बाळासाहेब
By Admin | Updated: October 24, 2015 18:45 IST2015-10-24T18:45:23+5:302015-10-24T18:45:23+5:30
पुष्कळ दिवसांनी मग बाळासाहेब परत एकदा आले. आले ते त्यांच्या खास शैलीत झपझप आले नि एकदम म्हणाले,

बाळासाहेब
चंद्रमोहन कुलकर्णी
पुष्कळ दिवसांनी मग बाळासाहेब परत एकदा आले. आले ते त्यांच्या खास शैलीत झपझप आले नि एकदम म्हणाले,
‘‘ह्या महिन्यात सुरू करू आपण काम. तुमच्या काय टर्म्स?’’ माङया काही फारशा टर्म्स-कंडिशन्स वगैरे नव्हत्या. बाळासाहेबांबरोबर काम करायला मिळणार ह्या गोष्टीचाच मला आनंद होता. तसं मी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘ते ठीक आहे, पण तुमच्या ज्या काही फीज वगैरे असतील, त्याबद्दल बोलून घेऊ आपण. कारण, एकदा ठरलं की वर्षभर तरी किमान काम करावं लागेल. काही कमिटमेंट्स कराव्या लागतील.’’
माङया काही फारश्या अटी नसल्याने व्यवहाराच्या चार गोष्टी ठरवून आम्ही लगेचच काम सुरू केलं.
मला वाटलं होतं तेवढं मात्र काम काही ग्रेट निघालं नाही, कारण : कंपनी!
ब:याच वेळेला आपण सरकारी कामांना नावं ठेवतो. वेळकाढू धोरणामुळे ते पुष्कळदा तसं, नावं ठेवण्यासारखं असतंही. पण हाऊस जर्नलच्या वगैरे कामांच्या बाबतीत, कंपन्यांच्या बाबतीतही फारशी वेगळी परिस्थिती असते असे नाही. तिथेही ब:यापैकी वेळकाढूपणा चालतो. निर्णय लवकर होत नाहीत. मीटिंगाच लवकर होत नाहीत, पुष्कळ गोष्टी! आम्ही ज्या कंपनीचं काम करत होतो, ती होती हडपसरला! काम करायचं जेव्हा ठरलं, तेव्हा ते मासिक स्वरूपाचं करायचं, असं ठरलं होतं. दर महिन्याला सोळा पानांचं एक मासिक.
कंपनीतल्या महत्त्वाच्या घटना, निरनिराळ्या ुडिपार्टमेंटमधल्या घडामोडी. कंपनीला मिळालेल्या विशेष ऑर्डर्स, कंपनीला मिळालेलं एखादं पारितोषिक, एखाद्या कर्मचा:यानं केलेली विशेष कामगिरी अशा प्रकारचा मजकूर त्यात प्रसिद्ध केला जाई. शिवाय कंपनीच्या कामात सुधारणा व्हाव्यात, उत्पादन जास्त व्हावं ह्यासाठीच्या नव्या नव्या कल्पना, ध्येयधोरणांमधले बदल, कामगारवर्गाच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यविषयक बाबतीतले लेख, कंपनीत दाखल झालेल्या एखाद्या नव्या यंत्रची तांत्रिक माहिती, त्या-त्या महिन्यातल्या विशेष कामगिरी करणा:या एखाद्या कर्मचा:याचा सत्कार, आणि अगदी छोटंसं एक संपादकीय; असा सगळा भरगच्च मजकूर प्रत्येक महिन्याला तयार करायचा आणि चांगल्या आर्टवर्कसह तो त्या अंकात छापायचा असा तो सगळा मिळून कार्यक्रम असायचा !
कंपनीनं ह्या कामासाठी काही वेगळे विशेष ऑफिसर्स नेमले होते, अशातला भाग नव्हता. मात्र विभागाचं हे काम. त्यामुळे तिथले हेड आणि इतर काही मंडळी हे काम बघत. ते त्यांच्या नेहमीच्या इतर कामांमधनं वेळ काढून (वेळप्रसंगी विशेष वेळ देऊन!) हे काम करीत.
काम वरवर पाहता साधं दिसत असलं तरी सोपं नसायचं. सतरा भानगडी! अनेक फोटो, खूप फायली, चिठ्ठय़ा-चपाटय़ा, पत्रं अशा अनेक गोष्टींनी बाळासाहेबांचं ऑफिस भरलेलं असायचं. नेमक्या वेळी नेमका फोटो आणि नेमका मजकूर सापडणं महामुश्कील व्हायचं कधीकधी! महिन्यातनं दोनतीनदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळ कंपनीत जाऊन बाळासाहेब तो सगळा पसारा घेऊन यायचे. दिवसरात्र खपून मजकूर, संपादकीय लिहून काढायचे, त्या-त्या मजकुराबरोबर छापण्यासाठीचे दोन-तीन फोटो त्याला टोचून ठेवायचे.
एखादा फोटो बघून मी म्हणायचो, ‘‘बाळासाहेब, हा फोटो चांगला नाही येणार प्रिंटिंगला.’’
फोटो हातात घेऊन निरखून बाळासाहेब म्हणत, ‘‘येस, यू आर राइट. आपण दुसरा मागवू!’’
मग त्या फोटोला पर्याय म्हणून दुसरा फोटो मागवला जाई. त्याबरोबर मग इतरही फोटोंची छाननी होऊन त्यातही बदल केले जात. मग बाळासाहेबांची आणखी एक चक्कर कंपनीत!
कधी कधी बाळासाहेब वैतागून जायचे. म्हणायचे, ‘‘ह्या असल्या कामाला माणूस ठेवूनही चालत नाही. आपल्यालाच जावं लागतं!’’
बाळासाहेब म्हणत ते खरंच होतं. ही असली कामं दुस:या कुणावर सोपवून चालत नसतं. प्रिंटिंगच्या क्षेत्रतली माहिती असणा:या माणसालाच ते सगळं करावं लागतं. बाळासाहेबांना पिंट्रिंगच्या क्षेत्रतली चांगलीच जाणकारी होती. त्यामुळे त्यांनाच स्वत:ला ते सगळं करावं लागायचं.
सगळे फोटो, मजकूर, पत्रं, संपादकीय आणि इतर सगळं लिखाण, मीटिंग्ज, गाठीभेटी, अॅप्रुव्हल्स, आर्टवर्क्स ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन अंक छापून हातात येतो न येतो, तोच लागलीच दुस:या अंकाची तयारी करायला लागायची!
सगळ्या आर्टवर्क्सना मला तीन-चार दिवस पुरेसे होत, पण बाळासाहेबांचे मात्र जवळजवळ वीसएक दिवस तरी ह्या भानगडीत नक्कीच जात. बाळासाहेब कंटाळलेत, हे लवकरच लक्षात आलं, ते त्यांच्या नव्या प्रस्तावावरून!
मला एके दिवशी म्हणाले, ‘‘चंद्रमोहन, हाच अंक आपण द्वैमासिक ठेवला तर?’’ मी दुजोरा दिल्यावर मग कंपनीकडे तसा प्रस्ताव ठेवून मासिकाचं रूपांतर द्वैमासिकात झाल्ं.
द्वैमासिक झालं म्हणून काम निम्मं कमी झालं आणि व्याप कमी झाला असं मात्र बिलकुल झालं नाही. ताण किंचित हलका झाला, एवढेच. महिन्याभराचं काम दीड एक महिन्यात करायला लागलो आम्ही आणि पृष्ठसंख्या? ती वाढली होती! सोळा पानांची आता अगदी दुप्पट बत्तीस पानांची झाली नसली, तरी चोवीस मात्र नक्कीच झाली होती.
वेळ गेला, तसं हळूहळू त्या सगळ्याचं मग एक गणित बसत गेलं. कामाची सवय झाली. कंपनीतली माणसं ओळखीची झाली, सहकार्याची भावनाही वाढीस लागली आणि आमच्या त्या हाऊस जर्नलला एक छान रूप आलं. अंकानं बाळसं धरलं, बाळ एका वर्षाचं झालं.
हे बाळ वर्षाचं झाल्यावर बाळासाहेब खूश झाले. म्हणाले,
‘‘आणखी एका कंपनीची ऑफर आलीय. करायचं का आणखी एक मासिक?’’
मी तयारच होतो. माङो काही फार दिवस त्यात जात नसत. अजून एखाद्या हाऊस जर्नलचं काम करणं माङया दृष्टीनं फारसं कठीण नव्हतं.
बाळासाहेबही माङया कामात लक्ष घालत नसत. मला त्यांनी अगदीच फ्री हॅँड दिला होता. ढवळाढवळ तर बिलकुलच नव्हती. डिझाइनिंगच्या बाबतीत उदार दृष्टिकोन होता त्यांचा! कंपनीकडूनच उलट कधी कधी त्रसदायक सूचना येत. तेव्हा तर कंपनीत जाऊन माङया वतीनं वाद घालत. प्रसंगी माझी बाजू घेऊन वाद घालत. पण हे वाद कलात्मक गोष्टींसाठी असत. त्यामुळे विकोपाला गेले नाहीत. कंपन्यांनाही मग पुढे आमच्या कामाची सवय होत गेली.
आणखी एक दोन कंपन्यांची कामं आणि रोटरी क्लबची एखादी छोटी वार्तापत्रिका अशी काही नियतकालिकांची नियमित कामं आम्ही एकत्र करू लागलो आणि बाळासाहेबांच्या आणि माङयामध्ये असलेल्या व्यावसायिक संबंधांना मैत्रीच्या नात्याचं छानसं रूप लाभलं. माङया वडिलांच्या वयाच्या बाळासाहेबांशी माझी मैत्री झाली. स्वच्छ, हसरी मैत्री.
माङया स्टुडिओत एकदा सूट घालून आले. टकाटक, वुलन सूट, सुरेखसा टाय, चकाचक बूट. आले आणि दरवाजात उभे राहिले.
म्हणाले,
‘‘आय अॅम सॉरी, चंद्रमोहन. ह्या अशा कपडय़ात मला तुमच्याकडे यावं लागतंय, पण मी येऊ का आत? काल राहिलेलं थोडं काम पूर्ण करू. चालेल का?
मी म्हणालो, ‘‘खरं तर नाही चालणार, पण या तुम्ही. एखाद्या वेळेला आपण करून बघू ट्राय! पण तुम्ही अशा कपडय़ात अध्र्या तासाच्या वर बसू शकाल आणि काम करु शकाल, असं मला वाटत नाहीये, बाळासाहेब!’’
अर्धा तास कशाला, काम सुरू केल्यापासून दहाव्या मिनिटालाच बाळासाहेब त्यांच्या त्या खास शैलीत झपकन उठून उभे राहिले आणि म्हणाले,
‘‘यू आर राइट, चंद्रमोहन! ह्या रोटरीच्या कपडय़ात काही माझं मन लागत नाहीये, मी जातो. घरी जाऊन कपडे बदलून येतो!’’
अध्र्या पाऊण तासातच बाळासाहेब परत आले. झकास रंगीत टी शर्ट घालून ! तसेच झपकन आले, खुर्चीवर ऐसपैस बसले, तास दोन तास मनसोक्त काम केलं आणि झपकन निघूृनही गेले!
माङया आयुष्यातही बाळासाहेब झपकन, थेट आले, नि निघूनही गेले, तेवढय़ाच झपकन ! (समाप्त)
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)
chandramohan.kulkarni@gmail.com