मोठाईकीची झिंग!
By Admin | Updated: January 16, 2016 13:45 IST2016-01-16T13:45:42+5:302016-01-16T13:45:42+5:30
‘आम्ही बैलांवर अत्याचार करीत नाही, त्यांना पोटच्या पोराप्रमाणो जपतो,वर्षातून एकदाच त्यांना शर्यतीला जुंपतो’. हे दावे अवास्तव आणि एकांगी आहेत. असं असेल तर बंदी उठवल्यानंतर पहिल्याच शर्यतीत दोन बैल जिवानिशी कसे गेले? हा प्रश्न केवळ पशु अत्याचारांचा नाही, अनेक घरंही त्यात भरडली गेली आहेत. सर्वोच्च न्यायालयानंच परत एकदा या सगळ्याला चाप लावला, हे बरंच झालं.

मोठाईकीची झिंग!
- अनिल कटारिया
पाळीव प्राण्यांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी 196क् चा भारत सरकारचा ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी अॅक्ट’ अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार बैलगाडा शर्यती मुळातच अवैध ठरतात.
‘आम्ही प्राण्यांवर अत्याचार करीत नाही, त्यांना पोटच्या पोराप्रमाणो जपतो’ वगैरे जे दावे यासंदर्भात केले जातात, ते मुळातच खोटे, अवास्तव आणि अतिरंजित आहेत. शर्यतीच्या प्राण्यांना खुराक देण्यापासून तर त्यांना मस्तवाल करण्यार्पयतचं जे काही वरवरचं चित्र दिसतं, दाखवलं जातं ते भ्रामक आहे. त्यामागची दुसरी बाजू तितकीच भयानक आहे. अगदी आत्ताचं ताजं उदाहरण. बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर दोनच दिवसांत दंगेवाडी, ता. खेड, जिल्हा पुणो येथे जी पहिलीच बैलगाडी शर्यत झाली, त्यात दोन बैलांना आपला जीव गमवावा लागला. एका फोटोग्राफरनं याची छायाचित्रं काढण्याचा प्रयत्न केला, तर त्यालाही मारहाण झाली. सगळ्या पुराव्यांची तातडीनं विल्हेवाट लावली गेली आणि माध्यमांर्पयत ही बातमी ‘फुटणार’ नाही, याचा चोख बंदोबस्त केला गेला. बैलांची मुलासारखी काळजी घेतली जाते, तर मग या खेळापायी हे बैल जिवानिशी गेले कसे?
शर्यतीत बैलांनी जीव तोडून धावावं यासाठी त्यांच्या शेपटीचे चावून चावून तुकडे केलेले मी स्वत: पाहिले आहेत. चालू शर्यतीत बैलांचे अंडकोश पिळल्याचे फोटो आणि व्हिडीओ आमच्याकडे आहेत. याशिवाय त्यांना इलेक्ट्रिक शॉक देणं, आरी टोचणं, अमानुष मारहाण करणं. हे सारे प्रकार तर नित्याचेच.
‘बैलांना आम्ही वर्षातून एकदाच शर्यतीला जुंपतो, त्यांच्यावर मुलासारखी माया करतो’ हेही थोतांडच. हेच बैल अनेक ठिकाणी शर्यतीसाठी नेले जातात. खाऊ-पिऊ घालून त्यांना टग्या केलं जातं, यामागेही बक्षिसाचा आणि मोठाईकीचा सोसच जास्त आहे. यामुळे प्राण्यांवर तर अत्याचार होतातच, शर्यतींच्या जुगाराचा नाद लागलेल्यांचं घरदारही उद्ध्वस्त होतं. ज्या घरातले लोक या शर्यतीत गुंतलेले आहेत, त्यांच्याच घरातल्या महिलांचं यासंदर्भातलं मत विचारात घेतलं, तर हे लक्षात येईल.
या बायका कळवळून आम्हाला सांगतात, ‘थांबवा हो हा खेळ. आमच्या माणसांना समजावून थांबवा, कायद्यानं थांबवा, पण थांबवा. आमच्या घरातलं घरपण या शर्यतींनी हिसकावून घेतलंय.’
बरं, शर्यतीच्या या नशेतून, व्यसनांतून मुलं तरी सुटतात का? त्यांची इच्छा असो, नसो, त्यांनाही शर्यतीच्या या घाण्याला जुंपलंच जातं. ही शर्यत पाहायला अनेक लहान मुलं आणि कॉलेजची तरुण मुलंही जातात. त्याच त्याच वातावरणात राहिल्यानं तरुण वयात ही ङिांग डोक्यात जातेच आणि त्याचं आकर्षणही निर्माण होतं. शिवाय या शर्यतींचा आस्वाद घ्यायला जाणारी मोठी माणसं! - त्यांच्याकडे कोणी जाणीवपूर्वक पाहिलंय? त्याचा अभ्यास केलाय? यातले अनेक दर्शक मद्यप्राशन करूनच या ठिकाणी येतात हे आमचं दीर्घकाळचं निरीक्षण आहे. शर्यतीचं आणि दारूचं व्यसन; दोन्हीही सारखंच आहे. घरातली एखादीच व्यक्ती दारू पीत असली तरी अख्ख्या कुटुंबाला त्याचे भोग भोगावे लागतात. शर्यतीच्या या नशेचंही तसंच आहे. ज्यांना ज्यांना या नशेची लत लागली आहे, त्यांचं अख्खं घरदारच यात भरडून निघाल्याची कैक उदाहरणं आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ प्राण्यांवरील अत्याचारांचा नाही. या शर्यतींच्या नादानं लोक कर्जबाजारी झाले आहेत.
त्यामुळेच गेली 25-3क् वर्षे या प्रश्नावर आम्ही लढतो आहोत. लोकांचं प्रबोधन करतो आहोत. या शर्यतींवर बंदी घालावी यासाठी उच्च न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ त्याचप्रमाणो मुंबई उच्च न्यायालयाकडेही आम्ही आमचं गा:हाणं मांडलं. न्यायालयानंही ते उचलून धरलं. विरोधक या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथेही आम्ही आमचे मुद्दे परत पुराव्यानिशी मांडले. मे 2क्14 ला आमच्या बाजूनंच निर्णय झाला. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयानंही सरकारला सुनावलं, प्राण्यांनाही सन्मानानं वागवा, त्यांच्यावर अत्याचार करू नका, यासंदर्भात कडक कायदे करा, दंड वाढवा. पण सरकार कायदे करण्याऐवजी, उलट आहेत ते कायदेही मोडीत काढण्याच्या मागे लागलं आहे.
सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही त्याविरोधात सरकारनं अधिसूचना काढली. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमानच आहे. सरकारच्या या अधिसूचनेला आता सर्वोच्च न्यायालयानंच स्थगिती देऊन, बैलांच्या शर्यतींनाही लगाम घातला आहे. आमच्या याच भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयानं परत एकदा शिक्कामोर्तब केलं आहे. सरकारनं कोणत्याही हिशेबानं ही अधिसूचना काढली असली, तरी नैतिकतेच्या, समाजहिताच्या, कायद्याच्या कोणत्याच परिभाषेत ती बसत नाही. आपल्या स्वार्थापायी सर्वोच्च न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रकार अश्लाघ्य आणि असमंजस असाच आहे.
शर्यत बदनाम का झाली?
महाराष्ट्र, कर्नाटकात बैलगाडी शर्यत शौकिनांची संख्या अधिक आहे. बहुतेक शेतक:यांच्या गोठय़ात बैलजोडी असल्याने शेतीच्या कामाबरोबरच गावच्या यात्र-जत्रंमधून हौस म्हणून बैलजोडी शर्यतीची परंपरा अस्तित्वात आली. प्रारंभी बक्षिसाची रक्कम कमी असली तरी शर्यतीत मानाचे निशाण जिंकणा:या बैलजोडीमुळे शेतक:याचे परिसरात नाव होऊ लागले. कालानुरूप बक्षिसांच्या रकमेत वाढ होऊ लागली. त्यामुळे शेतकरी केवळ शर्यतींसाठी खास जातिवंत बैल बाळगू लागले. आता तर अनेक कुटुंबांचा हा पारंपरिक व्यवसायच बनला आहे. त्यातूनच जिंकण्याची तीव्र ईष्र्या आणि अनेक अपप्रकारही यात शिरले.
काय आहे वस्तुस्थिती?
शर्यतीत पाठ रक्तबंबाळ होईर्पयत बैलांना काठीने बेदम मारहाण करणो, शेपटाचा चावा घेणो, टोकदार वस्तूने टोचणो, शॉक देणो आदि प्रकार होतात.
ज्या बैलाचा एरवी मुलाप्रमाणो सांभाळ होतो, त्याच्याशी शर्यतीच्या वेळी मात्र हैवानासारखी वर्तणूक ब:याचदा घडते.
शरीरावरील अत्याचार सहन होत नसल्यामुळे बैल उर फाटेर्पयत पळत राहतात. यात कित्येक जनावरे जायबंदी होतात, काही दगावतातसुद्धा!
अगदी थोडके गाडीमालक हे असले प्रकार करीत असले तरी मावळमुलखाची ऐतिहासिक शान असलेली ही परंपरा मात्र त्यामुळे पुरती बदनाम झाली आहे.
- विश्वास चरणकर
(लेखक पशुकल्याण चळवळीतील
ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.)