवाज निर्माण होतो. त्यामुळे या परिसराला गाणा:या वाळूचा पर्वत असंही म्हटलं जातं. चिनी भाषेत त्याला ‘मिन्गशा शान’ म्हणतात.
ािस्तपूर्व 2क्क्क् वर्षापूर्वीही येथे मानवी अस्तित्व असल्याचे पुरावे संशोधकांना आढळले आहेत. ‘शोझोऊ’ (मातीचं शहर) म्हणूनही प्राचीन काळी ते प्रसिद्ध होतं. मोगाओ लेण्यांत बौद्ध धर्माशी संबंधित 492 मंदिरे आढळतात. यात बुद्धाचे जवळपास 21क्क् रंगीत पुतळे आहेत.
तिस:या शतकातील प्रसिद्ध भाषांतरकार फहू यांच्यामुळे दूनहुआंग जगाच्या नकाशावर गेलं. त्यांच्यामुळे चीनसह मध्य आशियातून अभ्यासकांचा ओढा येथे वाढला.
दूनहुआंग आणि अजिंठा!
भारत आणि चीनमधील सांस्कृतिक देवाणघेवाणीचं नातं दोन हजार वर्षापासूनचं आहे. या दोन्ही देशांतील नात्याचा पूल बौद्ध धर्मानेच बांधला. बुद्धाची मानवी चित्रे सर्वप्रथम गंधारा कलाकारांनी समोर आणली. पुढे अनेक भारतीय कलाकारांनी ते आत्मसात केले. ही कला पुढे दूनहुआंगर्पयत पोहचली. या नात्याची वीण दूनहुआंग आणि अजिंठा लेण्यांमध्ये दिसते.
दूनहुआंगमधील ध्यान अवस्थेतील लेण्यांवर विशेषत: अजिंठा लेण्यांचा प्रभाव दिसतो. चौकोनी आणि आयताकृतीतील या लेण्यांचं अजिंठा लेण्यांशी खूपच साम्य आहे. ध्यानमुद्रेतील ही लेणी एक ते दोन चौरस मीटरची ओहत. दूनहुआंगमध्ये 2415 पुतळे आहेत. 1638 ते 1911 या कालखंडात हे पुतळे उभारण्यात आले आहेत. भारतातील मथुरेत असलेल्या पुतळ्यांची आठवण ते करून देतात. बुद्धांचे बहुतेक पुतळे भिक्खूच्या वेशात आणि वेगवेगळ्या आसनांमध्ये दिसतात. या पुतळ्यांवरील दागिने, धोती, अप्सरांची चित्रे, कलाकुसर भारतीयांशी नाते सांगतात.
गजानन दिवाण
मुंबई
लंडन (इंग्लंड), लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया (अमेरिका), सेंट पिट्सबर्ग (रशिया), शांघाय (चीन), स्टुटगार्ट (जर्मनी), योकोहामा (जपान)
दिल्ली
बीजिंग (चीन), न्यू यॉर्क, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, इलिनॉईस (अमेरिका), टोकियो, फुकूओका, क्यूशू (जपान), लंडन (इंग्लंड), मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया), मॉस्को (रशिया), सेऊल (दक्षिण कोरिया)
अहमदाबाद
अॅस्ट्राखन (रशिया), कोलंबस, ओहियो, न्यू जर्सी (अमेरिका), पोर्ट लुईस (मॉरिशस), रिओ दि जानेरिओ (ब्राझील), उल्सान (दक्षिण कोरिया)
अमृतसर
बेकर्सफिल्ड, सॅन होजे (अमेरिका), लंडन, बर्मिगहॅम (इंग्लंड)
बेंगळुरू
चेंगडू, सिचूआन (चीन), क्लेव्हलॅण्ड, ओहायो (अमेरिका), मिन्स्क (बेलारुस)
महाराष्ट्राच्या
परदेशी बहिणी
औरंगाबाद आणि मैझुरू (जपान),
नाशिक आणि ब्रिस्टल (इंग्लंड), मॉँट्रियल (कॅनडा), फिलाडेल्फिया (अमेरिका)
पुणो आणि ब्रेमेन (जर्मनी), सॅन होजे, फेअरबॅन्क्स, अलास्का (अमेरिका)