शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मेलोड्रामाचा बदलता पोत

By admin | Updated: October 25, 2014 13:49 IST

ऋत्विक घटक यांना अभिप्रेत असणारा मेलोड्रामा वेगळा होता. त्यामुळेच त्यांचे चित्रपट अभिजात होते. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील अनेक चित्रपट पाहताना पदोपदी याचीच जाणीव होत होती; कारण मेलोड्रामाचं नव्या पिढीनं बदललेलं स्वरूप तिथं दिसत होतं.

- अशोक राणे

 
'जो रडत नाही, तो माणूसच नाही.’
मेलोड्रामा - क्षोभनाट्याविषयीचे आपले विचार व्यक्त करताना ऋषितुल्य दिग्दर्शक ऋ त्विक घटक असं म्हणाले होते. हळवं होणं, भावविवश होणं, अश्रूंना वाट मोकळी करून देणं यांत काही वावगं नाही. ते एक प्रकारे स्वाभाविकच असतं, आहे. परंतु, एक गोष्ट तितकीच खरी, की प्रत्यक्ष जीवनात किंवा कलाकृतीतदेखील ते याच स्वाभाविकपणे यायला हवं; अन्यथा ते खोटं वाटतं. त्यामागचं कारण जरी योग्य असलं, तरी अशा खोटेपणामुळे ते इतरांपर्यंत पोहोचत नाही. कलाकृतीत जेव्हा ते संयमितपणे, तरलपणे येतं तेव्हा ते कलाकृतीचं सौंदर्य तर वाढवतंच; परंतु कथाशय अधिक गहिरा करतं. प्रेक्षकाला अंमळसं हळवं करतं, क्वचित डोळ्याच्या कडा किंचित ओलावतं आणि व्यक्तिरेखा ज्या अवस्थेतून जात असतात त्याच्या कार्यकारणभावाशी मुख्यत: नेतं. ऋत्विकदांना हा मेलोड्रामा अपेक्षित होता आणि तोच ‘मेघे ढाका तारा’, ‘सुवर्णरेखा’, ‘बारी थाके पालये’ आदी त्यांच्या कलाकृतींतून सतत दिसत राहिला. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांना अभिजाततेचं मूल्य प्राप्त झालं. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील बहुतांश चित्रपट पाहताना हेच सारं मनाशी येत राहिलं. प्रकर्षानं नजरेत भरलं. त्यातही विशेष गोष्ट म्हणजे नव्या पिढीनं बदलत आणलेलं मेलोड्रामाचं पारंपरिक स्वरूप!
नवी पिढी सभोवतालचं जग उगाचच भावविभोर होऊन पाहत नाही. परिणामी, प्रत्येक गोष्टीमागचा कार्यकारणभाव त्यांना दिसू शकतो.. आणि मग त्यातला कुणी कलावंत असेल, तर तो हे सारं एका अलिप्तपणे आपल्या कलाकृतीत मांडू शकतो. मेलोड्रामा एका संयमानं, तरलपणे चित्रित करू शकतो. बुसानमध्ये पाहिलेल्या चित्रपटात हेच अनुभवता आलं. 
‘एंड ऑफ विंटर’ या कोरियन चित्रपटाची सुरुवातच थेट अगदी मेलोड्रॅमेटिक आहे. इतकंच नाही, तर अगदी पाच-सात मिनिटांत पुढल्या वळणावर त्यात जे काही घडतं, ते तर मेलो मेलो मेलोड्रामासाठी सुपीक जमीनच तयार करतं आणि तरीही विशीतला कोवळा दिग्दर्शक कीम देहवन आपल्या या पहिल्या चित्रपटात एक लोभसवाणा संयम पाळतो. एका अलिप्तपणे कथांतर्गत घटिताकडे पाहतो. ते सारं विलक्षण तरलपणे विचारतो.
गोष्ट आहे एका कुटुंबाची. कुटुंबप्रमुख शाळामास्तर. नवृत्तीच्या दिवशी शाळेत निरोप समारंभ. त्यासाठी त्याची पत्नी, थोरला मुलगा, सून उपस्थित. धाकटा अजून पोहोचायचाय. अशा प्रकारच्या निरोप समारंभात होणारी भाषणबाजी, त्यातले सारे उपचार यांत चित्रपट एका र्मयादेनंतर रेंगाळत नाही. ते सारं गोष्टीतल्या एका मुद्दय़ापुरतंच येतं. म्हणजे, ‘एक शिक्षक नवृत्त होतो आणि त्याच्यासाठी शाळेचं व्यवस्थापन त्याच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत एक निरोप समारंभ आयोजित करतं.’ बस्स! पुढला मुद्दा म्हणजे ते कुटुंब सरळ घरी जाईल किंवा आजच्या संस्कृतीला धरून तरुण पोरांच्या आग्रहावरून जेवायला बाहेर जाईल. हेही कुटुंब जातं. मात्र, ती कुणाची सूचना होती, कुणाचा आग्रह होता, या फंदात दिग्दर्शक पडत नाही. आजच्या चित्रपटीय परिभाषेत म्हणायचं, तर कट टू रेस्तराँ.. उगाचच इथंतिथं क्षणभरही रेंगाळायचं नाही. सगळं कसं ‘फोकस्ड’ असायला हवं. 
घरगुती म्हणावं असं ते रेस्तराँ. कथानायक गप्पसा. स्वाभाविकपणे म्हणा वा वातावरणातला ताण कमी करायच्या उद्देशानं तेवढा प्रतिसाद देत आहे. जेवणाला उशीर होतोय तसतसा ताण वाढत चाललाय. अधूनमधून मुलगा आत जाऊन हॉटेलमालकाशी बोलतो आहे. ‘वाढतोच थोड्या वेळात’ हे त्याचं पालुपद सुरू आहे. अजून न पोहोचलेला धाकटा कुठवर आलाय, याचा अंदाज घेतला जातोय. एकदाचा तोही येतो. मागोमाग जेवण येतं. आता धाकटा थोरल्या भावाशी त्याची फिरकी घेतल्यासारखा बोलतो आहे.. आणि मध्येच कथानायक म्हणतो, ‘मला घटस्फोट हवाय!’ स्वाभाविकपणे क्षणभर अवघं जग जागीच थांबल्यासारखं होतं. सासर्‍याची ही काही तरी गंमत असावी किंवा आधीपासूनच्या ताणात आणखी भर पडायला नको म्हणून म्हणा सून तिच्या उगीचच्या उगीच एक्सायटेड शैलीत काहीबाही बोलत राहते; परंतु ती गंमत नसते. इथून पुढे जे-जे काही घडतं, तिथपासून अगदी चित्रपट संपेपर्यंत या नुकतीच साठी ओलांडलेल्या सद्गृहस्थाला या वयात घटस्फोट का हवाय, या कारणात दिग्दर्शक जात नाही. त्यानंतर काय आणि कसं घडलं, यावरच सारा फोकस राहतो. एका र्मयादेनंतर मुलांना या घटस्फोटाशी काही घेणंदेणं नाही, कारण या क्षणी ती त्यांच्याच विवंचनांत इतकी बुडालेली आहेत, की परिस्थिती कशी निस्तरावी, या पेचात आहेत. आणि त्यातही मोठा मुलगा आणि सून नवृत्तीनंतर वडिलांना मिळालेल्या पैशातून मोठी रक्कम मागायला शहरातून आले आहेत. त्यांची निकड इतकी तातडीची आहे, की त्यापुढे इतर सर्वांचेच प्रश्न त्यांच्यालेखी बिनमहत्त्वाचे किंवा कमी महत्त्वाचे आहेत. अगदी आईचेही! धाकट्यालाही अजून शहरात आपला जम बसवायचाय. त्यालाही क्षीती नाही.. आणि तशातच अभूतपूर्व आणि असा हिमवर्षाव झालाय. पंचक्रोशीतील सारी वाहतूकव्यवस्था कोलमडलीय आणि ही पाचही माणसं वाढत्या तणावग्रस्त वातावरणात एकाच जागी अडकून पडलीत. अवघं वातावरण निरुत्तर करणारं राहतं. त्यातून सहजपणानं त्यांचं अंतरंग उलगडत जातं. त्यांच्या परस्परनातेसंबंधांचा पोत दिसत राहतो. आजच्या जगातलं सम्यक दर्शन घडतं. सगळं अतिशय संथ लयीत.. आपल्या गतीनं चाललेलं असतं. नाही म्हणायला एकदाच त्या नवृत्त शिक्षकाची पत्नी सारा ताण असह्य होऊन काहीशी हिस्टॅरिक होते; परंतु एकदाच. कारण, नवर्‍याचा या वयातला हा अजब पवित्रा तिला अजिबात कळेनासा होतो. ती त्यालाच भिडते. जाब विचारते, ‘कशाला हवाय घटस्फोट..? झालंय काय असं..?’
आरंभापासून गप्प गप्प असलेला तो काहीच बोलत नाही. इतकंच नाही, तर घटस्फोट या विषयावर एकदा बोलून झाल्यानंतर तोंडातून चकार शब्द काढीत नाही. या कथेची आणखी एक लक्षणीय गंमत म्हणजे, यातील एकाही पात्राला नाव नाही. ती यांची किंवा अन्य कुठल्याही कुटुंबाची गोष्ट असू शकते. सर्वत्र सदासर्वकाळ काही तरी धुमसतं आहे. वरवर आलबेल वाटतं आहे; मात्र कुठेच काही आलबेल नाही.. आणि मग का नाही असा प्रश्न पडतो, तर शोधा तुमची तुम्ही उत्तरं, असा दिग्दर्शकाचा पवित्रा आहे.. आणि म्हणूनच एका मेलो.. मेलो.. मेलोड्रामाच्या रडव्या, भावुक वळणाशी जाऊ शकला असता हा चित्रपट सारं एका संयमानं चित्रित करीत भोवतालचं नेमकं भान देऊन जातो. आजच्या तरुण पिढीला स्वत:ची अशी स्पेस पाहिजे असते. तसा त्यांचा कडेकोट आग्रह असतो. ‘एंड ऑफ विंटर’च्या दिग्दर्शकाला आपल्या आधीच्या पिढीच्या मनातही ही अशी स्वत:च्या स्पेसची अपेक्षा असावी.. आणि म्हणूनच त्यानं असा घाट घातला असावा, असं आणि बरंच बरं काही वाटत राहतं. एक मेलोड्रॅमेटिक कथा हळवी, रडवी न होता अलिप्तपणाचा आग्रह धरत एक ‘सत्य’ दाखवते.
असाच मेलोड्रामा थेट गाभ्याशी असलेली गोष्ट फिलिपिन्सच्या ‘मारिक्विना’मध्ये आहे. मिलो सोग्युको हा तरुण दिग्दर्शकदेखील आपली ही मेलोड्रॅमेटिक कथा विलक्षण अशा संयमानं आणि अलिप्तपणे हातळतो. त्याची कथानायिका ही तिशीतली आहे. त्यामुळे तिच्याकडे आजच्या तरुण पिढीकडे असलेला भावुकपणा नाकारून अलिप्तपणे जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. वर म्हटल्याप्रमाणे तीही इमोशनल आहे; परंतु सेंटिमेंटल नाही. खरं तर भावविवश होत मनसोक्त रडावं, अशी घटना चित्रपटाच्या आरंभीच घडलेली आहे. उद्योग-व्यवसायात एक यशस्वी आणि सवार्थानं आधुनिक असलेल्या इमेल्डाला कुठे तरी एकाकी अवस्थेत राहणारे तिचे वडील गेल्याचं कळतं. क्षणभर ती हळवी होते, परंतु क्षणभरच! आणि मग वडिलांच्या अंत्यविधीच्या तयारीला लागते. फिलिपिन्सचे एक काळचे एक नामांकित शू-मेकर असलेल्या वडिलांच्या पायात दफनापूर्वी त्यांच्या आवडीचे बूट घालावेत, यासाठी ती नाना उपद्व्याप करते. दरम्यान, वडिलांबरोबर काम केलेल्या लोकांना भेटते.. आणि त्यातून तिचा आणि वडिलांचा नातेसंबंध उलगडत जातो. आपल्या कामावर प्रचंड निष्ठा असलेल्या तिच्या वडिलांनी कुटुंबाकडेही दुर्लक्ष केलं. इतकं, की छोट्या इमेल्डाला घेऊन तिच्या आईनं घरदार, शहर, देश सोडून अमेरिका गाठलं. इथं एका विशिष्ट परिस्थितीत वडिलांचा त्यांच्या सहकारी स्त्रीशी संबंध वाढला. हे सारं तिच्या आठवणीच्या संदर्भात येत जातं आणि ज्यांच्यावर तिनं बालपणापासून राग धरला ते वडील तिला हळूहळू कळत जातात.. तो माणूस म्हणजे केवळ त्याचं जोडे बनविण्याचं विलक्षण पॅशन एवढय़ापुरताच र्मयादित असतो. इमेल्डाला तिचा बाप नेमका आणि सर्वार्थानं कळतो. वडिलांची दुसरी पत्नी जेव्हा अंत्यदर्शनासाठी येते, तेव्हा ती कटू होत नाही. तिला नेमकं भान आलेलं असतं. म्हणजे इथं पुन्हा हळव्या, रडव्या मेलोड्रामाची शक्यता असताना दिग्दर्शकानं आजची पिढी कुठल्याही प्रसंगात उगाचच भावुक न होता तो कसा नेटकेपणानं हाताळते, याचं दर्शन घडवलं आहे. हे पाहताना सहज लक्षात येतं, की नवी पिढी मेलोड्रामाचा पोत अंतर्बाह्य बदलते आहे.
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे 
व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)