शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

बापू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 2:50 PM

बारा मर्डर नावावर होते. जेलात जायच्या आधी दहा आणि नंतर दोन. - पण लोकांचं अतोनात प्रेम. उसाच्या फडात लपवून गावागावातल्या लोकांनी त्याला भाकरतुकडा खायला घालून सांभाळलेला. जन्मठेप भोगून हा बाहेर आला, तर येरवड्याच्या जेलबाहेर लोक हारतुरे घेऊन स्वागताला...

- श्रीनिवास नागे

बारा मर्डर नावावर होते.जेलात जायच्या आधी दहा आणि नंतर दोन.- पण लोकांचं अतोनात प्रेम.उसाच्या फडात लपवून गावागावातल्या लोकांनीत्याला भाकरतुकडा खायला घालून सांभाळलेला.जन्मठेप भोगून हा बाहेर आला, तर येरवड्याच्याजेलबाहेर लोक हारतुरे घेऊन स्वागताला...उंचापुरा तगडा गडी,पांढºयाफेक झालेल्या झुपकेदार मिशा,डोईवर पिवळाधम्मक पटका,भंडा-यानं मळवट भरलेला,खांद्यावर घोंगडं, अंगात बाराबंदी-धोतर,कराकरा वाजणारं पायताण,हातात दणकट काठी आणितिच्यावर पितळी सिंह.कधीकाळी एका खांद्यालाफरशी-कु-हाडआणि दुसºया खांद्यालाथ्री नॉट थ्रीची बंदूक असायची....आता तिथं भंडाºयाची पिशवी आलेली !बाकी बापू कायबीबदलला नव्हता.मरेस्तोवर !सेगावच्या सेवागिरी यात्रेत तमाशाचे डझनावारी फड आलेले. त्यात तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडेंच्या तंबूभोवती गर्दी उसळलेली. कारण त्यावेळचा सुपर-डुपरहिट वग त्यांनी लावलेला.. ‘कृष्णाकाठचा फरारी अर्थात बापू बिरू वाटेगावकर’. बापू बिरूच्या कहाण्या ऐकून असलेली माणसं खास हा वग बघण्यासाठी आलेली. बापू बिरूच्या वेशातल्या कलाकाराची एंट्री झाली आणि शिट्ट्यांचा पाऊस पडला! त्यानं गोरगरिबांना, आयाबहिणींना केलेली मदत, त्याचे कडक डायलॉग ऐकून पब्लिक खुळं व्हायचंच राहिलं होतं... बापू बिरू वाटेगावकर नावाच्या वादळाची ती पहिली ओळख, मला झालेली.त्यानंतर काही दिवसांतच ऐकायला मिळालं की, बापू बिरू जन्मठेप भोगून आलाय. तो येरवड्याच्या जेलमधून बाहेर येतानाही त्याच्यावर फुलं उधळण्यासाठी गर्दी उसळलेली म्हणे.त्याचवेळी त्याच्याविषयी बरंचसं समजू लागलेलं. खरं तर ‘लार्जर दॅन लाइफ’ वाटावी अशी प्रतिमा समोर आलेली. पण आरेवाडीत बिरोबाच्या यात्रेत त्याची भेट झाली आणि तो डोक्यात शिरू लागला. त्यावेळी बापू बिरूचं ‘ह.भ.प. आप्पा महाराज’ नावाच्या प्रवचनकारात रूपांतर झालेलं. ते आदरार्थी संबोधन मनात अखेरपर्यंत कायम राहिलं...आरेवाडीच्या देवळात तो दिसताच लोकांचा गराडा पडला. उंचापुरा तगडा गडी, पांढ-याफेक झालेल्या झुपकेदार मिशा, डोईवर पिवळाधम्मक पटका, भंडाºयानं मळवट भरलेला, खांद्यावर घोंगडं, अंगात बाराबंदी-धोतर, कराकरा वाजणारं पायताण, हातात दणकट काठी आणि तिच्यावर पितळी सिंह. कधीकाळी एका खांद्याला फरशी-कुºहाड आणि दुस-या खांद्याला थ्री नॉट थ्रीची बंदूक असायची. आता तिथं भंडाºयाची पिशवी आलेली! बहिरी ससाण्यासारखी भेदक नजर मात्र कायम होती. देवळाबाहेर चिंचेच्या बनात बसल्यावर भीत-भीत विचारलं,‘आप्पा, हे भजन, प्रवचनाचं कुठून आलं?’तर उत्तर आलं, ‘फरारी असताना बहेच्या रामलिंग बेटावर गुरु भेटला. माळ घातली आन् वारकरी पंथाला लागलो... जेलात असताना तर ह्ये वाढलं. भजन कराय लागलो. अभंग-ओव्या पाठ झालत्या. जन्मठेप भोगून भाईर आल्यावर तेच लोकांना सांगतोय. तरणीताठी पोरं दारू-व्यसनं करून बाद व्हत्याती. त्यांना सुधराय लागलोय...’- हे रसायन जरा अजबच असल्याचं त्यावेळी लक्षात आलं.वाळवा तालुक्यातलं कृष्णाकाठचं बोरगाव हे बापू बिरूचं गाव. घरात गरिबी, पण धनगर समाजातल्या, पैलवानकी करणाºया बापूनं पहिला मुडदा पाडला १९६६ मध्ये. निमित्त होतं, गावगुंडांच्या मुजोरीचं. गावातल्या रंग्या शिंदेनं कहर केलेला. त्याची गावातल्या पोरीबाळींवर वाईट नजर. कुणाच्याही पदराला हात घालायचा. लोकांच्या परड्यात जे दिसेल ते पळवायचा, दाब दाखवून न्यायचा. त्यातून त्यानं टग्यांची ‘गँग’च केलेली. गावातलं कुणीच विरोध करायचं धाडस दाखवत नव्हतं. एकदा तर त्यानं लग्न झालेल्या तरण्या पोरीला ती बधत नाही म्हणून गळा दाबून मारलं. नंतर तिघी-चौघी बायका बापू बिरूकडं आल्या आणि त्यांनी रंग्याचा बंदोबस्त करायचं साकडं घातलं. बंदोबस्त झाला नाही तर नदीत जीव देऊ, असं सांगून गेल्या. बापूनं लोकांना सांगितलं; पण रंग्याच्या दहशतीनं कुणीच पुढं आलं नाही. शेवटी चिडलेल्या बापूनं रंग्याला संपवायचं ठरवलं. गणपतीत ओव्यांचा कार्यक्रम सुरू असताना चाकूनं रंग्याचा कोथळा काढला! मग हा बहाद्दर फरारी झाला....आणि सुरू झालं रक्तरंजित भयपर्व!!रंग्याच्या पंचनाम्यावेळी त्याच्या भावानं रक्ताचा टिळा लावून बापूला खलास करण्याची शपथ घेतली. ते समजताच बापूनं त्याला गावच्या शिवेवर तोडला. त्या दोघांच्या मामानं भाच्यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंदुकीचं लायसन मिळवलं; पण बापूनं पोलीसपाटलाच्या मदतीनं त्याला ताकारीच्या बसस्टॅण्डवर गोळ्या घातल्या. विशेष म्हणजे, ही बंदूक पोलिसांकडूनच हिसकावून आणलेली!‘ह्यो बत्तीस दातांचा बोकड आडवा केलाय, आजपास्नं अन्याय, अत्याचार, दादागिरी करणाºयांची या बापूच्या हातनं हीच गत हुईल’ - बापूनं जाहीर केलं.बापूनं अन्यायाविरुद्ध लढायचा जणू पणच केला. गावगुंड आणि खासगी सावकारी संपवायचा निश्चय केला. गरिबांना, आया-बहिणींना त्रास देणा-यांचा काटा काढण्याचा विडा उचलला. मग एकेक करत साथीदार जमा झाले. त्यातल्या काहींवर असाच अन्याय झालेला, तर काहीजण बापूची वाढती ताकद बघून आलेले. त्यात तरणी पोरंही होती. जिवाला जीव देणारी.बापू बिरूच्या जिभेवर अभंग जसे येत, तशा शिव्याही नाचायच्या. राग आणि लोभ दोन्ही व्यक्त करताना आपसूक शिवी येणारच, हे या मातीचंच गुणवैशिष्ट्य.सांगलीतल्या संजयनगरात पारायण सोहळ्यात प्रवचनासाठी आलेल्या बापू बिरूची दुस-यांदा भेट झाली. मिशीवर अलगद हात फिरवून बापू म्हणाला,‘म्या बारा मर्डर केलं. जेलात जायच्या आधी धा आन् नंतर दोन. पन कधी दुसºयाच्या बाईकडं वाकड्या नजरेनं बघितलं न्हाय.आमच्यात दारू पेणारं कुणी नव्हतं. चोरी आन् दरोडा ह्यापास्नं लांब राह्यचं, खंडणी मागायची न्हाय, असा दंडक हुता...’- पारायणासाठी जमलेले सगळे कान टवकारून ऐकत होते. काहीजण येऊन ‘माउली’ म्हणत पाया पडून जात होते. मधूनच दोघीजणी आल्या, बापूला ओवाळू लागल्या. त्यातली एक बोरगावशेजारच्या जुनेखेडची. तिच्या आईचं नांदणं बापूमुळंच सुरू झालेलं....‘जुनेखेडच्या एकीला सासू-सासरा छळायचीत. बारशात मानपान झाला न्हाई म्हणून उपाशी ठेवायचीत. ते कळल्यावर गेलो घरात. सगळ्यांना दम भरला. सासºयाला तडाखं दिलं. बंदूक दावली. सगळी गप्पगार. तवापास्नं छळ बंद झाला. तिची ही पोरगी...’ - बापूनं खुलासा केला.पोलीस रेकॉर्डवर बापू फरारी असला तरी गावकºयांना मात्र तो भेटायचा. पोलिसांनी त्याच्या आईला, बायकोला, भावाला आत टाकलं. पण बापू सापडला नाही. कसा सापडणार? बोरगाव, ताकारी, मसुचीवाडी, रेठरेहरणाक्ष या गावांच्या आसपास उसाची चिक्कार शेती. त्यात तो लपायचा. सोबतीला असलाच तर एखादा साथीदार अन्यथा एकटंच राहायचं, असं त्याचं तंत्र होतं. बापू आपल्यासाठी काम करतोय म्हटल्यावर लोक गाºहाणी सांगायला यायचे. कुणाचं कर्ज फेडायचं असायचं, तर कुणाची जमीन सावकाराकडून सोडवायची असायची. घरातली वाटणीची भांडणं असायची आणि भावकीतला बांधाला-बांध लागून झालेला वादही असायचा. बायाबापड्याही यायच्या. कुणाला सासू-सासरा नांदवायचा नाही, तर कुणाला हुंड्यापायी नवरा छळायचा. तरण्याताठ्या पोरी गावगुंडांच्या छेडछाडीला त्रासलेल्या असायच्या. नुकताच संसार सुरू झालेल्या पोरींचे आई-बाप यायचे. त्यावर बापू ‘न्याय’ द्यायचा!बाया-बापड्यांना त्रास द्यायचा नाही, खंडणी मागायची नाही, चोरी-दरोड्याच्या वाटेला जायचं नाही, दारू प्यायची नाही, हा दंडक बापू बिरूनं पाळला, साथीदारांना पाळायला लावला. त्याविरुद्ध जाणाºयांना शिक्षा ठरलेलीच. पण स्वत:चं थोरलं पोरगंच ही वाट चुकलं. दारू प्यायला लागलं, घरात दंगा करायला लागलं, पोरीबाळींची छेडछाड करायला लागलं, तेव्हा बापूनं त्यालाही गोळ्या घातल्या!!...काहींच्या पायांच्या नडग्या काठ्यांनी फोडल्या, तर काहींच्या हातावर कुºहाड बसली. काहींना गावाबाहेर नेऊन मुका मार दिला, तर काहीजण नुसता दम भरला तरी सुतासारखे सरळ व्हायचे. सगळं मार्गी लागायचं... कामं झालेल्या लोकांनी बापूला प्रचंड माया लावली. बापूही त्यांच्या घरात जाऊन हक्कानं भाजी-भाकरी मागायचा. शिवारात झोपायचा. पण आज कुठं जेवणार, कुठं झोपणार हे कुणालाच आगावू कळवायचं नाही, एवढी काळजी घ्यायचा. कायम सावध. त्यामुळं दगाफटका शक्य नव्हता.पोलिसांच्या ससेमिºयामुळं घराकडं जाणं शक्य नव्हतं. बापू लोकांच्या जिवावरच फरारी काळ रेटत होता. या काळात बापू बिरू आणि साथीदारांवर खुनांच्या मालिकांची नोंद पोलीस दप्तरी झाली. एव्हाना बापूचं नाव आसपासच्या चार-पाच जिल्ह्यांत झालं होतं. तिथले नामचिन गुंड बापू बिरूचं नाव घेतलं की चळाचळा कापायचे. सरकारनं फरारी बापूला पकडण्यासाठी वीस हजाराचं इनाम जाहीर केलं.इकडं कृष्णाकाठावर मात्र ‘सत्यधर्माचा भाऊ माझा, वाळवं तालुक्याचा राजा’ यासारख्या ओव्या ऐकू येत होत्या! शाहीर त्याच्यावर कवनं रचायचे!!‘पांडुरंगावर जीव असल्यानं पंढरीला जायचो. फरारी असताना वेश बदलून पार काशी, वैष्णोदेवीला जाऊन आलो. पोलिसांना चकवा देऊन वारी करून आलो. लय हिंडलो. नंतर दाढी वाढवली. रानात, कड्याकपारीत, डोंगरात, जंगलात राह्यचं. लोकांनी आणलेली कामं करायची, त्यांनी दिलेली भाकरीच खायची. हेच शेवटपर्यंत सुरू व्हतं...’ - बापू बिरू सांगत होता. पण तो पकडला गेला.शेजारच्या कºहाड तालुक्यातल्या तांबव्याच्या विष्णू बाळाचं नाव जुन्या काळात बापू बिरूनं ऐकलं होतं. तोही गरिबांचा ‘रॉबीनहूड’. अन्यायाविरोधात पेटून उठून त्यानंही मुडदे पाडलेले. तोही फरारी होता. त्यालाही लोकांनी प्रेम दिलं, जपलं. पुढं त्यानं पोलिसांसमोर शरणागती पत्करली; पण त्याला शिक्षा झाली. नंतर त्या भागातली गुंडगिरी आणखी फोफावली. बापूला हे माहीत असल्यानं तो हत्यारं टाकायला राजी नव्हता. पंचवीस वर्षं त्यानं पोलिसांना गुंगारा दिला. मदन पाटील या चाणाक्ष पोलीस निरीक्षकानं खबºयांकरवी माहिती काढून जुनेखेड-नवेखेडच्या रानात बाभळीखाली झोपलेल्या बापूला गराडा घातला. तेव्हाच बापूनं हत्यारं खाली ठेवली.तारीख होती, २६ मार्च १९९०.बापूच्या अटकेच्या काळातही काही कमी थरार नव्हता.वाळव्याच्या शिगावचा कुख्यात गुंड रवि पाटील बापूचा साथीदार बनला होता. बापूला सुरुवातीला कळंबा जेलमध्ये ठेवलं होतं. सांगलीला न्यायालयात तारखेसाठी आणलं जायचं. एकदा सुनावणीनंतर दोघे पोलीस एसटी बसमधून बापूला कोल्हापूरला नेत होते. तमदलगेजवळ बसवनखिंडीत बसच्या आडवी जीप लावून रवि पाटील साथीदारांसह बसमध्ये शिरला आणि पोलिसांना बंदुका दाखवून बापूला पळवून नेलं, बेड्यांसकट! पण नंतर लगेच पोलिसांनी उमदीजवळ बापूला जेरबंद केलं. पुढं बापूवर खुनाचा केवळ एक गुन्हा शाबूत झाला आणि जन्मठेप लागली. बापू बिरूचा दरारा वाढला असताना त्याच्या नावावर काहींनी खंडणी मागायला सुरुवात केली, साथीदार म्हणवून घेणाºयांनी गुंडगिरी सुरू केली. त्यातल्या काहींना बापूनं ‘थंड’ केलं, तर काहींना कायमची अद्दल घडवली. पुढं बापूला शिक्षा झाल्यावर साथीदार विखुरले. त्यातल्या कुणी ‘सुपाºया’ घेणं सुरू केलं, तर कुणी अवैध धंदे सुरू केले...जन्मठेपेनंतर बाहेर आल्यावर बापू अध्यात्माच्या मार्गाला लागला. एका पोलीसपाटलानं दिलेल्या जमिनीच्या तुकड्यावर गुजराण सुरू होती. पण पुढची पिढी गुन्हेगारीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडली नाही. अलीकडं त्याच्या दुसºया मुलावर आणि सुनेवर हल्ला झाला, तर एका नातेवाईक बाईकडं वाईट नजरेनं बघणाºयाला संपवण्यासाठी बापूला पुन्हा हत्यार हाती घ्यावं लागलं...तो धारेवरच जगला कायम.ताठ होता शेवटपर्यंत. डॉक्टरांना गुडघे बदलू दिले तेवढेच!बापूचं आयुष्य सोपं नव्हतंच कधी. त्याला झेपलंच नसतं ते सोपेपण कदाचित....पण या वादळानं ऐन तारुण्याच्या बेहोशीत मिळवलेली आणि शिक्षा भोगून आल्यानंतर परमार्थाला लागून साठवलेली लोकांची माया अफाट होती. त्याचा प्रत्यय त्याच्या अंत्ययात्रेत आला.बापूला अखेरचा निरोप द्यायला बोरगावचे रस्ते गर्दीनं फुलले होते...