शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

‘अवेंर्जस’चा ‘एंडगेम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 06:05 IST

मल्टीफ्लेक्समध्ये चोवीस तास शो सुरू आहेत. मध्यरात्री, पहाटेही हा सिनेमा बघायला लोक रांगा लावताहेत. तरुण पोरं तर पार वेडावली आहेत.  आपल्याला ‘स्पॉयलर्स’मिळू नयेत म्हणून  तिकीट मिळेपर्यंतचे दिवस चक्क ‘ऑफलाईन’ काढणार्‍या  तुमच्या आजूबाजूच्यांची संख्या मोजून पाहा.. थक्क व्हाल! अख्ख्या जगाला एकाच वेळी  इतकं वेड लावणार्‍या या सिनेमात आहे तरी काय?

ठळक मुद्देआजच्या तरुण भारतीय प्रेक्षकांचे नायक वेगळे आहेत,  आणि ते ‘तिकडचे’ आहेत.. का?

- पवन गंगावणेतुम्ही हा सिनेमा बघितला असेल किंवा नसेल, पण गेल्या तीन दिवसात ‘अवेंर्जस : एंडगेम’ हे नाव तुमच्या नजरेखालून एकदा तरी गेलंच असेल, कारण सगळीकडे याच सिनेमाची चर्चा सुरू आहे. चर्चा आहे एक तर सिनेमातल्या अफलातून दृश्यांची, त्यात घडणार्‍या घटनांची आणि बॉक्स ऑफिसवर सुरू असलेल्या त्याच्या घोडदौडीची.  मागच्या वर्षी आलेल्या  ‘अवेंर्जस : इन्फिनिटी वॉर’चा पुढचा भाग असलेल्या एंडगेमच्या प्रदशर्नावर जगभरातल्या प्रेक्षकांची नजर खिळलेली होती. 26 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे अँडव्हान्स बुकिंग अमेरिकेत तब्बल 24 दिवस आधी सुरू झाले आणि अवघ्या काही तासातच जवळपास सगळ्या ई-तिकीट वेबसाइट्सचे सर्व्हर अक्षरश: क्रॅश झाले. भारतातही परिस्थिती वेगळी नाही. या सिनेमाने पहिल्यांदाच सगळ्या मल्टिफ्लेक्स थिएटर्सना चोवीस तास शो लावायला भाग पाडले आणि मध्यरात्रीनंतरच्या, अगदी पहाटेच्या शोचीदेखील तिकीटे मिळवताना मारामारी व्हायची वेळ आली. अखेर 26 एप्रिलला सिनेमा प्रदर्शित झाला आणि अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर एका मागोमाग एक रेकॉर्ड तोडून बख्खळ कमाईचा धुमाकूळ या सिनेमाने जगभरात चालू ठेवला आहे. सगळे भेदाभेद उल्लंघून अख्ख्या जगाला एकाचवेळी इतकं वेड लावणार्‍या या ‘एंडगेम’मध्ये असं आहे तरी काय?अमेरिकन संस्कृतीत आपल्यासारख्या पौराणिक कथांची रेलचेल नाही. देवी-देवता, त्यांचे अवतार, चमत्कार नाहीत. जी गोष्ट त्यांच्या संस्कृतीने पुरवली नाही ती त्यांनी स्वत: निर्माण केली. त्यामुळे प्राचीन काळातले चमत्काराचे रेफरन्स त्यांच्या कथेत लागू न होता एखाद्या व्यक्तीत अशा शक्ती कशा असू शकतात याची उत्तरं वैज्ञानिक दृष्टिकोनातून शोधण्याचा प्रय} करण्यात आला. अमेरिकेकडे महाकाव्यं नाहीत पण कॉमिकबुक्स आणि ग्राफिक नॉव्हेल आहेत, त्यांच्याकडे अवतारी पुरुष नाहीत पण सुपरहिरो आहेत. ‘स्टार वॉर्स’ ही त्या अर्थाने अमेरिकेची ‘मॉडर्न मायथॉलॉजी’!2008 साली मार्व्हल स्टुडिओजने ‘आयर्न मॅन’ हा त्यांच्या पूर्वनियोजित ‘युनिव्हर्स मधल्या पहिला सिनेमा रिलीज केला आणि मरगळ आलेल्या सुपरहिरो प्रकारात नवसंजीवनी फुंकली. हळूहळू  ‘आयर्न मॅन’चा आणखी एक भाग, ‘द इंक्रेडीबल हल्क’,  ‘थॉर’,  ‘कॅप्टन अमेरिका’ यांचे स्वतंत्र सिनेमे आले आणि 2012 मध्ये ही सगळी पात्रं  ‘अवेंर्जस’मध्ये एकत्र आली. आजवर हे सुपरहिरो फक्त कॉमिकबुक आणि कार्टून्समध्येच एकमेकांच्या कथात शिरून क्रॉसओव्हर करायचे. सिनेमाच्या पटलावर एकमेकांच्या जगात ही पात्रं पहिल्यांदाच एकत्र श्वास घेत होती. जिथे वॉर्नर ब्रदर्स, ट्वेन्टीएथ सेंच्युरी फॉक्स, सोनी पिर्स एका सिनेमातून एकाच सुपरहिरोची कथा सांगत होते, तिथे मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये पात्रं एकमेकांच्या सिनेमात छोटे-मोठे कॅमिओ करत होते. सुपरहिरो सिनेमातल्या कथा ही फक्त पलायनवादी करमणूक असते हे लेबलसुद्धा गेल्या दोन दशकात काहीसं पुसलं गेलं. पौगंडावस्थेत युवकांच्या शरीरात होणार्‍या बदलांना रूपक म्हणून दाखवणारे  ‘स्पायडरमॅन’,  ‘एक्स-मेन’ सिनेमे असोत, अमेरिकेच्या राजकीय धोरणांवर सुप्तपणे टीका करणारे  ‘आयर्न मॅन, ‘कॅप्टन अमेरिका’चे सिनेमे असोत किंवा वणर्भेद, लिंगभेदाच्या विरुद्ध बंड पुकारण्यासाठी खास डिझाइन केलेले ‘ब्लॅक पँथर’ किंवा ‘कॅप्टन मार्व्हल’ असोत, करमणुकीसोबतच राजकीय भाष्य करण्याचं कामसुद्धा मार्व्हलचे सिनेमे वेळोवेळी करत आले आहेत. जगभरचे प्रेक्षक एमसीयूच्या प्रत्येक सिनेमाची उत्कंठेने वाट पाहतात, तिकीट खिडकीवर गर्दी तर करतातच; पण यासोबतच सिनेमातला सस्पेन्स माहीत होऊ नये, किंवा दुसर्‍या प्रेक्षकांचा अनुभव खराब होऊ नये म्हणून रिलीजनंतर इंटरनेटपासून लांब राहाणं, सिनेमा स्पॉइल न करण्याचा अलिखित नियम पाळणं,  ‘स्पॉइलर देणार नाही’ अशी वचनं/आणाभाका देणं-घेणं यासारख्या काही अनोख्या सवयी या फॅन्सनी शिस्तीने अंगीकारल्या आहेत. सिनेमाविषयीच्या या अनोख्या भक्तिभावानं जग अक्षरश: अचंबित आहे आणि ज्यांना यामागच्या भावना कळत नाहीत ते या एकनिष्ठ फॅन्सची टरही उडवतात. प्रत्येक सिनेमासोबत प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा त्यांचा प्रय} होता. सूक्ष्म निरीक्षणशक्ती असलेल्या चाहत्यांसाठी सिनेमात ईस्टर एग्स ठेवले जाऊ लागले, सिनेमाच्या शेवटी लोकांना बसवून ठेवायला भाग पाडणारे मिड क्रेडिट, एंड क्रेडिट सीन्स घालायची सवय मार्व्हल स्टुडिओजने पहिल्या सिनेमापासून लावून घेतली होती. हळूहळू हे आभासी जग, त्यातली पात्रं, कथा सगळं खरं भासायला लागलं. अनेक वर्षांनंतर खरोखर स्वत:ला हरवून देता येईल असं जग रचण्यात मार्व्हल स्टुडिओजचे निर्माता केविन फायगीला यश आलं होतं आणि प्रेक्षकांनी मनोभावे या नव्या जगाला स्वीकारलं. ज्याप्रकारे स्टार वॉर्सला आजही अमेरिकेच्या पॉपकल्चरमध्ये महत्त्वाचं स्थान आहे तसंच आजपासून पन्नास वर्षानंतरही मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स-एमसीयूच्या सिनेमांना मानाचं स्थान राहील, हे नक्की! पण एका अमेरिकन सिनेमाबद्दल भारतीय तरुणांमध्ये इतकं आकर्षण, इतकं कुतूहल का आहे? - हा प्रश्न खरंच विचार करायला भाग पाडतो.  भारतात धर्म आणि देवपूजा यांच्याकडे लोकांचा ओढा आहे. देवी-देवतांच्या चमत्काराच्या कहाण्या वाचत-ऐकतच भारताने एकविसाव्या शतकात पाऊल टाकलं. या मूल्यांमधून व्यक्तिपूजेचा जन्म झाला. यामुळेच देशात अमिताभ, रजनीकांत यांची मंदिरे दिसून येतात, दरवर्षी शाहरूखच्या वाढदिवसाला मन्नतला गर्दी जमते, सलमान भारी की शाहरूख? - या विषयावरून त्यांच्या फॅन्समध्ये हाणामार्‍या होतात. दोनवेळेच्या अन्नाची भ्रांत असलेला फॅन शरीरावर तिरंगा पेंट मारून सचिनला सपोर्ट करण्यासाठी सगळ्या मॅचेसमध्ये हजेरी लावतो. भारतीयांना मुळातच लार्जर दॅन लाइफ पात्रांची फार आवड आहे. र्मयादापुरुषोत्तम राम, करंगळीवर संजीवनी पर्वत घेऊन उडणारा हनुमान, शेकडोंशी एकटाच लढणारा भीम ते पार सत्तरच्या दशकातला गरिबीशी लढत मोठा माणूस बनणारा अमिताभ, नव्वदच्या दशकात ‘सातो को साथ, एकसाथ’ मारणारा बंडखोर सनी देओल ते पार आताचा ‘आली रे आली, आता तुझी बारी आली’ म्हणणारा इमानदार पोलीस बाजीराव सिंघम.. भारताने या प्रत्येक पात्रात कधी ना कधी स्वत:ला शोधलं आहे. दु:खाचा कधी ना कधी अंत होतो, शेवट नेहमी चांगला होतो या कल्पना र्शमजीवी ते मध्यमवर्गीय लोकांच्या दु:खावर नेहमी फुंकर घालत आल्या आहेत. त्यामुळे भावनिक आवाहन करणार्‍या आणि वाईटावर चांगल्याचा विजय सांगणार्‍या गोष्टी आपल्याला खूप आवडतात. हा सगळा मसाला सुपरहिरो सिनेमांमध्ये पुरेपूर असतो.आपल्याकडे मुळातच तंत्रज्ञानात रस असलेली युवा पिढी मोठय़ा प्रमाणात आहे. आपल्याकडे इंग्रजी हा कधीच अडथळा नव्हता. आंतरराष्ट्रीय कलाविष्कारांचं एक्सपोजर न मिळणं हीच आजवरची अडचण होती. भारतात झालेल्या डिजिटल क्रांतीने ती अडचणही मिटवली. परिणामी भारतातून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअँप, यू-ट्यूब या सर्वच कंपन्यांना प्रचंड ट्रॅफिक लाभलं. हे पॅटर्न लक्षात घेत नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडीओसारख्या ओव्हर द टॉप (ओटीटी) सर्व्हिसेस भारतात आल्या. जोडीला हॉटस्टार, वूट, झी-5, इरॉस नाऊसारख्या भारतीय बनावटीच्या सर्व्हिसेससुद्धा सुरू झाल्या. भारतातही रा.वन, क्रिश, भावेश जोशी, द्रोणासारखे सुपरहिरो सिनेमे बनविण्याचे प्रय} झाले; पण क्रिशचं उदाहरण वगळता इतर सिनेमे तिकीट खिडकीवर अपयशीच ठरले. हॉलिवूडचे सिनेमे पाहिल्यानंतर आपल्याकडच्या अँक्शन, सायफाय फिल्म्स बालीश वाटायला लागतात. खरं तर नेहमीच्या भारतीय सिनेमातले नायक हे एक प्रकारचे सुपरहिरोच असतात. अनेक गुंडांना मारणारे, डायलॉगबाजी करणारे, हिरोइनला पटवून डान्स करणारे.. भारतात अनेक वर्षं या हिरोंना आयडियलाइज केलं गेलं, पुढेही केलं जाईल. कारण अशा सिनेमाचं पर्व कोणत्याच अर्थाने थांबलेलं दिसत नाही; पण आता जाणकार प्रेक्षकांना त्यांच्या बुद्धिमत्तेला खिजगणतीतही न धरणार्‍या मठ्ठ सिनेमांचा कंटाळा आलाय. आजच्या पिढीला भारतीय मायथॉलॉजीशी जोडून घेणं अवघड जातं. अवतारी पुरुषांच्या कथेशी त्यांना रिलेट करता येत नाही आणि मग ते महाभारतात एका बाणाचे शंभर बाण होताना दिसले की खळखळून हसतात. कारण त्यामागचा तर्क त्यांना कळत नाही. उलटपक्षी  ब्लॅक पँथर, आयर्नमॅन जेव्हा अशाप्रकारची हत्यारं वापरतात तेव्हा त्याचा तर्क वायब्रेनियम, क्वांटम फिजिक्स असा काहीतरी दिला जातो. खरं तर हे तर्कही खोटंच असतात; पण ते ज्या पद्धतीने पडद्यावर दाखवतात, त्याने नजरबंदी होते.  निखळ करमणुकीव्यतिरिक्त सुपरहिरो सिनेमांमध्ये कमालीचा मानसिक, शारीरिक संघर्षसुद्धा असतो. ज्यात शारीरिक सीमांना पार करत एक हिरो अशक्यप्राय गोष्टी शक्य करून दाखवतो, प्रेक्षकांना भावनिक आवाहन करतो आणि असे नायक तरुण पिढीला नुसते आकर्षितच करत नाहीत, तर प्रेरणाही देतात. याकारणानेच बॅट मॅन, स्पायडर मॅन, कॅप्टन अमेरिका यांना काल्पनिक पात्र असतानाही आयकॉनिक स्टेटस प्राप्त झालंय आणि हा एक असा विभाग आहे जिथे भारतीय नायक हमखास अपयशी ठरतात.भारतातलं प्रचंड मार्केट लक्षात घेत आता आंतरराष्ट्रीय सिनेमांच्या प्रमोशन टूर्समध्ये भारतालाही सामील केलं जातं. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांचा ओढा साहजिकच आतंरराष्ट्रीय सिनेमांकडे वाढत चाललाय. यात बरेचजण पियर प्रेशरमुळेसुद्धा ओढले जातात. जगभरात एखाद्या गोष्टीची चर्चा सुरू असताना आपल्याला त्यातलं काहीच माहीत नसल्याच्या विचित्र तणावातूनही अनेकजण या सिनेमांकडे ओढले जातात.भारतीय नायकांबाबत होती/आहे, तशीच किंवा त्याहून जास्त तीव्र व्यक्तिपूजेची भावना सुपरहिरोबाबतही आहेच आणि ती कदाचित पुढचं नवीन फॅड निर्माण होईपर्यंतच टिकून राहील. पण सध्यातरी त्यामुळे भारताच्या तरुण प्रेक्षकांपैकी एका मोठय़ा वर्गाने पॅन्टचा बेल्ट हलवत  ‘हुड हुड दबंग’ म्हणत नाचणार्‍या नायकाकडे पाठ फिरवली आहे, हे खरंच!त्यांचे  ‘हिरो’ वेगळे आहेत, आणि त्यातले जवळपास सगळेच ‘तिकडचे’ आहेत! 

‘स्पॉयलर्स’पासून वाचण्यासाठी  ‘ऑफलाईन’ पलायन..

1. जगभरचे प्रेक्षक एमसीयूच्या प्रत्येक सिनेमाची उत्कंठेने वाट पाहतात, तिकीट खिडकीवर गर्दी करतात. एंडगेमने तर कहर केला आहे.2. एंडगेमच्या निमित्ताने भारतात ज्याच्या-त्याच्या तोंडी आणखी एक शब्द आला : स्पॉयलर्स! सिनेमातल्या कोण पात्राचं काय होतं, याचा सस्पेन्स आधीच फोडणे.3. असे स्पॉयलर्स आपल्याला मिळू नयेत म्हणून रणनीती आखणं, सिनेमातला सस्पेन्स माहीत होऊ नये, किंवा दुसर्‍या  प्रेक्षकांचा अनुभव खराब होऊ नये म्हणून रिलीजनंतर इंटरनेटपासून लांब राहणं, सिनेमा स्पॉइल न करण्याचा अलिखित नियम पाळणं,  ‘स्पॉईलर देणार नाही’ अशी वचनं/आणाभाका देणंघेणं यासारख्या काही अनोख्या सवयी या फॅन्सनी शिस्तीने अंगीकारल्या आहेत. 4. सिनेमाविषयीच्या या अनोख्या भक्तीभावानं जग अक्षरश: अचंबित आहे आणि ज्यांना यामागच्या भावना कळत नाहीत ते या एकनिष्ठ फॅन्सची टरही उडवतात.(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)

g.pavan018@gmail.com