शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

बास्स करा की, किती मेंदू चावाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 13:34 IST

जगात ५१६ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकांच्या हाती इंटरनेटचे जाळे आहे. यातील ९२ टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात. ४७६ कोटी लोक सोशल मीडियावर आहेत. 

- पवन देशपांडे(सहायक संपादक)तुम्हाला माहितेय?जगात ५१६ कोटी इंटरनेट युजर्स आहेत. म्हणजेच जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के लोकांच्या हाती इंटरनेटचे जाळे आहे. यातील ९२ टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात. ४७६ कोटी लोक सोशल मीडियावर आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन ?नवीन हेच की, हे सगळे ४७६ कोटी लोक रोजचे ५ ते ७ तास इंटरनेटवर घालवत आहेत आणि त्यातील प्रत्येकच गोष्ट कामाची असते अशातला भाग नाही. असते का ? विचार करा...गेल्या वर्षभरात मोबाइल हातात घेऊन डोळ्यांना ताण देण्याच्या वेळेत सात मिनिटांनी वाढ झाली आहे. म्हणजे समजा तुम्ही गेल्या वर्षी सरासरी ५० मिनिटे दिवसभरात मोबाइल पाहत असाल तर आता तो वेळ ५७ मिनिटांवर गेला आहे. थोडक्यात स्क्रीन टाइम वाढला आहे. दिवसातले पाच ते सात तास गॅजेट्सवर जात असतील तर आपला वेळ वाया जातोय की काही प्रॉडक्टिव्ह गोष्ट करण्यासाठी उपयोगी पडतोय, याचा विचार सुरू झालाय. त्यामुळेच ‘डिजिटल फास्टिंग’ हा ट्रेंड रुजू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात याचा उल्लेख केला होता. उपवास करताना जसे आपण विशिष्ट अन्न घेत नाही, तसेच एक दिवस गॅजेट्सला सुटी द्यायची. डोळ्यांना, बोटांना आणि मेंदूलाही आराम द्यायचा. काहीजण काही तासांसाठी डिजिटल फास्टिंग करतात तर काही दिवसभरासाठी. काही आठवड्यातून एक दिवस करतात तर काही महिन्यातून एक दिवस. आपल्याकडे जसे विविध व्रत आहेत, तसेच या डिजिटल फास्टिंगचे व्रतही आपण करू शकतो. म्हणजेच प्रत्येक आठवड्याच्या अमूक दिवशी मी इतका तास मोबाइल पाहणार नाही, गॅजेट्सना हात लावणार नाही. करू शकाल तुम्ही हा उपवास ?बास्स करा की, किती मेंदू चावाल? थोडा डिजिटली उपवास करा... डोक्याचा ताण कमी करा...होईल का तुम्हाला हे शक्य ?दिवसातील पाच ते सात तास आपण मोबाईलवर असतो. हे मोबाईलवेड कामाचे की बिनकामाचे हे ठरवून थोडं शहाण्यासारखं वागावं लागेल...कसा कराल हा उपवास ?उपवास करताना जसे आपण विशिष्ट अन्न घेत नाही, तसेच एक दिवस गॅजेट्सला सुटी द्यायची. डोळ्यांना, बोटांना आणि मेंदूलाही आराम द्यायचा.

फायदे काय आणि कुठे ?धावेल डोकं...एखादी गोष्ट करत असताना मधेच मेसेजची टोन वाजते अन् लक्ष विचलित होते. फोन येतो आणि त्यात १०-१५ मिनिटे जातात. सोशल मीडियाचे नोटिफिकेशन येते आणि ते बघता बघता इतरही अनावश्यक गोष्टी चाळण्यात वेळ खर्ची पडतो. हातातील काम मागे राहते. हेच जर फोन बंद असता तर झाले नसते. थोडा वेळासाठी फोकस हलला नसता आणि डोकं धावायला लागले असते. चित्त थाऱ्यावर...कुणाशी चर्चा करताना मोबाइलमध्ये डोकावण्याची वाईट सवयही अनेकांना असते. अनेकांना तर मीटिंगमध्येही असे करावे वाटते. फोन घुरघुरतो आणि कुणाचा मेसेज किंवा फोन असेल याकडे लक्ष लागून राहते. मीटिंगमधला किंवा चर्चेत मन राहत नाही. चित्त थाऱ्यावर ठेवायचे असेल तर थोडा वेळ का होईना मोबाइलपासून लांब राहायची सवय लावावी लागेल. शांतता लाभेल...फोनपासून थोडावेळ दूर राहिल्याने मोकळा श्वास घेऊ शकाल. सतत फोनमध्ये राहिल्याने वाढणारा स्ट्रेस आणि अस्वस्थता कमी होईल. त्यातून शांतता लाभेल.निवांत झोपझोपण्याआधी मोबाइल पाहिल्याने डोळ्यांवर तर परिणाम होतो. झोप उडते. त्यामुळे चक्रच बदलले आणि आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागतो. 

टॅग्स :Mumbaiमुंबई