काळ्या जादूचा किनारा
By Admin | Updated: August 29, 2015 14:36 IST2015-08-29T14:36:42+5:302015-08-29T14:36:42+5:30
रिओमध्ये समुद्राच्या अगदी समोर राहत असल्यामुळे दिवसभर किना:यावर जे काही चालते त्याची मी साक्षीदार आहे. सकाळी उठून फिरायला जावे, तर रेतीत काय काय दिसते. रात्री झालेल्या जादूटोण्याच्या विधीचे साहित्य! कधीकधी वाटते, या इतक्या जुन्या प्रथा अजूनही कशा इतक्या रुतून, रुजून बसलेल्या! एरवी सगळी आधुनिकता स्वीकारलेल्या या देशाच्या मानसिकतेवरले हे जोखड कसे अजूनही लटकलेले?

काळ्या जादूचा किनारा
>ब्राझीलमधल्या जादूटोण्याचे काळे विश्व आणि समुद्राच्या आईची पूजा
- सुलक्षणा व:हाडकर
सध्या ब्राझीलच्या रिओ दि जानेरिओ या शहरात समुद्राच्या अगदी समोर राहत असल्यामुळे दिवसभर किना:यावर जे काही चालते त्याची मी एक साक्षीदार आहे. समुद्राची गाज आध्यात्मिक सुख आनंद देत असली तरी त्याव्यतिरिक्तसुद्धा अनेक अनुभव हा समुद्र देतोच आहे.
रोज सकाळी, दुपारी आणि अगदी रात्रीसुद्धा इथे समुद्रावर वर्दळ दिसते. मध्यरात्रीसुद्धा आग पेटवून, रेतीत पांढरी फुले लावून काही घोळके नृत्य करताना दिसतात. अगदी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलासुद्धा तीच पांढरी, लाल, गुलाबी, पिवळी फुले ‘येमन्जा’ या समुद्रदेवतेला अर्पण केली जातात. तुमच्या मनात जी भावना, इच्छा आहे त्या रंगाची फुले समुद्राला अर्पण करण्याची इथे रीत आहे. ‘येमन्जा’ म्हणजे समुद्राची आई. तिला ‘जनाय्ना’, ‘मई दि अग्वा’, ‘लेमन्जा’ ह्या नावांनीही ओळखतात. नियती अथवा नशिबाला महत्त्व देणा:या योरूबा धर्मात येमन्जाच्या पूजेचे महत्त्व आहे. योरूबा पुराणामध्ये या देवतेला संरक्षक, मूळ देवता मानले जाते. यच्चयावत सर्व सजीवांची ती आई आहे असे मानले जाते. निर्मितीची सृजनाची देवता म्हणून तिला मान आहे.
ओरिषा म्हणजे योरूबा धर्मातील मूळ 600 लोकदैवतांपैकी एक येमन्जा आहे. परंतु सात प्रमुख दैवतांपैकी एक. तिचे महत्त्व आईपेक्षा जास्त. ‘ओरुन’ म्हणजे स्वर्ग सगळ्यात प्रथम क्रमांकावर. त्यानंतर अ्री म्ह्णजेच पृथ्वी. इशू, ओगून, शान्गो, आयरा, ओया, ओशून, नाना, ओवा, एबा, ओरिषा ओको अशा अनेक लोकदैवतांची पूजा-उपासना केली जाते. यात इंद्रधनुष्याची, नदीची, पावसाची, पर्वतांची, निसर्गाची, मृत्यूची, शेतीची, तलावांची, पहाडांची, आरोग्याची, अन्नधान्याची, आयुष्याची, प्राण्यांची, सापांची, समाधीची, शक्तीची, प्रेमाची, जंगलाची, वादळाची, पिण्याच्या पाण्याची, भरभराटीची दैवते आहेत. (हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)
- तर ही पूजा मी कोपकाबना किनारी पाहिली होती. ब्राझीलमध्ये दक्षिण आफ्रिकेतून गुलाम म्हणून आलेल्यांच्या पुढच्या पिढीतील सर्वचजण आपली दक्षिण आफ्रिकन संस्कृती ह्या निमित्ताने जपत आहेत.
मकुम्बा हासुद्धा असाच एक त्या संस्कृतीतील भाग. मकुम्बा म्हणजे संगीताचे वाद्य किंवा जादू. ब्राझील, अर्जेन्टिना, उरु ग्वे, पराग्वेमध्ये याचा प्रचार-प्रसार आणि लोकप्रियता आहे. काल समुद्रावर फिरायला गेले तर मला सायकल ट्रॅकवर एक मेणबत्ती, फोडलेली अंडी, मक्याच्या लाह्या, काही फुले, पांढरा धागा असे बरेच काही दिसले. याआधी ब्राझीलमधील जादूटोण्याबद्दल मी ऐकून होतेच. स्थानिक मैत्रिणींनी बरेच सांगितले होते. समुद्राच्या रेतीवर तर अनेकदा अशी उत्तरपूजा पाहिली होती.
दक्षिण आफ्रिकन देवतांना संगीत, जादूच्या मदतीने आवाहन केले जाते जेणोकरून आत्म्याला वश करता येते हा एक समज इथे आहे. यात पूजा उपासना, प्रसाद भेट चढविणो आणि मग वशीकरण असा ढोबळ क्रम असतो. काही पूजांमध्ये सेडरच्या लाकडावर रोझमेरी, सेलरीने क्र ॉस बनविला जातो. पवित्र पाण्यात तीन दिवस ठेवून मध्यरात्री मंत्र म्हणून काही उत्तरपूजा केल्या जातात. काळ्या मांजरीला मारून तिच्या डोळ्यात लांब फरसबीच्या शेंगा टाकल्या जातात. शेपटाखाली, कानात बिया टाकल्या जातात. तिला पुरले जाते. जेव्हा बियांपासून रोपटे येते तेव्हा उत्तरपूजा केली जाते.
या देशातली माणसे हा जादूटोणा कशाकशासाठी करतात याची यादी वाचली, तर चकित व्हाल तुम्ही.
तुमचा नवरा तुमच्याशी प्रामाणिक राहावा म्हणून, त्याने दुस:या बाईला सोडून द्यावे म्हणून, नोकरी मिळावी म्हणून, मुले व्हावीत म्हणून, शेजा:यांची पिडा जावी म्हणून, तुमच्या मनाप्रमाणो लोकांनी तुमच्याशी वागावे म्हणून, ज्या बाईला तुमच्या प्रेमात पाडायचे असेल त्यानुसार पक्षी- प्राणी वापरून वशीकरण करणो, पुरु षाला प्रेमात पाडणो, जास्त पैसे कमावणो, प्रगती होणो, मुले होणो अशा अनेक कारणांसाठी जादूटोणा केला जातो.
समुद्रकिनारी मध्यरात्री हे सर्व होते. सकाळी फिरताना त्याच्या खाणाखुणा दिसतात. ब्राझीलमध्ये अंधश्रद्धा आहेत. काळी जादू तर हमखास दिसते. परंतु लहान लहान बाबतीतसुद्धा लोक प्रथा पाळतात. म्हणजे पाहुणो घरातून बाहेर पडतात तेव्हा आपण दरवाजा उघडायचा असतो. नाहीतर ते पाहुणो पुन्हा येत नाहीत. शुक्रवारी पांढरे कपडे घालायचे. पांढरे फुलपाखरू वर्षाच्या सुरु वातीला दिसले तर संपूर्ण वर्ष चांगले जाते. घरात पक्षी ठेवू नये कारण त्यामुळे मृत्यू होतो. शिंपले आनंद घेऊन येतात, तर शार्क माशाचे दात गुडलक आणतात. घराच्या एका कोप:यात रॉक सॉल्ट भरलेली बरणी ठेवावी. तुम्हाला पैसे हवे असतील तर घरात हत्तीची प्रतिकृती ठेवावी. मुख्य दरवाजाकडे त्याची पाठ असायला हवी. घोडय़ाची नाल घरात असावी. कॉफी करताना आधी कपात साखर घालावी मग कॉफी. असे केले तर तुम्ही श्रीमंत बनता, आणि जमिनीवर पर्स ठेवली तर गरीब होता.
एका घरातून दुस:या घरी शिफ्ट होताना किंवा घर बदलताना केरसुणी जुन्या घरी विसरून जायची इथे रीत आहे. नवीन घरी नवीन केरसुणी.
धनप्राप्तीपासून ते भरभराट, इतरांचा मृत्यू, प्रेमात वशीकरण.. पासून काहीही! जशी समस्या तसे उपाय.
ब्राझीलियन लोक स्वत:चे फोटो सहसा कुणाला देत नाहीत. म्हणजे शाळांच्या वेबसाइटवरसुद्धा मुलांचे फोटो झाकलेले असतात. कारण फोटोचा गैरवापर करून काळी जादू केली जाते असा समज आहे. एखाद्याला शारीरिक, मानसिक त्रस द्यायचा असेल तर त्याच्या फोटोची गरज असते म्हणो. मकुम्बामध्ये असा फोटो घेऊन जादू केली जाते .
- सांगावे तितके कमीच!
कधीकधी मला वाटते, या इतक्या जुन्या प्रथा अजूनही कशा इतक्या रुतून, रुजून बसलेल्या!
एरवी सगळी आधुनिकता स्वीकारलेल्या या देशाच्या मानसिकतेवरले हे जोखड कसे अजूनही लटकलेले? एकदा आमच्या कॉलनीतल्या दुकानात काम करणारा एकजण थोडा मोकळ्या वेळी भेटला. गप्पा झाल्या. मला म्हणाला, ‘‘तू भारतीय आहेस ना? मला तुमची दुर्गा आवडते. दुर्गा म्हणजे देवी. एकदा मला शक्ती हवी होती तेव्हा मी तिच्याकडे शक्ती मागितली. तीन दिवस पूजा केली आणि मला शक्ती मिळाली. माङो काम झाले.’’
- मला गंमतच वाटली. जणूकाही एखाद्या कार्टून फिल्ममधील लहानसा नायक हे बोलतोय असे वाटले. मी त्या सोळा-सतरा वर्षाच्या मुलाला विचारलं, ‘‘तू शाळेत जात नाहीस का?’’ त्याला तोडकेमोडके इंग्लिश येते. तो म्हणाला, ‘‘नाही. मी रात्री शिकतो. दिवसा या दुकानात काम करतो. मी विचक्राफ्टची प्रॅक्टिस करतो.’’
- माङया रोजच्या रस्त्यावर तो मला नेहमी भेटतो. गप्पा झाल्यामुळे आता तोंडओळख झाली आहे. आम्ही दोघेही हसतो आणि पुढे जातो. तो मला भारतीय म्हणून, देवी दुर्गेच्या देशातली म्हणून ओळखतो.
भारतीय म्हणून माझी आणखीही ओळख मला त्याला करून द्यायची आहे. रिओमधल्या माङया या तरुण मित्रला डॉ. नरेंद्र दाभोलकरांविषयी, त्यांनी आणि त्यांच्या समकालीनांनी उभ्या केलेल्या विवेकाच्या चळवळीविषयी कधी आणि कसे सांगावे, या विचारात मी आता आहे.
(मुक्त पत्रकार असलेल्या लेखिका सध्या
ब्राझीलमध्ये वास्तव्यास आहेत.)
sulakshana.varhadkar@gmail.com